Current Affairs 1 NOVEMBER 2018

401
0
Share:

 

?1. आयसीसीच्या हॉल ऑफ फेममध्ये राहुल द्रविड

 • भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविड ला आयसीसीतर्फे हॉल ऑफ फेमचे मानचिन्ह देण्यात आले.
 • भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील अखेरच्या सामन्याआधी त्याला भारताचा माजी कर्णधार सुनील गावसकर यांच्या हस्ते हॉल ऑफ फेमचे मानचिन्ह प्रदान करण्यात आले.
 • डब्लीन येथे एका कार्यक्रमात आयसीसीने राहुल द्रविडचे नाव जाहीर केले होते.
 • त्याच बरोबर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग आणि इंग्लंडची माजी महिला यष्टीरक्षक आणि फलंदाज क्लेअर टेलर यांचाही आयसीसी ‘हॉल ऑफ फेम’मध्ये समावेश करण्यात आला आहे.
 • आयसीसीच्या ‘हॉल ऑफ फेम’मध्ये समावेश झालेला राहुल द्रविड हा भारताचा पाचवा खेळाडू आहे.
 • यापूर्वी बिशनसिंग बेदी, कपिल देव, सुनिल गावसकर, अनिल कुंबळे यांचा आयसीसी ‘हॉल ऑफ फेम’मध्ये समावेश केला गेला आहे.
 • द्रविड, पॉटिंग आणि टेलर या खेळाडूंची ‘हॉल ऑफ फेम’मधील माजी क्रिकेटपटू आणि माध्यमांचे निवडक प्रतिनिधी यांनी निवड केली.
 • राहुल द्रविड कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये चौथ्या स्थानावर आहे. ‘द वॉल’ अशी ख्याती असलेल्या राहुल द्रविडची गणना जगातील सर्वोत्कृष्ट खेळाडूंमध्ये करण्यात येते.
 • द्रविड 164 कसोटी आणि 344 एकदिवसीय सामने खेळला आहे. त्यात त्याने अनुक्रमे 13,288 आणि 10,889 धावा केल्या आहेत.

?2. ‘आयएनएस विराट’चं वस्तुसंग्रहालयात रुपांतर करण्यास मंत्रिमंडळाचा हिरवा कंदील

 • भारतीय नौदलाची शान राहिलेल्या आणि सध्या सेवेतून निवृत्त झालेल्या विमानवाहून युद्धनौका ‘आयएनएस विराट’चे वस्तुसंग्रहालयात रुपांतर करण्यास मंत्रिमंडळाने गुरुवारी हिरवा कंदील दाखवला.
 • त्यामुळे भारताचा हा अभिमानास्पद आणि ऐतिहासीक ठेवा सर्वसामान्यांना पाहण्यासाठी खुला होणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
 • केंद्र शासनाने सुरू केलेली ‘खेलो इंडिया’ योजनेची २०१८-१९ पासून अंमलबजावणी करण्यासही मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.
 • त्याचबरोबर राज्यातील शासकीय जमिनीवर क्रीडांगण किंवा खेळाचे मैदान, व्यायामशाळा यांच्या भाडेपट्ट्याच्या नुतनीकरणाबाबतचे धोरणही निश्चित करण्यात आले आहे.
 • शासकीय वैद्यकीय, दंत, आयुर्वेद महाविद्यालये आणि रुग्णालयांची बांधकामे आता केंद्र शासनाच्या अधिपत्याखालील सार्वजनिक कंपन्यांकडून करुन घेता येणार.
 • यामध्ये २५ कोटी व त्यापेक्षा जास्त अंदाजपत्रकीय किंमतीच्या कामांचाही समावेश करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
 • तसेच जवाहर नवोदय विद्यालयाच्या स्थापनेसाठी भंडारा जिल्ह्यातील मौजा पाचगाव (ता. मोहाडी) येथील ८.८० हेक्टर शासकीय जमीन नाममात्र भाड्याने ३० वर्षांसाठी देण्यास मंजूरी देण्यात आली

