Current Affairs 22 JULY 2020

Share:

 

🎯1. ६४ वर्षांत पहिल्यांदाच नोबेल पुरस्कार सोहळा रद्द

 • नोबेल फाऊंडेशनच्या संचालकांची माहिती
 • सध्या जगभरात करोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अशा परिस्थितीत दिवसेंदिवस करोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढही होत आहे. करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर यावर्षी पार पडणारा नोबेल पुरस्कार सोहळाही रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसंच माध्यमांच्या रिपोर्टनुसार ६४ वर्षांत पहिल्यांदाच हा सोहळा रद्द करण्यात आल्याचं म्हटलं जातंय.
 • नोबेल पुरस्कारांचं आयोजन करणाऱ्या संस्थेनं यासंदर्भातील माहिती दिली आहे. नोबेल पुरस्कार सोहळ वेगळ्या प्रकारे आयोजित करण्यात येणार असून त्याची लवकरच माहिती दिली जाणार असल्याचंही यावेळी स्पष्ट करण्यात आलं.
 • “ज्या प्रकारे नोबेल आठवडा आयोजित करण्यात येतो तसा यावेळी करण्यात येणार नाही. सध्या करोनाच्या महामारीमुळे यावेळची परिस्थिती वेगळी आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे वर्ष निराळं आहे. सध्या सर्वांना नव्या परिस्थितीशी जुळवून घेण्याची गरज आहे. त्यामुळे यावर्षीचा नोबेल पुरस्कार सोहळा रद्द केला जाणार असून तो नव्या स्वरूपात दिसेल,” अशी माहिती नोबेल फाऊंडेशनचे संचालक लार्स हेकेन्स्टीन निवेदनाद्वारे दिली. दरम्यान, नोबेल पुरस्कारांच्या ६४ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच हा सोहळा रद्द करण्यात आल्याचं म्हटलं जातंय.
 • डिसेंबरच्या अखेरच्या आठवड्यात आयोजन
 • दरवर्षी डिसेंबर महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात नोबेल पुरस्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात येतं. यालाच नोबेल विक म्हणूनही ओळखलं जातं. दरवर्षी या कालावधीत त्या वर्षातील नोबेल पुरस्कार विजेत्यांना स्टॉकहोममध्ये आमंत्रित केलं जातं. स्टॉकहोमच्या सिटी हॉलमध्ये आयोजित या सोहळ्यात विजेत्यांसाठी स्वीडिश राजघराण्यातील आणि जवळपास १३०० पाहुण्यांसोबत भोजनाचंदेखील आयोजन केलं जातं. शांती पुरस्कार विजेत्यांना ओस्लोमध्ये सन्मानित केलं जातं. त्यांनादेखील याठिकाणी येण्याचं आमंत्रण दिलं जातं.

🎯2. भारतीय वंशाच्या नर्सचा सिंगापूरमध्ये राष्ट्रपती पुरस्कारने सन्मान

 • सिंगापूरमध्ये कोरोना व्हायरस संकटाच्या काळात कोरोना यौद्धा म्हणून सर्वात पुढे येऊन काम करणाऱ्या एका भारतीय वंशाच्या नर्सचा राष्ट्रपती पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे.
 • कला नारायणसामी यांचा 5 नर्सेसमध्ये समावेश आहे, ज्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या सर्व नर्सेसना सिंगापूरचे राष्ट्रपती हलीम याकूब यांच्याद्वारे स्वाक्षरी असलेले प्रमाणपत्र, एक ट्रॉफी आणि 10 हजार सिंगापूर डॉलर्स देण्यात आले.
 • नारायणसामी या वुडलँड्स हेल्थ कँम्पसमध्ये नर्सिंगच्या उपसंचालक आहेत. कोरोना महामारीच्या संकटात संसर्ग रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांच्या कार्यासाठी त्यांना सन्मानित करण्यात आले. या उपाययोजना त्यांनी 2003 साली सार्सच्या वेळी शिकल्या होत्या.
 • नारायणसामी या सध्या 2022 मध्ये सुरू होणाऱ्या वुडलँड हेल्थ कॅम्पसच्या नियोजनात सहभागी आहेत. त्या पुरस्काराविषयी म्हणाल्या की, मी पुढील पिढीतील नर्सेसला तयार करेल. मी नेहमीच आमच्या नर्सेसना सांगते की, नर्सिंग तुम्हाला कधीच पुरस्कृत करण्यात अपयशी ठरणार नाही.
 • वर्ष 2000 साली नर्सेसना त्यांच्या कामगिरीसाठी पुरस्कार देण्याची सुरूवात झाली होती. आतापर्यंत 77 नर्सेसना सन्मानित करण्यात आले आहे.

