Current Affairs 06 March 2019

625
0
Share:

 

?1. swachh survekshan 2019: महाराष्ट्र देशातले तिसरे स्वच्छ राज्य

 • स्वच्छतेच्या बाबतीत देशातले तिसरे सर्वाधिक चांगली कामगिरी करणारे राज्य होण्याचा मान महाराष्ट्राने मिळवला आहे.
 • ‘स्वच्छ सर्वेक्षण २०१९’ अंतर्गत केलेल्या सर्वेक्षणानुसार महाराष्ट्राने हा सन्मान मिळवला आहे. या यादीत पहिला क्रमांक छत्तीसगडचा लागतो तर दुसऱ्या क्रमांकावर झारखंड आहे.
 • मध्य प्रदेशमधील इंदुर हे देशातील सर्वात स्वच्छ शहर ठरले आहे. इंदुरने हा मान सलग तीनवेळा मिळवला आहे.
 • राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज हे निकाल घोषित केले. हे सर्वेक्षण देशातील ४,२३७ शहरांमध्ये करण्यात आलं. २८ दिवस डिजीटल पद्धतीने करण्यात आलेल्या या सर्वेक्षणाचे निकाल राष्ट्रपतींनी जाहीर केले.
 • शहर विकास विभागाच्या प्रधान सचिव आणि महाराष्ट्रातील स्वच्छ भारत मिशनच्या संचालक मनीषा म्हैसकर यांनी राष्ट्रपतींच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारला.
 • राज्यातल्या शहरांच्या बाबतीत कोल्हापूर स्वच्छ सर्वेक्षणात १६ व्या स्थानावर आहे. पहिल्या २० शहरांमध्ये कोल्हापूर नवी मुंबईनंतर राज्यातील दुसरे शहर ठरले आहे.
 • नाशिक राज्यात १३ व्या तर देशात ६७ व्या क्रमांकावर आहे. नाशिकची ६३ व्या क्रमांकावरून ६७ व्या क्रमांकावर घसरण झाली आहे.

?2. पाकिस्तानला झटका, यूएस व्हिसाची मुदत ५ वर्षांवरून ३ महिने

 • पुलवामा हल्ल्यानंतर जागतिक समुदायात सतत पाकिस्तानवर टीकेची झोड उठली आहे. आता पाकिस्तानला अमेरिकेने आणखी एक धक्का दिला आहे.
 • अमेरिकेने पाकिस्तानी नागरिकांना मिळणारा व्हिसाचा कालावधी पाच वर्षांवरून घटवून तीन महिने केला आहे. एआरवाय न्यूजने अमेरिकी दूतावासाच्या प्रवक्त्यांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे.
 • हे नवे व्हिसा धोरण सर्वसाधारण नागरिकांसह पाकिस्तानी पत्रकारांनादेखील लागू असणार आहे. याशिवाय पाकिस्तानी नागरिकांसाठी असलेल्या व्हिसा अॅप्लिकेशन शुल्कातही अमेरिकन सरकारने वाढ केली आहे.
 • आधी यासाठी १६० डॉलर्स मोजावे लागत आता हे शुल्क आता १९२ डॉलर्सवर पोहोचले आहे. पाकिस्तानने अमेरिकन नागरिकांसाठी असलेल्या व्हिसा धोरणात बदल केल्यानंतर मंगळवारी अमेरिकेनेही हे बदल केले.
 • मात्र, सरकारी अधिकाऱ्यांच्या व्हिसा कालावधीबाबत अमेरिकन प्रशासन त्यांच्या कामाच्या कालावधीनुसार निर्णय घेईल, अशी माहिती या प्रवक्त्यांनी दिली.
 • वॉशिंग्टन डीसी आणि वाणिज्य दूतावासातील पाकिस्तानी अधिकाऱ्यांना विना परवानगी त्यांच्या कार्यालयांपासून ४० कि.मी. पुढील प्रवास करता येणार नाही, असं वृत्तही या वाहिनीने दिलं आहे. पाकपुरस्कृत दहशतवादाबाबतही अमेरिकेने पाकिस्तानला वारंवार समज दिली आहे.

