CURRENT AFFAIRS 31 AUGUST 2018

302
0
Share:

? 1. सौर प्रकल्पासाठी वीज खरेदी करार

 • ऊर्जा आणि विशेषतः कृषी क्षेत्रासाठी राबवल्या गेलेल्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत महानिर्मितीच्या 500 मेगावॅट क्षमतेचा सौर प्रकल्प उभारण्यात गती मिळणार आहे
 • त्यानुसार पहिल्या टप्प्यात 200 मेगावॅट क्षमतेचा सौर प्रकल्प मार्गी लावण्यात महानिर्मितीला यश मिळाले आहे
 • हे सर्व प्रकल्प विदर्भ मराठवाडा पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्र येथे उभारण्यात येणार आहे
 • यानुसार महानिर्मिती व संबंधित विकसक यांच्यात पीपीएफ या सर्व प्रकल्पांसाठी वीज खरेदी करार झाले आहेत

? 2. महाराष्ट्रातील सोळा जिल्ह्यांत मुलींच्या जन्मदरात वाढ

 • महाराष्ट्रातील सोळा जिल्ह्यांसह देशभरातील 161 जिल्ह्यांमध्ये दर हजारी 850 पेक्षा कमी झालेला मुलींचा जन्मदर आता बेटी बचाव बेटी पढाव अभियानांतर्गत 920 – 930 पर्यंत पोहोचला आहे
 • चंद्रपुर गडचिरोली रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये तर तो एक हजारापेक्षा जास्त झाला असल्याचे सकारात्मक चाचित्र निर्माण झाले आहे
 • गर्भलिंगनिदान रोखण्याचे आव्हान पेलण्यासाठी राज्यात सोनोग्राफी यंत्राला अॅक्टिव्ह ट्रॅकर बसवण्याची गरज मांडली जात आहे
 • 22 जानेवारी 2015 रोजी हरियाणा राज्यातील पाणीपत येथून बेटी बचाव बेटी पढाव योजनेचा शुभारंभ केला
 • अभियानाची राष्ट्रीय संयोजक म्हणून जळगाव जिल्ह्याचे डॉक्टर राजेंद्र फडके यांची नियुक्ती करण्यात आली
 • पंजाब हरयाणा गुजरात तमिळनाडू कर्नाटक उत्तरप्रदेश बिहार महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये मुलींचा जन्मदर 850 पेक्षा कमी झाला होता
 • 850 पर्यंत असलेल्या मुलींचा जन्मदर आता 920 यापुढे पोचला असल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले
 • वाढत्या श्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी प्रसूतीपूर्व निदानतंत्र कायदा 1994 लागू करण्यात आला आहे
 • वयानुसार प्रस्तुती पूर्व लिंग निदान करणे हा गुन्हा आहे तर हजारी मुलांमागे मुलींचे प्रमाण वाढावे हा यामागचा उद्देश आहे
 • महाराष्ट्रासह देशभरातील सर्व ठिकाणी ‘अॅक्टिव्ह ट्रॅकर’ अनिर्वाय करण्याची आवश्यकता असल्याचे डॉक्टर फडके यांनी सांगितले

? 3. बांबूंचा वापर करून पथदर्शी गावांची निर्मिती

 • राज्यात संघटित बांबू बाजाराला चालना देण्यासाठी बांबूंचा वापर करून पथदर्शी गावाची निर्मिती केली जाणार आहे यासाठी राज्य शासन आणि टाटा ट्रस्ट भागीदारीतून ‘ बांबू प्रवर्तन प्रतिष्ठान महाराष्ट्र’ ही कंपनी स्थापन करण्यात आली आहे
 • या कंपनीद्वारे घर बांधणीत बांबूचा वापर करून पथदर्शी गावाची निर्मिती करणे, बांबू अगरबत्ती प्रकल्प उभारणे, माहिती केंद्र सुरू करून गावात बांबूचे मूल्यवर्धन व उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत
 • अर्थ व वन मंत्री सुधीर मुनगंटीवार  यांनी बांबू विभागाच्या विकासासाठी बहुभाग धारकांसाठी राज्य बांबू प्रवर्तन यंत्रणा स्थापन करण्याची घोषणा  18 मार्च 2017 सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करताना केली होती
 • पहिल्या तीन वर्षात कंपनीकडून राज्यात पाच केंद्र सुरू करण्यात येणार आहेत
 • सुमारे 10 ते 16 गावांचा संक्षिप्त आराखडा तयार केला जाणार आहे
 • स्थापनेसाठी 2018-19 या अर्थसंकल्पात 20 कोटींचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे तर टाटा ट्रस्ट पाच कोटी रुपये देणार आहे
 • कंपनीच्या अध्यक्षांचा कालावधी दोन वर्षांचा राहणार आहे
 • पेसा कायद्यामुळे अनुसूचित क्षेत्रातील वनांचे व्यवस्थापन करण्याचा अधिकार स्थानिक लोकांना व ग्रामसभेत असल्याने बांबूची विक्री केली जाणार आहे
 • बांबू प्रवर्तन प्रतिष्ठान महाराष्ट्र ही कंपनी गडचिरोली अगरबत्ती प्रकल्पाच्या धर्तीवर अगरबत्ती प्रकल्पांना प्रोत्साहन देणार आहे
 • चंद्रपूर मुल मार्गावर चिचपल्ली येथे बांबू संशोधन केंद्र उभारण्यात येत आहे विशेष म्हणजे या संशोधन केंद्राच्या इमारतीची निर्मिती बांबू पासून केली जात आहे
 • 17 कोटी निधी खर्च करून ही इमारत बांधण्यात येत आहे