🎯3. ‘ध्रुवास्त्र’ची यशस्वी चाचणी, क्षणार्धात दुश्मनाच्या चिंधड्या उडवणार

 • चीनसोबत सध्या सुरु असलेल्या तणावात भारतीय सैन्याच्या मदतीला एक मोठी ताकत आली आहे. भारतानं ध्रुवास्त्र क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली आहे.
 • हे क्षेपणास्त्र पूर्णपणे मेड इन इंडिया आहे. या ध्रुवास्त्र क्षेपणास्राचा वापर भारतीय लष्कराकडील ध्रुव हेलिकॉप्टरसोबत केला जाणार आहे. क्विक रिस्पॉन्स देणारं हे क्षेपणास्त्र क्षणार्धात दुश्मनांच्या चिंधड्या उडवणार आहे.
 • ‘ध्रुवास्‍त्र’ क्षेपणास्त्राची चाचणी ओदिशा येथील बालासोर येथे करण्यात आली. या क्षेपणास्त्राची रेंज चार किलोमीटर ते सात किलोमीटर पर्यंत आहे. ही चाचणी नुकतीच हेलिकॉप्टर विना करण्यात आली.
 • डिफेंस रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायजेशन (डीआरडीओ) द्वारा बनवलेल्या या क्षेपणास्त्राचं नाव आधी नाग असं होतं ते नंतर बदलून ध्रुवास्त्र केलं गेलं.

LAC वर आता हवाई योद्धा ‘भारत’ ड्रोनची निगराणी, काय आहेत खास गोष्टी?

 • भारत आणि चीनमध्ये सुरु असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) ने भारतीय सैन्याला एलएसीसोबतच उंच आणि डोंगराळ भागात लक्ष ठेवण्यासाठी स्वदेशी ड्रोन उपलब्ध करून दिलं आहे.
 • ‘भारत’ नावाचं ड्रोन डीआरडीओच्या टर्मिनल हॉलिस्टिक्स अनुसंधान प्रयोगशाळा (टीबीआरएल),चंदीगडद्वारे विकसित करण्यात आलं आहे. या ड्रोनमार्फत उंच आणि डोंगराळ भागात गस्त घालण्यास मदत होणार आहे. अधिकाऱ्यांनी यासंदर्भात बोलताना सांगितलं की, ‘हे ड्रोन पूर्व लडाखमध्ये तैनात केलं जाण्याची शक्यता आहे.
 • तसेच या ड्रोनच्या माध्यमातून उंच आणि डोंगराळ भागातील निगराणी वाढवली जाऊ शकते. तसेच सीमेवरील इतर भागांमध्ये हे ड्रोन तैनात करण्यात येणार का? असा प्रश्न विचारल्यावर यासंदर्भात सैन्यदलाकडून निर्णय घेण्यात येणार असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं.

भारत’ ड्रोनची वैशिष्ट्य :

 • जगातील सर्वात हलतं आणि चपळ ड्रोन आहे भारत
 • नाईच व्हिजनचं फिचर देण्यात आलं आहे.
 • रियल टाइम व्हिडीओ रेकॉर्डची क्षमता आहे.
 • बालाकोट सारख्यं एअर स्ट्राइक करण्यासाठी सक्षण
 • आर्टिफिशियल इंटेलिजेंस आणि कॅमऱ्याची क्षमता आहे.
 • घनदाट जंगलांमध्ये लपलेल्या शत्रुंना ट्रॅक करण्याटी क्षमता
 • डिझाइन आणि टेक्नॉलॉजीमुळे रडारवर डिटेक्ट होत नाही
 • थंड वातावरणातही काम करण्यासाठी सक्षम

🎯4. अर्थउभारीसाठी EU चं ७५० अब्ज युरोचं पॅकेज

 • युरोपियन महासंघची संपलेली बैठक ही आतापर्यंतची सर्वात मोठी बैठक असल्याचं म्हटलं जात आहे.
 • फ्रान्स २४ ने एफपी, एपी आणि रॉयटर्सच्या हवाल्यानं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. या बैठकीदरम्यान तब्बल १ हजार ८०० अब्ज युरोंच्या मदत निधीसाठी करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
 • दरम्यान, पुढील सात वर्षांसाठी युरोपियन महासंघाच्या देशांच्या मदतीसाठी हे पॅकेज तयार करण्यात आलं आहे. यापैकी ७५० अब्ज युरोंची रक्कम अनुदान आणि कर्जाच्या रूपात देण्यात येणार आहे.

