Current Affairs 14 NOVEMBER 2019

162
0
Share:

 

🎯1. सन 2020 मध्ये होणारी SCO सरकारांच्या प्रमुखांची परिषद भारतात होणार

 • सन 2020 मध्ये होणारी शांघाय सहकार संघटना (SCO) या गटाच्या सदस्य देशांमधल्या सरकारांच्या प्रमुखांची 19 वी परिषद भारतात आयोजित केली जाणार असल्याच्या निर्णय शांघाय सहकार संघटनेनी नवी दिल्लीत एका बैठकीत घेतला आहे.
 • शांघाय सहकार संघटना (SCO) बाबत
 • शांघाय सहकार संघटना (Shanghai Cooperation Organisation -SCO) ही एक युरेशियन (युरोप-आशिया) राजकीय, आर्थिक आणि सुरक्षा युती आहे. समूहामध्ये चीन, रशिया, कझाकिस्तान, किर्गिझस्तान, ताजिकिस्तान, उज्बेकिस्तान, भारत आणि पाकिस्तान या देशांचा समावेश आहे. भारत 2017 साली SCOचा पूर्ण सदस्य बनला. वर्तमानात रशियाकडे समूहाचे अध्यक्षपद आहे.
 • त्याची स्थापना 2001 साली झाली. त्याचे बिजींग (चीन) या शहरात मुख्यालय आहे. चीन SCO चा संस्थापक देश आहे.

🎯2. सरन्यायाधीशांचं कार्यालयही माहिती अधिकाराच्या कक्षेत, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

 • सरन्यायाधीश यांचं कार्यालय देखील आता माहिती अधिकाराच्या अंतर्गत आलं आहे. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या घटनापीठाने हा निर्णय दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने दिल्ली उच्च न्यायालयाने 2010 साली दिलेला निर्णय कायम ठेवला आहे.
 • सर्वोच्च न्यायालयाने याबाबत काही नियमावलीही जारी केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालात म्हटलं की, सरन्यायाधीशांचं कार्यालय हे सार्वजनिक आहे, त्यामुळे ते माहिती अधिकाराच्या कक्षेत येते. यादरम्यान सरन्यायाधीश कार्यालयाची गोपनियता अबाधित राहणार आहे.
 • सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्यायमूर्ती एस. खन्ना, न्यायमूर्ती गुप्ता, न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती रमन्ना यांच्या न्यायपीठाने हा निर्णय दिला.
 • सर्वोच्च न्यायालयाने कलम 124 अंतर्गत हा निर्णय दिला आहे. न्यायमूर्ती संजीव खन्ना यांनी दिलेल्या निर्णयाला सरन्यायाधीश रंजन गोगोई आणि न्यायमूर्ती दीपक गुप्ता यांनी सहमती दर्शवली.

🎯3. नीता अंबानींची न्यूयॉर्कच्या ‘मेट्रोपॉलिटन म्युझियम ऑफ आर्ट’च्या विश्वस्तपदी निवड

 • रिलायन्स फाऊंडेशनच्या अध्यक्षा नीता अंबानी यांची न्यूयॉर्कच्या प्रतिष्ठित ‘मेट्रोपॉलिटन म्युझियम ऑफ आर्ट’च्या विश्वस्तपदी निवड झाली आहे.
 • या म्युझियमच्या विश्वस्तपदी निवड होणाऱ्या नीता अंबानी या पहिल्याच भारतीय आहेत. म्युझियमचे संचालक डॅनियल बोर्डस्की यांनी मंगळवारी ही घोषणा केली. यशस्वी उद्योजिका अशी ओळख असलेल्या नीता अंबानी यांनी संस्कृती आणि कला क्षेत्रात जे योगदान दिलं त्याचमुळे त्यांची निवड विश्वस्त म्हणून करण्यात आली असं बोर्डस्की यांनी म्हटलं आहे.
 • भारतीय कला आणि संस्कृतीच्या संवर्धन आणि प्रसारासाठी नीता अंबानी यांनी मोठं योगदान दिलं आहे. त्यांनी केलेल्या या कामाची दखल घेऊन ही निवड करण्यात आल्याचं बोर्डस्की यांनी स्पष्ट केलं. नीता अंबानी यांनी म्युझियमला कायमच मदत केली आहे.