? 4. सोयाबीन कापसावरील रोगांबाबत बंगळुरूतील संस्थेच्या वैज्ञानिकांकडून संशोधन

 • राज्यात एक कोटी 49 लाख हेक्टर खरिपाचे क्षेत्र असून त्यापैकी अंशी लाख हेक्‍टरवर सोयाबीन व कापसाचा पेरा आहे
 • रोगराई किडा व विविध कारणांनी शेतकऱ्यांसमोर येणाऱ्या अडचणी कमी करण्यासाठी बंगळूर येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स या संस्थेतील वैज्ञानिक प्रायोगिक तत्त्वावर लातूर जिल्ह्यात सोयाबीन तर यवतमाळ जिल्ह्यात कापसावर संशोधन  करणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी दिली
 • राज्यातील कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांसमोर आगामी दोन वर्ष काम करण्यास आपण तयार असल्याचे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स  येथील शास्त्रज्ञांनी सांगितले
 • हे तंत्रज्ञान राज्यातील शास्त्रज्ञांना व संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना शिकवले जाईल
 • या संशोधनाचे क्षेत्र मोजता येईल अपेक्षित उत्पादनाचा अंदाज काढता येईल, किटकनाशकांची फवारणी करता येईल, नेमके कोणते रोग पिकावर पडले आहेत याची माहिती घेता येईल
 • ड्रोनच्या साहाय्याने फवारणी केल्याने नेमकेपणाने फवारणी होईल व खर्चात बचत होईल.

? 5. इरम हबीब बनणार पहिली काश्मिरी मुस्लिम महिला वैमानिक

 • तीस वर्षीय इरम हबीब ही वैमानिक बनणारी काश्मीरमधील पहिली मुस्लिम महिला ठरणार आहे
 • पुढील महिन्यात इरम हबीब खाजगी विमान कंपनीत पायलट म्हणून रुजू होत आहे
 • दोन वर्षांपूर्वी तन्वी रैना या काश्मिरी पंडित कुटुंबातील मुलींन वैमानिक होत काश्मीरमधील पहिली महिला वैमानिक होण्याचा मान पटकावला होता
 • तर गेल्या वर्षी आयेशा अझीझ या 21 वर्षीय तरुणीने भारतातील सगळ्यात तरुण विद्यार्थी वैमानिक ठरण्याचा मान मिळवला होता
 • व्यवसायिक वैमानिकाचा परवाना मिळविण्यासाठी इरम सध्या दिल्लीमध्ये प्रशिक्षण घेत असून वैमानिकांना प्रशिक्षण तिने दोन वर्षांपूर्वी  अमेरिकेतील मयामी येथे घेतला आहे
 • कमर्शियल पायलट लायसन मिळाल्यानंतर पुढील महिन्यात इरम खाजगी विमान कंपनीत वैमानिक म्हणून रुजू होणार  असल्याचे वृत्त आहे.

