Current Affairs 14 OCTOBER 2019

242
0
Share:

 

🎯 1. कोमोरोस देशाला 20 दशलक्ष डॉलरची LoC वाढवून देण्याची घोषणा

 • उपराष्ट्रपती एम. वेंकय्या नायडू ह्यांनी 17 ऑक्टोबर 2019 रोजी कोमोरोस देशाला भेट दिली. संरक्षण आणि सागरी सहकार्य क्षेत्रात दोन्ही देशातले वैपक्षीय संबंध मजबूत करण्यासाठी भारताने कोमोरोसला 20 दशलक्ष डॉलर एवढी पत मर्यादा (लाइन ऑफ क्रेडिट) वाढवून देण्याची घोषणा केली. कोमोरोस देशाचे राष्ट्रपती अझाली असौमनी यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर ही घोषणा करण्यात आली.

अन्य ठळक बाबी

 • दोन्ही देशात संरक्षण सहकार्य, शिक्षण, आरोग्य आणि संस्कृती या क्षेत्रांमध्ये विविध क्षेत्रात सहा करार झाले आहेत. एका करारानुसार भारत कोमोरोसला 2 दशलक्ष डॉलरची पतमर्यादा (LOC) देणार.
 • यावेळी उपराष्ट्रपतींना कोमोरोसचा “द ऑर्डर ऑफ ग्रीन क्रीसेंट” नावाचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला.
 • राजधानी मोरोनी येथे18 मेगावॅट वीजनिर्मिती प्रकल्प उभारण्यासाठी भारताने6 दशलक्ष डॉलरची मदत केली आहे.
 • आंतरराष्ट्रीय सौर युती कार्याचौकट करारावर (International Solar Alliance Framework Agreement) स्वाक्षरी करण्याचा कोमोरोसने निर्णय घेतला आहे.

कोमोरोस देश

 • कोमोरोस हा हिंद महासागरातला आफ्रिकेच्या पूर्व किनाऱ्याजवळचा एक द्वीप-देश आहे. कोमोरोस आफ्रिका खंडातला तिसरा सर्वांत छोटा देश आहे. मोरोनी ही देशाची राजधानी आहे. कोमोरियन, फ्रेंच, अरबी या देशाच्या अधिकृत भाषा आहेत. कोमोरियन फ्रँक हे राष्ट्रीय चलन आहे.

🎯 2. गंगा नदीतल्या डॉल्फिन मास्यांच्या वार्षिक गणनेस प्रारंभ

 • उत्तरप्रदेश वनविभागाच्या सहकार्याने वर्ल्ड वाइड फंड फॉर नेचर-इंडिया’ (WWF-India) या संस्थेच्या वतीने गंगा नदीतल्या डॉल्फिन मास्यांच्या वार्षिक गणनेचा कार्यक्रम राबविण्यास बिजनौरमध्ये प्रारंभ केला गेला आहे.
 • ही गणना हस्तिनापुर वन्यजीवन अभयारण्य आणि नरोरा रामसार स्थळाच्या दरम्यान गंगा नदीच्या वरच्या पात्रात सुमारे 250 किलोमीटर लांबीच्या पात्रात केली जाणार आहे.

अन्य ठळक बाबी

 • गंगा नदीतल्या डॉल्फिन मास्यांची सध्या एकूण संख्या 2500 ते 3000 याच्यादरम्यान आहे, त्यातले 80 टक्क्यांहून अधिक गंगा व त्याच्या उपनद्यात वास्तव्यास आहेत.
 • या कार्यक्रमाचा भाग म्हणून राष्ट्रीय स्वच्छ गंगा अभियान (NMCO) याच्यावतीने 12 ऑक्टोबर 2019 रोजी 2030 सालापर्यंत डॉल्फिनची संख्या वाढविण्याच्या
 • उद्देशाने योजना तयार करण्यासाठी एका कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
 • ऑक्टोबर 2009 मध्ये भारत सरकारने गंगा नदीतल्या डॉल्फिनला ‘राष्ट्रीय जलचर प्राणी घोषित केले होते.

