Current Affairs 07 January 2020

579
0
Share:

 

🎯1. बिहारच्या भागलपूर वनविभागात कासवांसाठी एक पुनर्वसन केंद्र उभारणार

 • ताज्या पाण्यातल्या कासवांसाठी नव्या प्रकारचे पहिलेच असे एका पुनर्वसन केंद्राची उभारणी बिहार राज्याच्या भागलपूर वनविभागात केली जात आहे.
 • हे पुनर्वसन केंद्र अर्धा हेक्टरवर पसरलेले आहे आणि ते एकावेळी 500 कासवांना आश्रय देण्यास सक्षम असणार आहे.
 • बचाव पथकांनी तस्करांकडून वाचवले असता अनेक कासव गंभीर जखमी आणि आजारी असल्याचे आढळल्यानंतर असे केंद्र उभारण्याची गरज असल्याचे दिसून आले आहे.

🎯2. फाइलवर शेरा मराठीतच लिहा; ‘ठाकरे सरकार’चा आदेश

 • ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व विभागांच्या सचिवांना फाइलवर शेरा लिहिताना तो मराठीत लिहिण्याची सक्ती केली आहे. शेरा मराठीत लिहिला नसेल तर फाइल परत पाठवली जाणार आहे,’ अशी माहिती मराठी भाषामंत्री सुभाष देसाई यांनी दिली.
 • पत्रकार दिनानिमित्त देसाई यांनी सोमवारी मंत्रालयात पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारल्या. त्यावेळी त्यांनी सरकारची राजभाषेविषयीची भूमिका मांडली. सरकारी व्यवहारात मराठी भाषेचा वापर वाढावा, असा सरकारचा प्रयत्न आहे.

🎯3. साथरोगाची ‘रिअल टाईम’ माहिती मिळणार.

 • राज्यातील कोणत्याही भागात साथरोगाचे रुग्ण आढळल्यास त्याची ‘रिअल टाईम’ माहिती आरोग्य विभागाला मिळणार आहे.
 • विविध आजारांच्या माहितीच्या आधारे साथरोगाच्या उद्रेकाचा इशारा देणारी ही संगणकीय प्रणाली राज्यात पुढील महिनाभरात कार्यान्वित होईल. त्यामुळे साथरोग नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना करणे
 • शक्य होणार आहे.
 • एकात्मिक आरोग्य व्यवस्थापन व्यासपीठ (आयएचआयपी) अंतर्गत ही प्रणाली सुरू केली जाणार असून महाराष्ट्र देशातील नववे राज्य ठरले आहे.
 • तसेच केंद्र सरकार व जागतिक आरोग्य संघटनेने संयुक्तपणे ‘आयएचआयपी’ हे व्यासपीठ विकसित केले आहे.
 • देशात नोव्हेंबर 2018 पासून टप्याटप्याने काही राज्यांमध्ये याची अंमलबजावणी सुरू झाली आहे.
 • महाराष्ट्रातही ही प्रणाली सुरू करण्यासाठी काही दिवसांपासून तालुका, जिल्हापातळीवर कर्मचारी, अधिकाºयांचे प्रशिक्षण सुरू होते.
 • संगणकीय प्रणाली तीन पातळ््यांवर काम करणार आहे.
 • पहिल्या टप्प्यात गाव पातळीवरील प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील रुग्णांची माहिती तेथील आरोग्य सेवकांकडून ‘एस’ फॉर्म (संशयित) मध्ये भरली जाईल.
 • च्यासाठी मोबाईल अ‍ॅप विकसित करण्यात आले आहे. दुसऱ्या टप्प्यात तालुका पातळीवरील सरकारी रुग्णालये, आरोग्य
 • केंद्रांमधील रुग्णांची माहिती (पी फॉर्म) संगणकाद्वारे भरली जाईल. तर तिसऱ्या टप्प्यात सरकारी प्रयोगशाळांमध्ये नमुना तपासणीनंतरच्या निदानाची माहिती (एल फॉर्म) संगणकाद्वारे भरली जाईल.
 • हे तिनही फॉर्म एकमेकांशी जोडण्यात आले आहेत. गावपातळीवर भरलेली माहिती सर्व सरकारी रुग्णालये, प्रयोगशाळांना पाहता येऊ शकते.

🎯4. ज्येष्ठ कलाकारांना ‘वासुदेव गायतोंडे कला जीवनगौरव पुरस्कार’

 • राज्याला कलेचा समृद्ध वारसा लाभला आहे. दृश्यकलेचे शिक्षण देणारी देशातील पहिली संस्था सर ज.जी. कला महाविद्यालयाच्या रूपात मुंबईत स्थापन झाली. राज्यातील कलाकारांनी कला क्षेत्रात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय लौकिक प्राप्त केला आहे. त्यानुसार, दृश्यकलेच्या क्षेत्रात योगदान देणाऱ्या ज्येष्ठ कलाकारांना ‘वासुदेव गायतोंडे कला जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.
 • राज्यात दृश्यकला क्षेत्रात सातत्यपूर्ण आणि निष्ठेने कार्य करणाऱ्या ज्येष्ठ कलाकारांना ‘वासुदेव गायतोंडे कला जीवनगौरव पुरस्कार’ दरवर्षी प्रदान करण्यात येणार आहे. या पुरस्काराचे स्वरूप पाच लाख रुपये, स्मृतिचिन्ह आणि सन्मानपत्र असे असणार आहे.
 • तर हा पुरस्कार दृश्यकलेच्या एका ज्येष्ठ व नामवंत कलाकार यांना दरवर्षी, क्रमनिहाय प्रदान करण्यात येईल. त्यात अनुक्रमे रेखा व रंगकला, शिल्पकला, उपयोजित कला आणि कला व शिल्प (अंतर्गत गृहसजावट, वस्त्रकाम, मातकाम, धातूकाम) या विभागांचा समावेश आहे.
 • तसेच या क्रमनिहाय येणा ऱ्या संबंधित कला विभागात पुरस्कारासाठी कलाकार यांची निवड न झाल्यास त्यानंतरच्या क्रमावरील विभागातील कलाकारांचा पुरस्कारासाठी विचार करण्यात येईल, असे निर्देश शासन निर्णयात नमूद आहेत.

