Current Affairs 30 OCTOBER 2018

552
0
Share:

 

? 1. ज्येष्ठ संगीतकार यशवंत देव यांचे निधन

 • मराठी संगीत विश्वावर आधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ संगीतकार, गीतकार यशवंत देव यांचे वयाच्या ९१ व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झाले.
 • अभंग, भावगीत, लोकगीत, युगलगीतांना त्यांनी संगीतबद्ध केले.
 • यशवंत देव यांचा जन्म १ नोव्हेंबर १९२६ साली झाला होता.
 • वडिलांकडूनच त्यांना संगीताचे सुरुवातीचे धडे मिळाले. तेच त्यांचे पहिले गुरू होते.त्यांच्याकडून त्यांना तालाचे बाळकडू मिळाले.
 • जी.एन. जोशी आणि गजाननराव वाटवे यांच्या शब्दप्रधान गायकीमुळेच यशवंत देव सुगम संगीताकडे वळले.
 • भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी’, ‘असेन मी नसेन मी’, ‘अखेरचे येतील माझ्या…’ ‘दिवस तुझे हे फुलायचे’, ‘स्वर आले दुरुनी’, ‘तिन्ही लोक आनंदाने’, ‘जीवनात ही घडी’ अशा शेकडो गीतांना संगीतसाज चढवून यशवंत देव यांनी भावसंगीताचे विश्व समृद्ध केले होते.
 • चित्रपटाबरोबरच अनेक नाटकांसाठीही त्यांनी संगीत दिले होते.
 • आकाशवाणीवर सुगम संगीत विभागात सतारवादक म्हणून त्यांनी कारकीर्द सुरू केली होती .
 • मुंबई आकाशवाणी केंद्रावर त्यांनी सादर केलेला ‘भावसरगम’ हा कार्यक्रम चांगलाच गाजला.
 • त्याद्वारेच, संगीतकार, गायक आणि कवी ही त्यांची ओळख महाराष्ट्राला झाली.
 • ग. दि. माडगुळकरांच्या सचिन शंकर बॅले ग्रुपने सादर केलेल्या ‘कथा ही रामजानकीची’ या नृत्यनाटिकेला यशवंत देव यांनी संगीत दिले होते.
 • यशवंत देव यांना गदिमा पुरस्कार, गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार, शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानचा राम कदम कलागौरव पुरस्कार असे विविध पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते

? 2. ९३ वर्षांच्या मराठमोळ्या शिल्पकाराने साकारला जगातील सर्वात उंच पुतळा

 • जगातील सर्वात उंच पुतळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ची. उद्या पटेल यांच्या जयंतीनिमित्त या १८२ मीटर उंच असलेल्या पुतळ्याचे लोकार्पण केले जाईल.
 • स्टॅच्यू ऑफ लिबर्टीपेक्षा दुप्पट उंच असणारा हा पुतळा भारताला सर्वाधिक उंचीचा पुतळा असणारा देश अशी नवी ओळख मिळवून देईल.
 • वल्लभाई पटेल यांचा हा पुतळा साकारणारे शिल्पकार आहेत ९३ वर्षांचे राम सुतार.
 • धुळ्यामधील गोंडूर या छोट्याश्या गावी एका गरीब कुटुंबात जन्म झालेल्या राम सुतार यांनी अनेक प्रसिद्ध शिल्पे आपल्या हातांनी घडवली आहेत
 • राम सुतार हे स्वातंत्र्योत्तर भारतीय स्मारकशिल्पांचा इतिहास घडवणाऱ्यांपैकी एक आहेत.
 • त्यांनी मुंबईच्या ‘जेजे स्कूल ऑफ आर्ट’मध्ये आपले शिक्षण पूर्ण केले.
 • वयाने ९३ वर्षांचे असलेल्या राम सुतार यांनी १९६० पासून स्वतंत्रपणे स्टुडिओ थाटला.
 • त्यांनी संसद भवनाच्या आवारातील मौलाना आझाद (१८ फूट), इंदिरा गांधी (१७ फूट),
 • राजीव गांधी (१२ फूट), गोविंदवल्लभ पंत (१० फूट) आणि जगजीवनराम (९ फूट) असे अनेक पुतळे घडविले आहेत.
 • छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पंडित जवाहरलाल नेहरू, नेताजी सुभाषचंद्र बोस, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्या शिल्पांसह अनेक शिल्पांची निर्मिती त्यांनी केली आहे.
 • फ्रान्स, इटली, अर्जेंटिना, रशिया, इंग्लंड या ठिकाणीही त्यांनी साकारलेली शिल्पं उभी आहेत.
 • रवीन्द्रनाथ टागोर यांचा टोकिओतील पुतळा राम सुतार यांनी निर्मिलेला आहे
 • गांधीजींचे त्यांच्या स्टुडिओत घडलेले अनेक अर्धपुतळे भारत सरकारने परदेशांना भेट म्हणून दिलेले आहेत.
 • अरबी समुद्रातील शिवस्मारक, इंदू मिलचे प्रस्तावित आंबेडकर स्मारक आणि ३१ ऑक्टोबरला उद्घाटन होणारा चिनी बनावटीचा सरदार पटेल यांचा पुतळा ही, उंचीत एकमेकांशी स्पर्धा करणारी तिन्ही स्मारकशिल्पे राम सुतार यांच्या मूळ कल्पनेतून उतरली आहेत
 • काही दिवसांपूर्वीच त्यांना केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाकडून देण्यात येणारा २०१६ या वर्षासाठीचा टागोर पुरस्कार जाहीर झाला. एक कोटी रुपये, प्रमाणपत्र आणि पारंपारिक हस्तकला शिल्प असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