? 6. आरसीबीच्या प्रशिक्षक गॅरी कस्टर्न यांची नियुक्ती

 • आयपीएल मध्ये विराट कोहली यांच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाच्या प्रशिक्षकपदी दक्षिण आफ्रिकेचे माजी फलंदाज गॅरी कर्स्टन यांची नियुक्ती करण्यात आली आहे
 • गेली अनेक वर्ष न्यूझीलंडचा माजी कर्णधार डॅनिअल व्हिटोरी संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी सांभाळत होता
 • 2011साली भारताच्या विश्वचषक विजेत्या संघाचे गॅरी कर्स्टन प्रशिक्षक होते
 • याचबरोबर अकराव्या हंगामात गॅरी कर्स्टन यांनी आरसीबीचा फलंदाजी प्रशिक्षक काम पाहिलं होतं

? 7. विमानतळाचे नाव ‘छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ’

 • ‘छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ’अशी सुधारणा मुंबई विमानतळाच्या नावात करण्यात आली आहे
 • यापूर्वी विमानतळाला ‘छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ’ असे नाव होते

? 8. गरीब कुटुंबांना स्वस्त दरात मिळणार इंडक्शन किंवा सोलर कुकर

 • ज्यांच्या घरात वीज पोहोचली व पोहोचणार आहे अशा ग्रामीण भागातील गरीब कुटुंबांना स्वयंपाकासाठी सरकार सोलर व इंडक्शन कुकर स्वस्त दरात देणार आहे
 • उर्जा मंत्रालयाची ही नवी योजना आहे
 • ऊर्जा मंत्रालयाच्या ईईएसएल या सरकारी कंपनीकडे वितरणाचे काम सोपविण्यात आले आहे
 • ऊर्जा राज्यमंत्री आर के सिंह यांनी सर्व राज्यांच्या ऊर्जामंत्र्यांना प्रत्येक घरात वीज पोहोचवण्याचे काम लवकर पूर्ण करण्याचे आव्हान केले आहे
 • केंद्र सरकारने यंदाच्या 31 डिसेंबर पर्यंत प्रत्येक घरात विजेचे बल्ब पोहोचविण्याचा संकल्प केला आहे

? 9. आशियाई क्रीडा स्पर्धा नौकनयन ‘सेलिंग’  प्रकारात भारताला तीन पदके

 1. नौकानयन स्पर्धेत भारताने तीन पदके जिंकली आहेत
 2. नौकानयन स्पर्धेतील सेलिंग 49 ईआर एफएक्स  या क्रीडाप्रकारात भारतीय महिला संघाच्या वर्षा गौतम आणि श्वेता शवरेगर यांनी दुसरे स्थान पटकावत रौप्यपदक पटकावले आहे
 3. नौकानयन सेलिंग स्पर्धेतच पुरुषांच्या गटात वरूण ठक्कर, गणपती चेगप्पा यांनी कांस्यपदक पटकावले आहे
 4. हर्शिता तोमर हिने ओपन लेजर 7 स्पर्धेत कांस्यपदक पटकावले आहेत

? 10. बॉक्सवर विकास कृष्ण सलग तीन   आशियाई क्रीडा स्पर्धेत पदक जिंकण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे

 • जकार्तामध्ये सुरू असलेल्या अशी क्रीडा स्पर्धेत हिंदुस्तानचा आघाडीचा बॉक्सर विकास कृष्ण जायबंदी झाल्याने उपांत्य फेरीचा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला नाही
 • सामना नो खेळल्याने विकासला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले
 • विकासने सलग तीन आशियाई क्रीडा स्पर्धेत पदक जिंकण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे
 • अशी कामगिरी करणारा तो पहिला हिंदुस्तानी बॉक्सर आहे
 • विकासने 2010 मध्ये 60 किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकले होते
 • 2014 मध्ये कांस्यपदकावर कब्जा केला होता
 • दरम्यान विकासने याच वर्षी गोल्ड कोस्ट मध्ये आयोजित कॉमनवेल्थ गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकले होते

? 11. YOUTH BOXING CHAMPIONSHIP  – भारताच्या नीतूला सुवर्णपदक

 • बुडापेस्ट येथे सुरू असलेल्या YOUTH BOXING CHAMPIONSHIP स्पर्धेत भारताच्या नितुने सुवर्णपदकाची कमाई केली आहे
 • या स्पर्धेत नितुने सलग दुसऱ्या वर्षात सुवर्णपदकाची कमाई केली आहे
 • 48 किलो वजनी गटात थायलंडच्या नीलदा मेकॉनचा पराभव केला
 • मागच्या वर्षी गुवाहटीत झालेल्या स्पर्धेतही नितुने सुवर्णपदक जिंकलं होतं

? 12. नासाने केल्या गुरु ग्रहावरील ग्रेट रेड परिसरात पाणी असल्याचा दावा

 • नासाच्या शास्त्रज्ञांकडून गुरु ग्रहावरील ग्रेट रेड परिसरात पाणी असल्याचा दावा करण्यात आला असून पाणी तडक दिसून आल्याचे सांगण्यात आले आहे
 • पाणी ऑक्सिजन पासून तयार होते ऑक्सिजनचे  प्रमाण गुरू ग्रहावर सुर्यापेक्षा 9  पट जास्त आहे
 • गुरुचा उपग्रहावरील बराच भाग बर्फाने अच्छादलेला असल्यामुळे ग्रहावर पाणी असण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे
 • गुरू हा पृथ्वी नंतरचा पहिला बाष्परूपात पाणी सापडलेला ग्रह आहे शिवाय ग्रहाची गुरुत्वाकर्षण शक्ती पृथ्वीसारखेच आहे.