?3. ‘स्वच्छ सर्वेक्षण’मध्ये महाराष्ट्राला सर्वाधिक पुरस्कार

 • ‘स्वच्छ सर्वेक्षण अभियान’मध्ये महाराष्ट्राने सर्वाधिक ४५ पुरस्कार पटकावून देशात अव्वल स्थान मिळविले आहे. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या राज्यांच्या यादीत महाराष्ट्राला तिसरे स्थान मिळाले.
 • नवी दिल्लीत बुधवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
 • विज्ञान भवनातील समारंभात ‘स्वच्छ सव्‍‌र्हेक्षण-२०१९’चे निकाल घोषित करण्यात आले. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते १० पुरस्कारांचे वितरण या वेळी करण्यात आले. महाराष्ट्राला उत्कृष्ट (बेस्ट परफॉर्मिग स्टेट) राज्यांत तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
 • पहिल्या शंभरांत राज्यातील २४ शहरे
 • या अभियानात सवरेत्कृष्ट कामगिरी केलेल्या पहिल्या १०० शहरांमध्ये राज्यातील २४ शहरे आहेत. या शहरांमध्ये नवी मुंबई (७), कोल्हापूर (१६), मीरा-भाईंदर (२७), चंद्रपूर (२९), वर्धा (३४), वसई-विरार (३६), पुणे (३७), लातूर (३८), सातारा (४५), पिंपरी-चिंचवड (५२), उदगीर (५३), सोलापूर (५४), बार्शी (५५), ठाणे (५७), नागपूर (५७), नांदेड-वाघाळा (६०), नाशिक (६७), अमरावती (७४), जळगाव (७६), कल्याण-डोंबिवली (७७), पनवेल (८६), अचलपूर (८९), बीड (९४) व यवतमाळ (९६) या शहरांचा समावेश

?4. हवामानाचे अॅलर्ट आता मोबाइलवर

 • विजांचा कडकडाट, वादळी पाऊस, अतिवृष्टीचा इशारा आता थेट नागरिकांच्या मोबाइलवर येणार आहे.
 • नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी हवामानशास्त्र विभागाने आता लोकांशी ‘कनेक्ट’ होण्याचे ठरवले असून, येत्या पावसाळ्यापासून लोकांना मोबाइलवर अॅलर्ट येणार आहेत.
 • यासाठी काही राज्यांत प्रायोगिक तत्त्वावर मेसेज पाठविण्यास सुरुवात झाली आहे. एवढेच नव्हे, तर टीव्ही आणि एफएम रेडिओवरही दर काही तासांनी अपडेट मिळणार आहेत.

?5. राफेल कराराशी निगडित कागदपत्रं संरक्षण मंत्रालयातून चोरीला : महाधिवक्ता

 • ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ प्रशांत भूषण यांनी सरकार राफेल कराराची कागदपत्रं लपवत असल्याचा आरोप केला. ही कागदपत्रं कोर्टात सादर करण्यास प्रशांत भूषण यांनी सांगतचा महाधिवक्त्यांनी राफेल कराराची कागदपत्रं चोरीला गेल्याचा दावा केला.
 • राफेल विमान कराराबाबत सुप्रीम कोर्टात दाखल पुनर्विचार याचिकेवर सुप्रीम कोर्टात खडाजंगी झाली. राफेल विमान कराराशी निगडीत कागदपत्रं संरक्षण मंत्रालयातून चोरीला गेल्याचा दावा भारताचे महाधिवक्ता के के वेणुगोपाल यांनी सुप्रीम कोर्टात केला.
 • ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ प्रशांत भूषण यांनी सरकार राफेल कराराची कागदपत्रं लपवत असल्याचा आरोप केला. ही कागदपत्रं कोर्टात सादर करण्यास प्रशांत भूषण यांनी सांगतचा महाधिवक्त्यांनी राफेल कराराची कागदपत्रं चोरीला गेल्याचा दावा केला..