? 3. प्रदूषण, विषारी वायूमुळे २०१६ या वर्षात १ लाखापेक्षा जास्त मुलांचा मृत्यू-WHO

 • जागतिक आरोग्य संघटना अर्थात WHO ने दिलेल्या अहवालानुसार २०१६ या एका वर्षात भारतात प्रदूषण आणि विषारी वायू यामुळे १ लाख २५ हजार मुलांचा मृत्यू झाला.
 • प्रदूषण आणि विषारी हवेचा परिणाम पाच वर्षांखालील मुलांवर सर्वाधिक झाल्याचंही WHO ने आपल्या अहवालात म्हटलं आहे.
 • वायू प्रदूषण, बाल आरोग्य आणि स्वच्छ हवा या संदर्भातला एक अहवाल WHO ने समोर आणला आहे.
 • या अहवालात पाच देशांची नावं नमूद करण्यात आली आहे.
 • पाच देशांपैकी एक नाव भारताचंही आहे कारण भारतात प्रदुषणाचं प्रमाण जास्त आहे.
 • स्वयंपाक घरात जेवण तयार होत असताना निर्माण होणारे वायू प्रदूषण आणि घराबाहेर होणारे प्रदूषण याचा परिणाम अनेक मुलांच्या आरोग्यावर झाला आहे.
 • ग्रीनपीसनेही या संदर्भातला एक अहवाल दिला आहे.
 • ज्यानुसार भारतात होणारं प्रदूषण मोठ्या प्रमाणावर आहे. एवढंच नाही तर दिल्लीत होणारं प्रदूषण सर्वाधिक आहे असंही ग्रीनपीसने त्यांच्या अहवालात म्हटलं आहे.

? 4. न्यूझीलंडचे माजी प्रशिक्षक माईक हेसन किंग्ज इलेव्हन पंजाबच्या प्रशिक्षकपदी

 • न्यूझीलंडचे माजी प्रशिक्षक माईक हेसन यांची आयपीएलमधील महत्वाचा संघ मानला जाणाऱ्या किंग्ज इलेव्हन पंबाजच्या प्रशिक्षकपदावर नेमणूक करण्यात आलेली आहे.
 • हेसन यांच्याशी संघ प्रशासनाने दोन वर्षांचा करार केला असून,
 • हेसन ब्रॅड हॉज यांची जागा घेतील.
 • २०१९ विश्वचषकासाठी वर्षभरापेक्षा कमी कालावधी शिल्लक राहिलेला असताना हेसन यांनी व्यस्त वेळापत्रकाचं कारण देत प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला होता.
 • हेसन यांच्या मार्गदर्शनाखालीच न्यूझीलंडच्या संघाने २०१५ साली झालेल्या टी-२० विश्वचषकाची अंतिम फेरी गाठली होती.

