CURRENT AFFAIRS 23 JULY 2020

470
0
Share:

 

?1. येत्या शनिवारी चीनचं ‘मिशन मंगळ’, ऑर्बिटर, लँडर रोव्हर पाठवणार

 • चीन आणि अमेरिकेमध्ये सुरु असलेली स्पर्धा आता अवकाशातही पाहायला मिळणार आहे. चीन मंगळावर झेप घेण्यासाठी सज्ज झाला आहे. चीनने आपल्या मिशन मंगळ मोहिमेला ‘तियानवेन 1’ नाव दिले आहे.
 • ‘तियानवेन 1’ मिशनतंर्गत चीनने ऑर्बिटर, लँडर आणि रोव्हर मंगळावर उतरवण्याची योजना आखली आहे.
 • येत्या शनिवारी चीनच्या हैनान येथील तळावरुन लाँग मार्च ५ रॉकेट ऑर्बिटर, लँडर आणि रोव्हर घेऊन मंगळाच्या दिशेने झेपावेल. लाँग मार्च ५ चीनचे सर्वात शक्तीशाली रॉकेट आहे.
 • या मोहिमेद्वारे मंगळावरील मातीचा अभ्यास करण्याची योजना आहे. चीनच्या या मिशन ‘तियानवेन 1’चे उड्डाण वातावरणावरही अवलंबून आहे.
 • चीन पाठोपाठ अमेरिकाही ३० जुलैला मंगळावर रोव्हर पाठवणार आहे. या आठवडयात सोमवारी संयुक्तअरब अमिरातीचे अवकाशयान मंगळाच्या दिशेने झेपावले. ‘अल अमल’ असे या अवकाशयानाचे नाव असून ते जपानच्या प्रक्षेपण तळावरून सोडण्यात आले.
 • अरब जगतातील कुठल्याही देशाने आतापर्यंत अशी आंतरग्रहीय मोहीम राबवली नव्हती. ‘अल अमल’ मंगळाच्या कक्षेत भ्रमण करेल.
 • अमेरिकेला अवकाशात टक्कर देण्याचा चीनचा प्रयत्न आहे. १९९० पासून अमेरिकेने आतापर्यंत मंगळावर चार रोव्हर पाठवले आहेत. चीनचा हा पहिलाच प्रयत्न आहे.
 • अमेरिका पर्सविअरन्स हा एसयूव्ही गाडीच्या आकाराचा रोव्हर मंगळावर पाठवणार आहे. या माध्यमातून अमेरिका मंगळावरील स्क्षूमजीवाचे अस्तित्व, खडक आणि मातीच्या नमुन्याचे परीक्षण करणार आहे. 

?2. 75 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच ऑनलाईन होणार युएनची महासभा

 • कोरोना व्हायरस महामारीच्या संकटाचा संपुर्ण जगावर परिणाम झाला आहे. सप्टेंबरमध्ये होणाऱ्या संयुक्त राष्ट्राच्या महासभेवर देखील याचा परिणाम होणार आहे. यंदा ही महासभा वेगळ्या पद्धतीने होणार आहे.
 • या वर्षी जगभरातील नेते या महासभेला स्वतः उपस्थित न राहता, आपल्या भाषणांचे व्हिडीओ पाठवणार आहेत. संयुक्त राष्ट्राकडून या संदर्भात माहिती देण्यात आली आहे.
 • सांगण्यात आले आहे की, अनेक नेत्यांनी कोरोना संकटामुळे यूएनला येण्यास नकार दिला आहे. त्यामुळे आता हाच उत्तम पर्याय आहे.
 • या वर्षी संयुक्त राष्ट्र आपले 75 वर्ष पुर्ण झाल्याचा आनंद साजरा करत आहे. मात्र अनेक देशात हवाई वाहतूक बंद असल्याने मोठ्या संख्येने अधिकारी येणे शक्य नाही.
 • संयुक्त राष्ट्रानुसार, कोणत्याही देशाचे प्रतिनिधी, नेते किंवा अन्य प्रमुख व्यक्ती आपला संदेश आधीच पाठवू शकतात. जेणेकरून, वेळापत्रकानुसार तो व्हिडीओ संदेश चालवला जाईल. यावेळी मात्र त्या देशांचे कायमस्वरूपी प्रतिनिधी उपस्थित असतील.
 • जगातील सर्वात मोठ्या संस्थेच्या महासभेकडे दरवर्षी सर्वांचे लक्ष असते. यात 193 देशांचे प्रतिनिधी सहभागी होत असतात. मात्र यंदा परिस्थिती वेगळी असल्याने, प्रतिनिधी व्हिडीओ संदेश पाठवणार आहेत.

?3. राष्ट्रीयीकृत बँकांची संख्या पाचवर येणार!