?3. शक्ती’ भारताचा पहिला मायक्रोप्रोसेसर

 • इंडियन इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी मद्रासच्या विद्यार्थ्यांनी पहिला स्वदेशी बनावटीचा मायक्रोप्रोसेसर विकसित केला आहे. ‘
 • शक्ती’ असे या मायक्रोप्रोसेसरला नाव देण्यात आले आहे. मोबाइल फोन, टेहळणी कॅमेरे आणि स्मार्ट मीटर्स या स्वदेशी बनावटीच्या ‘शक्ती’ मायक्रोप्रोसेसरवर चालतील.
 • या मायक्रोप्रोसेसरचे डिझाइनपासून सर्व काही आयआयटी मद्रासच्या विद्यार्थ्यांनी तयार केले आहे.
 • या मायक्रोप्रोसेसरची मायक्रोचीप भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्त्रो) चंदीगड येथील प्रयोगशाळेत तयार करण्यात आली आहे.
 • भारतीय तंत्रज्ञान क्षेत्रातील हे महत्वपूर्ण यश असून यामुळे परदेशी मायक्रोप्रोसेसरवरील अवलंबित्व कमी होणार असून सायबर हल्ल्याचा धोकाही कमी होईल

?4. १०० सर्वोत्तम परदेशी चित्रपटांमध्ये फक्त एकाच भारतीय चित्रपटाची वर्णी

 • जागतिक स्तरावर सर्वोत्कृष्ट असे २१ व्या शतकातील १०० विदेशी भाषांमधले (इंग्रजी नसलेले) चित्रपट कुठले हे पाहण्यासाठी बीबीसीने एक पोल नुकताच घेतला होता.
 • जगातील ४३ देशांतील २०९ शहरांमध्ये ही पाहणी करण्यात आली.
 • या पोलच्या माध्यमातून त्यांनी २१ व्या शतकातील १०० सर्वोत्कृष्ट चित्रपटांची निवड केली आहे.
 • भारताच्या दृष्टीने असमाधानाची बाब म्हणजे या १०० चित्रपटांमध्ये एकाही हिंदी चित्रपटाची वर्णी लागलेली नाही.
 • परंतु या १०० सर्वोत्कृष्ट चित्रपटांमध्ये फक्त एकाच भारतीय चित्रपटाला स्थान मिळाले आहे.
 • जगातील या १०० सर्वोत्कृष्ट चित्रपटांमध्ये विख्यात दिग्दर्शक सत्यजित रे यांच्या ‘पाथेर पांचाली’ला स्थान मिळाले आहे.
 • पाथेर पांचाली या चित्रपटाला १५ वे स्थान मिळाले आहे. पाथेर पांचाली हा बंगाली भाषेतील चित्रपट १९५५ मध्ये प्रदर्शित झाला होता.
 • बीबीसीने निवडलेल्या १०० चित्रपटांमध्ये प्रसिद्ध जपानी दिग्दर्शक अकिरा कुरोसावा यांच्या १९५० मध्ये आलेल्या ‘सेव्हन सामुराई’ या चित्रपटाने प्रथम स्थान पटकावले आहे.
 • बीबीसीने या पोलमध्ये निवडण्यात आलेल्या २४ देशांतील १९ भाषाच्या ६७ दिग्दर्शकांच्या१०० चित्रपटांची यादी जाहीर केली आहे.
 • यामध्ये सर्वाधिक चित्रपट फ्रेंच भाषेतील आहेत. फ्रेंचमधील २७, मँडेरिन आणि इटालियन भाषेतील प्रत्येकी ११ चित्रपटांचा समावेश आहे.
 • पूर्व आशियातील २५ चित्रपटांचा या यादीत समावेश करण्यात आला आहे. यामध्ये जपान ११, चीन ६ तायवान ४ हाँगकाँग ३ आणि दक्षिण कोरियाच्या एका चित्रपटाचा समावेश आहे.
 • १०० चित्रपटांमधील केवळ ४ चित्रपटांचे दिग्दर्शन महिलांनी केले आहे. विशेष म्हणजे पोलमध्ये सहभागी झालेल्या तज्ज्ञांमध्ये ४५ टक्के महिला होत्या