? 5. ५ वे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन पैठणमध्ये

 • २ व ३ फेब्रुवारी २०१९ रोजी संत एकनाथ ज्ञानपीठ, माहेश्वरी जनकल्याण सभागृह, पैठण, जि. औरंगाबाद येथे दोन दिवसीय ५ वे अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलेले आहे.
 • पैठण येथील नियोजित संमेलनाचे अध्यक्षस्थान संमेलनाध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक तथा शेतकरी कवी इंद्रजीत भालेराव भूषविणार आहेत.
 • संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून शेतकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते अॅड सतीश बोरुळकर,
 • पैठण यांनी तर अ.भा.मराठी शेतकरी साहित्य चळवळीचे संस्थापक अध्यक्ष गंगाधर मुटे यांनी ५ व्या अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष म्हणून जबाबदारी स्वीकारली आहे.
 • दोन दिवस चालणाऱ्या या संमेलनात मुक्त बाजारव्यवस्थेत शेतीचे भवितव्य जनुकीय तंत्रज्ञान : शोध आणि बोध सनातन शेतीचा चक्रव्यूह कर्जमुक्ती शेतीची कि शेतकऱ्यांची? शेतीप्रधान साहित्य आणि साहित्यिक बदलती शेती, बदलती सरकार आणि लावू पणाला प्राण! अशा विविध विषयावरील एकूण ७ परिसंवाद राहणार आहे.
 • या परिसंवादात ज्येष्ठ साहित्यिक, ज्येष्ठ शेतकरी नेते, शेती अर्थशास्त्राचे गाढे अभ्यासक, अर्थतज्ज्ञ आदी अनुभवी वक्ते भाग घेणार असल्याने हे या संमेलनाचे वैशिष्ट्यपूर्ण एवेगळेपण असणार आहे.

? 6. जगातील सर्वांत मोठे विमानतळ, टर्कीची राजधानी इस्तांबुलमध्ये

 • टर्कीची राजधानी इस्तांबुलमध्ये जगातील सर्वांत मोठे विमानतळ बांधण्यात आले आहे.
 • या विमानतळाचे उद्घाटन 29 ऑक्टोबरला राष्ट्रपती रेचप तैयप एर्डोअन यांच्या हस्ते करण्यात आले.
 • जवळपास 9 कोटी प्रवाशांची क्षमता असलेले हे विमानतळ 19 हजार एकरात पसरले आहे.
 • तसेच, 250 एअरलाइन्स 350 पेक्षा जास्त जागेवरुन उड्डाणे करतील असे हे विमानतळ असून संपूर्ण हायटेक बनविले आहे.
 • विमानतळावर ऑर्टिफीशियल इंटेलिजन्सच्या मदतीने सर्व सुविधा पुरविल्या जाणार आहेत. याचबरोबर, विमानतळ एटीसी ट्युलिप डिझाइनमध्ये करण्यात आले आहे.
 • या विमानतळाची निर्मिती करण्यासाठी जवळपास 10 वर्षांचा कालावधी लागला आहे.
 • 2028 पर्यंत या विमानतळावरुन 20 कोटी लोक प्रवास करु शकणार आहेत. दरम्यान, जगात सध्या अटलांटा विमानतळावरुन 10 कोटी लोक प्रवास करतात.

? 7. फेसबुकने 6 भारतीय भाषांमध्ये लाँच केली डिजिटल साक्षरता लायब्ररी

 • फेसबुकने तीन लाख भारतीयांना डिजिटल सुरक्षेचं प्रशिक्षण देण्यासाठी डिजिटल साक्षरता लायब्ररी लाँच केली आहे.
 • बांगला , हिंदी, तमिळ, तेलगु, कन्नड आणि मल्याळम या सहा भारतीय भाषांमध्ये लायब्ररी आहे.
 • दक्षिण आशिया सुरक्षा संमेलनात याबाबत घोषणा करण्यात आली आहे.
 • भारत, श्रीलंका, नेपाळ, बांगलादेश आणि अफगाणिस्तान पाच देशांमधील 70 संघटनांनी या संमेलनात भाग घेतला होता.
 • फेसबुकने याशिवाय सायबर पीस फाऊंडेशन आणि डिपार्टमेंट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज यांच्या सहयोगानं दिल्ली आयआयटीमध्ये बाल सुरक्षा हॅकाथनचं आयोजन केलं आहे.
 • फेसबुकच्या एंटीगोन डेविस यांनी स्थानिक भागीदारांसोबत आम्ही डिजिटल साक्षरता लायब्ररी, बाल सुरक्षा हॅकाथन आणि अन्य ऑफलाईन प्रशिक्षणाचे कार्यक्रम करतो.
 • डिसेंबर 2018 पर्यंत भारतातील जवळपास तीन लाख लोकांना प्रशिक्षण देण्याचा मानस असल्याचं डेविस यांनी सांगितलं.

