Current Affairs 25 May 2020

Share:

 

1. जैवविविधतेच्या संवर्धनासाठी भारत सरकारचे पाच नवे उपक्रम

• 22 मे 2020 रोजी पाळल्या गेलेल्या आंतरराष्ट्रीय जैविक विविधता दिनाचे औचित्य साधून केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते जैवविविधतेच्या संवर्धनासाठी पाच महत्त्वाच्या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.

हे उपक्रम पुढीलप्रमाणे आहेत –

• राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरण (NBA) आणि संयुक्त राष्ट्रसंघ विकास कार्यक्रम (UNDP) यांचा जैवविविधता संरक्षण इंटर्नशिप कार्यक्रम – या कार्यक्रमात एका वर्षाच्या कालावधीसाठी पदव्युत्तर पदवी प्राप्त 20 विदयार्थ्यांची निवड केली जाणार आहे. नैसर्गिक स्त्रोत व्यवस्थापन आणि जैवविविधता संवर्धन याबाबत शिक्षण/ प्रशिक्षण आणि विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये चाललेल्या राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरण (NBA) यांच्या उपक्रमांमध्ये त्यानं गुंतविले जाणार. तसेच ते राज्य जैवविविधता मंडळांना तांत्रिक मदत पुरविणार.

• ‘नॉट ऑल अॅनिमल्स मायग्रेट बाय चॉइस’ मोहीम – संयुक्त राष्ट्रसंघ पर्यावरण कार्यक्रम (UNEP) यांच्या सहकार्याने वन्यजीव गुन्हे नियंत्रण विभाग (WCCB) यांची लप्तप्राय प्रजातींची बेकायदेशीर तस्करी रोखण्यासाठी एक जनजागृती मोहीम आहे. वन्यजीवांच्या अवैध व्यापारात धोकादायक साथीचे रोग पसरण्याचा धोका असतो. ‘जैवविविधता संवर्धन आणि जैविक विविधता अधिनियम-2002’ विषयक एक ऑनलाइन परिसंवाद (वेबिनार) मालिका

• wwF मॉडेल कॉन्फरन्स ऑफ पार्टीज (MCOP) – हा जैवविविधतेच्या संभाषणात तरुण पिढीचा सहभाग समाविष्ट असलेला WWF इंडिया याचा नवा उपक्रम आहे.

• जैवविविधता संवर्धनाविषयी पाऊले उचलण्यास विचारविमर्श करण्यासाठी तरुणाईला एकत्र आणणे आणि त्याना एक व्यासपीठ उपलब्ध करुन देणे हा या कार्यक्रमाचा हेतू आहे.

• मनुष्यप्राणी प्रजातीसाठी नैसर्गिकरीत्या नि:शुल्क उपलब्ध असलेल्या पर्यावरणीय सेवांच्या माध्यमातून निसर्गाच्या महत्त्वपूर्ण भूमिकेवर प्रकाश टाकण्यासाठी ‘वर्ल्ड वाइल्डलाइफ फंड’ (WWF) या संस्थेचे पाठबळ असलेली एक जनजागृती मोहीम.

2. कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी ‘कांगारा चहा’ प्रभावी: ICMRचा दावा

कोविड-19 रोगावरील उपचार पद्धतीत बदल करीत भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनी (ICMR) रोगप्रतिकार शक्ती वाढवणे तसेच विषाणूचा प्रभाव कमी करण्यासाठी ‘हायड्रोक्झीक्लोरोक्वीन’ (HCQ) ऐवजी HIV वरील औषधे देण्याचे ठरवले आहे.

• शिवाय, कांगारा चहामधील रसायनेही रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यात व कोरोना विषाणूचा प्रभाव कमी करण्यात HIV वरील औषधांपेक्षा अधिक प्रभावी असल्याचे आढळून आले आहे.

• पालमपुर (हिमाचल प्रदेश) येथील हिमालयन जैवस्रोत तंत्रज्ञान संस्थेचे (IHBT) संचालक डॉ. संजय कुमार यांनी ही माहिती दिली. कांगारा चहाची हिमाचल प्रदेशात लागवड होते.

कांगारा चहाचे औषधीयुक्त गुणधर्म

• कांगारा चहात मनुष्यप्राणीच्या शरीराला लाभदायक ठरणारे गुणधर्म आहेत.IHBT संस्थेनी तंत्रज्ञानाचा उपयोग करुन कोविड-19 वर मात करण्यासाठी हे सिद्ध केले आहे.

• शास्त्रज्ञांना कांगारा चहात’65 बायोअॅक्टीव’ रसायने किंवा ‘पॉलिफेनोल्स आढळून आली. त्यांच्या संयोगाने ते विशिष्ट विषाणूवर अधिक प्रभावी ठरु शकते. सध्या HIV वरील बाजारात उपलब्ध औषधांपेक्षाही ही रसायने अधिक प्रभावी आहेत.

