Current Affairs 13 NOVEMBER 2019

206
0
Share:

 

🎯1. महाराष्ट्रात अखेर राष्ट्रपती राजवट लागू; राष्ट्रपतींचं शिक्कामोर्तब

 • महाराष्ट्रात अखेर तिसऱ्यांदा राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या केंद्रीय मंत्रिमंडळाने केलेल्या शिफारशीच्या फाइलवर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी अखेर स्वाक्षरी केली आहे.
 • त्यामुळे आजपासून महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. राष्ट्रपती राजवट लागू असली तरी एखाद्या पक्षाने पुरेसे संख्याबळ दाखवल्यास त्यांना सत्ता स्थापन करण्याची संधी दिली जाईल. त्यानंतर राज्यातील राष्ट्रपती राजवट उठवली जाईल, असं कायदेतज्ज्ञांचं म्हणणं आहे.
 • भाजपनंतर शिवसेनाही राज्यात सत्ता स्थापनेचा दावा करू शकली नव्हती. त्यामुळे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राष्ट्रवादीला सत्ता स्थापनेस पाचारण केलं होतं. पण राष्ट्रवादीनेही सत्ता स्थापन करण्यात असमर्थता दर्शवल्याने राज्यपालांनी केंद्राकडे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस केली होती.
 • त्याला केंद्र सरकारने मंजुरी दिल्यानंतर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या शिफारशीची फाइल राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे पाठविली. कोविंद यांनी संध्याकाळी साडेपाच नंतर राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या आदेशावर सही केल्याने महाराष्ट्रात राजष्ट्रपती राजवट लागू झाली आहे.

महाराष्ट्रात तिसऱ्यांदा राष्ट्रपती राजवट

 • महाराष्ट्राच्या इतिहासात दोनवेळा राष्ट्रपती राजवट लागली असून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होण्याची ही तिसरी वेळ आहे.
 • या आधी १९८० आणि २०१४ मध्ये महाराष्ट्र राष्ट्रपती राजवटीखाली गेलं होतं. १९७८ मध्ये शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली पुलोदचं सरकार होतं.
 • हे सरकार बरखास्त करून तेव्हा विधानसभेच्या मध्यावधी निवडणुका घेण्यात आल्या होत्या. त्यामुळे १७ फेब्रुवारी ते ९ जून १९८० या काळात महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती.
 • त्यानंतर २०१४ मध्येही महाराष्ट्र राष्ट्रपती राजवटीखाली गेलं. ही राष्ट्रपती राजवट ३२ दिवसांसाठी होती. राष्ट्रवादी काँग्रेसने पृथ्वीराज चव्हाण सरकारचा पाठिंबा काढल्याने सरकार कोसळलं होतं व त्यानंतर २८ सप्टेंबर २०१४ ते ३१ ऑक्टोबर २०१४ यादरम्यान महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती.

🎯2. कोळ्यांची नवीन प्रजाती मास्टर ब्लास्टर सचिन च्या नावावर

 • जगभरातील कोट्यावधी क्रिकेट प्रेमींसाठी या खेळातील देव असलेल्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर याच्या ख्यातीमध्ये आणखी एक प्रशंसा जोडल्या गेली आहे. कोळी म्हणजेचं Spider च्या विविध प्रकारांवर संशोधन करणारा एक संशोधक ध्रुव प्रजापती याने एक नवीन प्रजाती शोधून काढलेली आहे. महत्वाच म्हणजे या प्रजातीला सचिन तेंडूलकर चे नाव देण्यात आले आहे.
 • गुजरात एज्युकेशन अँड रिसर्च फाऊंडेशनमध्ये ज्युनिअर रिसर्चर म्हणून काम करणाऱ्या ध्रुव प्रजापतीने कोळ्यांच्या नवीन प्रजाती शोधल्या आहेत.
 • यातील एका प्रजातीला सचिन तेंडुलकर तर दुसऱ्या प्रजातीला संत कुरियकोस इलियास चावरा यांचं नाव दिलं आहे. चावरा यांनी केरळमध्ये शिक्षणाचा प्रसार करण्यात मोलाची भूमिका बजावली होती.
 • मारेंगो सचिन तेंडुलकर ही कोळ्याची प्रजाती केरळ, तामिळनाडू आणि गुजरात या राज्यांमध्ये प्रामुख्याने सापडते. २०१५ सालात ध्रुवने या प्रजातीचा शोध लावला होता. यानंतर या कोळ्यावर संधोशन आणि ओळख पटवण्याचं काम २०१७ साली पूर्ण झालं. या दोन्ही प्रजाती एशियन जम्पिंग स्पायडर्स या प्रकारातल्या असल्याचंही ध्रुवने सांगितलं आहे.