? 8. अँगेला मर्केल: 2021 मध्ये घेणार राजकीय संन्यास, बर्लिनमध्ये केली घोषणा

 • अँगेला मर्केल यांनी 2021 मध्ये जर्मनीच्या चान्सलरपदावरून तसंच राजकारणातून संन्यास घेणार असल्याची घोषणा केली आहे.
 • जर्मनीत नुकत्याच झालेल्या प्रांतीय निवडणुकांमध्ये त्यांच्या ख्रिश्चन डेमोक्रॅटिक युनियन या पक्षाची हार झाली आहे. त्या
 • डिसेंबरमध्ये त्यांच्या पक्षाच्या होणाऱ्या अधिवेशनात नेतेपदासाठी दावा करणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
 • 2000 साला पासून पक्षाची धुरा त्यांच्या हातात आहे.
 • चान्सलरपदाची सलग चौथी कारकिर्द संपल्यानंतर कुठलही राजकीय पद स्वीकारणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
 • गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये अँगेला मर्केल यांची चौथ्यांदा जर्मनीच्या चान्सलरपदी निवड झाली होती.
 • मर्केल यांचा आजवरचा प्रवास थक्क करणारा आहे
 • अँगेला मर्केल यांचा जन्म 17 जुलै 1954 ला हँबर्गमध्ये झाला. त्यांचे वडील पूर्व जर्मनीतल्या एका गावात पास्टर म्हणजे ख्रिस्ती धर्मगुरू होते.
 • बर्लिनबाहेर ग्रामीण भागात त्या लहानाच्या मोठ्या झाल्या. त्यांनी फिजिक्समध्ये डॉक्टरेट मिळवली आहे.
 • 2015 साली सीरियातल्या निर्वासितांसाठी देशाच्या सीमा खुल्या करण्याच्या त्यांच्या निर्णयाचे बरेच पडसाद उमटले होते.
 • पूर्व बर्लिनमध्ये संशोधन क्षेत्रात काम करणाऱ्या एका संस्थेत त्या केमिस्ट म्हणून काम करत होत्या. 1
 • 1989 ला त्या पूर्व जर्मनीतील लोकशाही चळवळीत सहभागी झाल्या होत्या. बर्लिनची भिंत कोसळल्यानंतर जर्मन सरकारमध्ये त्यांना प्रवक्त्या म्हणून संधी मिळाली.
 • 1990 ला जर्मनीचं एकीकरण होण्यापूर्वी त्या सीडीयूमध्ये सहभागी झाल्या. पुढच्या वर्षी त्यांची नेमणूक महिला आणि युवा मंत्री म्हणून झाली.
 • 1999 तत्कालिन पक्षप्रमुख हॅल्मट कोल यांना पक्ष निधीतल्या भ्रष्टाचाराच्या आरोपावरून पायउतार व्हावं लागलं. त्यानंतर 2000 ला मर्कल यांची नियुक्ती ख्रिश्चन डेमोक्रॅटिक युनियनच्या (CDU) नेत्या म्हणून झाली.
 • 2005 ला त्या जर्मनीच्या पहिल्या महिला चान्सलर झाल्या.

? 9. सियाचीनमध्ये ऑक्सिजन बँक, सिर्फ फाउंडेशनचा पुढाकार

 • सिर्फ फाउंडेशनच्या माध्यमातून सियाचीनमध्ये सैनिकांसाठी ऑक्सिजन पुरवठा प्रकल्प उभारण्याचा संकल्प केला आहे.
 • त्यासाठी किमान एक कोटी दहा लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.
 • त्या निर्णयाला अनेक लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. दूरदूरहून लोक त्यांना जमेल तेवढी आर्थिक मदत देत आहेत.
 • सियाचीन हा सर्वांत उंच बर्फाळ प्रदेश असून, सामरिकदृष्ट्याही तो अत्यंत महत्त्वाचा प्रदेश आहे. त्यामुळे त्या भागात तैनात असलेल्या जवानांची खूप मोठी परीक्षा असते

