Current Affairs 08 OCTOBER 2019

370
0
Share:

 

🎯 1. ३९ व्या जागतिक कवी परिषदेचे उदघाटन _______येथे झाले.

 1. भोपाळ
 2. नवी दिल्ली
 3. भुवनेश्वर
 4. आग्रा

ANSWER –3

🎯 2. भारताच्या मदतीने कोणत्या देशात उभारण्यात आलेल्या तेलशुद्धीकरण प्रकल्पाचा उदघाटन सोहळा ८ ऑक्टोबर रोजी पेट्रोलियम व नैसर्गिक वायू आणि पोलाद मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते आयोजित करण्यात आला.

 1. मंगोलिया
 2. कंबोडिया
 3. लाओस
 4. व्हिएतनाम

ANSWER –1

🎯 3. उत्सवाच्या वेळी वायू प्रदूषणाला आळा घालण्यासाठी कोणत्या संस्थेने ‘हरित फटाके’ विकसित केले.

 1. IIT कानपुर
 2. CSIR
 3. IISc बेंगळुरू
 4. IIT खड्गपूर

ANSWER –2

🎯 4. भारताने कोणत्या शेजारच्या देशात कोस्टल सर्व्हिलन्स रडार यंत्रणा उभारण्याचा निर्णय घेतला आहे ?

 1. श्रीलंका
 2. बांग्लादेश
 3. मालदीव
 4. पाकिस्तान

ANSWER –2

🎯 5. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी युद्धात मृत्युमुखी पडलेल्या सैनिकांच्या कुटुंबियांना दिली जाणारी आर्थिक मदत चार पट वाढविण्यात मान्यता दिली. हा निधी _____अंतर्गत देण्यात येणार

 1. आर्मी बॅटल कॅज्यूएलिटिज वेलफेयर फंड
 2. राष्ट्रीय संरक्षण कोष
 3. लष्कर केंद्रीय कल्याण कोष
 4. यापैकी नाही

ANSWER –1

🎯 6. २१ ऑक्टोबर २०१९ रोजी _____सर्व महिला असलेल्यांचा स्पेसवॉक आयोजित करणार आहे.

 1. युरोपियन स्पेस एजन्सी (ESA)
 2. जपान एरोस्पेस एक्सप्लोरेशन एजन्सी (JAXA)
 3. NASA (नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशन )
 4. ISA (इस्राएल स्पेस एजन्सी)

ANSWER –3

🎯 7. UNESCO ने आदिवासी लोकांसाठीचे राजदूत म्हणून ____यांची नेमणूक केली.

 1. कॅमेरून डायझ
 2. यूना किम
 3. मिली बॉबी ब्राउन
 4. यलीट्झा एपारीसीओ

ANSWER –4

🎯 8. जागतिक अधिवास दिन _____या दिवशी साजरा केला जातो.

 1. ७ ऑक्टोबर
 2. ९ ऑक्टोबर
 3. ६ ऑक्टोबर
 4. ८ ऑक्टोबर

ANSWER –1

🎯 9. वित्तीय कृती कार्यदल (FATF) आणि संयुक्त राष्ट्रसंघ (UN) यांच्यादरम्यान वाढीव सहकार्याची मागणी भारताने केली आहे.  FATF बाबत खालील विधाने विचारात घ्या.

I. FATF चे मुख्यालय स्वित्झर्लंड च्या जिनेव्हा या शहरात आहे.

II. १९८९ साली जी शिखर परिषदेत FATFची स्थापना झाली.

III. १९८९ साली झालेल्या त्याच्या स्थापनेपासून दहशतवाद तसेच वित्तीय घोटाळ्यांना प्रतिबंधित करण्यासाठी ते कार्यरत आहे.

वरती दिलेले कोणते विधान अचूक आहे

 1. केवळ I
 2. II आणि III
 3. केवळ II
 4. वरील सर्व

ANSWER –3

🎯 10. करदाते आणि कर अधिकारी यांच्यामधील परस्पर संवाद कमी करण्यासाठी अर्थमंत्र्यांनी प्राप्तिकर विभागाच्या NeAC केंद्राचे उदघाटन केले. NeAC चे पूर्ण नाव काय आहे ?

 1. नॅशनल ई-असेसमेंट सेंटर
 2. नेशनवाइड ई-असेसमेंट सेंटर
 3. नॅशनल ई- अनॅलिसिस सेंटर
 4. नेशनवाइड ई- अनॅलिसिस सेंटर

ANSWER –1


Latest Current Affairs Videos

Latest Current Affairs Videos