Current Affairs 27 November 2018

457
0
Share:

 

 

?1. सुनील अरोरा भारताचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त

 • निवडणूक आयुक्त सुनील अरोरा देशाचे पुढील मुख्य निवडणूक आयुक्त असतील.
 • विद्यमान मुख्य निवडणूक आयुक्त ओ पी रावत यांचे स्थान ते घेतील. निवडणूक आयोगाने सोमवारी या नियुक्तीला पुष्टी दिली. येत्या २ डिसेंबरला अरोरा हे पदभार स्वीकारतील. रावत यांचा कार्यकाळ १ डिसेंबर रोजी संपुष्टात येणार आहे.
 • अरोरा हे भारतीय प्रशासकीय सेवेच्या (आयएएस) १९८० च्या तुकीडीचे राजस्थान केडरचे सेवानिवृत्त अधिकारी आहेत. ३१ ऑगस्ट २०१७ रोजी त्यांची निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली होती.
 • विधी मंत्रालयाने सोमवारी अरोरा यांच्या नियुक्तीला सरकारकडून मंजुरी मिळाल्यानंतर परवानगीसाठी तो राष्ट्रपती भवनात पाठवण्यात आला आहे. अरोरा यांच्या नियुक्तीच्या औपचारिक घोषणेची अधिसूचना लवकर काढण्यात येईल, असे मंत्रालयातील सूत्राने माहिती दिली.
 • राजस्थानमध्ये प्रशासकीय सेवेत असताना ६२ वर्षीय अरोरा यांनी विविध विभागाचे कामकाज पाहिले आहे.
 • त्याचबरोबर ते केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण विभागाचे सचिव आणि कौशल विकास आणि उद्योजकता मंत्रालयाचे सचिव म्हणूनही काम पाहिले आहे. त्याचबरोबर त्यांनी अर्थ आणि वस्त्रोद्योग आणि योजना आयोगाच्या विविध पदांवर काम केले आहे.
 • ते १९९३ ते १९९८ पर्यंत राजस्थानच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांचे सचिव आणि २००५ ते २००८ पर्यंत मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव म्हणून काम केले आहे.

?2. अझीम प्रेमजी यांना फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार

 • प्रेमजी यांना फ्रान्सचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘शेव्हेलियर डि ला लीज डि ऑनर’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
 • माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील (आयटी) उद्योगपती अझीम प्रेमजी यांना फ्रान्सचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘शेव्हेलियर डि ला लीज डि ऑनर’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
 • माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील (आयटी) उद्योगपती अझीम प्रेमजी यांना फ्रान्सचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘शेव्हेलियर डि ला लीज डि ऑनर’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
 • आयोजकांकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भारतात आयटी उद्योग विकसित करणे, फ्रान्समध्ये आर्थिक गुंतवणूक करणे तसेच अझीम प्रेमजी फाऊंडेशन आणि विद्यापीठाच्या माध्यमातून एक समाजसेवकाच्या रुपात त्यांनी समाजासाठी दिलेल्या योगदानाची दखल घेत हा सन्मान केला जात आहे.
 • प्रेमजी यांच्यापूर्वी भारतातील बंगाली अभिनेते सौमित्र चॅटर्जी आणि अभिनेता शाहरुख खान यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

?3. प्रसिद्ध संवाद लेखक सलीम खान यांना “इफ्फीचा विशेष पुरस्कार

 • गोव्यात सुरु असलेल्या 49 व्या इफ्फीच्या सांगता समारंभात प्रसिद्ध पटकथा लेखक सलीम खान यांना इफ्फी विशेष पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.
 • चित्रपट क्षेत्रातल्या अमूल्य योगदानाबद्दल त्यांचा सन्मान करण्यात येणार असून 10 लाख रुपये, प्रशस्तीपत्रक आणि शाल या पुरस्काराने त्यांना गौरवण्यात येणार आहे.
 • केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) राज्यवर्धन राठोड यांनी आज ट्विटरवरुन ही माहिती दिली आहे.
 • 24 नोव्हेंबर 1935 मध्ये इंदूर येथे सलीम खान यांचा जन्म झाला.
 • अमाप लोकप्रिय झालेला ‘शोले’ हा चित्रपट, ‘दिवार’, ‘जंजीर’ यासारख्या लोकप्रिय चित्रपटांच्या त्यांनी लिहिलेल्या पटकथा रसिकांच्या पसंतीला उतरल्या.
 • अभिनेता आणि निर्माते म्हणूनही त्यांचे योगदान राहिले आहे.

