Current Affairs 30 JUNE 2020

201
0
Share:

 

🎯1. ‘टिकटॉक’सह ५९ चिनी अ‍ॅपवर बंदी

 • लडाख सीमेवरील धुमश्चक्रीनंतर भारत-चीन यांच्यात निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सोमवारी टिकटॉक, शेअरइट, ब्युटी प्लस या लोकप्रिय चिनी अ‍ॅपसह एकूण ५९ अ‍ॅपवर बंदी घातली.
 • वापरकर्त्यांची माहितीचोरी, तिचा गैरवापर, राष्ट्रीय सुरक्षेला धोका आणि नागरिकांची मागणी यांच्या आधारे बंदी घालण्यात आल्याचे माहिती तंत्रज्ञान खात्याने निवेदनाद्वारे स्पष्ट केले. देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेला धोकादायक असलेले घटक या माहितीचा गैरवापर करीत असून त्याद्वारे देशाची एकात्मता आणि सार्वभौमत्वाला धक्का पोहोचत आहे. ही अतिशय गंभीर आणि चिंताजनक बाब असून त्यावर तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे, असे केंद्रीय प्रसारण मंत्रालयाने बंदीचे आदेश जारी करताना म्हटले आहे. हे हानीकारक अ‍ॅप बंद करण्यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्रालयानेही सूचना केली होती. तसेच नागरिकांतूनही या अ‍ॅपबाबत तक्रारी येत होत्या, असेही मंत्रालयाने या आदेशांत म्हटले आहे.
 • केंद्रीय माहिती प्रसारण मंत्रालयाने माहिती तंत्रज्ञान कायद्यातील तरतुदींचा आधार घेत ही कारवाई केली. माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ‘६९अ’ मधील तरतुदींचा आधार घेत ५९ अ‍ॅपवर बंदी आणण्यात आल्याचे केंद्र सरकारने जाहीर केले. अँड्रॉइड आणि आयओएस प्रणालींवर प्रचलित असलेल्या या अ‍ॅपकडून भारतीय वापरकर्त्यांची माहिती बेकायदा साठवून भारताबाहेरील सव्‍‌र्हरना पुरवली जात असल्याच्या तक्रारी विविध माध्यमांतून करण्यात आल्या होत्या.
 • भारत आणि चीन सैन्यात गलवान खोऱ्यात संघर्ष होण्याच्या आधीपासून म्हणजे देशात करोनाचा फैलाव वाढू लागल्यापासूनच चिनी वस्तूंप्रमाणे चिनी मोबाइल आणि अ‍ॅपवरही बहिष्कार घालण्यासंदर्भात समाजमाध्यमांवरून मोहीम चालवली जात होती. ही अ‍ॅप वापरकर्त्यांच्या माहितीचा गैरवापर करीत असल्याच्या तक्रारीही सातत्याने येत होत्या. विशेषत: टिकटॉक या लोकप्रिय अ‍ॅपवरून प्रसारीत केल्या जाणाऱ्या चित्रफिती आणि संवाद यांच्याविषयी अनेकदा वादंग निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सोमवारी या अ‍ॅपवर घातलेल्या बंदीचे स्वागत होत आहे.

बंदीबाबत सरकार काय म्हणते?

 • राष्ट्रीय सुरक्षेला धोकादायक असलेले घटक माहितीच्या गैरवापरातून एकात्मता आणि सार्वभौमत्वाला धक्का पोहोचत आहेत.
 • अ‍ॅपवर बंदी घातल्यामुळे मोबाइल आणि इंटरनेट वापरणाऱ्या कोटय़वधी भारतीयांच्या हिताचे रक्षण होईल.
 • देशाची सायबर सुरक्षितता आणि सार्वभौमत्वाच्या हमीसाठी हा ‘लक्ष्यवेधी’ निर्णय आहे.