?6. मुकेश अंबानी जगातील 13 व्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती, गेल्या वर्षभरात संपत्तीत 25 टक्क्यांनी वाढ

 • भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले मुकेश अंबानी जगातील 13 व्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. फोर्ब्सने नुकतंच जाहीर केलेल्या जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत मुकेश अंबानी 13 व्या क्रमांकावर आहेत.
 • फोर्ब्सच्या जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत ऑनलाईन ई-शॉपिंग कंपनी अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस पहिल्या क्रमांकावर आहेत.
 • बेजोस यांच्यानंतर मायक्रोसॉफ्टचे बिल गेट्स आणि वॉरेन बफे यांचा अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक आहे.
 • मुकेश अंबानी यांची संपत्ती 2018 मध्ये 1 अब्ज डॉलर एवढी होती. आता, अंबानी यांची संपत्ती 50 अब्ज डॉलर एवढी झाली आहे.
 • गतवर्षी जगभरातील श्रीमंतांच्या या यादीत मुकेश अंबानी हे 19 व्या स्थानी होते. मात्र, यंदाच्या उत्पन्नानुसार अंबानी यांनी 6 क्रमांकाने आघाडी घेत फोर्ब्सच्या यादीत 13 वे स्थान पटकावलं आहे.

?7. सर्वांत स्वस्त डेटामध्ये भारत अव्वल

 • जगातील सर्वांत स्वस्त मोबाइल डेटा भारतात उपलब्ध होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. भारतात एक जीबी डेटा सरासरी १८.५० रुपयांना मिळत असून, जगभरात एक जीबी डेटासाठी सरासरी ६३९ रुपये मोजावे लागत असल्याचे उघड झाले आहे.
 • ‘केबल डॉट यूके’ नामक एका ब्रिटिश वेबसाइटने केलेल्या पाहणीत ही बाब समोर आली आहे. या वेबसाइटतर्फे २३० देशांतील ६,३१३ डेटा प्लॅनचा अभ्यास करून एक अहवाल तयार केला आहे. त्यानुसार अमेरिकेत एक जीबी डेटासाठी १२.३७ डॉलर अर्थात ८७५ रुपये खर्चावे लागतात.
 • सर्वांत माग डेटा झिम्बाब्वेमध्ये मिळत असल्याचेही समोर आले आहे. सर्वाधिक महागाईचा सामना करणाऱ्या झिम्बाब्वेमध्ये एक जीबी डेटासाठी ७५.२० डॉलर अर्थात अंदाजे ५,१३२ रुपये मोजावे लागत असल्याचे दिसून आले आहे.

सर्वांत स्वस्त डेटा असणारे देश

 • १ भारत १८.५
 • २. किर्गिझस्तान १९.०८
 • ३. कझाकिस्तान ३४.६३
 • ४. युक्रेन ३६.०४
 • ५. रवांडा ३९.५८
 • ६. सुदान ४८.०६
 • ७ श्रीलंका ५५.१२
 • ८. मंगोलिया ५७.९५
 • ९. म्यानमार ६१.४८
 • १०. कांगो ६२.१९

सर्वांत महाग डेटा असणारे देश

 • झिम्बाब्वे ५,३१२
 • इक्वेटोरियल गिनी ४,६४८
 • सेंट हेलेना ३,९१७
 • फॉकलँड आइसलँड ३,३४५
 • जिबोती २६७७

?1. TVS Motor Company won the Green Era Award for Sustainability

TVS Motor Company won the International Sustainability award Green Era Award for Sustainability in Lisbon, Portugal. Tata Motors also won the Quality and Business Excellence Award in acknowledgment of its endeavor to create new benchmarks in product quality.  Green Era Award for Sustainability: The Green Era Award for Sustainability was awarded at the Green Economy Forum held on 10th of February 2019 at Lisbon. The nominees for the Green Era Award for Sustainability are based on the following criteria’s: ♦ Energy Efficiency ♦ Creativity & Innovation ♦ Increase of Renewable Energy share in the energy source portfolio ♦ Economic, Social & Environmental Impact The Green Era Award for Sustainability recognizes the true global exemplars who have been innovative and creative in pursuing sustainable imperative.

?2. Vedanta has appointed Ajay Kapur as the CEO of its aluminium and power business

Vedanta has appointed Ajay Kapur as the Chief Executive Officer of its aluminium and power business. He joins Vedanta from Ambuja Cements where he was the MD and CEO for its India business.  Mr. Kapur brings with him an experience of 31 years across business verticals. He would drive key priorities for the aluminium business, which include a strong focus on volume and cost and improving efficiencies, among others.