🎯 3. ई-सिगारेट कायद्याचा मसुदा सरकारने केला जाहीर

 • तंबाखू एवढेच ई सिगारेटही हानिकारक असल्याचे अन्न प्रशासनाकडून सांगण्यात आले होते. त्यानंतर याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींना देशातील डॉक्टरांनीही पत्र लिहिले होते. सरकारने सर्व बाबींचा विचार करून ई सिगारेट्सवर बंदी आणली.
 • आता केंद्रीय आरोग्य विभागाने ई-सिगारेट प्रतिबंध कायद्याचा मसुदा जाहीर केला आहे. या मसुद्यानुसार सहा महिन्यापर्यंत शिक्षा ई सिगारेट वापरल्यास अथवा बाळगल्यास होऊ शकते. त्याचबरोबर 50 हजार रु. दंडही आकारण्यात येऊ शकतो. सरकारने हा मसुदा शुक्रवारी जाहीर केला आहे.
 • या मसुद्यामध्ये ई सिगारेट्सवर बंदी, त्याचे स्वरूप यांबद्दल माहिती नमूद करण्यात आली आहे. तसेच ज्यांच्याकडे ई सिगारेट्स असतील त्यांनी त्या अधिकाऱ्यांकडे जमा कराव्यात असेही सांगण्यात आले आहे.
 • दरम्यान, तंबाखू आणि सिगारेट्सप्रमाणेच ई-सिगारेट्स हानिकारक आहे. देशात सध्या ई सिगारेट्सचे जवळजवळ 150 फ्लेवर्स उपलब्ध आहेत. ई सिगारेटमध्ये असणार्‍या लिक्विडमध्ये लेड, क्रोमियम, निकेल यासारखे घातक धातू असतात. ई सिगारेट्स मधून निघणारा धुरही आरोग्यासाठी हानिकारक असल्याचे सांगितले आहे. 5 मार्च रोजीच महाराष्ट्रामध्ये ई सिगारेटच्या बंदीचा निर्णय घेण्यात आला होता.

🎯 4. ‘जी-20 ग्लोबल स्मार्ट सिटीज अलायन्स’ यामध्ये भारताचा समावेश

 • जी-20 ग्लोबल स्मार्ट सिटीज अलायन्स’ यामध्ये भारत सामील झाला आहे. स्मार्ट शहरे तंत्रज्ञानाचा जबाबदारीने व नैतिक वापर करण्याच्या दिशेने कार्य करणाऱ्या जगातल्या अग्रगण्य शहरांच्या जाळ्यातल्या 15 सदस्यांना सामील झाला आहे.
 • जागतिक आर्थिक मंचाचा (WEF) ‘जी-20 ग्लोबल स्मार्ट सिटीज अलायन्स ऑन टेक्नॉलॉजी गव्हर्नन्स’ हा समूह सार्वजनिक जागांवर जोडल्या गेलेल्या उपकरणांच्या वापरासाठी जागतिक मानदंड आणि धोरणांचे मानक तयार करणार आहे.
 • स्मार्ट सिटी तंत्रज्ञान रहदारी कमी करण्यास, गुन्हेगारीशी लढा देण्यास, नैसर्गिक आपत्तींशी जुळवून घेण्यासाठी आणि हरितगृह वायूंचे उत्सर्जन कमी करण्यास मदत करते. मात्र योग्य काळजी न घेतल्यास हे तंत्रज्ञान विशेषत: गोपनीयता आणि सुरक्षिततेसाठी महत्त्वपूर्ण धोका ठरते.