🎯2. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी

 • अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरुद्ध इराणने अटक वॉरंट जारी केलं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह इतर डझनभर व्यक्तींना ताब्यात घेण्यासाठी इराणने इंटरपोलची मदत मागितली आहे. इराणच्या बगदादमध्ये झालेल्या ड्रोन हल्ल्यात इराणच्या रिवोल्यूशनरी गार्ड आणि कुद्स फोर्सचा प्रमुख मेजर जनरल कासिम सुलेमानी 3 जानेवारीला ठार झाला होता. याप्रकरणी इराणने हे पाऊल उचललं आहे, अशी माहिती तेहरानमधील वकील अली अलकासीमर यांनी सोमवारी दिली. या संपूर्ण प्रकरणामुळे अमेरिका आणि इराणमधील तणाव आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
 • इराणमध्ये झालेल्या हल्ल्यामागे डोनाल्ड ट्रम्य यांच्यासह 30 जण असल्याचा आरोप अलकासीमर यांनी केला आहे. याच हल्ल्यात कासिम सुलेमानीचा मृत्यू झाला होता. वृत्तसंस्था आयएसएनच्या बातमीनुसार, अलकासीमर यांनी ट्रम्प यांच्याव्यतिरिक्त कुणाचंही नाव उघड केलेलं नाही.
 • फ्रान्समधील लियोनमधील इंटरपोलने याबाबत कोणतीही प्रतिक्रिया अद्याप दिलेली नाही. याबाबत इंटरपोल काही भूमिका घेईल याची शक्यताही कमी आहे. कारण कोणत्याही राजकीय मुद्यामध्ये इंटरपोल हस्तक्षेप करु शकत नाही.
 • अमेरिका आणि इराणमधील तणावादरम्यान अमेरिकेने इराणवर ड्रोन हल्ला केला होता. सुलेमानी त्याच्या फौजेसह बगदाद एअरपोर्टकडे जात असताना हा हल्ला झाला. यात सुलेमानीची मृत्यू झाला. यासह इराणच्या मोबलायझेशन फोर्सचा कमांडर अबू मेहती अल मुहंदीसही ठार झाला होता.

🎯3. संपूर्ण भारतीय बनावटीची पहिली करोना लस तयार; जुलैपासून मानवी चाचणीला होणार सुरूवात

 • देशात तसंच जगभरात करोनानं थैमान घातलं आहे. अशा परिस्थितीत करोनावरील लस विकसित करण्यासाठी सर्वच देश प्रयत्न करत आहेत. करोनावरील लस विकसित करणाऱ्या देशांमध्ये भारतदेखील आघाडीवर आहे. परंतु अशातच सोमवारी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे.
 • भारत बायोटेकनं करोनावरील लस COVAXIN तयार केल्याची सोमवारी घोषणा केली. आयसीएमआर आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ विरोलॉजी (एनआयव्ही) यांच्यासोबत मिळून त्यांनी यशस्वीरित्या भारतातील पहिली करोना लस तयार केली आहे.
 • जुलै महिन्यापासून या लसीची मानवी चाचणी सुरू केली जाणार असल्याची माहिती भारच बायोटेककडून देण्यात आली. “एसएआरएस-सीओव्ही -२ स्ट्रेनला पुण्यातील एनआयव्हीमध्ये वेगळो करण्यात आले आणि नंतर भारत बायोटेककडे वर्ग करण्यात आले. हैदराबादच्या जिनोम व्हॅलीमध्ये असलेल्या भारत बायोटेकच्या बीएसएल -3 (बायो-सेफ्टी लेव्हल 3) हाय कन्टेंनमेंट फॅसिलिटीमध्येही लस विकसित करण्यात आली,” असं कंपनीनं निवेदनात म्हटलं आहे.
 • भारतातील ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया, सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (सीडीएससीओ), आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयानं फेज १ आणि फेज २ मानवी वैद्यकीय चाचण्या सुरू करण्यास परवानगी दिली आहे. या अगोदर कंपनीने प्रीक्लिनिकल अभ्यासामधून मिळविलेले निकाल सादर केले होते. मानवी वैद्यकीय चाचण्या पुढील महिन्यात देशभरात सुरू होणार आहेत.

