Current Affairs 10 March 2019

543
0
Share:

 

 ?1. निवडणूक जाहीर; जागावाटपासाठी आठवडाच

 • महाराष्ट्रात ११ ते २९ एप्रिल अशा चार टप्प्यांमध्ये लोकसभेसाठी मतदान होणार आहे. कधी नव्हे ते राज्यात चार टप्प्यांत निवडणूक होत असल्याने राजकीय पक्षांना प्रचाराचे नियोजन करण्याची संधी मिळणार आहे, मात्र अद्याप राज्यात शिवसेना-भाजप युतीचे तसेच काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे जागावाटप निश्चित झालेले नाही.
 • त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत आठवड्याभरात जागावाटपाचे काम उरकून राजकीय पक्षांना प्रचाराचे रणशिंग फुंकावे लागेल.
 • महाराष्ट्रात चार टप्प्यांत निवडणूक होणार असून राजकीय पक्षांना प्रचारासाठी जवळपास ४० ते ४५ दिवस मिळणार आहेत. राज्यात शिवसेना-भाजप यांच्यात युती, तर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात आघाडी झाली आहे. मात्र युती आणि आघाडी यांच्यातील जागावाटपाचे अद्याप निश्चित झालेले नाही.
 • शिवसेना आणि भाजप यांच्यात किती जागा लढवायच्या हे निश्चित झाले असले तरी कोणत्या जागा लढवायच्या या यादीवर अखेरचा हात फिरविणे बाकी आहे. विद्यमान खासदारांना पुन्हा उमेदवारी देण्याबाबत युतीमधील दोन्ही पक्षांचे एकमत झाले असले तरी पालघर, जालना अशा काही जागांवर वाद असून त्यावर तोडगा काढण्याचे काम सुरू आहे.
 • काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्यातही कोणी कोणत्या जागा लढवायच्या हे अद्याप ठरायचे आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत आघाडीला मोठ्या प्रमाणावर अपयश आले होते. त्यामुळे आता हरलेल्या जागांवर कोणी किती काम करून या जागा जिंकण्याच्या परिस्थितीत आणून ठेवल्या आहेत यावर खल सुरू आहे.
 • शिवाय आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडी, मनसे तसेच इतर काही छोट्या पक्षांना घेण्याबाबतही प्रयत्न सुरू आहेत. ही सर्व प्रक्रिया आघाडीला पुढच्या आठवड्याभरात उरकावी लागणार आहे. युती आणि आघाडीची जागावाटपाची प्रक्रिया जेवढ्या लवकर उरकेल तेवढा त्यांना उमेदवारांचा प्रचार करण्याचा वेळ मिळणार आहे.

महाराष्ट्रात चार टप्प्यांत मतदान

 • महाराष्ट्रात लोकसभेच्या ४८ जागांसाठी ११, १८, २३ आणि २९ एप्रिल रोजी मतदान चार टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. हे चार टप्पे व मतदान होणारे मतदारसंघ पुढीलप्रमाणे.
 • ११ एप्रिल (७ मतदारसंघ): नागपूर, रामटेक, वर्धा, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर, यवतमाळ-वाशीम
 • १८ एप्रिल (१० मतदारसंघ): बुलडाणा, अकोला, अमरावती, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर
 • २३ एप्रिल : (१४ मतदारसंघ): जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, रायगड, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, पुणे, बारामती, अहमदनगर, माढा, सांगली, सातारा, कोल्हापूर, हातकणंगले
 • २९ एप्रिल (१७ मतदारसंघ): उत्तर मुंबई, वायव्य मुंबई, ईशान्य मुंबई, उत्तर-मध्य मुंबई, दक्षिण-मध्य मुंबई, दक्षिण मुंबई, ठाणे, कल्याण, भिवंडी, पालघर, नंदूरबार, दिंडोरी, नाशिक, धुळे, मावळ, शिरुर, शिर्डी

?2. देशाचे संरक्षण खाते सर्वाधिक भ्रष्ट

 • देशात सर्वत्र भ्रष्टाचार आहे, मात्र आपले संरक्षण खाते सर्वाधिक भ्रष्ट आहे. राफेल विमानखरेदीतील संशयास्पद व्यवहारांवरून ही बाब अधोरेखित होते, असे मत ज्येष्ठ पत्रकार एन. राम यांनी ‘मुंबई कलेक्टिव्ह’च्या परिसंवादात व्यक्त केले.
 • नरिमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे रविवारी झालेल्या परिसंवादाची सुरुवात ‘राफेल: मोदीज नेमेसिस?’ या विषयाने झाली. या विषयावर राफेल प्रकरणाबाबतची स्फोटक माहिती राम यांनी दिली.
 • ‘सरकारने युरो फायटरसारखे चांगले पर्याय असताना राफेलची निवड करण्यात आली. ‘दसॉल्त’शी करार करताना समांतर वाटाघाटी केल्या गेल्या. एवढेच नव्हे तर या करारातील भ्रष्टाचार प्रतिबंधक तरतुदी जाणीवपूर्वक काढून टाकण्यात आल्या.
 • रशिया, अमेरिका यांच्याशी केलेल्या करारांमध्ये अशा तरतुदी नाहीत हे खरे असले तरी ते त्या देशांच्या सरकारांशी केलेले करार असल्याने त्यात तशी गरज नव्हती. मात्र राफेलमध्ये सरकारचा व्यवहार एका खासगी कंपनीशी होत होता. अशा वेळी या तरतुदी काढण्याचे प्रयोजन काय? या आणि अशा अनेक संशयास्पद बाबींमुळे राफेल खरेदी प्रकरणाला भ्रष्टाचाराची दरुगधी येते, असे राम म्हणाले.

