Current Affairs 19 February 2019

511
0
Share:

 

?1. केंद्रीय कर्मचाऱ्यांना सरकारची मोठी भेट

 • लोकसभा निवडणुकीआधी मोदी सरकार सरकारी कर्मचाऱ्यांना एकाहून एक मोठी भेट देत आहे. मोदी सरकारने कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढविला आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांना १२ टक्के महागाई भत्ता देण्याचा निर्णय मंगळवारी केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला.
 • महागाई भत्त्यात ही तीन टक्के वाढ असून सुमारे एक कोटी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांना त्याचा लाभ मिळेल. ही वाढ १ जानेवारी २०१९ पासून लागू करण्यात येईल.
 • नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत महागाई भत्ता 3 टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला गेला.
 • पूर्वी ९ टक्के महागाईभत्ता असणारा आता १२ टक्के झाला आहे. या निर्णयामुळे सरकारच्या तिजोरीवर १९६८ कोटी रूपयांचा आतिरिक्त भार पडणार आहे.
 • दिल्ली-गाझियाबाद-मेरठचा रॅपिड ट्रांझिट सिस्टम (आरआरटीएस) बांधण्याचा प्रस्ताव आणि अहमदाबाद मेट्रो रेल्वे प्रकल्प फेज-२ चा प्रस्ताव कॅबिनेटमध्ये मंजूर केल्याची माहिती मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिली. यामध्ये सरकारच्या तिजोरीवर ३०२७४ कोटींचा भार पडणार आहे.

?2. मुंबई विमानतळ ठरले सर्वोत्तम इन्फ्रास्ट्रक्चर

 • मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील नवीन टर्मिनल (टी-२) देशातील सर्वोत्तम पायाभूत सुविधा (इन्फ्रास्ट्रक्चर) ठरले आहे. ‘ईपीएस वर्ल्ड’ हा या क्षेत्रातील पुरस्कार विमानतळाला मिळाला आहे.
 • छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून तासाला सरासरी ४८ विमानांची ये-जा होते. हे देशातील सर्वात व्यस्त, आशियातील १४ वे व जगातील २९ वे सर्वाधिक व्यस्त विमानतळ आहे.
 • विमानतळाचा २००६ पासून खासगीकरणातून विकास सुरू आहे. त्यासाठी जीव्हीके व विमानतळ प्राधिकरणाची मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेड (मिआल) ही संयुक्त कंपनी स्थापन करण्यात आली आहे. हीच कंपनी विमानतळाचे दैनंदिन कामकाज पहात आहे.
 • मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असल्याने वाढता व्याप पाहता, फेब्रुवारी २०१४ मध्ये विमानतळावर नवीन टर्मिनल इमारत बांधण्यात आले. चार लाख ५० हजार चौरस मीटर क्षेत्रफळावर ही इमारत उभी आहे. त्यासाठी ९८ अब्ज रुपये खर्च करण्यात आला.
 • जेट एअरवेज, एअर विस्तारा व एअर इंडिया या भारतीय विमानसेवा कंपन्यांसह विदेशी कंपन्यांची विमाने याच टर्मिनलमधून रवाना होतात.
 • १२ हजार कर्मचारी येथे कार्यरत आहेत. चार कोटी प्रवासी क्षमतेचे हे टर्मिनल आहे. असे हे टर्मिनल देशातील विविध सार्वजनिक उपयोगांच्या प्रकल्पांमधील सर्वोत्तम बांधकाम ठरले आहे.
 • नवी दिल्लीत झालेल्या ‘ईपीएस वर्ल्ड’ परिषदेत विमानतळाला हा पुरस्कार मिळाला आहे.

?3. भारताची अमेरिकेकडून प्रथमचकच्च्या इंधनाची खरेदी

 1. आखाती देशांवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी ‘इंडियन ऑइल’तर्फे (आयओसी) प्रथमच अमेरिकेकडून वार्षिक ३० लाख टन कच्चे इंधन खरेदी करण्यात येणार आहे.
 2. या संदर्भातील करारही नुकताच झाला. त्यानुसार एक एप्रिल २०१९पासून अमेरिकेतून इंधन आयात करण्यात येणार आहे. या व्यवहाराचे एकूण मूल्य १.५ अब्ज डॉलर असेल.
 3. भारताने २०१७ पासून अमेरिकेकडून इंधनाची आयात करण्यास सुरुवात केली होती. मात्र, प्रथमच एका भारतीय तेलशुद्धीकरण कंपनीने अमेरिकेसमवेत वार्षिक करार केला आहे.