• सध्या HIV वरील मान्यताप्राप्त औषधे कोविड-19 रुग्णांवर उपचारासाठी वापरली जात आहेत. कॅटेचिन’ हे नैसर्गिक आरोग्यवर्धक घटक आहे. पेशींचे नुकसान टाळणे आणि इतर अनेक फायदे प्रदान करणे, यासाठी ते ओळखले जाते. कांगारा चहात ते पुरेपूर आहे.

• कांगारा चहा मधील रसायने मानवी शरीरातल्या प्रथिनेयुक्त विषाणूंना प्रतिबंध करु शकतात, असा दावा करण्यात आला आहे.

• तसेच संस्थेनी या चहाचा वापर करुन अल्कोहोलयुक्तहँड सॅनिटायझर, औषधी साबणचीही निर्मिती केली आहे. त्यात बुरशीविरोधी, जीवाणूविरोधी, स्वच्छतायुक्त आणि आर्द्रतायुक्त लाभदायक गुणधर्म आहेत.

3. लेझर क्षेपणास्त्राची अमेरिकेची यशस्वी चाचणी 

• हवेत झेपावणारे व विमान नष्ट करू शकणाऱ्या लेझर क्षेपणास्त्राची अमेरिकेने १६ मे रोजी पॅसिफीक महासागरात यशस्वी चाचणी घेतली.

• यूएसएस पोर्टलँड या नौदलाच्या युद्धनौकेवर ही चाचणी पार पडली.

• हे जहाज वाहतुकीसाठी वापरले जाते. ते एका बंदरापाशी होते. ते पाण्याप्रमाणेच जमिनीवरूनही जाऊ शकते.

• उच्च उर्जा असलेले घन स्वरुपातील लेझरचे अव्वल दर्जाचे क्षेपणास्त्र प्रथमच यशस्वीरित्या सोडण्यात आले. त्याद्वारे ड्रोन विमान भेदले गेले आणि त्यास आग लागल्याचे छोट्या व्हिडिओवरून दिसले.

4. देशांतर्गत विमान सेवा आजपासून

• टाळेबंदीमुळे जवळपास दोन महिन्यांपासून बंद असलेली देशांतर्गत विमान सेवा सोमवारपासून सुरू होणार असून मुंबई विमानतळावरूनही दररोज ५० विमानांची ये-जा होणार आहे. मात्र, महाराष्ट्रासह अनेक राज्यांनी विमान प्रवाशांबाबत स्वत:ची नियमावली व अटी घातल्याने या सेवेबाबत प्रवाशांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.

• केंद्र सरकारने २५ मेपासून देशांतर्गत विमान सेवा सुरू करण्याची घोषणा केल्यापासूनच महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि तमिळनाडू या राज्यांनी त्याला विरोध केला आहे.

• महाराष्ट्रातील मुंबई, नागपूर, पुणे आणि औरंगाबाद ही विमानतळांची शहरे ही लाल क्षेत्रांत असल्याने तसेच मुंबईत प्रवासी वाहतूक बंद असल्याने प्रवासी विमान सेवा सुरू करू नये, अशी आग्रही मागणी राज्य सरकारच्या वतीने करण्यात आली होती.

• या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याची भूमिका केंद्रीय हवाई वाहतूकमंत्री हरदीपसिंग पुरी यांच्या कानावर घातली होती. राज्यातील जनतेशी रविवारी दुपारी संवाद साधताना मुख्यमंत्री ठाकरे यांनी मुंबईतून प्रवासी विमान सेवा नकोच, अशी भूमिका मांडली होती. मात्र, त्यानंतर काही तासांतच राज्य सरकारने भूमिका बदलली. मुंबईतून दररोज २५ विमानांचे उड्डाण तर २५ विमाने अन्य शहरांतून येतील, असे अल्पसंख्यांक विकासमंत्री नवाब मलिक यांनी जाहीर के ले. तसेच राज्य सरकारच्या वतीने लवकरच नियमावली जाहीर के ली जाईल, असे ट्वीट मलिक यांनी के ले. टप्प्याटप्प्याने ही संख्या वाढविण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट के ले. मुंबईचे महत्त्व लक्षात घेता, देशांतर्गत विमान सेवा मुंबईतून सुरू व्हावी, अशी आग्रही भूमिका केंद्राने मांडली. केंद्राच्या विनंतीनंतरच महाराष्ट्र सरकारने निर्णय बदलल्याचे उच्चपदस्थांकडून सांगण्यात आले.
राज्यांची स्वतंत्र नियमावली
• देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीसंदर्भात केंद्र सरकारने रविवारी नियमावली जाहीर केली आहे. मात्र, त्याच वेळी अलगीकरणासंदर्भात राज्यांना स्वतंत्र नियमावली आखण्याची परवानगी देण्यात आली आहे.