?5. पीओके’तील चीन-पाक बससेवेला भारताचा विरोध

 • पाक व्याप्त काश्मीर क्षेत्रातून सुरु होणाऱ्या चीन-पाकिस्तान बससेवेला भारताने तीव्र विरोध दर्शवला आहे. ‘
 • भारताकडून चीन आणि पाकिस्तानच्या १९६३ ‘सीमारेषा करार’लाही मान्यता मिळालेली नाही.
 • अशात पाक व्याप्त काश्मीरमध्ये पाकिस्तानकडून सुरु करण्यात येणारी बस सेवा भारताच्या स्वायत्तेचे उल्लंघन आहे
 • चीन आणि पाकिस्तान पाक व्याप्त काश्मीरमध्ये चीन-पाक इकॉनॉमिक कॉरिडोअर अंतर्गत बससेवा सुरु करणार असल्याचे वृत्त समोर आले होते.
 • ही बससेवा एका खासगी ट्रान्सपोर्ट कंपनीकडून संचलित केली जाणार आहे.
 • येत्या १३ नोव्हेंबरपासून याची सुरुवात होणार असून ही बससेवा लाहोर ते चीनमधील काशगरपर्यंत जाणार आहे.
 • ३० तासांच्या या प्रवासासाठी १३ हजार रुपये भाडे आहे. तर परतीचे तिकीट २३ हजार रुपये आहे. या सेवेचे मोठ्याप्रमाणात अडव्हान्स बुकिंगही करण्यात आले आहे

?6. श्रीलंकेचे गोलंदाजी प्रशिक्षक झोयसा निलंबित

 • सामनानिश्चितीच्या आरोपामुळे श्रीलंकेचे गोलंदाजीचे प्रशिक्षक न्यूवान झोयसा यांच्यावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) निलंबनाची कारवाई केली आहे.
 • झोयसा यांच्या त्वरित आणि तात्पुरत्या स्वरूपाची निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
 • १ नोव्हेंबरपासून झोयसा यांना आपल्यावरील आरोपांबाबत उत्तर देण्यासाठी १४ दिवसांची मुदत देण्यात आली आहे,’’ असे आयसीसीने स्पष्ट केले आहे.
 • श्रीलंकेच्या क्रिकेटमधील भ्रष्टाचाराची आयसीसीकडून सखोल चौकशी सुरू आहे.
 • विश्वविजेत्या संघातील फलंदाज सनथ जससूर्यावरही काही दिवसांपूर्वी चौकशीला सहकार्य न केल्याबद्दल आयसीसीने ठपका ठेवला होता.
 • माजी डावखुरे वेगवान गोलंदाज झोयसा यांनी ३० कसोटी आणि ९५ एकदिवसीय सामन्यांत श्रीलंकेचे प्रतिनिधित्व केले आहे.
 • सप्टेंबर २०१५ मध्ये त्यांच्याकडे गोलंदाजीचे प्रशिक्षकपद सोपवण्यात आले.
 • झोयसा यांच्यावर आयसीसीच्या आचारसंहितेचे कलम २.१.१, २.१.४ आणि २.४.४ नुसार कारवाई करण्यात आली आहे.