?4. प्रसिद्ध साहित्यिक नामवर सिंह यांचे निधन, वयाच्या 92 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

 • हिंदी साहित्यातील प्रसिद्ध लेखक, समीक्षक नामवर सिंह यांचे काळ रात्री वयाच्या 92 वर्षी निधन झाले.
 • एका महिन्यापासून दिल्लीतील एम्स ट्रॉमा सेंटरमध्ये ब्रेन हॅमरेज झाल्यामुळे लाईफ सपोर्ट सिस्टमवर होते. कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार नामवर सिंह यांच्यावर बुधवारी दिल्लीतील लोधी रोडवर असलेल्या समशान घाटात दुपारी अंतिम संस्कार करण्यात येणार आहे.
 • नामवर सिंह यांचा जन्म 28 जुलै 1927 रोजी वाराणसीमधील एका छोट्या गावात झाला होता. हिंदी साहित्यमध्ये त्यांनी एमए आणि पीएचडीचे शिक्षण घेतले आहे.
 • त्यांना साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. 1959 मध्ये चकिया-चंदौलीमधून कम्युनिस्ट पार्टीकडून त्यांनी लोकसभा निवडणूकही लढवली आहे. पण त्यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला होता.
 • त्यांनी छायावाद (1955), इतिहास और आलोचना(1957), कहानी : नयी कहानी (1964), कविता के नए प्रतिमान (1968), दूसरी परंपरा की खोज(1982), वाद विवाद संवाद (1989), यासारख्या कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या आहेत. त्यांची मुलाखत असलेले ‘कहना न होगा’ हे पुस्तक देखील सा‍हित्य जगतात प्रसिद्ध आहे.
 • ते 1959-60 मध्ये सागर विश्वविद्यालय (म.प्र.) हिंदी विभागात सहायक प्राध्यापक होते. 1960 ते 1965 पर्यंत त्यांनी वाराणसीतून स्वतंत्र लेखन केले.
 • 1965 मध्ये ‘जनयुग’ साप्ताहिकाचे संपादक म्हणून दिल्लीत काम केले. 1967 पासून त्यांनी ‘आलोचना’ त्रैमासिकाचे संपादक सुरु केले होते. वेगवेगळ्या संस्थांमध्ये काम करताना त्यांनी आपली साहित्यसेवा सुरूच ठेवली होती. त्यांनी महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय विद्यापीठ वर्धाचे कुलाधिपती म्हणून देखील त्यांनी काम केले आहे.

?5. जोकोव्हिचला चौथ्यांदा लॉरेओ पुरस्कार!

 • गतवर्षांत प्रतिष्ठित चार ग्रँडस्लॅमपैकी दोन स्पर्धाचे विजेतेपद मिळवणारा सर्बियाचा नामांकित टेनिसपटू नोव्हाक जोकोव्हिच याने सोमवारी मध्यरात्री चौथ्यांदा लॉरेओ जागतिक क्रीडा पुरस्कारावर नाव कोरले.
 • वर्षभरात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूला हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. याव्यतिरिक्त जिम्नॅस्टिक खेळाडू सिमोन बाइल्स, गोल्फपटू टायगर वूड्स व फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद मिळवणाऱ्या फ्रान्स संघानेसुद्धा मानाचे पुरस्कार पटकावले.
 • २०१८मध्ये जोकोव्हिचने विम्बल्डन व अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या विजेतेपदाला गवसणी घातली. त्याशिवाय या वर्षी जानेवारीत झालेल्या ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम स्पर्धेतही त्याने विजयश्री खेचून आणली.
 • जोकोव्हिचला फ्रान्सचा फुटबॉलपटू किलियान एम्बाप्पे, एलिउड किपचोज आणि ली ब्रॉन जेम्स यांच्याकडून कडवी लढत मिळाली. मात्र अखेरीस जोकोव्हिचनेच बाजी मारली.
 • जोकोव्हिचने विश्वातील वेगवान धावपटू उसेन बोल्टच्या चार पुरस्कारांशी बरोबरी केली असून पाच पुरस्कारांसह अव्वल स्थानावर असलेल्या रॉजर फेडररपेक्षा तो फक्त एका पुरस्काराने मागे आहे.
 • या पुरस्कारासाठी २०१८ या वर्षांतील कामगिरीचा आढावा घेण्यात आला होता. त्याशिवाय ६८ खेळाडूंना या पुरस्कारांसाठी नामांकन लाभले होते. महिलांमध्ये सिमोनने वर्षांतील सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार मिळवला. २०१७मध्येसुद्धा सिमोनने या पुरस्कारावर नाव कोरले होते. वयाच्या अवघ्या २१व्या वर्षीच सिमोनने १४ जेतेपदे मिळवली आहेत.
 • त्याशिवाय रशियात झालेल्या फुटबॉल विश्वचषकाचे विजेतेपद मिळवणाऱ्या फ्रान्सला ‘वर्षांतील सर्वोत्तम संघ’ या पुरस्काराने गौरवण्यात आले. एकाच वर्षी दोन वेळा सर्वोत्कृष्ट संघाचा पुरस्कार पटकावणारा फ्रान्स हा पहिला संघ ठरला आहे.

