Current Affairs 07 March 2019

771
0
Share:

 

? 1. मुंबई जगातल १२ वं सगळ्यात श्रीमंत शहर

 • भारतात एकीकडे गरीब आणि श्रीमंतांमधील दरी प्रचंड वाढत असली तरी दुसरीकडे देशातील श्रीमंतांच्या संख्येंत ही झपाट्याने वाढत आहे.
 • २०१८ मध्ये जगातलं १८वं श्रीमंत शहर असणारं मुंबई यावर्षी जगातलं १२वं सगळ्यात श्रीमंत ठरलं आहे. दुसरीकडे भारतातील अब्जाधीशांच्या संख्येतही ११६ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
 • नाइट फ्रॅंक या संस्थेने बुधवारी जागतिक श्रीमंती अहवाल प्रकाशित केला. जगातील श्रीमंतांची वाढलेली संख्या, शहरांच्या जीवनशैलीतील बदल या सगळ्याचा अभ्यास करून हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला.
 • या अहवालानुसार भारतातील अब्जाधीशांची संख्या २०१३मध्ये ५५वरून ११९ वर पोहोचली आहे. तर लक्षाधिशांची संख्या अडीच लाखावरून सव्वा तीन लाखांवरून पोहोचली आहे.
 • या अहवालात जे लोकं २२५ कोटी किंवा त्याहून अधिक गुंतवणूक क्षमता ठेवणाऱ्या लोकांना ,कंपन्यांना सर्वाधिक श्रीमंतीचा स्तर दिला असून त्यांना अल्ट्राबिलेनियर म्हटलं आहे
 • भारतात एकूण १९४७ अल्ट्राबिलेनियर असून त्यातले सर्वाधिक ७९७ अल्ट्राबिलिनियर मुंबईत आहेत. अल्ट्राबिलिनियरच्या संख्येत गेल्या काही वर्षांत प्रचंड वाढ झाली असून येत्या काळात अल्ट्राबिलिनियर्सची संख्या ३९ टक्क्यांनी वाढेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
 • लंडन हे जगातलं सर्वात श्रीमंत शहर आहे तर या यादीत दुसरा नंबर न्यूयॉर्कचा लागतो. मुंबई जगातलं सगळ्यात श्रीमंत बारावं शहर असलं तरी त्याचवेळी ते जगातील महाग शहरांच्या यादीतही चमकलं आहे.
 • आज मुंबई जगातलं १६वं सर्वात महाग शहर ठरलं असून प्रॉपर्टीच्या बाबतीत ते देशातील सर्वात महागडं शहर आहे.

? 2. २० रुपयाचं नाणं चलनात येणार

 • नोटाबंदीनंतर १०, ५०, १००, २००, ५०० आणि २ हजार रुपयांच्या नव्या नोटा चलनात आणल्यानंतर आता केंद्र सरकारनं २० रुपयाचं नाणं चलनात आणण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय अर्थमंत्रालयानं या संदर्भात एक अधिसूचना काढली आहे.
 • याआधी २००९ साली रिझर्व्ह बँकेनं १० रुपयांचं नाणं चलनात आणलं होतं. हे नाणं सध्या मोठ्या प्रमाणात चलनात आहेत. आता त्याला २० रुपयाच्या नाण्याची जोड मिळणार आहे.
 • नव्या नाण्याच्या बाहेरील बाजूस ६५ टक्के तांबे, १५ टक्के झिंक, २० टक्के निकेल असेल तर, आतील बाजूस ७५ टक्के तांबे, २० टक्के झिंक आणि ५ टक्के निकेल असेल.
 • हे नाणं २७ मिलिमीटर व्यासाचं व ८.५४ ग्रॅम वजनाचं असेल. या नाण्याला १२ कडा असतील. नाण्याच्या एका बाजूस अशोक स्तभाचं चिन्ह व त्याखाली ‘सत्यमेव जयते’ लिहिलेलं असेल.
 • उजव्या बाजूस भारत व डाव्या बाजूस INDIA लिहिलेलं असेल. नाण्याच्या दुसऱ्या बाजूस नाण्याचं २० रुपये हे मूल्य कोरलेलं असेल. त्यावर ₹ हे चिन्ह असेल. त्याशिवाय, धान्याच्या लोंब्या असतील. वीस रुपयांच्या नाण्यासोबतच सरकार १, २, ५ आणि १० रुपयांची नवी नाणीही आणणार आहे..

