CURRENT AFFAIRS 2 SEPTEMBER 2018

568
0
Share:

?1. पाकिस्तानला अमेरिकेचा आणखी एक झटका मोठी आर्थिक मदत रद्द

 • पाकिस्तानला दगडा दणका देताना अमेरिकेने तीनशे मिलियन डॉलर्स म्हणजे जवळपास 2100 कोटी रुपयांची आर्थिक मदत रोखली
 • दहशतवाद्यांविरोधात कोणतीही ठोस कारवाई न केल्याबद्दल अमेरिकेने हा निर्णय घेतला आहे
 • दहशतवादाविरोधात कारवाई करण्यात पाकिस्तान अयशस्वी ठरतात वारंवार सूचना करून देखील दहशतवाद विरोधात कारवाई न केल्यामुळे आम्ही 300 मिलियन डॉलर्स आर्थिक मदत रोखण्याचा निर्णय घेतल्याचा अमेरिकेकडून सांगण्यात येत आहे
 • या वर्षीच्या सुरुवातीला ही अमेरिकेने पाकिस्तानची 50 कोटी डॉलरची आर्थिक मदत रोखली होती

?2. उपराष्ट्रपतींच्या पुस्तकाचे प्रकाशन

 • उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या उपराष्ट्रपतीपदाच्या कारकिर्दीला एक वर्ष पूर्ण झाले आहे
 • यानिमित्ताने नायडू यांनी ‘मुविंग ऑन मुविंग फॉरवर्ड : ए ईअर इन ऑफिस’ हे पुस्तक लिहिले आहे
 • विज्ञान भवनात पंतप्रधान नरेंद्र मोदी माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले
 • पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाला माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा, लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन, केंद्रीय मंत्री अरुण जेटली आदी मान्यवर उपस्थित होते

?3. न्या, रंजन गोगोई होणार भारताचे नवे सरन्यायाधीश

 • भारताचे पुढील सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती रंजन गोगोई यांची शिफारस सध्याचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी केंद्र सरकारकडे केली आहे
 • 3 ऑक्टोबर रोजी सरन्यायाधीश म्हणून शपथ घेण्याची शक्यता आहे
 • न्या, 28 फेब्रुवारी 2018 रोजी गुवाहाटी उच्च न्यायालयाचे न्यायाधीश बनले
 • त्यानंतर 12 फेब्रुवारी 2011 रोजी ते पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश झाले
 • एप्रिल 2012 पासून ते सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून कार्यरत आहेत
 • न्यायमूर्ती गोगोई असून सध्या त्यांच्यावर एनसीआर ( नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीजन)  अपडेट करण्याची ही प्रक्रिया सुरू आहेत या प्रक्रियेवर देखरेख ठेवण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे
 • दरम्यान 2017 साली सर्वोच्च न्यायालयातील वरिष्ठ न्यायाधीशांनी केलेल्या बंडात न्यायाधीश यांचा समावेश होता

?4. ISSF World championship :भारतीय नेमबाजांना दोन सुवर्णपदक

 • 52 व्या ISSF World championship स्पर्धेत भारतीय नेमबाजांनी धडाकेबाज सुरुवात केली आहे
 • जूनियर खेळाडूंच्या गटात भारताने दोन सुवर्णपदकांची कमाई केली आहे
 • याचबरोबर सांघिक प्रकारातही अर्जुन ने आपले सहकारी गौरव राणा आणि अनमोल जैन यांच्या सोबत सुवर्णपदक पटकावलं
 • गौरव ने वैयक्तिक प्रकारातही कांस्यपदक आपल्या नावावर केलं
 • 2020 मध्ये टोकियोत होणा-या ऑलिम्पिकसाठी या स्पर्धेतून खेळाडूंना प्रवेश मिळणार आहे

?5. ASIAN GAMES 2018: समारोप समारंभात राणी रामपाल भारताची ध्वजधारक

 • भारतीय महिला हॉकी संघाची कर्णधार राणी राजपालची आशियाई क्रीडा स्पर्धेचा रविवारी होणाऱ्या  समारोप कार्यक्रमासाठी भारताची ध्वजधारक म्हणून निवड करण्यात आली आहे
 • रविवारी होणाऱ्या सांगता समारंभास राणी भारताची ध्वजधारक असणार आहे, असे भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष नरिंदर बत्रा यांनी सांगितले