🎯4. “भारतात कार्बनमुक्त वाहतूक” प्रकल्प

 • आंतरराष्ट्रीय वाहतूक मंच (आयटीएफ) च्या सहकार्याने नीती आयोग 24 जून रोजी “भारतात कार्बनमुक्त वाहतूक” हा प्रकल्प सुरु करणार आहे.
 • भारत 2008 पासूनच, वाहतूक धोरण तयार करणाऱ्या आंतर-सरकारी संघटना असणाऱ्या आयटीएफ चा सदस्य आहे.
 • “भारतात कार्बनमुक्त वाहतूक” हा प्रकल्प भारतासाठी त्याच्या आवश्यकतेनुसार वाहतूक उत्सर्जन मुल्यांकन आराखडा तयार करेल.
 • “भारतात कार्बनमुक्त वाहतूक” आंतरराष्ट्रीय वाहतूक मंचच्या उपक्रमाच्या व्यापक स्तरावर भारतात राबवला जाईल. हा प्रकल्प “उदयोन्मुख अर्थव्यवस्थेतील कार्बनमुक्त वाहतूक” (डीटीईई) या प्रकल्प समूहाचा एक भाग आहे, जो जगभरातील विविध क्षेत्रांमधील वाहतूक कार्बनमुक्त करण्याला समर्थन देते.
 • भारत, अर्जेन्टीना, अझरबैजान आणि मोरोक्को सध्याचे सहभागी देश आहेत. ही परियोजना आयटीएफ आणि वुप्परटल संस्था आणि जर्मनीच्या पर्यावरण, निसर्ग संरक्षण आणि अणु ऊर्जा संस्थेचा एकत्रित प्रकल्प आहे.

🎯5. ६ राफेल लढाऊ विमानांची तुकडी २७ जुलैपर्यंत भारतात

 • सहा राफेल लढाऊ जेट विमानांची पहिली तुकडी भारताला २७ जुलैपर्यंत मिळण्याची शक्यता असून, यामुळे भारतीय हवाई दलाची लढाऊ क्षमता अधिक उंचावण्याची अपेक्षा आहे.
 • संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी २ जूनला त्यांच्या फ्रान्सच्या समपदस्थ फ्लोरेन्स पार्ली यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला.
 • फ्रान्समधील करोना महासाथीचा परिणाम न होता राफेल जेट विमाने ठरलेल्या वेळापत्रकानुसार भारताला दिली जातील, असे या वेळी त्यांनी सांगितले.
 • या विमानाची पहिली स्क्वाड्रन हवाई दलाच्या सामरिकदृष्टय़ा महत्त्वाच्या मानल्या गेलेल्या तळांपैकी अंबाला हवाई दल स्थानकात तैनात केली जाईल.

🎯6. रशियाची एनर्जिया कंपनी 2023 साली स्पेस वॉक करण्यासाठी पर्यटक पाठविणार

 • अंतराळात स्पेस वॉक करण्यासाठी खासगी पर्यटकांना पाठविण्याच्या शर्यतीत रशियाच्या एनर्जिया स्पेस कॉर्पोरेशन या कंपनीने देखील उडी घेतली आहे. कंपनी 2023 साली अंतराळ प्रवासी पाठविणार अशी योजना तयार करण्यात आली आहे.
 • त्यासाठी अमेरिकेच्या स्पेस अँडव्हेंचर या कंपनीसोबत एनर्जिया कंपनीने करार केला आहे, ज्याच्यानुसार 2023 साली 2 अंतराळ पर्यटकांना आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) स्पेस वॉकसाठी नेले जाणार आहे.
 • मोहिमेत सहभागी झालेल्या एकाला रशियाच्या नेतृत्वात एका प्रशिक्षित रशियन अंतराळयात्रीसह स्पेसवॉक करू दिले जाणार आहे.
 • याव्यतिरिक्त, अमेरिकेच्या NASA संस्थेने खासगी अंतराळ मोहिमांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने रिचर्ज ब्रॅनसनच्या व्हर्जिन गॅलेक्टिक स्पेस टुरिझम कंपनीसोबत करार केला आहे. ही कंपनी अंतराळयात्रींना अंतराळ पर्यटनासाठी पाठण्याच्या दिशेने काम करते. तसेच स्पेसएक्स कंपनीने देखील मार्चमध्ये घोषणा केली होती की क्रू ड्रॅगनमार्फत पुढच्या वर्षी तीन जणांना अंतराळ पर्यटनासाठी घेऊन जाणार.
 • रिवोल्यूशनरी गार्ड फोर्स इराणच्या सैन्याचा भाग आहे. मात्र अमेरिकेने एप्रिल 2019 मध्ये रिवोल्यूशनरी गार्ड फोर्सला दहशतवादी संघटना घोषिते केलं होतं. सुलेमानी पश्चिम आशियात इराणी कारवायांमागचा सूत्रधार मानला जातो. त्यामुळेच अमेरिकेने त्याला लक्ष केल्याची चर्चा होती.

 


Latest Current Affairs Videos

Latest Current Affairs Videos