 • केंद्र सरकारने बँकिंग उद्योगाच्या पुनर्रचनेचा भाग म्हणून सध्याच्या १२ राष्ट्रीयीकृत बँकांची संख्या आणखी कमी करण्याचे ठरविले आहे.
 • उल्लेखनीय म्हणजे दोन दिवसांपूर्वी बँकांच्या राष्ट्रीयीकरणाच्या ५१ व्या वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने ही योजना प्रस्तावित केली असून त्यात काही बँकांचे खासगीकरणही अभिप्रेत आहे.
 • वृत्तसंस्थेने सरकारी आणि बँकिंग सूत्रांच्या आधारे दिलेल्या वृत्तानुसार प्रस्तावित योजनेच्या पहिल्या टप्प्यात सरकारी मालकीच्या बँकांची संख्या केवळ पाचच राहील असे उद्दिष्ट राखण्यात आले आहे.
 • तथापि सध्याच्या १२ वरून पाच अशी ही संख्या खासगीकरणाच्या माध्यमातून कमी केली जाणार आहे. सरकारी मालकीच्या बँकांपैकी बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन ओव्हरसीज बँक, यूको बँक, बँक ऑफ महाराष्ट्र आणि पंजाब अ‍ॅण्ड सिंध बँक या बँकांतील सरकारकडे असलेल्या बहुमताचा भागभांडवली हिस्सा विकण्याचा पर्यायाने या बँकांचे खासगीकरण प्रास्तावित आहे.
 • एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याचा हवाला देत या वृत्तसंस्थेने दोन वर्षांत राष्ट्रीयीकृत बँकांची संख्या चार किंवा पाचवर आणण्याचे प्रास्तावित असल्याचे म्हटले आहे. करोना विषाणूबाधेमुळे स्थंभित झालेल्या अर्थव्यवस्थेमुळे सरकारला अपेक्षित महसूल मिळू शकलेला नाही. याची भरपाई करण्यासाठी राष्ट्रीयीकृत बँकांतील भागभांडवल विकून निधी उभारण्याचा सरकारी पातळीवर विचार सुरू आहे.
 • याआधी अनेक सरकारी समित्यांनी आणि भारतीय रिझव्‍‌र्ह बँकेने सरकारी बँकांची संख्या कमी करण्याचे प्रस्तावित केले आहे. सरकारने या वित्तीय वर्षांच्या सुरुवातीला १० सरकारी बँकांचे चार बँकांत विलीनीकरण करून राष्ट्रीयीकृत बँकांची संख्या २२ वरून १२ वर आणली आहे.
 • भविष्यात सरकारी बँकांचे विलीनीकरण शक्य नसल्याने भागभांडवल विकणे हाच पर्याय असल्याचा मतप्रवाह केंद्रीय अर्थ खात्यात बळावत असल्याचे दिसत आहे.
 • करोना विषाणूबाधेच्या संकटामुळे आर्थिक वर्षांच्या अखेरीस बँकांना वाढत्या अनुत्पादित मालमत्तेचा सामना करावा लागेल असे मानण्यात येते. परिणामी बँकांच्या पुनर्भाडवलीकरणाची आवश्यकता लक्षात घेता, सरकारपुढे वाढीव आर्थिक पेच निर्माण होईल. आधीच घटलेल्या महसुलामुळे बँकांच्या पुनर्भाडवलीकरणासाठी तरतूद करणे सरकारला जवळजवळ अशक्य असल्याचे मानले जाते.
 • या तरतुदीपेक्षा बँकांतील भागभांडवल विकून खासगीकरण करण्यावर अर्थमंत्रालय अनुकूल असल्याचे दिसून येते. पुनर्भाडवलीकरणापेक्षा भागभांडवल विकून खासगीकरणाची योजना कितपत यशस्वी होईल याबद्दल बँकिंग वर्तुळात मात्र साशंकता व्यक्त होत आहे.

?4. ऑक्सफर्डची लस सीरम कंपनी ‘कोविशिल्ड’ नावाने विकणार

 • या लशीच्या चाचण्या यशस्वी झाल्या असून आता थोडेच टप्पे बाकी आहेत.
 • ऑक्सफर्ड विद्यापीठ व अ‍ॅस्ट्राझेन्का यांनी तयार केलेली लस भारतात ‘कोविशिल्ड’ या नावाने विकणार असल्याचे सीरम इन्स्टिटय़ूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी सांगितले. या लशीच्या चाचण्या यशस्वी झाल्या असून आता थोडेच टप्पे बाकी आहेत.
 • लशीच्या निर्मितीसाठी सीरम इन्स्टिटय़ूटने ऑक्सफर्डशी करार केला होता. त्यामुळे ही लस पुण्यातील प्रकल्पात उत्पादित करण्यात येणार आहे. या लशीची खरेदी बहुतांश सरकारकडून केली जाण्याची शक्यता असून लसीकरण कार्यक्रमात ती सरकारकडून मोफत दिली जाईल.
 • लशीच्या किमतीबाबत त्यांनी सांगितले की, आम्ही कमी व मध्यम उत्पन्न गटातील देशांना लस देणार आहोत. त्यामुळे त्या लशीची किंमत एका डोसला एक हजार रुपये ठेवली जाईल.
 • या लशीच्या मानवी चाचण्या भारतात घेण्याची जबाबदारी सीरम इन्स्टिटय़ूटवर टाकण्यात आली आहे. सीरमकडून ४ ते ५ हजार लोकांवर या लशीच्या चाचण्या ऑगस्टमध्ये केल्या जाणार आहेत.