?6. विश्वचषकातील सामने वेळापत्रकानुसारच -आयसीसी

 • पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील विश्वचषक स्पर्धेतील लढतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मात्र ३० मेपासून इंग्लंडमध्ये होणाऱ्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील सर्व सामने नियोजित वेळापत्रकानुसारच होतील, असे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) स्पष्ट केले आहे.
 • दहशतवादी हल्ल्याच्या पाश्र्वभूमीवरं १६ जून रोजी मँचेस्टर येथे पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातून भारताने माघार घ्यावी, अशी मागणी भारताचा माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग याने केली आहे. याविषयी आयसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्ह रिचर्डसन यांनी सांगितले की, ‘‘हा सामना रद्द करण्यात यावा, अशा प्रकारचे कोणतेही संकेत मिळाले नाहीत. या हल्ल्यात ज्यांना आपले प्राण गमवावे लागले आहेत, आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत. आम्ही आमच्या सदस्य देशांमार्फत या परिस्थितीचे निरीक्षण करीत आहोत.’’
 • ‘‘खेळामध्ये विशेष करून क्रिकेटमध्ये दोन्ही देशांतील लोकांना, समाजाला एकत्र आणण्याची क्षमता आहे. त्याच धर्तीवर आम्ही आमच्या सदस्य देशांबरोबर काम करीत आहोत,’’ असेही त्यांनी सांगितले.
 • भारतीय क्रिकेट नियामक मंडळातील एका पदाधिकाऱ्याने सांगितले की, ‘‘हरभजनने आपली मते मांडली आहेत. इतिहासावर नजर टाकल्यास हे लक्षात येते की, कारगिल युद्ध सुरू असतानाच भारत आणि पाकिस्तान यांच्यात इंग्लंडमध्ये १९९९च्या विश्वचषकातील सामना रंगला होता.’’

?1. TN CM Palaniswami flagged off 4 vessels made under deep sea fishing project

Tamil Nadu Chief Minister Edappadi K. Palaniswami flagged off the first set of four vessels made at Cochin Shipyard Limited (CSL) under the deep sea fishing project. The project was initiated by Prime Minister Narendra Modi.  The project is to protect the fishermen from the ‘troubled waters’ of Palk Bay and prevent their arrest by the Sri Lankan navy on charges of trespass, through video conferencing from Chennai.  The CSL has built the vessels at a cost of Rs.81.5 lakh each and has four more orders. Under the project, the beneficiaries are helped to construct the longliners at the cost of Rs.80 lakh per boat. The Centre provides 50% subsidy and the State government 20% as the beneficiaries contributed 10% and helped to raise 20% institutional finance.

?2. SC set aside NGTs decision to reopen Sterlite copper plant at Thoothukudi

The Supreme Court on 18th February set aside the National Green Tribunal (NGT) decision to reopen the Sterlite copper plant at Thoothukudi. The plant had been ordered to be closed down by the Tamil Nadu government due to environmental pollution. The tribunal, in its December 15 order, directed the Tamil Nadu Pollution Control Board (TNPCB) to pass fresh orders of renewal of consent and issue an authorization to Vedanta Limited to handle hazardous substances. A Bench led by Justice Rohinton Nariman concluded that the tribunal lacked jurisdiction to entertain the appeal by the plant’s owner, Vedanta, against the shutdown. The Tamil Nadu State contended that Vedanta had not been complying with pollution norms, and the situation had severely deteriorated since 1996.