युतीचा इतिहास

 • जून 2019 मध्ये जपानच्या ओसाका शहरात जी-20 शिखर परिषदेच्या संयुक्त विद्यमाने या युतीची स्थापना करण्यात आली. युतीमध्ये जगातल्या अग्रगण्य शहरांचे जाळे आणि तंत्रज्ञान प्रशासन संघटनांमधील 15 सदस्य आहेत. जागतिक आर्थिक मंच युतीचे सचिवालय म्हणून काम करते.
 • ग्लोबल स्मार्ट सिटीज अलायन्सच्या संस्थात्मक भागीदारांमध्ये सन 2019 आणि सन 2020 मध्ये जी-20 समूहाच्या राष्ट्रांचा समावेश आहे, ज्यामध्ये जापान, सौदी अरब; भारताचे स्मार्ट सिटी मिशन; सिटीज फॉर ऑल; सिटीज टुडे इंस्टीट्यूट; कॉमनवेल्थ लोकल गव्हर्नमेंट फोरम; कॉमनवेल्थ सस्टेनेबल सिटीज नेटवर्क कनेक्टेड प्लेसेस कॅटापूल्ट; डिजिटल फ्यूचर सोसायटी; ICLEI – लोकल गव्हर्नमेंट फॉर सस्टेनेबिलिटी; इंटरनॅशनल टेलीकम्यूनीकेशन यूनियन; ओपन अँड एगाईल स्मार्ट सिटीज; स्मार्ट सिटी एक्सपो वर्ल्ड कॉग्रेस; यूनायटेड सिटीज अँड लोकल गव्हर्नमेंट; व्हॉट वर्क्स सिटीज; वर्ल्ड इकनॉमिक फोरम; आणि वर्ल्ड एनेबल यांचा समावेश आहे.
 • भागीदार 2 लक्षाहून अधिक शहरे आणि स्थानिक सरकार, आघाडीच्या कंपन्या, स्टार्टअप उद्योग, संशोधन संस्था आणि नागरी संस्था यांचे प्रतिनिधित्व करतात.

🎯 5. भारतानं इतिहास रचला; मायदेशात सलग ११ कसोटी मालिका जिंकल्या!

 • विराट कोहलीच्या टीम इंडियाने पुणे कसोटीत दक्षिण आफ्रिकेचा पराभव करुन मायदेशात सलग 11 कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम गाजवला आहे. कसोटी इतिहासात मायदेशात सलग अकरा मालिका जिंकणारा भारत पहिला संघ ठरला आहे.
 • 2012 पासून आतापर्यंत भारतीय भूमीवर झालेल्या कसोटी मालिकांमध्ये टीम इंडिया अपराजित राहिली आहे. याआधी ऑस्ट्रेलियाने दोन वेळा सलग दहा कसोटी मालिका जिंकण्याचा विक्रम केला होता.
 • दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका खिशात घालत टीम इंडियाने ऑस्ट्रेलियन संघाचा तो विक्रम मोडीत काढला आहे.
 • पुण्यातल्या गहुंजे स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या सामन्यात विराट कोहलीच्या टीम इंडियानं दक्षिण आफ्रिकेचा एक डाव आणि 137 धावांनी धुव्वा उडवून सामन्यावर निर्विवाद वर्चस्व गाजवलं.
 • या विजयासह भारताने तीन कसोटी सामन्यांच्या या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे.
 • पहिल्या डावात 326 धावांची आघाडी घेतल्यानंनंतर टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेवर फॉलोऑन लादला. पण फॉलोऑननंतर खेळतानाही भारताच्या प्रभावी आक्रमणासमोर दक्षिण आफ्रिकन फलंदाजी पुन्हा ढेपाळली आणि पाहुण्या संघाचा दुसरा डाव 189 धावांतच आटोपला.
 • भारताकडून उमेश यादव आणि रवींद्र जाडेजाने सर्वाधिक तीन फलंदाजांना माघारी धाडलं. अश्विनने दोन तर ईशांत शर्मा आणि शमीने प्रत्येकी एक विकेट घेतली.

Latest Current Affairs Videos

Latest Current Affairs Videos