🎯3. दाल तलाव ‘इको सेन्सिटिव्ह झोन’घोषित केला जाणार

 • जम्मू व काश्मीर सरकारने श्रीनगरचे प्रसिद्ध दाल तलाव आणि त्याच्याजवळच्या आसपासच्या भागांना इको सेन्सिटिव्ह झोन (ESZ) म्हणून घोषित करण्यासाठी दहा सदस्यांची समिती गठीत केली आहे.
 • दाल तलाव “लेक ऑफ फ्लॉवर्स”, “ज्वेल इन द क्राऊन ऑफ कश्मीर” किंवा “श्रीनगर्स ज्वेल” या नावानेही ओळखले जाते. यात झेलम नदीचे पाणी साठते.
 • 2017 साली केलेल्या अभ्यासानुसार, प्रदूषण आणि अतिक्रमणांमुळे दाल तलाव त्याच्या मूळ क्षेत्रफळापासून म्हणजेच 22 चौरस किलोमीटर क्षेत्रापासून सुमारे 10 चौरस किलोमीटरपर्यंत कमी झाले आहे.
 • तलावाची क्षमता सुमारे 40 टक्क्यांपर्यंत कमी झाली आहे आणि पाण्याची गुणवत्ता खालावली आहे. तलावाच्या आरोग्यास धोका तयार झाल्याने तिथले पर्यावरण दूषित झाले आहे. हे स्थळ पर्यटनाच्या दृष्टीनेही महत्त्वाचे आहे. तिथे 800 ते 900 हाऊसबोटी देखील आहेत.

🎯4. भारताला हॉकी विश्वचषकाचे यजमानपद

 • 2023 मध्ये होणाऱ्या पुरुष हॉकी विश्वचषकाचे यजमानपद भारताला मिळाले आहे. आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनने (एफआयएच) शुक्रवारी संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेतला.
 • विश्वचषकाचा कालावधी 13 जानेवारी ते 20 जानेवारी 2023 दरम्यान असणार आहे. भारत चौथ्यांदा यजमानपद भूषवणारा पहिला देश बनला आहे. सामन्यांचे ठिकाण मात्र अजून ठरलेले नाही.

भारतातील मागील विश्वचषक :

 • 1982: मुंबई
 • 2010: नवी दिल्ली
 • 2018: भुवनेश्वर
 • आजपर्यंत 3 वेळा हॉलंडमध्ये हा विश्वचषक झाला आहे. मात्र आता भारतात याची चौथी वेळ असल्याने भारत हा 4 वेळा स्पर्धा होत असलेला पहिलाच देश बनला आहे.

🎯5. ज्येष्ठ अभिनेते बलदेव इंगवले यांचे निधन

 • दिग्दर्शन, अभिनय, निर्मिती व्यवस्थापन अशा चित्रपट निर्मितीच्या तिन्ही क्षेत्रात ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते बलदेव इंगवले यांचे निधन झाले.
 • ते ९६ वर्षांचे होते.सुरूवातीपासूनच अभिनयाची आवड असल्याने १९४७ मध्यें राजा परांजपे दिग्दर्शित ‘बलिदान’’ या चित्रपटात त्यांनी प्रथम काम केले. भालजी पेंढारकर, विश्राम बेडेकर, दिनकर द. पाटील, माधव शिदे, बाळ गजबर, वसंत पेंटर, अनंत माने यांच्यापासून सतीश रणदिवे ,भास्कर जाधव, प्रकाश काशीकर आदी नामवंत दिग्दर्शकांच्या हाताखाली त्यांनी अभिनयाचे रंग खुलवले.
 • सुमारे २०० पेक्षा अधिक चित्रपटात त्यांनी तिन्ही विभागात काम केले. ‘सर्जा’ या चित्रपटातील भूमिकेबद्दल त्यांना महाराष्ट्र शासनाचे पारितोषिक मिळाले होते.
 • चरित्र अभिनेता अशी त्यांची विशेष ओळख राहिली. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचा २००५ साली मानाचा ‘चित्रकर्मी पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले होते.

Latest Current Affairs Videos

Latest Current Affairs Videos