Current Affairs 24 JULY 2020

197
0
Share:

 

?1. ऑक्सफर्ड अ‍ॅस्ट्राझेन्का यांनी तयार केलेली लस भारतात ‘कोविशिल्ड’ या नावाने विकणार:

 • ऑक्सफर्ड विद्यापीठ व अ‍ॅस्ट्राझेन्का यांनी तयार केलेली लस भारतात ‘कोविशिल्ड’ या नावाने विकणार असल्याचे सीरम इन्स्टिटय़ूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी सांगितले. या लशीच्या चाचण्या यशस्वी झाल्या असून आता थोडेच टप्पे बाकी आहेत.
 • लशीच्या निर्मितीसाठी सीरम इन्स्टिटय़ूटने ऑक्सफर्डशी करार केला होता. त्यामुळे ही लस पुण्यातील प्रकल्पात उत्पादित करण्यात येणार आहे.
 • या लशीची खरेदी बहुतांश सरकारकडून केली जाण्याची शक्यता असून लसीकरण कार्यक्रमात ती सरकारकडून मोफत दिली जाईल.
 • लशीच्या किमतीबाबत त्यांनी सांगितले की, आम्ही कमी व मध्यम उत्पन्न गटातील देशांना लस देणार आहोत. त्यामुळे त्या लशीची किंमत एका डोसला एक हजार रुपये ठेवली जाईल.
 • या लशीच्या मानवी चाचण्या भारतात घेण्याची जबाबदारी सीरम इन्स्टिटय़ूटवर टाकण्यात आली आहे. सीरमकडून 4 ते 5 हजार लोकांवर या लशीच्या चाचण्या ऑगस्टमध्ये केल्या जाणार आहेत.

 ?2. अर्थउभारीसाठी EU चं ७५० अब्ज युरोचं पॅकेज

 • युरोपियन महासंघची संपलेली बैठक ही आतापर्यंतची सर्वात मोठी बैठक असल्याचं म्हटलं जात आहे.
 • फ्रान्स २४ ने एफपी, एपी आणि रॉयटर्सच्या हवाल्यानं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. या बैठकीदरम्यान तब्बल १ हजार ८०० अब्ज युरोंच्या मदत निधीसाठी करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. दरम्यान, पुढील सात वर्षांसाठी युरोपियन महासंघाच्या देशांच्या मदतीसाठी हे पॅकेज तयार करण्यात आलं आहे. यापैकी ७५० अब्ज युरोंची रक्कम अनुदान आणि कर्जाच्या रूपात देण्यात येणार आहे.

दोन भागांमध्ये विभाजन

 • २७ देश असलेला युरोपियन महासंघ या शिखर परिषदेत दोन भागांमध्ये विभागलेला पाहायला मिळाला. एकीकडे नेदरलँड, ऑस्ट्रिया, डेनमार्क आणि स्वीडनसारखे देश होते. त्यांना फ्रुगल फोर म्हणून ओळखलं जातं.
 • तर यामध्ये फिनलँडनंदेखील त्यांचीच साथ दिली. हे पाच देश कमी अनुदान आणि कर्ज घेण्याच्या बाजूने होते. तसंच त्यांना ज्यामुळे देशांना कर्ज घेण्यात अडचणी निर्माण होती अशा अटीही लावण्याच्या तयारीत हे देश होते. अशातच पोलंड आणि हेंगेरीसारख्या देशांना संकटाचा सामना करावा लागला असता.

युरोपचा मार्शल प्लॅन

 • स्पेनचे पंतप्रधान पेद्रो सांचेज यांनी हा युरोपसाठी मार्शल प्लॅन असल्याचं म्हटलं. तसंच पुझील सहा वर्षांमध्ये यामुळे स्पेनची अर्थव्यवस्थेला १४० अब्ज युरोंचा फायदा होणार असल्याचं ते म्हणाले.