? 3. महिलांना पुरुषांपेक्षा १९ टक्के कमी वेतन: सर्वे

 • हल्ली सर्वच क्षेत्रात महिला पुरुषांच्या बरोबरीने कार्यरत असल्या, तरी वेतनाच्या बाबतीत विषमता असल्याचे दिसून आले आहे.
 • जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या एका सर्वेक्षणानुसार देशातील महिला नोकरदारांचे वेतन पुरुष नोकरदारांच्या तुलनेत सरासरी १९ टक्के कमी असल्याचे आढळून आले आहे.
 • ‘मॉन्स्टर सॅलरी इंडेक्स’नुसार (एमएसआय) देशात अद्याप ‘जेंडर पे गॅप’ असल्याचे आढळून आले असून, पुरुष नोकरदार महिला नोकरदारांच्या तुलनेत ताशी ४६.१९ रुपये अधिक सरासरी वेतन घेत असल्याचे दिसून आले आहे.
 • गेल्या वर्षी (२०१८) देशातील पुरुष आणि महिला नोकरदारांना अनुक्रमे ताशी २४२.४९ रुपये आणि १९६.३ रुपये सरासरी वेतन मिळत होते.
 • या सर्वेक्षणानुसार बऱ्याच क्षेत्रांमध्ये दोघांच्या वेतनामधील तफावत आजही कायम असल्याचे दिसून आले आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील पुरुष कर्मचाऱ्यांच्या तुलनेत महिलांना २६ टक्के कमी वेतन, तर उत्पादन क्षेत्रातील महिलांना पुरुषांच्या तुलनेत २४ टक्के कमी वेतन मिळत असल्याचे आढळले आहे.

? 4. ‘मायक्रोसॉफ्ट’ने बनवली जगातील सर्वात शांत खोली; हृदयाची धडधडही ऐकू येणार

 • अमेरिकेच्या प्रसिद्ध ‘मायक्रोसॉफ्ट’ कंपनीने एका अनोख्या खोलीची निर्मिती केली आहे. सुमारे दहा कोटी पन्नास लाख रुपये खर्चून तयार करण्यात आलेल्या या खोलीचे वैशिष्ट्य म्हणजे ती अतिशय शांत असून, तेथे मानवी हृदयाची धडधडही स्पष्ट ऐकू येते.
 • वॉशिंग्टनमधील रेडमंड परिसरातील असलेल्या कंपनीच्या मुख्यालयात ही खोली उभारण्यात आली आहे. मात्र, या खोलीत इतकी शांतता आहे, की कुणीही व्यक्ती ४५ मिनिटांपेक्षा अधिक वेळ येथे थांबूच शकत नाही.
 • जगाच्या पाठीवरील ही सर्वांत शांत खोली असल्याचा दावा कंपनीतर्फे करण्यात आला आहे. येथील आवाजाची पातळी उणे २०.३ डेसिबल असल्याचे नोंदविण्यात आले आहे.
 • जगातील सर्वांत शांत खोलीसाठीचे गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. या खोलीची प्रत्येक भिंत भूकंपरोधक आहे. प्रत्येक भिंत एक फूट लांब आहे. त्यामुळे बाहेरचा कोणताही आवाज आत येऊच शकत नाही.
 • या खोलीच्या आता आवाजाची कोणत्याही प्रकारची कंपने जाणवत नाहीत. खोलीच्या भिंती, फरशी आणि छत तयार करण्यासाठी फायबर ग्लासचा वापर करण्यात आला आहे. जेणेकरून आवाजाची कंपने जाणवू नये.
 • खोलीची लांबी आणि उंची प्रत्येकी २१ फूट आहे. या खोलीला परिसरातील अन्य इमारतींपासून वेगळे ठेवण्यासाठी वेगळ्या फाउंडेशन स्लॅबची निर्मिती करण्यात आली होती.
 • या खोलीमध्ये फरशीसाठी फायबर ग्लासचा उपयोग करण्यात आला आहे. लढाऊ विमानांमध्ये प्रामुख्याने ध्वनिरोधक असलेल्या फायबर ग्लासचा वापर करण्यात येतो.
 • मायक्रोसॉफ्टच्या इंजिनीअरच्या मते कंपनीच्या आवारात सात ग्राउंड चेंबरची निर्मिती करण्यात आली आहे. कंपनीकडे एकूण २५ पेक्षा अधिक चेंबर आहेत.
 • कंपनीने प्रामुख्याने अशा प्रकारचे साउंड चेंबरची निर्मिती हेडफोन आणि माउस बटनाच्या आवाजाच्या परिक्षणासाठी केली आहे.
 • या ठिकाणी उपकरणांचे परीक्षण केल्याने त्यांना ध्वनिच्या पातळीपर्यंत अनुकूल बनवणे सोपे जाते. या चेंबरमध्ये असलेल्या शांततेमुळे येथे थांबण्यास कंपनीचे इंजिनीअर तयार नसल्याचे दिसून आले आहे.