?3. राज्यात यंदा प्रथमच व्हीव्हीपॅट

 • ‘राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघांतील ८ कोटी ७ लाख ९८ हजार मतदार चार टप्प्यांत आपला मतदानाचा हक्क बजावणार असून, यंदा प्रथमच राज्यात व्हीव्हीपॅट मतदारयंत्रांचा वापर होईल’, अशी माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी आश्निनीकुमार यांनी दिली.

?4. बाबासाहेबांचे स्मारक २०२०पर्यंत

 • दादरच्या चैत्यभूमीनजीक इंदू मिलच्या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक २०२०पर्यंत पूर्ण करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी मुंबईत स्पष्ट केले.
 • डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सामान्य माणसांच्या जीवनात प्रकाशज्योत प्रज्ज्वलित करून अंधकारमय जीवन प्रकाशमय केले. तोच प्रकाश भीमज्योतीच्या माध्यमातून हे सरकार देत आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

?5. लोकसभा निवडणूक : राज्यात आदर्श आचारसंहिता लागू, काय आहेत आचारसंहितेच्या कालावधीतील नियम

 • संपूर्ण राज्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत स्वेच्छाधीन निधीतून अनुदानाचे वाटप, मंत्र्यांचे दौरे व शासकीय वाहनांचा वापर, एकत्रित निधीतून शासकीय जाहिराती प्रसिद्ध करणे, नवीन कामांची किंवा नवीन योजनांची घोषणा, शासकीय सार्वजनिक /खाजगी संपत्तीचे विद्रुपीकरण इत्यादी बाबींवर निर्बंध लागू झाले आहेत.
 • आदर्श आचारसंहितेच्या कालावधीत निवडणूक खर्चावर देखरेख व नियंत्रण ठेवण्यात येणार आहे. याकरीता राज्यस्तर आणि जिल्हास्तरावर नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.
 • राजकीय पक्षांच्या व उमेदवारांच्या जाहिराती प्रमाणिकरण करण्यासाठी राज्य व जिल्हास्तरावर माध्यम प्रमाणिकरण व संनियंत्रण समिती (Media Certification and Monitoring Committee) स्थापन करण्यात आल्या आहेत.
 • सर्व राजकीय पक्ष, प्रसिद्धी माध्यमे आणि शासकीय विभाग प्रमुख यांच्याबरोबर बैठका घेऊन त्यांना आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीबाबत माहिती देण्यात आली आहे.
 • आदर्श आचारसंहितेच्या काळात राजकीय पक्षांनी व उमेदवारांनी “काय करावे किंवा करु नये” (“DOs & DON’Ts)ची प्रत मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या https://ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
 • भारत निवडणूक आयोगाचे संकेतस्थळ https://eci.nic.in वर निवडणुकीसंदर्भातील सर्व सूचनांचा तपशील उपलब्ध आहे. उमेदवारांनी दाखल केलेली शपथपत्रे व खर्चाचे तपशील वेळोवेळी मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या https://ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध होतील.
 • या गोष्टींवर करडी नजर
  • फेसबुक, ट्विटरसारख्या सोशल मीडियावरील प्रचारावर, पेड न्यूजवर निवडणूक आयोगाची करडी नजर
  • इव्हीएमची मूव्हमेंट पाहण्यासाठी जीपीएसचा वापर केला जाईल
  • मतदान केंद्रावर सुरक्षेच्या दृष्टीने अधिक काळजी घेण्यात येणार
  • निवडणुकीतल्या गैरव्यवहाराबात सामान्य नागरिकही आयोगाकडे थेट तक्रार करु शकणार, अॅपवरील तक्रारदाराचं नाव गुप्त राहणार, 100 मिनिटांच्या आत अशा तक्रारींना प्रतिसाद आयोगाचे अधिकारी देणार.
  • मतदानाच्या 48 तास आगोदर लाऊड स्पीकरची परवानगी नसेल
  • रात्री दहानंतर प्रचाराला मुभा नाही, रात्री दहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत लाऊडस्पीकरचा वापर करता येणार नाही

?6. इथियोपियाचे विमान कोसळून १५७ ठार

 • इथियोपियातील अदिस अबाबा येथून नैरोबीला जाणारं इथियोपियन एअरलाइन्सचं एक विमान कोसळून सर्व १५७ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.
 • विमानाने उड्डाण घेताच अवघ्या ६ मिनिटांत ही दुर्दैवी घटना घडली. मृतांमध्ये १४९ प्रवासी तर ८ क्रू मेंबर्सचा समावेश आहे. इथियोपियाच्या पंतप्रधानांनी विमान अपघाताच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

?1. Oceania Nations including Australia will participate in 2022 Asian Games

Oceania nations, including sporting powerhouse Australia, have been invited to compete in Olympic team events such as football and basketball at the 2022 Asian Games for the first time. The invitation to the 2022 Asian Games in China’s Hangzhou is limited to volleyball, beach volleyball, basketball and football and fencing, ruling out sports such as swimming and track cycling which Australia would be expected to dominate. Oceania – Australia, New Zealand and a swathe of Pacific islands – has not taken part in the regional Olympics before, but sporting ties with Asia have been growing.

