Current Affairs 12 November 2019

164
0
Share:

 

🎯1. संसदेच्या अर्थविषयक स्थायी समितीवर मनमोहन सिंग नियुक्त

 • दिग्विजय सिंह यांची नागरी विकास खात्याच्या स्थायी समितीवर सदस्यपदी निवड करण्यात आली आहे.
 • माजी पंतप्रधान व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मनमोहन सिंग यांची संसदेच्या अर्थविषयक स्थायी समितीच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी काँग्रेसचे आधीचे सदस्य दिग्विजय सिंह यांच्या जागी डॉ. मनमोहन सिंग यांची नियुक्ती केली आहे.
 • दिग्विजय सिंह यांची नागरी विकास खात्याच्या स्थायी समितीवर सदस्यपदी निवड करण्यात आली आहे. ही नियुक्तीही नायडू यांनीच केली आहे. मनमोहन सिंग यांच्यासाठी दिग्विजय सिंह यांनी संसदेच्या अर्थविषयक स्थायी समितीचा राजीनामा दिला होता.
 • मनमोहन सिंग हे १९९१ ते १९९६ दरम्यान देशाचे अर्थमंत्री होते, तसेच सप्टेंबर २०१४ ते मे २०१९ दरम्यान ते अर्थविषयक स्थायी समितीचे सदस्य व राज्यसभेचे सदस्य होते. नंतर जूनमध्ये त्यांची राज्यसभेची मुदत संपली व ऑगस्टमध्ये राजस्थानातून ते राज्यसभेवर पुन्हा बिनविरोध निवडून आले.
 • मागील काळात अर्थविषयक स्थायी समितीने वस्तू व सेवा कर, निश्चलनीकरण म्हणजे नोटाबंदी हे विषय हाताळले होते. दरम्यान, आता नवीन बदलात दिग्विजय सिंह यांना नागरी विकास खात्याच्या स्थायी समितीचे सदस्यपद देण्यात आले आहे.

🎯2. दीपक चहर जगात अव्वल :

 • भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील तिसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यांत रोहित शर्मा आणि शिखर धवन अपयशी ठरले. पण, लोकेश राहुल व श्रेयस अय्यर यांनी अर्धशतकी खेळी करताना संघाला मोठी धावसंख्या उभारून दिली.
 • तर या दोघांनी वैयक्तिक अर्धशतकासह संघाला 5 बाद 174 धावांपर्यंत मजल मारून दिली.
 • तसेच दीपक चहर (6/7) आणि शिवम दुबे (3/30) यांनी संघाला कमबॅक करून दिलं. टीम इंडियानं या सामन्यासह मालिकाही 2-1 अशी खिशात घातली. भारतानं हा सामना 30 धावांनी जिंकला.
 • युजवेंद्र चहलनं महमदुल्लाहला त्रिफळाचीत करून विक्रमाला गवसणी घातली. त्याचे ही ट्वेंटी-20 क्रिकेटमधील 50वी विकेट ठरली.
 • तर या कामगिरीसह त्यानं डेल स्टेनचा विक्रम मोडला. चहलनं 34 सामन्यांत 50 विकेट्स घेतल्या. स्टेनला 35 सामने खेळावे लागले होते.
 • शिवाय आर अश्विन आणि जसप्रीत बुमराह यांच्यानंतर ट्वेंटी-20 50 विकेट्स घेणारा चहल तिसरा भारतीय गोलंदाज ठरला आहे.

🎯3. जीवशास्त्रज्ञ के. उल्लास करंथ ह्यांना WCsचा ‘जॉर्ज शलर जीवनगौरव पुरस्कार मिळाला

 • भारताचे प्रसिद्ध जीवशास्त्रज्ञ डॉ. के. उल्लास करंथ ह्यांचा न्यूयॉर्क शहरात वाइल्डलाइफ कन्झर्वेशन सोसायटी (WCS) याच्यावतीने ‘जॉर्ज शलर जीवनगौरव पुरस्कार’ देवून सन्मान करण्यात आला आहे.
 • ते हा पुरस्कार प्राप्त करणारे पहिले भारतीय आहेत.
 • डॉ. के. उल्लास करंथ व्याघ्र संवर्धनाच्या क्षेत्रात त्यांनी केलेल्या नेतृत्वासाठी ते ओळखले जातात. ते वाइल्डलाइफ कन्झर्वेशन सोसायटीसोबत 1988 सालापासून जुळलेले होते आणि त्यांच्या निवृत्तीवेळी 29 ऑक्टोबर 2019 रोजी त्यांना हा पुरस्कार दिला गेला.
 • त्यांनी थायलँड, मलेशिया, कंबोडिया, लाओ पीडीआर, म्यानमार, इंडोनेशिया, रशिया तसेच आफ्रिका आणि लॅटिन अमेरिका खंडात चाललेल्या संशोधन प्रकल्पांमध्ये त्यांचा सहभाग होता.
 • ते पद्मश्री सन्मान प्राप्त आहेत तसेच अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित आहेत. ते सध्या भारतात ‘सेंटर फॉर वाइल्डलाइफ स्टडीज’चे संचालक आहेत.

wcs विषयी:

 • वाइल्डलाइफ कन्झर्वेशन सोसायटी (WCS) ही अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरात वन्यजीवन क्षेत्रात काम करणारी जागतिक संघटना आहे. ही संस्था सुमारे 60 राष्ट्रांमध्ये आणि जगातल्या सर्व महासागर क्षेत्रात विविध प्रकल्प चालवते.

🎯4. माजी मुख्य निवडणूक आयुक्त टी. एन. शेषन यांचे निधन :

 • निवडणूक आचारसंहितेच्या काटेकोर अंमलबजाणीतून भारतीय निवडणूक प्रक्रियेत आमूलाग्र बदल घडवणारे आणि राजकारण्यांमध्ये दरारा निर्माण करणारे माजी मुख्य निवडणूक आयुक्त टी. एन. शेषन यांचे चेन्नई येथील घरी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
 • ते 86 वर्षांचे होते.
 • तर मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून शेषन यांची 12 डिसेंबर 1990 रोजी नियुक्ती झाली.
 • त्यानंतरची सहा वर्षांची त्यांची कारकिर्द ऐतिहासिक ठरली. मुख्य निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती होताच त्यांनी निवडणूक प्रक्रियेचा चेहरा-मोहरा बदलला. निवडणुकीतील गैरप्रकारांना आळा घालण्याबरोबरच निवडणूक प्रक्रिया पारदर्शक केली.

Latest Current Affairs Videos

Latest Current Affairs Videos