?4. आता टायब्रेकरमध्ये जगज्जेतेपदाचा निकाल

 • जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेच्या १२व्या डावात मॅग्नस कार्लसन आणि फॅबियानो करुआना यांनी ३१ चालींनंतर बरोबरी पत्करल्यानंतर आणि आता जगज्जेतेपदाचा निर्णय ‘टायब्रेकर’मध्ये ठरणार आहे.
 • १२ डावांच्या जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत स्पर्धेत विद्यमान विश्वविजेत्या कार्लसनने ६-६ अशी बरोबरी राखल्यामुळे जाणकारांनी आश्चर्य प्रकट केले आहे. या स्पर्धेच्या १३२ वर्षांच्या इतिहासात प्रथमच स्पर्धा टायब्रेकपर्यंत लांबली आहे.
 • १२व्या डावात पांढऱ्या मोहऱ्यांनीशी खेळणाऱ्या करुआनाने आठव्या आणि १०व्या डावाप्रमाणेच स्वेशनिकोव्ह व्हॅरिएशन पद्धतीचा अवलंब केला. कार्लसनने एच५ या १२व्या चालीने करुआनाला चकित केले. परंतु दोघांनीही बरोबरीवरच पुन्हा एकदा समाधान मानले.
 • नॉर्वेचा २७ वर्षीय कार्लसन तिसऱ्यांदा विश्वविजेतेपदावर नाव कोरण्यासाठी उत्सुक आहे. २०१३ मध्ये भारताच्या विश्वनाथन आनंदला नमवून त्याने जगज्जेतेपद पटकावले होते.
 • जागतिक बुद्धिबळ क्रमवारीत अग्रस्थानावर असलेला कार्लसन हा रॅपिड आणि ब्लिट्झ प्रकारातसुद्धा क्रमवारीत अव्वल स्थानावर विराजमान आहे.

असा ठरणार जगज्जेता..

 • बुधवारी होणाऱ्या टायब्रेकरच्या पहिल्या टप्प्यात कार्लसन पांढऱ्या मोहऱ्यांनिशी खेळणार आहे. यात सर्वोत्तम चार जलदगती (रॅपिड) सामन्यांचा समावेश असतो. यात प्रत्येक खेळाडूला २५ मिनिटे मिळतात, तर प्रत्येक चालीनंतर आणखी १० सेकंदांचा वेळ मिळतो.
 • हा सामना निकाली ठरला नाही, तर दोघांना पाच लघुडाव खेळावे लागतील. यात प्रत्येक खेळाडूला पाच मिनिटांचा अवधी मिळेल, तर प्रत्येक चालीनंतर तीन सेकंद अधिक वेळ मिळेल.
 • जर पाचही लघुडावांद्वारे निकाल लागू शकला नाही, तर ही कोंडी फोडण्यासाठी ‘अर्मागेडॉन’ पद्धतीचा अवलंब केला जाईल. यात पांढऱ्या मोहऱ्यांनिशी खेळणाऱ्या खेळाडूला पाच मिनिटे मिळतील, तर काळ्या मोहऱ्यांनिशी खेळणाऱ्याला चार मिनिटे मिळतील. यात ६०व्या चालीनंतर दोघांनाही प्रत्येकी तीन सेकंदांचा वाढीव वेळ मिळेल. हा सामना बरोबरीत सुटलयास काळ्या मोहऱ्यांनिशी खेळणाऱ्या खेळाडूला विजेता घोषित केले जाईल.

