Current Affairs 27 JULY 2020

245
0
Share:

 

?1. महाराष्ट्रासह दोन राज्यांमध्ये ICMR ची अत्याधुनिक चाचणी केंद्र; पंतप्रधान मोदी करणार उद्घाटन

 • गेल्या काही दिवसांपासून देशात करोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तसंच करोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी चाचण्याही त्या प्रमाणात वाढवणं आवश्यक असल्याचं मत यापूर्वी अनेकांनी व्यक्त केलं होतं. करोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी य़ांच्या हस्ते आयसीएमआरच्या अत्याधुनिक चाचणी केंद्रांचं उद्धाटन करण्यात येणार आहे.
 • व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे मोदी या केंद्रांचं उद्धाटन करणार आहे. तसंच यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यादेखील उपस्थित असणार आहेत.
 • कोलकात्यात आयसीएमआर – नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कॉलरा अँड अँट्रिक डिजिज हे पहिलं चाचणी केंद्र, नॉएडामध्ये आयसीएमआर – नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कॅन्सर प्रिव्हेंट अँड रिसर्च सेंटर येथे दुसरं तर मुंबईत आयसीएमआर – नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च इन रिप्रोडक्टिव्ह हेल्थ या ठिकाणी तिसरं चाचणी केंद्र सुरू करण्यात येणार आहे.
 • या तिन्ही चाचणी केंद्रांमध्ये दररोज १० हजारांपर्यंत करोनाच्या चाचण्या करता येणार आहेत. तसंच याव्यतिरिक्त या केंद्रांमध्ये अन्य आजारांच्या चाचण्याही करता येणार आहे. यामध्ये हेपेटायटिस बी आणि सी, एचआयव्ही, टिबी, डेंग्यू यांचाही समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन हेदेखील या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. तसंच त्यांच्यासोबतच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यादेखील सहभागी होणार आहे.

?2. भारत बायोटेक’च्या लशीचा पहिला टप्पा पूर्ण झाला

 • भारत बायोटेक या कंपनीने राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था व आयसीएमआर यांच्या सहकार्याने तयार केलेल्या कोव्हॅक्सिन लशीच्या मानवी चाचण्यातील पहिल्या टप्प्यांचे निष्कर्ष उत्साहवर्धक व आशादायी असल्याचे रोहतक येथील पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिकल सायन्सेस या संस्थेतील प्रमुख संशोधक डॉ. सविता वर्मा यांनी म्हटले आहे.
 • पहिल्या टप्प्याच्या दुसऱ्या भागात आणखी सहाजणांना कोव्हॅक्सिन ही लस टोचण्यात आली. त्यामुळे आता पहिला टप्पा पूर्ण झाला असून देशात एकूण पन्नासजणांना लस देण्यात आली. त्याचे निष्कर्ष उत्साह वाढवणारे आहेत.
 • रोहतक येथे पहिल्या टप्प्याची सुरुवात 17 जुलैला करण्यात आली होती. त्या दिवशी तीनजणांना लस टोचण्यात आली.
 • करोनावरील ही लस दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान केंद्रात एका तीस वर्षांच्या व्यक्तीलाही देण्यात आली होती. कोव्हॅक्सिनचा पहिला टप्पा व दुसरा टप्पा यातील चाचण्या पूर्ण होण्यास 1 वर्ष तीन महिने लागणार आहेत.

?3. पाच राफेल विमानांचे भारताच्या दिशेने प्रस्थान

 • पाच राफेल विमानांचा पहिला ताफा फ्रान्समधून भारताकडे येण्यास निघाला असून ही विमाने करारानुसार देण्यात येत आहेत. बहुउद्देशी असलेले हे लढाऊ विमान असून बुधवारी ही विमाने अंबाला येथील हवाई दलाच्या तळावर येणार आहेत.
 • राफेल विमानांच्या खरेदीचा करार भारताने पाच वर्षांपूर्वी केला होता. भारतीय हवाई दलाला फ्रान्सची दसॉल्ट कंपनी ३६ विमाने देणार असून त्यासाठी ५९ हजार कोटींचा करार झाला होता.
 • फ्रान्सने भारताला यापूर्वीही जग्वार, मिराज, मायसियर विमानांचा पुरवठा केला होता. एकूण दहा राफेल विमाने तयार असून त्यातील पाच देण्यात आली आहेत तर पाच अजून प्रशिक्षण कार्यक्रमासाठी फ्रान्समध्येच आहेत.
 • फेब्रुवारी २०२१ पर्यंत भारताला सर्व ३६ राफेल विमाने दिली जाणार आहेत.