? 13. ऊबर कंपनी देणार उड्डाण करून घेऊन जाणारी टॅक्सी सेवा

 • भारतात लवकर उड्डाण करून घेऊन जाणारी टॅक्सी सेवा सुरू होणार आहे
 • यासाठी टॅक्सी सेवा देणाऱ्या उबेर कंपनीने अत्याधुनिक टॅक्सी सेवा देण्याचा विचार केला आहे
 • उबेर एलिवेट ही सेवा आता देशभरात दिली जाणार आहे
 • अत्याधुनिक हवाई टॅक्सी सेवा उबेर एलिवेट ही सेवा अमेरिकेच्या बाहेर म्हणजे भारत जपान ऑस्ट्रेलिया ब्राझील आणि फ्रान्स येथे पुरवली जाणार आहे
 • तसेच अमेरिकेत ही सेवा लॉस एंजिल्समध्ये देखील दिली जाणार आहे
 • कंपनीने दिलेल्या माहितीनुसार टॅक्सी परीक्षण उड्डाण 2020 मध्ये पुरवली जाणार आहे
 • यातील तीन शहरांमध्ये 2023 पर्यंत व्यावसायिकरित्या या सेवेला सुरुवात होईल असे देखील सांगितले आहे
 • उबेर एव्हिएशन प्रोग्राममध्ये एरिक एलिसनने  सांगितले की या सेवेत तुम्ही फक्त एक बटन दाबून तुमची उड्डाण सेवा बोलावू शकता.

? 14. फिलिपाईन्सकडून भारताचे अनुकरण, स्वतःचे आधारकार्ड सुरू

 • फिलिपाईन्स या देशाने भारताचे अनुकरण केले असून भारतातील ‘आधार’प्रमाणेच बायोमेट्रिक ओळखीची यंत्रणा सुरू करण्याची घोषणा केली आहे. ही यंत्रणा ‘आधार’ कार्डप्रमाणे असेल.
 • ऑगस्ट महिन्याच्या सुरूवातीला या संदर्भातील कायदा फिलिपाईन्सच्या संसदेने मंजूर केला होता.
 • त्या अंतर्गत सुरू करण्यात येणाऱ्या कार्यक्रमाची सूत्रे सांख्यिकी खात्याच्या प्रमुख लिसा ग्रेस बर्सेल्स यांच्या हाती देण्यात आली आहेत.
 • त्याअंतर्गत फिलिपिनो नागरिकांना स्वतःची खास ओळख मिळेल तसेच सरकारी सेवा, बँक खाती आणि नोकऱ्या मिळविण्यास साहाय्य होईल.
 • यात पहिल्या टप्प्यात लोकांच्या डोळ्यांचे स्कॅन, बोटांचे ठसे आणि चेहरेपट्टी यांसारखी माहिती गोळा करण्यात येईल.
 • देशात राहणाऱ्या सर्व 10 कोटी 60 लाख लोकांची नोंदणी करून त्यांना ओळख देण्याचे काम 2022 पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य यात ठेवण्यात आले आहे.

? 15.अमेरिकेत गुप्तरोगांचे प्रमाण सर्वोच्च पातळीवर

 • लैंगिक संबंधातून होणाऱ्या गुप्तरोगांचे प्रमाम अमेरिकेत सर्वोच्च पातळीवर गेला आहे, असे सरकारी आरोग्य खात्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
 • क्लॅमिडिया, गोनोऱ्हिया आणि सिफिलिस अशा रोगांचा यांमध्ये समावेश आहे.
 • दारिद्र्य, बदनामीची भीती, भेदभाव आणि मादक द्रव्यांचा वापर यांमुळे गुप्तरोग वाढतात असे यापूर्वीच्या काही संशोधनातून दिसून आले होते.
 • अमेरिकेत 2017 साली क्लॅमिडिया, गोनोऱ्हिया आणि सिफिलिस या रोगांची सुमारे 23 लाख प्रकरणे नोंदविण्यात आली.
 • अशी माहिती सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (सीडीसी) या संस्थेने म्हटले आहे.