🎯4. DRDO चं मोठं यश! रात्रीच्यावेळी ‘तेजस’चं अरेस्ट लँडिंग यशस्वी

 • खास नौदलासाठी बनवण्यात आलेल्या तेजसच्या सागरी आवृत्तीची संरक्षण संशोधन विकास संस्था डीआरडीओने रात्रीच्या वेळी केलेली अरेस्ट लँडिंगची चाचणी यशस्वी ठरली. या चाचणीमधून डीआरडीओने अरेस्ट लँडिंग हाताळण्याचे आपले कौशल्य दाखवून दिले आहे. मंगळवारी रात्री केलेल्या या चाचणीचा व्हिडीओ डीआरडीओने पोस्ट केला आहे.
 • तेजस हे स्वदेशी बनावटीचे हलके लढाऊ विमान आहे. १२ नोव्हेंबरला ६.४५ च्या सुमारास एसबीटीएफ गोव्यामध्ये एलसीए तेजसचे अरेस्ट लँडिंग करण्यात आले. रात्रीच्या वेळी करण्यात आलेली ही पहिली चाचणी आहे.
 • दोन महिन्यापूर्वीच गोव्यामध्ये समुद्र किनाऱ्याजवळील नौदलाच्या तळावर घेण्यात आलेली एलसीए तेजसची अरेस्ट लँडिंगची चाचणी यशस्वी ठरली होती. ही चाचणी दिवसा घेण्यात आली होती. सर्वसामान्य तेजस विमानाला उड्डाण आणि लँडिंगसाठी एक किलोमीटरची धावपट्टी लागते. तेजसच्या सागरी आवृत्तीमध्ये उड्डाणाला २०० मीटर आणि लँडिंगसाठी १०० मीटरची धावपट्टी लागते.
 • अरेस्ट लँडिंगमध्ये धावपट्टीवरील वायरच्या मदतीने फायटर विमानाचे लँडिंग होते. त्यासाठी विमानाचा वेग कमी करावा लागतो. आता तेजसची लवकरच आयएनएस विक्रमादित्य या युद्धनौकेवर अरेस्ट लँडिंगची चाचणी होईल.
 • डीआरडीओ, एचएएल आणि सीएसआयआर या संस्था तेजसच्या सागरी आवृत्तीच्या विकासामध्ये सहभागी आहेत. एलसीए तेजसची सागरी आवृत्ती निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये आहे. इंडियन एअर फोर्समध्ये तेजसचा आधीच समावेश झाला आहे. अगदी मोजक्या देशांकडे अरेस्ट लँडिंगची टेक्नॉलॉजी आहे.

🎯5. आयसीसीची वनडे क्रमवारी जाहीर; विराट कोहली, जसप्रीत बुमरा अव्वल स्थानी कायम

 • रोहित शर्मा सध्या क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये सुपर फॉर्ममध्ये आहे. क्रमवारीच्या बाबतीत रोहित सध्या वन डे, कसोटी आणि ट्वेन्टी ट्वेन्टीत टॉप टेन फलंदाजांमध्ये आहे.
 • टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि जसप्रीत बुमराने आयसीसीच्या वन डे क्रमवारीत फलंदाज आणि गोलंदाजांच्या यादीत आपलं अव्वल स्थान कायम राखलं आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या या यादीत विराट कोहलीच्या खात्यात सर्वाधित 895 गुणांची नोंद आहे. कोहलीपाठोपाठ टीम इंडियाचा सलामीवीर रोहित शर्मा 863 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर गोलंदाजांमध्ये दुखापतीनंतरही जसप्रीत बुमरा 797 गुणांसह आपला पहिला नंबर टिकवून आहे.
 • रोहित शर्मा सध्या क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये सुपर फॉर्ममध्ये आहे. क्रमवारीच्या बाबतीत रोहित सध्या वन डे, कसोटी आणि ट्वेन्टी ट्वेन्टीत टॉप टेन फलंदाजांमध्ये आहे. रोहितनं यंदाच्या कॅलेंडर वर्षात 25 वन डे सामन्यांत 1232 धावांचा रतीब घातला आहे. त्यात तब्बल सहा शतकं आणि पाच अर्धशतकांचा समावेश आहे.
 • जसप्रीत बुमरा सध्या पाठीच्या दुखापतीवर उपचार घेत आहे. पण तरीही दुसऱ्या क्रमांकावरच्या ट्रेन्ट बोल्टपेक्षा मोठ्या फरकानं पहिला क्रमांक राखून आहे. गोलंदाजांमध्ये न्यूझीलंडचा बोल्ट 740 गुणांसह दुसऱ्या तर अफगाणिस्तानचा मुजीब उर रेहमान तिसऱ्या स्थानावर आहे. अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत हार्दिक पंड्या या एकमेव भारतीय खेळाडूचा समावेश आहे. अष्टपैलू खेळाडूंमध्ये हार्दिक पंड्या दहाव्या क्रमांकावर आहे.
 • आयसीसीच्या वन डे क्रमवारीतले टॉप थ्री-
 • फलंदाज
 • विराट कोहली (भारत) 895
 • रोहित शर्मा (भारत) 863
 • बाबर आझम (पाकिस्तान) 834
 • गोलंदाज
 • जसप्रीत बुमरा (भारत) 797
 • ट्रेंट बोल्ट (न्यूझीलंड) 740
 • मुजीब उर रेहमान (अफगाणिस्तान) 707
 • अष्टपैलू
 • बेन स्टोक्स (इंग्लंड) 319
 • मोहम्मद नबी (अफगाणिस्तान) 307
 • इमाद वसिम (पाकिस्तान) 295

Latest Current Affairs Videos

Latest Current Affairs Videos