?6 राष्ट्रीय एरोबिक स्पर्धेचा मान गोव्याला, 22 राज्यांचा समावेश

 • नाही एरोबिक्स या खेळाची राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा गोव्यात आयोजित करण्याचे ठरले होते
 • इंडियन स्पोर्ट्स एरोबिक्स अँड फिटनेस फेडरेशन ऑफ इंडियातर्फे पेडे- म्हापसा येथील इंडोर स्टेडीयम वर 12 ते 14 ऑक्‍टोबर दरम्यान ही स्पर्धा होईल
 • या स्पर्धेत देशातील 22 राज्यांचे संघ सहभागी होतील 450 खेळाडू आणि 35 तांत्रिक अधिकाऱ्यांचा समावेश आहे
 • सीबीएससी बोर्डच्या राष्ट्रीय चॅम्पियनशिपमध्ये सर्क्युलरमध्ये गेल्या सात वर्षांपासून या खेळाचा समावेश करण्यात आला आहे
 • 2018-19 या वर्षातील ही अधिकृत केंद्रित जूनियर आणि वरिष्ठ गटातील स्पर्धा असून या स्पर्धेतील विजेत्या संघाला 16 ते 18 नोव्हेंबरदरम्यान मास्को येथे होणाऱ्या जागतिक स्पोर्ट्स एरोबिक्स फिटनेस अँड हिप हॉप चॅम्पियनशिप साठी सहभागाची संधी मिळणार आहे
 • गेल्या वर्षी गोव्यातच आंतराष्ट्रीय स्तरावरील एरोबिक्स कार्यशाळा आणि स्पर्धेचं आयोजन करण्यात आले होते.

?7. बँकिंग सेवा पोहोचणार प्रत्येकाच्या दारापर्यंत भारतीय पोस्ट पेमेंट बँकेचे दिल्लीत उद्घाटन

 • देशातील टपाल दाव्याला बळकटी देणाऱ्या आणि या टपाल जाळ्यांचा वापर करून सर्वसामान्यांच्या दारात वित्तीय सेवा पोहोचवत बचतीला चालना देणाऱ्या इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी उद्घाटन केले.
 • विशेष म्हणजे या बँकेची स्थापना 17 ऑगस्ट 2016 रोजी झाली होती
 • 30 जानेवारी 2017 रोजी प्रायोगिक तत्त्वावर या बँकेचा रायपूर आणि रांची येथील दोन शाखांचे उद्घाटनही झाले
 • ही योजना आता देशाच्या सर्व जिल्ह्यांत पंतप्रधानांच्या हस्ते शनिवारी कार्यान्वित झाली आहे
 • टपाल कार्यालयांची जाळे आणि जवळपास तीन लाख पोस्टमन आणि ग्रामीण टपाल सेवकांच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकाच्या दारात बँकिंग सेवा त्याद्वारे पोहोचविण्यात येणार आहे
 • अर्थातच घरपोच सेवेसाठी शुल्कही आकारले जाईल आणि जीएसटी ही आकारला जाईल असे या बँकेच्या संकेतस्थळावर नमूद करण्यात आले आहे
 • या बँकेत अनामत ठेवी स्वीकारण्यात येणार आहेत
 • मात्र ही बँक अग्रिम कर्ज अथवा क्रेडिट कार्ड देणार नाही
 • दळणवळण मंत्री मनोज सिन्हा यांनी सांगितले की 650 शाखा आणि 3250 संपर्क केंद्रांद्वारे ही सेवा देशभर उपलब्ध करून देण्यात येणार आहे
 • कोणत्याही खात्यामध्ये एक लाख रुपयांहून अधिक रक्कम भरल्यास त्याचे आपोआप टपाल कार्यालय बचत खात्यामध्ये रूपांतर होणार आहे
 • त्यासाठी टपाल बचत बँकांमधील तब्बल 17 कोटी खाते संलग्न करण्याची परवानगीही या नव्या बँकेला देण्यात आली आहे
 • कर्ज आणि विमा यासाठी आयपीपीबी, पीएनबी, बजाज अलियन्स लाइफ इन्शुरन्स फॉर थर्ड पार्टी सारख्या आर्थिक सेवांशी जोडण्यात येणार आहे.

टपाल बँकेची वैशिष्ट्ये:

 • आयपीपीबी 100 टक्के सरकारी आणि टपाल खात्याच्या अखत्यरीत स्थापन
 • एअरटेल आणि पेटीएम नंतर ‘ पेमेंट बँक’ म्हणून परवाना  लाभलेली तिसरी सेवा
 • तब्बल 100 हून अधिक देयकाचा भरणा आणि आर्थिक व्यवहार पार पाडण्याची सोय
 • बचत आणि चालू खात्याची सेवा उपलब्ध
 • निधी हस्तांतरण, लाभार्थी अनुदान हस्तांतरण, गॅस, दूरध्वनी, वीज आदि देयकाचा भरणा सेवा मूल्यांचा भरणा,एटीएम आणि डेबिट कार्ड, नेटवर्किंग आदी सेवा उपलब्ध
 • खाते उघडण्यासाठी आधार चा वापर, तर वैधता, व्यवहार आणि पैसे भरण्यासाठी बायोमेट्रिक यंत्रणेचा वापर
 • खात्यात किमान ठेवीची अट नाही
 • कमाल ठेवीची मर्यादा एक लाख रुपयापर्यंत
 • त्यापुढील ठेवी या थेट टपाल कार्यालय बचत खात्यात जमा होणार
 • बचत खात्यावर चार टक्के व्याजदर मायक्रो एटीएम, मोबाईल बँकिंग अॅप, संदेश आदीद्वारे सेवा

 


Latest Current Affairs Videos

Latest Current Affairs Videos