?7. गोव्यातील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात यंदा दोन मराठी चित्रपट, ८ लघुपटांची निवड

 • गोव्यात २0 नोव्हेंबरपासून सुरु होणाऱ्या ४९ व्या आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सवासाठी यंदा २ मराठी चित्रपटांची आणि सर्वाधिक ८ मराठी लघुचित्रपटांची निवड करण्यात आलेली आहे.
 • विविध भाषेतील एकूण २२ चित्रपट आणि २१ लघुपट या विभागात दाखविण्यात येणार आहेत.
 • इंडियन पॅनोरमा विभागात पुण्याच्या निपुण अविनाश धर्माधिकारी दिग्दर्शित धप्पा आणि प्रतिमा जोशी दिग्दर्शित आम्ही दोघी हे दोन मराठी चित्रपट दाखविण्यात येणार आहेत.
 • लघुपटांमध्येही चार इंग्लिश, तीन हिंदी, तीन मल्याळी, एक बंगाली, एक भोजपुरी आणि एक उरिया भाषेतील लघुपट दाखविण्यात येणार आहेत.
 • चित्रपट दिग्दर्शक, पटकथाकार राहुल रवैल यांच्या अध्यक्षेतखालील १३ सदस्यांच्या चित्रपट ज्यूरींनी या महोत्सवामध्ये इंडियन पॅनोरमा विभागासाठी एकूण २२ चित्रपटांची निवड केली आहे, तर २१ लघुपटांचा समावेश करण्यात आला आहे.
 • दिग्दर्शक शाही एन करुन यांच्या ओएलयू या मल्याळम चित्रपटाने इंडियन पॅनोरामाची सुरुवात होणार आहे.
 • पाच बंगाली, सहा मल्याळी, चार तमिळ, एक तेलगू, एक तुलू, एक लद्दाखी, एक जस्सारी भाषेतील चित्रपटांचाही समावेश आहे.
 • लघुपटांसाठी चक्क ८ मराठी भाषेतील लघुपट निवडण्यात आले आहेत. याचा प्रारंभही आदित्य जांभळे दिग्दर्शित खरवस या मराठी लघुपटानेच होणार आहे.
 • याशिवाय कोल्हापूरच्या मेधप्रणव बाबासाहेब पोवार यांचा हॅपी बर्थ डे, नितेश पाटणकरांचा ना बोले वो हराम, प्रसन्ना पोंडेंचा सायलेंट स्क्रीम, सुहास जहागिरदार यांचा येस आय अ‍ॅम माऊली, शेखर रणखांबे यांचा पॅम्पलेट, गौतम वझे यांचा आई शपथ, आणि स्वप्नील कपुरे यांचा भर दुपारी या लघुपटांचा या विभागात दाखविण्यात येणार आहेत.

?8. जागतिक पासपोर्ट निर्देशांकात भारताने पटकावले ६६वे स्थान

 • जागतिक पासपोर्ट निर्देशांकात भारतीयपासपोर्टने ६६वे स्थान पटकावले आहे.
 • गेल्या वर्षीच्या तुलनेत भारतीय पासपोर्टने ९ स्थानांची प्रगती केली आहे.
 • या निर्देशांकात सिंगापूर आणि जर्मनीचे पासपोर्ट सर्वाधिक शक्तिशाली ठरले आहेत.
 • नागरिकत्व नियोजन क्षेत्रात काम करणाऱ्या ‘हेनले अँड पार्टनर्स’ या संस्थेने हा निर्देशांक जारी केला आहे.
 • संबंधित देशाची पासपोर्टधारक व्यक्ती किती देशांत व्हिसाशिवाय जाऊ शकतात; अथवा त्या देशात गेल्यानंतर व्हिसा, भेट परवाना (व्हिजिटर्स परमिट) किंवा इलेक्ट्रॉनिक प्रवास अधिकार मिळवू शकतात, या निकषांच्या आधारे हा निर्देशांक तयार केला जातो.
 • भारतीय पासपोर्टला ६६ देशांत मुक्त संपर्काधिकार (अ‍ॅक्सेस) आहे.
 • सिंगापूर आणि जर्मनीच्या पासपोर्टचा मुक्त संपर्काधिकार तब्बल १६५ देशांत असल्याचे ‘हेनले अँड पार्टनर्स’ने जारी केलेल्या वार्षिक पासपोर्ट निर्देशांकात म्हटले आहे.
 • केवळ २२ देशांत संपर्काधिकार असलेला अफगाणिस्तानचा पासपोर्ट सर्वांत शेवटच्या ९१व्या स्थानी आला आहे.
 • २६ देशांच्या संपर्काधिकारासह पाकिस्तान शेवटून दुसऱ्या म्हणजेच ९0 व्या स्थानी आहे.
 • २९ देशांच्या संपर्काधिकारासह सीरिया ८८व्या स्थानी, तर ३४ देशांच्या संपर्काधिकारासह सोमालिया ८७व्या स्थानी आहे.