मिटिऑर क्षेपणास्त्रे

 • मिटिऑर क्षेपणास्त्राची प्रगत आवृत्ती असलेले बीव्हीआर क्षेपणास्त्र भारताला देण्यात आले असून ते एमबीडीएने तयार केले आहे. ब्रिटन, जर्मनी, इटली, फ्रान्स, स्पेन आणि स्वीडन या देशांच्या समान शत्रूंविरोधात त्यांचा वापर केला जातो. मिटिऑर क्षेपणास्त्राला रॅमजेट मोटर असून ते खूप लांबपर्यंत जाऊ शकते.
 • राफेल विमानात भारताला सोयीचे अनेक बदल करून देण्यात आले आहेत, त्यात रडार वॉर्निग रिसीव्हर, लो बँड जॅमर्स, १० तासांचे फ्लाइट डाटा रेकॉर्डिग, इन्फ्रारेड शोध सुविधा, ट्रॅकिंग यंत्रणा या सुधारणांचा त्यात समावेश आहे.

?4. दुहेरी ऑस्करविजेत्या ऑलिव्हिया दी हॅविलन्द यांचे निधन

 • ‘गॉन विथ दी विन्ड’ तसेच अन्य हॉलिवूडपटांमधील अभिनयामुळे गाजलेल्या ऑलिव्हिया दी हॅविलन्द यांचे वयाच्या १०४ व्या वर्षी निधन झाले.
 • दुहेरी ऑस्कर विजेती असलेल्या या अभिनेत्रीची ओळख ‘दी फ्रॅगरन्ट क्वीन ऑफ दी हॉलिवूड कॉस्च्युम ड्रामा’ अशी होती.
 • टोकिओ येथे जन्म झालेल्या ऑलिव्हिया कॅलिफोर्नियात लहानाच्या मोठय़ा झाल्या. त्यांना १९४६ मधील ‘टू इच हिज ओन’ आणि १९४९ मधील ‘दी हेअर्स’ या चित्रपटांतील भूमिकांसाठी ऑस्कर पुरस्काराने गौरविण्यात आले होते.
 • गॉन विथ दी विन्डमधील त्यांची भूमिका चित्रपट रसिकांच्या दीर्घकाळ स्मरणात राहिली.

?5. स्वच्छ भारत अभियानाचे अय्यर यांचा राजीनामा

 • १९८१ च्या बॅचचे आयएएस अधिकारी परमेश्वरन अय्यर यांनी केंद्र सरकारच्या सचिव, स्वच्छता व पेयजल अभियानाच्या पदाचा राजीनामा दिला.
 • अय्यर २००९ मध्ये जागतिक बँकेसोबत जोडले गेले होते. २०१६ मध्ये ते पंतप्रधान मोदींच्या सांगण्यावरून परत आले. तसेच त्यांनी स्वच्छ भारत अभियानाचे काम सांभाळले. आतापर्यंत ११ कोटी शौचालये बांधली गेली आहेत.

?6. सेरी-फु टबॉल स्पर्धा : युव्हेंटसचे सलग नववे विजेतेपद

 • ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या अप्रतिम कामगिरीमुळे युव्हेंटसने सलग नवव्यांदा सेरी-ए फु टबॉल स्पर्धेच्या विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. युव्हेंटसने रविवारी सॅम्पडोरियाचा २-० असा पाडाव करत दोन सामन्यांआधीच जेतेपदावर मोहोर उमटवली.
 • पाच वेळा ‘बलॉन डीऑर’ या प्रतिष्ठेच्या पुरस्कारावर नाव कोरणाऱ्या रोनाल्डोने करोनाच्या विश्रांतीनंतर सलग ११ सामन्यांत गोल करण्याचा विक्रम आपल्या नावावर केला.
 • रोनाल्डोला आता सेरी-ए स्पर्धेत युव्हेंटसतर्फे सर्वाधिक गोलचा विक्रम आपल्या नावावर करण्यासाठी एका गोलची गरज आहे. १९३३-३४मध्ये फे लिस बोरेल यांनी हा विक्रम नोंदवला होता.
 • युरोपमधील पाच प्रतिष्ठेच्या लीगमध्ये करोनानंतर १० पेक्षा जास्त गोल झळकावणारा रोनाल्डो हा एकमेव फु टबॉलपटू ठरला आहे.
 • ५ युव्हेंटसने (१९३१-३५) याआधी सेरी-ए फु टबॉल स्पर्धेत सलग पाच वेळा विजेतेपद पटकावण्याची करामत केली होती.
 • त्यानंतर टोरिनो संघाने १९४३-४९ दरम्यान सलग पाच वेळा विजेतेपद संपादन केले होते.
 • १४ युरोपमधील सर्व प्रतिष्ठेच्या लीगमध्ये सलग १४ वेळा विजेतेपद मिळवण्याची किमया लॅटव्हियाच्या स्कोंटो क्लबने १९९१-२००४ या कालावधीत केली होती.

Latest Current Affairs Videos

Latest Current Affairs Videos