दोन भागांमध्ये विभाजन

 • २७ देश असलेला युरोपियन महासंघ या शिखर परिषदेत दोन भागांमध्ये विभागलेला पाहायला मिळाला. एकीकडे नेदरलँड, ऑस्ट्रिया, डेनमार्क आणि स्वीडनसारखे देश होते. त्यांना फ्रुगल फोर म्हणून ओळखलं जातं.
 • तर यामध्ये फिनलँडनंदेखील त्यांचीच साथ दिली. हे पाच देश कमी अनुदान आणि कर्ज घेण्याच्या बाजूने होते. तसंच त्यांना ज्यामुळे देशांना कर्ज घेण्यात अडचणी निर्माण होती अशा अटीही लावण्याच्या तयारीत हे देश होते. अशातच पोलंड आणि हेंगेरीसारख्या देशांना संकटाचा सामना करावा लागला असता.

युरोपचा मार्शल प्लॅन

 • स्पेनचे पंतप्रधान पेद्रो सांचेज यांनी हा युरोपसाठी मार्शल प्लॅन असल्याचं म्हटलं. तसंच पुझील सहा वर्षांमध्ये यामुळे स्पेनची अर्थव्यवस्थेला १४० अब्ज युरोंचा फायदा होणार असल्याचं ते म्हणाले.

🎯5. ICC Rankings : स्टोक्स अष्टपैलूंच्या यादीत अव्वल

 • वेस्ट इंडिजविरूद्धच्या दुसऱ्या कसोटीत धडाकेबाज कामगिरी करणारा बेन स्टोक्स याला ICCच्या ताज्या क्रमवारीत बढती मिळाली.
 • ICC ने ताजी कसोटी क्रमवारी जाहीर केली. त्यात अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत त्याने अव्वल स्थान पटकावले तर फलंदाजांच्या यादीत तो तिसऱ्या स्थानी विराजमान झाला.
 • अष्टपैलूंच्या यादीत त्याने वेस्ट इंडिजचा कर्णधार जेसन होल्डर याला खाली ढकलत अव्वलस्थान पटकावले. तसेच अँड्र्यू फ्लिंटॉफनंतर अष्टपैलूंच्या यादीत अव्वल ठरणारा स्टोक्स पहिलाच इंग्लिश खेळाडू आहे. ही स्टोक्सची कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी आहे.
 • टॉप ५ अष्टपैलूंच्या यादीत रविंद्र जाडेजा आणि रविचंद्रन अश्विन हे दोघे अनुक्रमे तिसऱ्या आणि पाचव्या स्थानी आहेत.

🎯6. रोनाल्डोचे विक्रमी अर्धशतक- सेरी-फुटबॉल स्पर्धा :

 • अव्वल फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोने तीन मिनिटांच्या अंतरात दोन गोल केल्याने युव्हेंटसने सेरी-ए फुटबॉल स्पर्धेत लॅझियोला 2-1 नमवले.
 • रोनाल्डो सेरी-ए, इंग्लिश प्रीमियर लीग, ला-लिगा या स्पर्धामध्ये 50 गोल करणारा पहिला फुटबॉलपटू ठरला.
 • या विजयाबरोबरच युव्हेंटसने विक्रमी सलग नवव्या विजेतेपदाच्या दिशेने वाटचाल केली आहे.
 • रोनाल्डोने 51व्या मिनिटाला पेनल्टीवर पहिला, तर 54व्या मिनिटाला दुसरा गोल केला.
 • सिरमने या प्रकल्पात 20 कोटी डॉलर गुंतवण्याचा निर्णय घेतला:
 • ऑक्सफर्डने करोना व्हायरस विरोधात विकसित केलेली लस पहिल्या फेजमध्ये यशस्वी ठरल्यामुळे जगभरात सर्वांच्याच अपेक्षा उंचावल्या आहेत.
 • भारताची सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडिया ही संस्था या प्रकल्पात भागीदार आहे. त्यामुळे सर्व काही नियोजनानुसार झाले, तर भारतीयांनाही ही लस नोव्हेंबरपर्यंत मिळू शकते.
 • सिरमने या प्रकल्पात 20 कोटी डॉलर गुंतवण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय घेण्यासाठी त्यांना फक्त 30 मिनिट लागली.
 • सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाचे प्रमुख अदर पूनावाला यांनी एनडीटीव्हीला ही माहिती दिली.

Latest Current Affairs Videos

Latest Current Affairs Videos