?3. First Israeli private lunar mission set to be launched

SpaceIL, an Israeli Private company, is to launch what it hopes will be the first private spacecraft to land on the moon in the 4th week of February 2019. SpaceIL and State-owned Israel Aerospace Industries said that the spacecraft, dubbed Beresheet, or Genesis, will ship from Florida, where, propelled by a SpaceX rocket, it will commence its voyage to the moon.

?4. The 79th lHC to be held in Bhopal Madhya Pradesh from 26th February

The 79th Indian History Congress (IHC) is to be held at Barkatullah University in Bhopal, Madhya Pradesh from February 26. The 79th Indian History Congress was supposed to be held at Pune but was cancelled citing financial constraints to host the congress. IHC will be held at Madhya Pradesh for the second time. The first time it was held in 2011. Over 1,000 delegates including prominent historians are expected to participate in the IHC in Bhopal. Indian History Congress: ♦ Indian History Congress was established in 1935 ♦ It is the largest professional and academic body of Indian historians with over 10,000 members ♦ Its aim is the promotion and encouragement of the scientific study of Indian history  ♦ The Indian History Congress holds annual sessions on five sections namely:     1) Ancient India     2) Medieval India     3) Modern India     4) History of Countries other than India     5) Archaeology  ♦ IHC stands for collaboration with historians throughout the world and promotes the study in India of the history of other countries

?5. IOC signed deal worth USD 1.5 billion with USA

Indian Oil Corporation (IOC) signed an annual deal worth $1.5 billion to import 3 million tonnes of crude oil in the fiscal year beginning April 1. This is the first time any Indian refiner has signed an annual contract since the country in 2017 began importing crude oil from the U.S.  The term contract follows IOC signing up to buy crude oil from the U.S. through a term-tender deal in August 2018. It had, at that time, bought about 6 million barrels of U.S. crude oil under a single tender for delivery between November 2018 and January 2019.

?6. Rajnath Singh Launches Pan-India Number 112 For Women Safety

This Emergency Response Support System (ERSS), launched in 16 states/union territories and Mumbai city, aims to help those in distress, especially women send out distress signals and their location details to the nearest police control room by pressing a button on their phones. The ERSS project, being launched by the Ministry of Home Affairs and the Ministry of Women & Child Development (WCD), is financed using Rs 321.69 crore from the Nirbhaya Fund Scheme.

?7. Mary Kom designated as womens training Ambassador of PUMA

M.C. Mary Kom signed a two-year deal with Puma to be their ambassador for women’s training in India, the sports brand. Kom, a bronze medallist at the 2012 Olympics, won her record sixth gold medal at the World Amateur Boxing Championships in November last year.

?8. Symantec has launched Email Fraud Protection

Global cybersecurity company Symantec has launched ‘Email Fraud Protection’, an automated solution, to help organizations block fraudulent emails from reaching enterprises.  It aims to reduce workload for IT departments and eliminate the need to manually manage email security configurations while combating Business Email Compromise attacks. The solution is now available as part of Symantec’s Email Security Solution and Integrated Cyber Defence Platform. With this solution, email authentication standards are met by automatic monitoring of approved third-party senders.

?9. CBIC appoints Sandeep Mohan Bhatnagar and Ashok Kumar Pandey as its members

Senior IRS officers Sandeep Mohan Bhatnagar and Ashok Kumar Pandey have been appointed as members in the Central Board of Indirect Taxes and Customs (CBIC). Pandey is a 1983-batch Indian Revenue Service (Customs and Central Excise) officer, while Bhatnagar a 1984-batch IRS officer.

?10. Rabindranath Tagore Award for Cultural Harmony awarded by the President

President Ram Nath Kovind presented the Rabindranath Tagore Award for Cultural Harmony for the year 2014, 2015 and 2016 at the Pravasi Bhartiya Kendra, New Delhi. The awardees were: Shri Rajkumar Singhajit Singh for the year 2014 Chhayanaut (a cultural organization of Bangladesh) for the year 2015 Shri Ram Sutar Vanji for the year for 2016 The Tagore Award for Cultural Harmony was instituted by the Government of India for promoting values of Cultural Harmony from 2012 and it is awarded annually and carries an amount of Rs 1 crore.


Latest Current Affairs Videos

Latest Current Affairs Videos