? 10. भारत-जपान यांच्यात सहा करारांवर स्वाक्षऱ्या

 • भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जपान दौऱ्यावर असून जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा झाल्यानंतर भारत-जपान या दोन देशांदरम्यान सहा करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
 • या करारांमध्ये हाय स्पीड रेल प्रोजेक्ट, नौदलात सहकार्य यांचा प्रामुख्याने समावेश आहे.
 • १३ व्या वार्षिक बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी व जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांच्यात झालेल्या द्विपक्षीय चर्चेत विकासावर भर दिला.
 • इंडो-पॅसिफीकवर लक्ष्य केंद्रीय करण्याचे दोन्ही देशांनी ठरवले आहे.
 • भारत आणि जपान यांच्यात परराष्ट्र मंत्री, संरक्षण मंत्री स्तरावर २+२ चर्चेसाठी सहमती झाली.
 • भारत आणि जपान यांच्यात संरक्षणामधील विकास करण्यावर लक्ष्य केंद्रीत करण्याबरोबरच डिजिटल सहकार्य, सायबरस्पेस, आरोग्य, संरक्षण, सागरी समूद्र या क्षेत्रातही सहकार्य करण्याविषयी एकमत झाल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली.
 • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल प्रोजेक्टवर या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा पार पडली. या प्रोजेक्टसाठी जपानने मंजुर केलेल्या कर्जावर सुद्धा दोन्ही देशांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत.

? 1. USFDA approved Cipla for hypertension and cardiac conditions drug

Cipla, a major drug firm, received final approval from the United Nations Food and Drug Administration (USFDA), the U.S. health regulator to market Metoprolol tablets. The drug is used to treat hypertension and various cardiac conditions. The strengths of the drug are 50mg, 100mg and 200mg.

? 2. India and Japan supports free Indo Pacific

India and Japan outlined a vision for strengthened bilateral relations at the 13th annual summit. Enhanced strategic and defence cooperation dominated the talks between Prime Minister Narendra Modi and his Japanese counterpart, Shinzo Abe. The talks accepted Japan’s formulation of a free and open Indo-Pacific as both the sides stressed their unwavering commitment to it. The concept is usually seen as a response to China’s growing dominance in the region. Mr.Abe and Mr.Modi said the India-Japan bilateral relationship was invested in upholding the rule of law and democratic values.

? 3. Jair Bolsonaro is elected as President of Brazil

Jair Bolsonaro, Former Army Captain, was elected as the President of Brazil. He promised a fundamental change in direction for the country. Mr.Bolsonaro, 63, will take office on January 1, 2019. Official results gave him 55.13% of the votes in the run-off election, to 44.87% for leftist opponent Fernando Haddad, with 99.99% of the ballots counted. The U.S. President Donald Trump congratulated him.Mr. Bolsonaro publicly admired the American leader.

? 4. India and Japan supports free Indo Pacific

India and Japan outlined a vision for strengthened bilateral relations at the 13th annual summit. Enhanced strategic and defence cooperation dominated the talks between Prime Minister Narendra Modi and his Japanese counterpart, Shinzo Abe. The talks accepted Japan’s formulation of a free and open Indo-Pacific as both the sides stressed their unwavering commitment to it. The concept is usually seen as a response to China’s growing dominance in the region. Mr.Abe and Mr.Modi said the India-Japan bilateral relationship was invested in upholding the rule of law and democratic values.

? 5. WhatsApp and CII collaborated to train SMEs, entrepreneurs in India

Whatsapp partnered with Confederation of Indian Industry (CII) to train small and medium enterprises (SMEs) and entrepreneurs on using the messaging platform. The main objective is to help connect and grow the SMe businesses through the social messaging platform. It consist of on-ground training around the country to explain the features and best practices on the WhatsApp Business app that was launched in January 2018.

? 6. India topped as Asias most investment savvy economy: Standard Chartered

According to a new Standard Chartered study-‘The Emerging Affluent Study 2018– Climbing the Prosperity Ladder’, India is Asia’s most investment savvy economy. The survey markets were: China, Hong Kong, India, Indonesia, Kenya, Malaysia, Nigeria, Pakistan, Singapore, South Korea, the UAE.