?5. देशातील पाच जिल्ह्य़ांत हत्तीरोग नियंत्रणाचा पथदर्शी प्रकल्प

 • देशातून हत्तीरोगाचे उच्चाटन करण्यासाठी केंद्र सरकार महाराष्ट्रासह पाच राज्यातील प्रत्येकी एका जिल्ह्य़ामध्ये पथदर्शी प्रकल्प राबवणार आहे.
 • या प्रकल्पानुसार या जिल्ह्य़ातील प्रत्येक नागरिकांना हत्तीरोग नियंत्रणासाठी दिल्या जाणाऱ्या पारंपरिक औषधांसह प्रथमच ‘आयवर मेक्टीन’ हे नवीन औषध दिले जाणार आहे. हा प्रकल्प यशस्वी झाल्यास पुढे तो देशभरात राबवला जाणार आहे.
 • केंद्र सरकारने पथदर्शी प्रयोगासाठी निवडलेल्या राज्यांमध्ये उत्तर प्रदेश, बिहार, कर्नाटक, झारखंडसह महाराष्टाच्रा समावेश आहे.
 • त्यात महाराष्ट्रातील केवळ नागपूर हा एकच जिल्हा आहे.
 • केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या पथदर्शी प्रयोगानुसार या सर्व जिल्ह्य़ांमध्ये नागरिकांना त्यांच्या शरीरातील हत्तीरोगाचे जंतू नष्ट करण्यासाठी पूर्वी दिल्या जाणाऱ्या अलबइन्डा झोल आणि डीईसी या दोन वेगवेगळ्या प्रकारच्या गोळ्यांसह आयवर मेक्टीन हे नवीन औषध दिले जाणार आहे.
 • या प्रयोगाअंतर्गत नागपूर जिल्ह्य़ातील शहरी व ग्रामीण भागातील एकूण ५१ लाख नागरिकांपैकी तब्बल ४४ लाख नागरिकांना डिसेंबरमध्ये ही औषधे दिली जातील. मात्र हृदयरुग्ण, मूत्रपिंडासह इतर गंभीर आजारांच्या गटात मोडणाऱ्या रुग्ण, गर्भवती महिलांना यातून वगळण्यात आले आहे.
 • या उपक्रमासाठी महापालिका आणि सार्वजनिक आरोग्य विभागाला स्वतंत्र पथके नियुक्त करण्याची सूचना मिळाली आहे. हे पथक घरोघरी जाऊन वजन, उंची तपासून नागरिकांना औषध देणार आहे. सोबत या गोळ्या सेवन केलेल्या सर्व नागरिकांच्या नोंदीही ठेवण्यात येणार आहेत. या पथदर्शी प्रकल्पासाठी ग्लोबल हेल्थ, पीसीआयसह इतरही सामाजिक संस्थांची मदत केंद्रीय व राज्याच्या आरोग्य खात्याला मिळत आहे.

हत्तीरोग कसा होतो?

 • हत्तीरोग हा जंतासारख्या एका विशिष्ट परजीवीमुळे होणारा आजार आहे. या परजीवीचा प्रसार क्युलेक्स या डासामुळे होतो. हा डास गटार, सांडपाणी, अशा ठिकाणी मुख्यत्वे वाढतो. मात्र, असे पाणी नसल्यास तुलनेने स्वच्छ पाण्यातही तो वाढू शकतो.
 • या डासाच्या चाव्यातून हत्तीरोगाचे जंतू मानवाच्या रक्तात प्रवेश करतात. तेथे त्यांचे रूपांतर मोठय़ा कृमीमध्ये होते. यातील मादी वारंवार नव्या पिलावळीला जन्म देते. एकदा शरीरात शिरलेला हा प्रौढ कृमी शरीरात पाच ते आठ वर्षे, तर क्वचित पंधरा वर्षेदेखील राहू शकतो. हा बाल कृमी दिवसा फुफ्फुसातील रक्तवाहिन्यांमध्ये तर रात्री मुख्य रक्तप्रवाहामध्ये सापडतो. हत्तीरोगावर नियंत्रणासाठी मानवाच्या शरीरातून हे कृमी व जंतू कायमचे नष्ट करणे गरजेचे आहे.
 • ‘‘केंद्र सरकारने २०२० पर्यंत देशातून हत्तीरोगाचे उच्चाटन करण्याचे लक्ष्य निश्चित केले आहे. त्यासाठी नागपूरसह देशातील पाच राज्यांत विशेष मोहीम राबवली जाणार आहे. त्यात नवीन औषध पहिल्यांदाच वापरले जाणार आहे. हे औषध सुरक्षित असून त्याच्या दर्जाबाबत सर्व तपासण्या झाल्या आहेत. पुढे हा प्रयोग देशभरात राबवला जाणार आहे.’’

?6. आता इनकमिंग कॉल्स फ्री नाहीत?