? 6. महाराष्ट्रातील 6 महिलांना “नारी शक्ती पुरस्कार’ जाहीर

 • विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महाराष्ट्रातील 6 महिलांना नारी शक्ती पुरस्कार जाहिर झाला आहे.
 • केंद्रीय महिला व बाल कल्याण मंत्रालयाच्यावतीने दरवर्षी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणा-या माहिलांना ‘नारी शक्ती’ या प्रतिष्ठित पुरस्काराने गौरविण्यात येते.
 • यावर्षी देशभरातील एकूण 44 महिलांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार असून यामध्ये महाराष्ट्रातील सहा महिलांचा समावेश आहे. हा पुरस्कार प्रदान सोहळा राष्ट्रपती भवन येथे होणार आहे.
 • महाराष्ट्रातील महिलांमध्ये मुंबईतील सीमा राव, स्मृती मोरारका, कल्पना सरोज, सीमा मेहता, अहमदनगर जिल्ह्ययाच्या राहीबाई पोपरे, सातारा जिल्ह्याच्या चेतना गाला सिन्हा यांचा सन्मान होणार आहे.

महाराष्ट्रातील सहा दिग्गज महिला

 • मुंबईच्या सीमा राव या देशातील एकमेव महिला कमांडो प्रशिक्षक आहेत. त्यांनी आतापर्यंत 15000 पेक्षा अधिक सैनिक प्रशिक्षित केले. शिवाय त्यांनी स्वत: ची शुटींगचे तंत्र विकसित केले आहे. त्यांचे हे तंत्र भारतीय सेनेनही स्वीकारले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना ‘नारी शक्ती’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
 • मुंबईच्या सुप्रसिद्ध कथक नृत्यागंना सीमा मेहता यांना कथक नृत्य क्षेत्रातील भरीव कामगिरीसाठी सन्मानित करण्यात येणार आहे. पद्मश्री पुरस्कार प्राप्त उद्योजिका कल्पना सरोज यांनी उद्योग क्षेत्रात स्वत:च्या कर्तृत्वाने जो ठसा उमटविला आहे. त्यांच्या या उत्कृष्ट कामगिरीसाठी त्यांना गौरविण्यात येणार आहे.
 • मुंबईच्या स्मृती मोरारका यांनी ‘तंतुवी’ या संस्थेच्या माध्यमातून पारंपरिक हातमाग क्षेत्रातील कारागिरांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी हातमाग समुह सुरू केला त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना ‘नारी शक्ती’ पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
 • अहमदनगर जिल्ह्यातील राहीबाई पोपरे यांना, त्यांच्या कृषी क्षेत्रात वैविध्यपूर्ण प्रयोगासाठी ‘नारी शक्ती’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
 • सातारा जिल्यातील माण देशी महिला सहकारी बॅंकेच्या संस्थापिका चेतना गाला सिन्हा यांना ग्रामीण क्षेत्रातील महिलांना आर्थिकरित्या सक्षम करण्यासाठीच्या योगदानाबद्दल ‘नारी शक्ती’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

? 1. BHEL installed 1st solar EV charging station on Delhi-Chandigarh Highway

Bharat Heavy Electricals Limited (BHEL) has set up its first solar-based electric vehicle (EV) charger on the Delhi-Chandigarh Highway. The project is covered under the FAME scheme (Faster Adoption and Manufacturing of Hybrid and Electric Vehicles). To be implemented from April 1, 2019, the FAME II scheme envisages setting up of about 2,700 charging stations across India so that at least one charging station is available in a grid of 3×3 km2.

? 2. Scientist Ajit Kumar Mohanty appointed as BARC Director

The Bhabha Atomic Research Centre (BARC) has appointed scientist Ajit Kumar Mohanty as its Director. He has been appointed for a period of three years. He is at present Director, Physics Group in BARC and Director, Saha Institute of Nuclear Physics. The BARC is India’s premier nuclear research facility based in Mumbai.

? 3. Delhi government launched four fully automated driving test centres

The Delhi government threw open to the public four fully automated driving test centres. The first of the fully Automated Driving Test Centres (ADTCs) was inaugurated by Transport Minister Kailash Gahlot at Mayur Vihar I Regional Transport Office. The other three ADTCs, at Vishwas Nagar, Sarai Kale Khan, and Shakur Basti, also started operation.  The scientifically designed tracks at the ADTCs includes space for testing reverse parallel parking, up-gradient, Forward-8, Reverse-S, traffic junction, H-track for four-wheelers, read a government statement. Similar facilities have been planned for eight other locations namely Lado Sarai, Raja Garden, Hari Nagar, Burari, Loni, Rohini, Jharoda Kalan, and Dwarka.