? 7. PM to unveil the worlds largest statue

Prime Minister Narendra Modi is set to unveil Sardar Patel’s statue, the world’s largest, on Vallabhbhai Patel’s birth anniversary on October 31 in Gujarat. The statue is a Rs.3,000 crore project. It is funded for the most part by the Gujarat government, with minor contributions from the Centre and Central PSUs. The statue is made up of 1,700 tonnes of bronze, 1,850 tonnes of bronze cladding, 70,000 metric tonnes of cement and 24,500 metric tonnes of steel. Two high-speed elevators inside can take tourists up to the statue’s chest from where around 200 visitors can view the Narmada river and the Sardar Sarovar dam over it.

? 8. State Bank of India and Hitachi Payments formed joint venture for digital payment platform

State Bank of India (SBI) and payments solution provider Hitachi Payment Services India entered into an agreement to form a joint venture for establishing a card acceptance and digital payment platform. According to the joint venture (JV), Hitachi will pick up 26 percent stake in SBI Payment Services, a wholly-owned subsidiary of SBI. The JV will have various payment options to customers and merchants.

? 9. Vedanta Ltd. gets 10 year extension for oil block

Vedanta Ltd., a mining company, won a 10-year extension of its contract for the prolific Rajasthan oil block. The extension was made under a condition that it pays a higher share of profit to the government. The 25-year contract for exploration and production of oil and gas from Barmer block RJ-ON-90/1 of Vedanta, formerly Cairn India, is due for renewal on May 14, 2020.

? 10. Worlds largest airport under one roof opened in Istanbul, Turkey

World’s largest airport terminal under one roof with a capacity to serve 90 million passengers was opened in Istanbul, Turkey. It has been constructed as a part of the phase-1A of the project – Istanbul New Airport. It has been constructed by – IGA and the first phase costed 7.5 billion Euro. It has five pier blocks as well as 77 boarding gates and 143 aero-bridges.

? 11. India and Japan signed a currency swap agreement worth USD 75 billion

India and Japan signed a currency swap agreement worth $75 billion. The agreement happened during Prime Minister Narendra Modi’s visit to Japan. The agreement aimed at a great friendship between the two countries and to further strengthen the economic cooperation.  It is expected that the swap arrangement should aid in bringing greater stability to foreign exchange and capital markets in India. Currency Swap: ♦ A currency swap involves the exchange of interest and sometimes of principal in one currency for the same in another currency ♦ Interest payments are exchanged at fixed dates through the life of the contract

? 12. Indias first container movement on inland waterways to move 16 PEPSICO containers from Kolkata to Varanasi

PepsiCo (India) will move 16 containers equivalent to 16 truckloads in the vessel MV RN Tagore which will reach Varanasi in 9-10 days. MV RN Tagore will make its return journey with fertilizers belonging to IFFCO that will be procured from its Phulpur plant near Allahabad. The vessel will be flagged off by Secretary (Shipping), Govt. of India, Shri Gopal Krishna along with Chairman, IWAI, Shri Pravir Pandey.

? 13. WHO reported that Delhi topped national charts in bad air quality

World Health Organization’s (WHO) report on most polluted cities 2018 said 14 out of the 20 most polluted cities in the world are in India. WHO reported that Delhi topped the charts of bad air quality nationally.  Also, the WHO children’s health report released on 29th October said that 93% of the world’s children under 15 years breathe polluted air. Indian environmentalists analysed the same issue in 14 cities using the Central Pollution Control Board of India (CPCB) data and concluded the same. Most cities, unlike Delhi, do not have an emergency response plan to tackle air pollution. Some of the cities like Patna and Varanasi have recently formulated action plans. There is no special governing body in place to issue advisories or mitigate the pollution at the source level instantly as in the case of the Graded Response Action Plan (GRAP).

? 14. Train 18: Indias first engineless train set for trials

It is a 16-coach prototype without a locomotive (engine) that will travel at a speed of up to 160 kmph. It was developed by the city-based Integral Coach Factory, Chennai in 18 months as part of the ‘Make In India’ initiative. It cost nearly Rs 100 crore and will cut travel time by 15 percent compared to the Shatabdi.


Latest Current Affairs Videos

Latest Current Affairs Videos