 • मिनिमम रिचार्जसाठी कंपन्यांनी तसे नवे प्लॅन सुरु केले आहेत. ग्राहकांना दर महिन्याला खास इनकमिंगसाठीचे प्लॅन्स देण्यात येणार आहेत. त्यानुसार रिचार्ज करावे लागतील.
 • त्यामुळे आता केवळ इकमिंगसाठी सिमकार्ड वापरता येणार नाही.
 • काही ग्राहक केवळ इनकमिंगसाठीच सिम कार्ड्स वापरतात. हल्ली प्रत्येक मोबाईलमध्ये दोन सिम कार्ड्सची सुविधा उपलब्ध असल्याने अनेक ग्राहक केवळ एकाच सिम कार्डवर रिचार्ज करतात.
 • त्यामुळे ग्राहक एका सिमकार्डवर केवळ इनकमिंग कॉल्स घेत असतील तर यापुढे अशी फ्री इनकमिग सेवा मिळणार नाही. फ्री इनकमिंग सेवेसाठी प्रत्येक ग्राहकाला रिचार्ज करावाच लागेल. रिचार्ज केला नाही तर इनकमिंग कॉल्सची मोफत सेवा बंद होईल.
 • रिलायन्स जिओच्या स्वस्त रिजार्च पॅकमुळे इतर कंपन्यांचे धाबे दणाणले आहेत. जिओला टक्कर देण्यासाठी आयडिया आणि वोडाफोन या दोन मोठ्या कंपन्या एकत्र आल्या.
 • आता या कंपन्यांनी तोट्यातून बाहेर पडण्यासाठी हा नवा फंडा शोधला आहे.
 • जिओ कंपनी सुरु झाल्यापासून अनेक युजर्स इतर कंपन्यांच्या सिम कार्ड्सचा उपयोग केवळ इनकमिंग कॉल्ससाठी करतात. यादरम्यान रिचार्ज न केल्याने कंपन्यांना
 • त्यांच्या ARPU म्हणजेच अॅव्हरेज रेव्हेन्यू पर युजर (प्रति ग्राहक सरासरी महसूल) मध्ये खूप नुकसान होत आहे. या नुकसानभरपाईसाठी आता मिनिमम रिचार्ज करावे लागणार आहे.

?7. Mohammad Aziz Death: गायक मोहम्मद अजीज यांचे निधन

 • बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक मोहम्मद अजीज यांचे हृदयविकाराच्या झटक्यामुळे निधन झाले आहे.
 • मोहम्मद अजीज यांचे हृदयविकाराच्या झटक्यामुळे निधन
 • ते ६४ वर्षांचे होते
 • बॉलिवूडमधील प्रसिद्ध पार्श्वगायक मोहम्मद अजीज यांचे हृदयविकाराच्या झटक्यामुळे निधन झाले आहे. ते ६४ वर्षांचे होते. मोहम्मद अजीज यांची मुलगी सनाने त्यांच्या निधनाची माहिती एका वाहिनीला दिली आहे.
 • अजीज यांचा जन्म १९५४ साली पश्चिन बंगालमध्ये झाला होता. अजीज यांनी बॉलिवूड व्यतिरिक्त बंगाली, उडिया आणि इतर भाषेतील सिनेमांसाठी पार्श्वगायन केले होते.
 • अजीज मोहम्मद रफींचे खूप मोठे चाहते होते. त्यांना अनु मलिक यांनी बॉलिवूडमध्ये मोठा ब्रेक दिला होता. अमिताभ बच्चन यांचा चित्रपट मर्दमधील शीर्षक गीत मैं हूं मर्द टांगे वालामधून ते पार्श्वसंगीतात लोकप्रिय झाले होते.
 • त्यानंतर अजीज यांनी बऱ्याच सिनेमातील लोकप्रिय गाणी गायली होती. लाल दुपट्टा मलमल का, मैं से मीना से न साकी से यांसारखी शेकडो गाणी त्यांनी गायली होती. त्यांनी मर्द शिवाय बंजारन, आदमी खिलौना है, लव ८६, पापी देवता, जुल्म को जला दूंगा, पत्थर के इन्सान, बीवी हो तो ऐसी, बरसात की रात यांसारख्या चित्रपटातील गाणी गायली होती.