?9. उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू तीन आफ्रिकी देशांच्या दौऱ्यावर रवाना

 • उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू तीन आफ्रिकी देशांच्या दौऱ्यावर आज रवाना झाले. .
 • 6 नोव्हेंबरपर्यंत चालणाऱ्या या दौऱ्यात उपराष्ट्रपती बोट्‌स्वाना, झिंबाब्वे आणि मलावी या देशांचा दौरा करणार आहेत.
 • या तीन देशांच्या राष्ट्रप्रमुखांशी चर्चा, व्यापारी समुदाय आणि भारतीय समुदायालाही उपराष्ट्रपती संबोधित करणार आहेत.
 • बोट्‌स्वानाच्या राजधानीत तेराव्या वार्षिक जागतिक प्रदर्शनाचे उद्‌घाटन उपराष्ट्रपती आज करणार आहेत.
 • भारताची आर्थिक आणि औद्योगिक प्रगती दर्शवत 25 भारतीय कंपन्या यात सहभागी झाल्या आहेत.
 • बोट्‌स्वानाच्या उपराष्ट्रपतींची नायडू उद्या भेट घेणार आहेत.
 • 3 नोव्हेंबरला उपराष्ट्रपती झिंबाब्वेचे राष्ट्राध्यक्ष इमर्सन मनंगाग्वा यांच्याशी चर्चा करतील. 5 नोव्हेंबरला मलावीचे राष्ट्राध्यक्ष पीटर मुथारिका यांच्याशी उपराष्ट्रपती चर्चा करणार आहेत

?1. IIT-Madras researchers designed India’s 1st microprocessor ‘Shakti’

The ‘Shakti’ family of processors was fabricated at ISRO’s Chandigarh semi-conductor laboratory, making it the first ‘RISC V Microprocessor’ to be completely designed and made in India. Shakti microprocessor can be used in mobile computing devices, embedded low power wireless systems and networking systems. ‘Shakti’ will reduce dependency on imported microchips and the risk of cyber attacks.

?2. India win eighth consecutive ODI series against Windies

India defeated Windies by 9 wickets in the fifth ODI at Thiruvananthapuram to clinch the five-match series 3-1 and win their eighth consecutive ODI series against Windies. With scores of 140, 157 not out and 107 in the first three games, Kohli became the first Indian to score three consecutive hundreds in the 50-over format. India Team Captain – Virat Kohli, Windies Team Captain – Jason Holder.

?3. Cattle feed distribution for the flood hit areas in Kerala

Kerala Feeds, a public sector undertaking under the State government,  along with Ernakulam Collector K. Mohammed Y. Safirulla inaugurated the district-level Snehasparsham project that provides 100 bags of cattle feed for free to dairy farmers. Kerala Feeds Managing Director B.Sreekumar said that in eligible cases, more cattle feed will be provided. It has been reported that the flood and landslips have left Ernakulam district with a property loss of Rs. 8,000 crore.

?4. Maharashtra announced drought in 151 tehsils in 26 districts

Maharashtra government has announced severe and medium-scale drought in 151 tehsils in 26 districts. The announcement will hold for the next six months. Out of the 151 tehsils, 39 come under the ‘severe drought’ category while 112 are medium-scale areas. The declaration is based on the Centre’s drought manual of 2016. The government asked the District Collectors to not collect land revenue from farmers, implement a 33% subsidy on the electricity bill of agriculture pumps, kick start employment guarantee scheme, and exempt school and college fees for students from these tehsils. Farmers will get financial aid and government is likely to credit Rs.6,800 per hectare to farmers with non-irrigated farms and Rs.13,000 per hectare to those with irrigated farms.