• विविध राज्य सरकारांनीही त्यानुसार नियमावली जाहीर केली आहे. मात्र, या नियमावलींमध्ये एकवाक्यता नसल्यामुळे प्रवाशांना अडचणींना तोंड द्यावे लागणार आहे. या अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर रविवारी विविध विमान कंपन्या आणि हवाई वाहतूक मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांची बैठकही पार पडली. मात्र, त्यामध्ये कोणताही तोडगा निघू शकला नाही.

5. भारताच्या ‘मँगो मॅन’चा करोना योद्ध्यांना अनोखा सलाम.

• भारताचे मँगो मॅन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हाजी कलीमुल्लाह खान यांनीही अगदी हटके पद्धतीने या कोवीड योद्ध्यांना समाल केला आहे.

• तर आंब्याच्या वेगवेगळे वाण विकसित करण्यासाठी पद्मश्री पुरस्कार मिळाले्या खान यांनी नुकत्याच दोन नवीन वाण तयार केले आहे.

• तसेच हे दोन्ही वाण त्यांनी कोवीड योद्ध्यांना समर्पित करत एका वाणाचे नाव‘डॉक्टर आंबा’ तर दुसऱ्याचे ‘पोलीस आंबा’ असं ठेवलं आहे.

• बायगत शेतीचे तज्ज्ञ असणाऱ्या खान हे कलम करण्याच्या तंत्रज्ञानाच्या मदतीतून आठ एकर जमिनीमध्ये 1600 वेगवेगळ्या प्रकारच्या आंब्याच्या वाणांचे उत्पादन घेतात.

उत्तर प्रदेशमधील महिलाबाद येथे खान कुटुंबाच्या 20 एकर जमिनीवर आंब्याच्या बागा आहेत. त्यापैकी 8 एकरावर कलीमुल्लाह हे आंब्याची नवीन नवीन कलम तयार करुन प्रयोग करत असतात.

• तर त्यांनी कलम करण्याच्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून म्हणजेच ग्राफ्टींगच्या माध्यमातून एकाच झाडावर 300 प्रकराच्या आंब्यांचे उत्पादन घेतलं होतं.तसेच आंबा संशोधन आणि बागायती शेतीमधील प्रयोगशिलतेसाठी त्यांना 2008 साली भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित केलं होतं.

• 6. महाराष्ट्रात १५ जून पासून शाळा सुरु करण्याचा सरकारचा विचार

• महाराष्ट्रात करोनाच्या संकटात शाळा आणि महाविद्यालयं बंद ठेवण्यात आली आहेत. अशात आता १५ जून पासून शाळा सुरु करण्याचा विचार सरकार करत आहे असे संकेत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले आहेत.

• महाराष्ट्रात शाळा सुरु झाल्यानंतर आठवड्यातले ४८ तास त्या सुरु ठेवल्या जातील. म्हणजे शनिवार-रविवार अशी सुट्टी देणाऱ्या शाळांना ती मुभा नसेल असंही वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे. सध्या देशात लॉकडाउनचा चौथा टप्पा सुरु आहे. अशात मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर आणि १५ इतर प्रमुख शहरं ही रेड झोन मध्ये आहेत. मात्र हळूहळू शाळा सुरु करण्याचा विचार राज्य सरकार करतं आहे असं वर्षा गायकवाड यांनी इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.

• दोन शिफ्टमध्ये शाळा सुरु करण्याचा विचार आहे असं वर्षा गायकवाड यांनी इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे. तसंच शाळांचे तास कमी करण्याचा विचार असल्याचंही त्या म्हणाल्या. सोशल डिस्टन्सिंग पाळणं बंधनकारक असणार आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं. शाळा सुरु करताना दोन पर्यांयाचा विचार सुरु आहे.
काय आहेत पर्याय

• पर्याय १: विद्यार्थ्यांना त्यांच्या ऑड आणि इव्हन नंबर प्रमाणे दोन शिफ्टमध्ये म्हणजे सकाळच्या सत्रात आणि दुपारच्या सत्रात बोलवायचं

• पर्याय २ :प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांचे दोन गट करायचे दोन्ही गटांना एक दिवसाआड शाळेत बोलवायचं हा दुसरा पर्याय आहे.

• या दोन पर्यायांचा विचार राज्य सरकार करतं आहे. तसंच शाळा सुरु झाल्या तरीही एका बाकावर एकच विद्यार्थी बसेल याची काळजी शाळांना घ्यायची आहे असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.


Latest Current Affairs Videos

Latest Current Affairs Videos