? 4. Toyota and JAXA partners on a planned mission to the moon

Toyota to join hands with Japan Aerospace Exploration Agency (JAXA), Japan’s space agency, on a planned mission to the moon, with the Japanese auto giant expected to develop a lunar rover. It will be the car manufacturer’s first full-fledged entry into space exploration after the company jointly developed a robot sent to the International Space Station.  Toyota is expected to jointly develop a mobility method to be used on the lunar surface for the mission. So far, only Russia, the United States, and China have made the 3,84,000 km journey and landed spacecraft on the moon. Last month, Israel launched a spacecraft that aims to join them. In 2017, Japan revealed plans to put an astronaut on the Moon around 2030. Before humans set foot on the lunar surface again, NASA aims to land an unmanned vehicle on the moon by 2024.

? 5. India nominated Ramesh Chandra to head Food and Agricultural Organisation

India has nominated Ramesh Chandra, a member of Niti Ayog, to head Food and Agricultural Organisation (FAO). Ramesh Chand’s candidature is challenged by Qu Dongyu of China, Medi Moungui of Cameroon, Catherine Geslain-Laneelle of France and Davit Kirvalidze of Georgia. To get elected to the post of Director-General of FAO the candidate needs to secure a simple majority of the 194 members. The only Indian to head the FAO is Binay Ranjan Sen, who was the Director-General from 1956 to 1967.  Food and Agriculture Organisation (FAO): ♦ FAO is a specialized agency of the United Nations which leads international efforts to defeat hunger ♦ It was established as a specialized agency in 1945 ♦ It aims to achieve food security for all and make sure that people have regular access to enough high-quality food to lead active healthy lives

? 6. World Bank, Chhattisgarh State and GoI signed to support the States reforms

The Government of India, the State Government of Chhattisgarh and the World Bank signed a $25.2 Million Loan Agreement to support the State’s Reforms in Expenditure Management under Chhattisgarh Public Financial Management and Accountability Program. Chhattisgarh Public Financial Management and Accountability Program: ♦ The reforms encompass Expenditure Planning, Investment Management, Budget Execution, Public Procurement, and Accountability ♦ The programme will help the state of Chhattisgarh to strengthen its Direct Benefit Transfer (DBT) and Tax Administration Systems ♦ The World Bank will also facilitate cross-learning from Public Financial Management (PFM) Reforms undertaken by it in the other Indian States while bringing in global experiences ♦ The programme which focuses on IT solutions will benefit almost 11,000 Village Panchayats and 168 Urban Municipalities in the State

? 7. Bharat Electronics launches SWAGAT- Automatic Fare Collection Gating System

Bharat Electronics Limited (BEL), a defence public sector undertaking, presented SWAGAT – the Automatic Fare Collection Gating System. Prime Minister Narendra Modi launched the system on Monday as part of the inaugural of Phase I of the Ahmedabad Metro.

? 8. Trump notified to terminate trade benefits for both India and Turkey

President Trump notified the Congress his intent to terminate trade benefits for both India and Turkey under the Generalized System of Preference (GSP) eligibility criteria.  About 2,000 products, including auto components and textiles, can enter the US duty-free if the beneficiary developing country meet the eligibility criteria. India was the largest beneficiary of the GSP programme in 2017 with $5.7 billion in imports to the US given duty-free status.  President Trump has accused India of failing to ensure the US of equitable and reasonable access to its markets. The US is pressing India to reduce US trade deficits and has repeatedly called out India for high tariffs. India has sought talks with the US to avoid the withdrawal of the trade benefits under the GSP. India has offered a trade package to the US which promises of about Rs.35,000 crore annually in oil and gas imports from the US and another Rs.1,00,000 crore in defence orders in the coming years.

? 9. March 1 2019 observed as World civil defence day

World Civil Defence Day is observed on 1st March every year, all over the world. The theme of this year’s World Civil Defence Day was “Children’s safety, our responsibility”. This day was incorporated in 1990 by the International Civil Defence Organisation (ICDO). The day marks the entry into force of the ICDO Constitution as an intergovernmental organisation in 1972 and has two main purposes: The attention of the world public the vital importance of Civil Protection and of raising awareness of the preparedness for, and prevention and self-protection measures in the event of accidents or disasters.

? 10. ISRO and CNES signed to set up a joint maritime surveillance system

National space agency ISRO and French space agency CNES signed an agreement to set up a joint maritime surveillance system in the country in May. K.Sivan, Chairman of the Indian Space Research Organisation, and Jean-Yves Le Gall, President of CNES of France, signed the agreement in Bengaluru. The two nations will explore putting up a constellation of low-Earth orbiting satellites that will identify and track the movement of ships globally, and in particular, those moving in the Indian Ocean region where France has its Reunion Islands. The CNES-ISRO agreement intends to supply an operational system for detecting, identifying and tracking ships in the Indian Ocean. It provides for a maritime surveillance centre to be set up in India in May this year; sharing of capacity to process existing satellite data and joint development of associated algorithms. The two agencies have put up two climate and ocean weather monitoring satellites Megha-Tropiques (of 2011) and SARAL-AltiKa (2013) that are considered a model.


Latest Current Affairs Videos

Latest Current Affairs Videos