?2. Red Flag 2019 Aerial Exercise began in United States

Red Flag is US Air Force’s premier air-to-air combat training exercise. It was launched in 1975. 12-day long Red Flag 2019 has started at Nellis Air Force Base, Nevada, United States. It is scheduled from 3rd to 16th March 2019. Air forces from US, United Arab Emirates, Belgium, Netherlands, Singapore and Saudi Arabia, participate in this exercise. India has participated in it for two times in 2008 and 2016.

?3. Google launches ‘Bolo’ app to help children read in Hindi, English

Google has launched a new app called Bolo, which aims to help students with their reading and comprehension skills and will help them read out aloud in English and in Hindi. The app features an animated character ‘Diya’, who encourages children to read stories aloud and helps if the child is unable to pronounce a word. Bolo will also be a free app and relies on Google’s speech recognition and text-to-speech technology.

?4. Arata Isozaki won Pritzker Architecture Prize

Arata Isozaki, a prominent Japanese architect renowned for his versatility and transnational approach to design, has won his field’s highest accolade, the Pritzker Architecture Prize. He is the 46th person and eighth Japanese architect to receive the Pritzker Prize.

?5. China hikes defence budget to USD 177.61 billion, turns second highest spender

China has increased its defence budget by 7.5 per cent for this year, hiking it to USD 177.61 billion from last year’s USD 175 billion. It is over three times India’s defence budget. With this increase, China becomes the highest defence spender on defence after the United States. India’s defence budget this year was increased by 6.87 per cent to Rs 3.18 lakh crore against last year’s allocation of Rs 2.98 lakh crore.

?6. Southern Railway gets a boost; Kerala to get a new coaching terminal in Nemom

Minister of Railways & Coal, Shri Piyush Goyal laid the foundation stone for New Coaching Terminal at Nemom and unveiled WAP-7HS passenger locomotive through video conferencing here today. Shri Ghanshyam Singh, Member (Traction), Railway Board, Shri Rajesh Agarwal, Member (Rolling Stock), Railway Board, Shri Vishwesh Chaubey, Member (Engineering), Railway Board and other Senior Railway Officers were present on this occasion. Shri Piyush Goyal said that the present Government has consistently focused on development for all areas in the country. The main focus has been on large scale infrastructure creation both physical and social.

?7. Telangana govt forms SIT to probe data theft case

The Telangana government formed a Special Investments in-depth probe into the alleged electoral rolls data theft. A YSR Congress leader had lodged a complaint with the Cyberattack  The SIT will have three IPS officers, two DSPs and a few instants A YSR Congress leader had lodged a complaint with the Cyberattack. YSRCP president YS Jaganmohan Reddy alleged that the TDP president and chief minister N Chandrababu Naidu.

?8. Kummanam Rajasekharan Resigns as Mizoram Governor

Mizoram Governor Kummanam Rajasekharan stepped down from his post. Governor of Assam, Prof. Jagdish Mukhi, has been given temporary charge of the Aizawl Raj Bhavan. Mr. Rajasekharan, who was former State president of the BJP in Kerala, sworn in as Governor of Mizoram in May 2018.

?9. President Ram Nath Kovind to give Nari Shakti awards on International Womens Day

International Women’s Day is being observed on 08th March. Governments, NGOs and other organisations across the world observe the day on the 8th of March every year to highlight the achievements of women. The theme for this year’s women’s day is ‘Think Equal, Build Smart, Innovate for Change’. The purpose of the theme is to achieve gender equality by putting innovation by women and girls, for women and girls, at the heart of efforts. President Ram Nath Kovind will present the highest civilian honor for women in India, Nari Shakti Puraskar 2018 in New Delhi.​​​​

?10. Centre to launch work from home jobs in the IT sector

The government is working on a scheme to push work-from-home jobs in the IT sector by offering financial incentives to both employees and employers. Incentivising work-from-home jobs through policy-level initiatives can help in creating jobs in the ITES domain while increasing the available talent pool for the sector.  This will create employment opportunities in the IT/ITES industry, especially for women and differently-abled persons. Currently, the scheme is proposed for a three-year period till March 31, 2022, with an outlay of about Rs.270 crore to create about 50,000 work-from-home jobs.  The initiative is likely to be launched as phase II of the IT Ministry’s India BPO Promotion Scheme that incentivises firms to set up operations in tier-2 and tier-3 cities in the country. The scheme, launched in 2016, had an outlay of about Rs. 500 crore with an objective to create about 1.45 lakh jobs.


Latest Current Affairs Videos

Latest Current Affairs Videos