?3. ICC Rankings : स्टोक्स अष्टपैलूंच्या यादीत अव्वल

 • वेस्ट इंडिजविरूद्धच्या दुसऱ्या कसोटीत धडाकेबाज कामगिरी करणारा बेन स्टोक्स याला ICCच्या ताज्या क्रमवारीत बढती मिळाली.
 • ICCने ताजी कसोटी क्रमवारी जाहीर केली. त्यात अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत त्याने अव्वल स्थान पटकावले तर फलंदाजांच्या यादीत तो तिसऱ्या स्थानी विराजमान झाला.
 • अष्टपैलूंच्या यादीत त्याने वेस्ट इंडिजचा कर्णधार जेसन होल्डर याला खाली ढकलत अव्वलस्थान पटकावले. तसेच अँड्र्यू फ्लिंटॉफनंतर अष्टपैलूंच्या यादीत अव्वल ठरणारा स्टोक्स पहिलाच इंग्लिश खेळाडू आहे. ही स्टोक्सची कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी आहे. टॉप ५ अष्टपैलूंच्या यादीत रविंद्र जाडेजा आणि रविचंद्रन अश्विन हे दोघे अनुक्रमे तिसऱ्या आणि पाचव्या स्थानी आहेत.

?4 रोनाल्डोचे विक्रमी अर्धशतक- सेरी-फुटबॉल स्पर्धा :

 • अव्वल फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोने तीन मिनिटांच्या अंतरात दोन गोल केल्याने युव्हेंटसने सेरी-ए फुटबॉल स्पर्धेत लॅझियोला 2-1 नमवले.
 • रोनाल्डो सेरी-ए, इंग्लिश प्रीमियर लीग, ला-लिगा या स्पर्धामध्ये 50 गोल करणारा पहिला फुटबॉलपटू ठरला.
 • या विजयाबरोबरच युव्हेंटसने विक्रमी सलग नवव्या विजेतेपदाच्या दिशेने वाटचाल केली आहे.
 • रोनाल्डोने 51व्या मिनिटाला पेनल्टीवर पहिला, तर 54व्या मिनिटाला दुसरा गोल केला.

 ?5. सिरमने या प्रकल्पात 20 कोटी डॉलर गुंतवण्याचा निर्णय घेतला:

 • ऑक्सफर्डने करोना व्हायरस विरोधात विकसित केलेली लस पहिल्या फेजमध्ये यशस्वी ठरल्यामुळे जगभरात सर्वांच्याच अपेक्षा उंचावल्या आहेत.
 • भारताची सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडिया ही संस्था या प्रकल्पात भागीदार आहे. त्यामुळे सर्व काही नियोजनानुसार झाले, तर भारतीयांनाही ही लस नोव्हेंबरपर्यंत मिळू शकते.
 • सिरमने या प्रकल्पात 20 कोटी डॉलर गुंतवण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय घेण्यासाठी त्यांना फक्त 30 मिनिट लागली.
 • सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाचे प्रमुख अदर पूनावाला यांनी एनडीटीव्हीला ही माहिती दिली.

?6. 960 कर्मचाऱ्यांची कपात करणार LinkedIn:

 • करोना संकटकाळात मोठ्या कंपन्यांमधून कर्मचाऱ्यांची कपात सुरूच आहे. मंगळवारी आघाडीची प्रोफेशनल सोशल नेटवर्किंग वेबसाइट LinkedIn ने 900 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन कमी करण्याचा निर्णय घेतला.
 • जगभरातील अनेक कंपन्या LinkedIn चा वापर योग्य उमेदवाराचा शोध घेण्यासाठी करतात, तर उमेदवार/कर्मचारी या प्लॅटफॉर्मचा वापर नवीन नोकरी शोधण्यासाठी करत असतात.
 • कंपनीने जगभरातील आपल्या 960 म्हणजे कर्मचाऱ्यांच्या एकूण संख्येच्या 6 टक्के कर्मचाऱ्यांची कपात केली जाणार असल्याचं मंगळवारी जाहीर केलं.
 • सेल्स आणि हायरिंग ( sales and hiring ) डिव्हिजनधील कर्मचाऱ्यांना त्यांची नोकरी गमवावी लागेल, असे कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
 • LinkedIn चे मुख्य कार्यकारी अधिकारी रेयान रॉसलान्सकी (Ryan Roslansky) यांनी, नोकरीवरुन कमी करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना 10 आठवड्यांचा पगार दिला जाईल, असं सांगितलं. याशिवाय, अमेरिकेतील कर्मचाऱ्यांना 2020 अखेरपर्यंत आरोग्य विमाची सुविधा मिळेल असेही त्यांनी नमूद केले.

Latest Current Affairs Videos

Latest Current Affairs Videos