Current Affairs 25 JULY 2020

200
0
Share:

 

?1. रिपब्लिकन पक्षाचे अधिवेशन रद्द- डोनाल्ड ट्रम्प:

रिपब्लिकन पक्षाचे जॅक्सनव्हिल येथे होणारे अधिवेशन करोना विषाणूच्या प्रसारामुळे रद्द करण्यात आले आहे, हे अधिवेशन पुढील महिन्यात होऊन त्यात डोनाल्ड ट्रम्प यांची अधिकृत उमेदवारी जाहीर केली जाणार होती.

तर 24-27 ऑगस्ट दरम्यान हे अधिवेशन होणार होते. आता हे अधिवेशन पूर्ण स्वरूपात होणार नाही.

व्हाइट हाऊसच्या पत्रकार परिषदेत ट्रम्प यांनी सांगितले की, फ्लोरिडामध्ये करोनाचा प्रसार जास्त असल्याने जॅक्सनव्हिल येथील अधिवेशन रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागला. या अधिवेशनासाठी ही योग्य वेळ नाही कारण फ्लोरिडात करोनाचा प्रसार जास्त आहे.

फ्लोरिडामध्ये करोनाचा प्रसार झाला असून त्या राज्यात 3,89,868 रुग्ण आहेत. कॅरोलिना व न्यूयॉर्क पहिल्या व दुसऱ्या क्रमांकावर आहेत.

?2. महिलांना लष्करात ‘पर्मनंट कमिशन’; सरकारने काढला आदेश

 • लष्करी सेवेतील सर्व शाखांमधील महिला अधिकाऱ्यांना ‘पर्मनंट कमिशन’चे दरवाजे पुरुषांच्या बरोबरीने खुले करण्याचा औपचारिक आदेश केंद्र सरकारने गुरुवारी काढला. यामुळे देशाच्या लष्कर या सर्वात मोठ्या सैन्यदलातील लैंगिक भेदभाव संपुष्टात येऊन महिलांचा ऐतिहासिक विजय झाला.
 • पूर्ण पेन्शनही मिळेल आधी ‘शॉर्ट सर्व्हिस कमिशन’वर (एसएससी) 10वर्षे सेवा पूर्ण करणाºया फक्त पुरुष अधिकाऱ्यांनाच ‘पर्मनंट कमिशन’चा पर्याय निवडता येत होता.
 • महिलांना अशा प्रकारे ‘कमांड पदां’पासून दूर ठेवले जायचे. परिणामी, त्या सरकारी पेन्शनपासूनही वंचित राहायच्या. कारण पेन्शन 20वर्षांच्या सेवेनंतर लागू होते. त्यांना ‘पर्मनंट कमिशन’, ‘कमांड पद’ व पेन्शन हे तिन्ही लाभ मिळतील.

?3. भारतात 30 वर्षीय स्वयंसेवकाला दिला कोरोनाचा पहिला डोस:

 • भारतात विकसित करण्यात आलेल्या COVAXIN या लसीच्या मानवी चाचणीस एम्स रुग्णालयात सुरुवात करण्यात आली आहे. 30 वर्षीय स्वयंसेवकाला या स्वदेशी लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे.
 • इंडिया टुडेने एम्स रुग्णालयातील सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, स्वयंसेवकाला दोन तास रुग्णालयात निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे.
 • भारत बायोटेक या फार्मा कंपनीने पहिली स्वदेशी COVAXIN ही करोना विषाणूवरील लस तयार केली आहे.
 • स्वयंसेवकाला रुग्णालयात निरीक्षणाखाली ठेवण्यात आल्यानंतर नंतर घरी पाठवण्यात येणार आहे. यानंतर पुढील सात दिवस त्याच्यावर लक्ष ठेवलं जाईल. COVAXIN लसीचा हा पहिलाच डोस आहे.
 • डोस देण्याआधी करण्यात आलेल्या स्क्रिनिंग आणि टेस्टमध्ये संबंधित 30 वर्षीय व्यक्ती पात्र ठरली होती.

?4. सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये क्रीडा स्पर्धाना सुरुवात- केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजिजू:

 • सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये क्रीडा स्पर्धाना सुरुवात होईल, अशी आशा आहे. जेणेकरून करोनाच्या संकटानंतर लोकांचा आत्मविश्वास उंचावण्यास मदत होईल, असे केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितले.
 • मे महिन्याच्या अखेरीस क्रीडामंत्र्यांनी ऑलिम्पिकशी संबंधित काही खेळांची सराव शिबिरे सुरू करण्यास परवानगी दिली आहे.
 • ‘‘भविष्यात लवकरच क्रीडा स्पर्धाना सुरुवात होईल. ठरावीक मर्यादा आखून योग्य कार्यप्रणालीसह काही स्पर्धाचे आयोजन करण्यासाठी सरकारकडून परवानगी दिली जाईल.
 • विशेष सराव सत्रांमध्ये ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेले खेळाडू सराव करत आहेत, याचा मला आनंद आहे,’’ असे रिजिजू यांनी सांगितले.
 • राष्ट्रकुल देशांच्या परिषदेदरम्यान रिजिजू यांनी करोनानंतर भारताच्या क्रीडा कार्यक्रमांना कशी सुरुवात करता येईल, याबाबतची माहिती दिली. ते म्हणाले की, ‘‘सर्व राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशाच्या क्रीडामंत्र्यांशी चर्चा करून मी हळूहळू क्रीडाविषयक घडामोडी सुरू करण्यास सांगितले आहे. काही खेळांच्या लीग सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये सुरू करण्यात येतील.’’

?5. 2018 Asian Games : रौप्यपदक विजेत्या भारतीय रिले संघाला सुवर्णपदाचा मान

 • २०१८ साली जकार्ता येथे पार पडलेल्या आशियाई खेळांमध्ये, ४ * ४०० मिश्र रिले प्रकारात रौप्य पदकाची कमाई करणाऱ्या भारतीय संघासाठी आनंदाची बातमी आहे.
 • रौप्य पदकावरुन भारतीय संघाला सुवर्णपदकाचा मान मिळाला आहे. सुवर्णपदक विजेत्या बहारीन संघाचा एक खेळाडू उत्तेजक द्रव्य चाचणीत दोषी आढळल्याने बहारीनच्या संघावर ही कारवाई करण्यात आली आहे. केमी अदेकोया या बहारीनचा खेळाडू उत्तेजक द्रव्य चाचणीत दोषी आढळला, ज्यामुळे Athletics Integrity Unit (AIU) ने बहारीनच्या संघावर कारवाई करत भारतीय संघाला सुवर्णपदक बहाल केलं आहे.
 • मोहम्मद अनस, एम.आर. पुवम्मा, हिमा दास, राजीव अरोकिया या भारतीय खेळाडूंनी ३:१५:७१ अशी वेळ नोंदवली होती. तर बहारीनच्या संघाने ३:११:८९ अशी वेळ नोंदवली होती. याव्यतिरीक्त महिलांच्या ४०० मी. अडथळ्यांच्या शर्यतीत चौथ्या स्थानावर राहिलेल्या भारताच्या अनु राघवनलाही बढती देत कांस्यपदक बहाल करण्यात आलं आहे.

Latest Current Affairs Videos

Latest Current Affairs Videos