🎯5. प्रशांत जगपात नितीन पवारला सुवर्णपदक

 • महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आणि पुण्यातील अमनोरा टाऊनशीपचे विकसक असलेल्या सिटी कॉर्पोरेशन लिमिटेड तर्फे आयोजित 63 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत माती विभागात सोलापूरचा प्रशांत जगपात (86 किलो) व कोल्हापूर शहराचा नितीन पवार (70 किलो) यांनी सुवर्णपदके पटकावले.
 • म्हाळुंगे- बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकूल येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत हे अतीतटीचे सामने रंगले होते. यात सोलापूरचा प्रशांत जगपात (86 किलो) व कोल्हापूर शहराचा नितीन पवार (70 किलो) यांनी सुवर्णपदक पटकावले. आज 70 व 86 किलो वजनी गटातील माती विभागातील अंतिम फेरीचे सामने पार पडले. यात 86 किलो वजनी गटात माती विभागात सोलापूरच्या प्रशांत जगताप याने अहमदनगरच्या आकाश भिंगारेला 8-2 गुणांनी पराभूत करत सुवर्णपदक पटकावले. प्रशांत हा वयाच्या 22 व्या वर्षी प्रथमच महाराष्ट्र केसरी वजनी गट स्पर्धेतीत सहभागी झाला आणि पहिल्याच वर्षी सुवर्णपदकावर त्याने आपली मोहर उमटविली.

🎯6. प्रसिद्ध चित्रकार अकबर पदमसी यांचं निधन

 • भारतातील प्रसिद्ध चित्रकार अकबर पदमसी यांचं वयाच्या 92 व्या वर्षी निधन झालं. मुंबईतील वरळीला वास्तव्यास असलेले अकबर पदमसी हे काही दिवस कोइम्बतूरजवळील आश्रमात राहायला गेले होते, तिथंच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
 • मुंबईतील जे. जे. स्कूल ऑफ आर्ट महिविद्यालयात शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी पॅरिसमधून उच्चशिक्षण पूर्ण केलं. पाश्चात्य शैलीनं चित्र रंगवण्यासाठी ते विशेषत: ओळखले जात. 1951 सालापासून त्यांची चित्रकारकीर्द बहरत गेली.
 • ललिता कला अकादमीचा कलारत्न पुरस्कार, तसंच मध्य प्रदेशच्या कालिदास सन्मानानं अकबर पदमसी यांचा गौरव झाला आहे.

🎯7. “नवीन, उदयोन्मुख आणि धोरणात्मक तंत्रज्ञान (NEST)” : परराष्ट्र मंत्रालयातला नवा विभाग

 • भारत सरकारच्या केंद्रीय परराष्ट्र कल्याण मंत्रालयाने 1 जानेवारी 2020 रोजी घोषणा केली की नवी दिल्लीत मंत्रालयात “नवीन, उदयोन्मुख आणि धोरणात्मक तंत्रज्ञान (NEST)” नावाने एका नव्या विभागाची स्थापना करण्यात येणार आहे.
 • वेगाने वाढणाऱ्या भारतीय अर्थव्यवस्थेत अश्या पुढाकाराने परकीय संबंधातून तंत्रज्ञान क्षेत्रात होणाऱ्या गुंतवणुकीला आकर्षित करण्याला प्रोत्साहन मिळणार. सध्या भारत देशात 5G नेटवर्क तंत्रज्ञान आणण्यासाठी त्याच्या क्षेत्रात चाचण्यांमध्ये भाग घेण्यासाठी ह्यूवेई कंपनीसारख्या मोठ्या उद्योगांना परवानगी देण्याच्या विचारार्थ सरकार आहे.

ठळक बाबी

 • NEST विभाग नवीन व उदयोन्मुख तंत्रज्ञानाशी संबंधित मुद्द्यांकरिता मंत्रालयात एक केंद्र म्हणून काम करणार.
 • 5G आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यासारख्या क्षेत्रांमध्ये परदेशी भागीदारांचे सहकार्य घेण्यामध्ये नवा विभाग मदत करणार.
 • स्थानिक भागधारक आणि परदेशी भागधारक यांच्यादरम्यान समन्वय ठेवण्यासाठी तसेच भारताच्या विकासाची प्राथमिकता आणि राष्ट्रीय सुरक्षा लक्षात घेऊन धोरणे ठरविण्यामध्ये या विभागाची मदत होणार आहे.
 • नवा विभाग नवीन व उदयोन्मुख तंत्रज्ञान आणि तंत्रज्ञानावर आधारित संसाधनांविषयीची परकीय धोरणे आणि आंतरराष्ट्रीय कायदेशीर चौकट अश्या बाबींचे मूल्यांकन करणार आणि योग्य परकीय धोरण निवड करण्याविषयीची शिफारस करण्यास देखील मदत करणार आहे.

Latest Current Affairs Videos

Latest Current Affairs Videos