?5. Vice President Venkaiah Naidu embarked on a 7 day visit to Botswana, Zimbabwe and Malawi

He will inaugurate the 13th Annual Global Expo Botswana 2018. He will also inaugurate the Jaipur Foot Camp in Malawi to mark the 150th Anniversary of Mahatma Gandhi. About Botswana: ♦ President: Mokgweetsi Masisi ♦ Capital: Gaborone ♦ Currency: Botswana pula About Zimbabwe: ♦ President: Emmerson Mnangagwa ♦ Capital: Harare About Malawi: ♦ President: Peter Mutharika ♦ Capital: Lilongwe ♦ Currency: Malawian kwacha

?6. CSIR developed Less Polluting Firecrackers named SWAS, SAFAL and STAR

These crackers developed by Council of Scientific and Industrial Research (CSIR) are 15-20 percent cheaper than the conventional ones and free from harmful chemicals. ♦ SWAS stands for Safe Water releaser, ♦ SAFAL stands for Safe minimal Aluminum and ♦ STAR stands for Safe Thermite cracker. The crackers will come in the market after the approval from Petroleum and Explosive Safety Organization (PESO), which is the nodal agency for safety requirements in manufacture, storage, transport of all types of explosives.

?7. Doordarshan Cameraman, Two Policemen killed in Naxal attack in Chhattisgarh’s Dantewada

DD Cameraman Achyutanand Sahu and two policemen, Sub-Inspector Rudra Pratap Singh and Assistant Constable Manglu, were killed in the attack. Mor Mukut Sharma was a part of the three-member team, including cameraman Achyuta Nanda Sahu and journalist Dheeraj Kumar, sent by the public broadcaster to cover the next month’s two-phased polls in the state, which has 90 seats. The first phase of polls covering 18 constituencies of eight Maoist-affected districts Bastar, Kanker Sukma, Bijapur, Dantewada, Narayanpur, Kondagaon and Rajnandgaon will be held on November 12. The remaining 72 constituencies will witness polling on November 20.

?8. Delhi observes ‘Clean Air Week’ from November 1-5 to fight against the worsening air quality

Centre in collaboration with the Delhi, UP and Haryana governments organise ‘Clean Air Week’ between November 1-5 in Delhi and four other National Capital Region (NCR) cities – Faridabad, Gurgaon, Ghaziabad and Noida. This decision was taken in a meeting held in Delhi under the Chairmanship of Union Environment Secretary CK Mishra to discuss the urgent steps for air pollution reduction and regulating fire crackers in the light of the Supreme Court’s Order. On October 23, 2018, the Supreme Court had allowed the sale of “green firecrackers.” On Diwali, citizens would be allowed to burst crackers only between 8 pm to 10 pm.

?9. Mphasis signed with IIMBs incubation centre

Mphasis has signed with NSRCEL, the start-up incubation centre at Indian Institute of Management Bangalore, to support the early-stage social venture. The programme aimed to incubate and support ‘for profit’ social ventures and startups that have been in operation for one to three years. Over 550 applications were received for this programme and 16 of them were shortlisted for the three-month pre-incubation. They were then given an opportunity to pitch before an advisory council for selection to the programme which will be for 12-18 months. TAXSHE Services Pvt. Ltd., ECONUT Coconut Producer Company Ltd., Blink Research and Services Pvt. Ltd., ThinkZone, and Rural Caravan Pvt. Ltd. are the selected ventures.

?10. Austria to withdraw from UN migration pact

Austria is set to follow the United States and Hungary by backing out of a United Nations (UN) migration pact. United Nations’ (UN) Global Compact for Safe, Orderly and Regular Migration agreement is due to be formally approved in December in Morocco. The pact aims to boost international cooperation on migration issues. ♦ Austrian Chancellor – Sebastian Kurz.


Latest Current Affairs Videos

Latest Current Affairs Videos