?5. चंद्रपूरमध्ये उभारणार १४५ मेगावॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प

 • मुख्यमंत्री, ऊर्जामंत्र्यांचा हिरवा कंदील
 • विविध प्रकारच्या वीजप्रकल्पांसाठी ओळखल्या जाणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यात आता प्रदुषणमुक्त १४५ मेगावॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. भद्रावती तालुक्यातील करचराळा येथे हा प्रकल्प होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि ऊर्जामंत्री नितीन राउत यांनी याला हिरवा झेंडा दाखवला आहे.
 • चंद्रपूर जिल्ह्याने कायमच उद्योग, औष्णिक विद्युत प्रकल्प यासाठी जगाच्या नकाशावर स्थान मिळविले आहे. मात्र, यामुळे येथे मोठ्या प्रमाणात प्रदुषणाच्या प्रश्नही निर्माण झाला आहे. जिल्ह्यातील प्रदूषणामुळे लोकांच्या आरोग्यावर होणार परिणाम नेहमीच चिंतेचा विषय ठरत आहे.
 • जिल्ह्याातील नवीन औष्णिक ऊर्जा प्रकल्प येऊन जिल्हातील वनसंपदेच्या ऱ्हास होणार होता. मात्र, हे टाळण्यासाठी खासदार बाळू धानोरकर आणि आमदार प्रतिभा धानोरकर यांनी जिल्ह्याात पर्यावरणाचे संतुलन राखले जाईल असे उद्योग आणण्याची आग्रही भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या पुढे मांडली होती.
 • त्यांच्या या मागणीवर सकारात्मक निर्णय घेऊन मुख्यमंत्र्यांनी १४५ मेगावॅटचा सौर ऊर्जा प्रकल्पाला मान्यता दिली. या ग्रीन प्रोजेक्टमुळे प्रदूषणविरहित वीज निर्मिती करून चंद्रपूर जिल्हातील नागरिकांना दिलासा मिळणार आहे. या प्रकल्पामुळे रोजगार निर्मिती चालना मिळून स्थानिकांना रोजगाराची संधी देखील उपलब्ध होणार आहे, असं खासदार धानोरकर यांनी सांगितलं.

?6. ‘ध्रुवास्त्रा’ची चाचणी यशस्वी

 • ओडिशातील बालासोर येथे भारताच्या हेलिकॉप्टरवरून सोडण्याच्या ध्रुवास्त्राची चाचणी यशस्वी झाली असून यात प्रत्यक्ष हेलिकॉप्टरमधून ते सोडण्यात आले नव्हते. हे रणगाडाविरोधी क्षेपणास्त्र असून ते प्रत्यक्षात नाग (हेलिना) क्षेपणास्त्र आहे, त्याचे नामकरण ‘ध्रुवास्त्र’ असे करण्यात आले आहे. भारतीय लष्करी दलांनी या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली असून बालासोर येथे १५ व १६ जुलैला त्याच्या हेलिकॉप्टरमधून सोडण्याच्या चाचण्या यशस्वी झाल्या होत्या.
 • ‘हेलिना’ हे तिसऱ्या पिढीचे क्षेपणास्त्र असून त्याचा मूळ उद्देश शत्रूच्या रणगाडय़ांचा वेध घेणे हा आहे. प्रगत हलक्या हेलिकॉप्टरमधून ते सोडता येते. सर्व हवामानात वापरता येणारे हे क्षेपणास्त्र असून उंचीवरून हल्ला व थेट हल्ला असे दोन्ही प्रकार यात शक्य आहेत.
 • हेलिना शस्त्रास्त्र प्रणाली अजून लष्करात तैनात करण्यात आलेली नाही. हेलिनाचाच भाग असलेले ध्रुवास्त्र भारतीय हवाई दलात तैनात करण्याचे काम चालू आहे. या क्षेपणस्त्राची क्षमता ७ कि.मी. असून एकाच वेळी हेलिकॉप्टरला लावून आठ क्षेपणास्त्रे सोडली जाऊ शकतात. त्यासाठी दोन प्रक्षेपकांचा वापर केला जातो.
 • हेलिना दोन प्रकारे सोडता येते. रणगाडय़ांची जास्तीत जास्त हानी करण्याची क्षमता त्यांच्यात आहे. त्यात ‘इमेजिंग इन्फ्रारेड सिकर’चा समावेश आहे.

 


Latest Current Affairs Videos

Latest Current Affairs Videos