?1. WhatsApp Business Head Neeraj Arora Resigns

WhatsApp’s Chief Business Officer Neeraj Arora has resigned from the post after 7-years in the company. His exit comes seven months after WhatsApp co-founder Jan Koum left the company. Arora had been an integral part of WhatsApp since 2011 and played a vital role in the company’s acquisition by Facebook in 2014. Neeraj Arora was the front-runner for the post of the CEO at WhatsApp after the departure of Koum.

?2. Govt hikes outlay for first phase of FAME India scheme to Rs 895 crore

The phase-I of the Faster Adoption and Manufacturing of (Hybrid) and Electric Vehicles (FAME India) scheme was supposed to be implemented over a two-year period commencing from April 1, 2015. The Ministry of Finance has approved the enhancement of the total outlay on the first phase of the scheme from Rs 795 crore to Rs 895 crore.

?3. Saina Nehwal wins silver at Syed Modi International 2018, Sameer Verma Retains Title

World number nine Saina Nehwal bagged silver at Syed Modi International Badminton Championships 2018 after losing to world number 27 Han Yue. India’s Sameer Verma defeated Lu Guangzu of China in the men’s singles final to successfully defend and win the Syed Modi International Championships in Lucknow.

?4. Centre and ADB Sign 200 Million Dollar Loan Pact To Upgrade State Highways In Bihar

The Centre and Asian Development Bank (ADB) has signed a 200 million dollar loan agreement to finance widening and upgrading of about 230 Kilometers State Highways in Bihar to all-weather standards with road safety features. The agreement was signed by Additional Secretary in the Finance Ministry Sameer Kumar Khare and Officer-in-Charge of ADB’s India Resident Mission, Rajeev P Singh in New Delhi.

?5. Ohio becomes the first US state to accept taxes in Bitcoin

Ohio will become the first US state to accept payment of taxes by businesses in Bitcoin, beginning this week. Businesses can pay 23 different taxes with Bitcoin, from employee withholding tax to fuel and sales tax, through an online cryptocurrency portal. The state will use BitPay, a cryptocurrency global payment system, to complete the process.

?6. Bihar CM unveils 70 ft tall Lord Buddha’s statue in Rajgir

Bihar Chief Minister Nitish Kumar unveiled a 70-feet tall statue of Lord Buddha at Rajgir in Nalanda district. It is the second tallest statue of Buddha in the country.  The statue has been installed above a 16-metre radius pedestal in the middle of Lake Ghora Katora. It is made of pink sandstone.

?7. NASA InSight Lands On Mars 7 Months After Launch

The National Aeronautics and Space Administration (NASA) InSight spacecraft landed on Mars after nearly a 7 months, 458-million-kilometer journey, and a 6.5-minute parachuted descent through the Red Planet’s atmosphere. The 360-kg lander also shared its first photo from Mars, showing an area called Elysium Planitia, where it will dig five meters below the surface.

?8. National Milk Day observed on 26 November

National Milk Day that was started in 2014 on 26th November to mark the birth anniversary of the father of White Revolution, Dr Verghese Kurien was celebrated in the Meghalaya for the first time. Kurien was the architect of Operation Flood which was launched in 1970 by India’s National Dairy Development Board (NDDB). India’s Operation flood was the world’s biggest dairy development program which gave a major thrust to the milk production of the nation.

?9. Aadi Mahotsav Organized By Tribal Affairs Ministry in New Delhi

The 4th edition of annual “Aadi Mahotsav”, a National Tribal Festival organized by Ministry of Tribal Affairs in association with TRIFED and Ministry of Culture to celebrate and cherish the spirit of tribal culture, craft, cuisine and commerce held at Dilli Haat, Shri Aurobindo Marg, INA, Delhi. This year, more than 600 tribal artisans from 23 states, 80 tribal chefs hailing from 20 States besides 14 cultural troupes comprising more than 200 artists are taking part in the Mahotsav.

?10. Telangana CEO Dr Rajat Kumar inaugurated five-day exhibition on Our Vote- Our Future in Hyderabad

Telangana Chief Electoral Officer Dr Rajat Kumar inaugurated a five-day exhibition on “Our Vote- Our Future” in Hyderabad. This exhibition was organized by the Regional Outreach Bureau of Information and Broadcasting Ministry. The main aim is to increase the polling percentage of at least 10 percent.


Latest Current Affairs Videos

Latest Current Affairs Videos