?3. Rajnath to inaugurate an electronic surveillance project in Assam

Home Minister Rajnath Singh is to inaugurate an electronic surveillance project in Dhubri district of Assam, a riverine and highly porous stretch along the Bangladesh border.  The Home Ministry announced that the smart fencing will be operationalized in the 61 km riverine section of the international border in Dhubri district of Assam, where the Brahmaputra river enters into Bangladesh, in a bid to check illegal immigration and smuggling of arms, ammunition, drugs, and cattle.

?4. RBI fined 7 banks for delayed SWIFT implementation

The Reserve Bank of India (RBI) has imposed a penalty on 7 Banks for delayed implementation of SWIFT-related operational controls. It fined Rs.4 crore on Karnataka Bank, Rs.3 crore on City Union Bank, Rs.2 crore on DCB Bank and Rs.1 crore on Karur Vysya Bank Ltd., Rs. 4 crore on Indian Bank, Rs.3 crore on IOB and Rs.3 crore on United Bank of India for the same violations.  SWIFT is the global messaging software used for transactions by financial entities. SWIFT stands for Society for Worldwide Interbank Financial Telecommunication.  RBI had directed banks on time-bound implementation and strengthening of SWIFT-related operational controls after the  Rs.14,000 crore fraud in Punjab National Bank.

?5. India to collaborate with 4 countries to increase 3 species of Asian rhinos

India is to collaborate with Bhutan, Nepal, Indonesia, and Malaysia to increase the population of three species of Asian rhinos, including the Greater one-horned rhinoceros found in the Indian sub-continent. The five rhino range nations signed a declaration ‘The New Delhi Declaration on Asian Rhinos 2019’ for the conservation and protection of the species at the recently held Second Asian Rhino Range Countries meeting in New Delhi, India. The declaration was signed to conserve and review the population of the Greater one-horned, Javan and Sumatran rhinos every four years to reassess the need for joint actions to secure their future.

?6. Mukesh Ambani secured 13th place in the Forbes list of the ultra wealthy

In the release of the latest Forbes list of the ultra wealthy, Mukesh Ambani, chairman of Reliance Industries, secured 13th place. Jeff Bezos remains the world’s richest person with a wealth of $131 billion. Secondly, Bill Gates ranks second with wealth worth $96.5 billion and Warren Buffett in 3rd position. Forbes List: ♦ Forbes List can refer to one of the lists published annually by the American magazine Forbes, including:         (i) The Forbes 400 list of the wealthiest people in the United States         (ii) The World’s Billionaires, a list of all the people with a net worth over $1 billion

?7. Geological Survey of India sets up 22 GPS stations across country

The Geological Survey of India (GSI) launched 22 permanent global positioning system (GPS) stations across India to identify seismically hazardous zones and encourage mapping activities. The 22 GPS-Geodetic (pertaining to Geodesy, the science of earth measurement) observatories are located in Kolkata, Thiruvananthapuram, Jaipur, Pune, Dehradun, Chennai, Jabalpur, Bhubaneswar, Patna, Raipur, Bhopal, Chandigarh, Gandhinagar Vishakhapatnam, Agartala, Itanagar, Mangan, Jammu, Lucknow, Nagpur, Shillong and Little Andaman. Another 13 GPS permanent stations will be operational by March 2020. The organisation has launched a platform called “Bhuvisamvad” under the Ministry of Mines to facilitate interaction between geo-scientists and university and college students.

?8. Azaadi ke Diwane Museum inaugurated at Red Fort

‘Azaadi Ke Diwane’ museum is dedicated to the unsung heroes of the country’s freedom struggle. Built by the Archaeological Survey of India (ASI), the museum is the fifth in a series of recently inaugurated ones – the others being: ♦ the Subhash Chandra Bose and  Indian National Army (INA) museum, ♦ the Yaad-e-Jallian museum, ♦ the Museum on 1857 (on the country’s first war of Independence) ♦ the Drishyakala (a museum on Indian Art) — on the sacrifices of India’s freedom fighters.

?9. Coal minister Goyal dedicates 1,000 MW NTPL power project to nation

The 1,000-MW coal-fired thermal power project of NTPL (Neyveli Tamil Nadu Power Ltd) is a joint venture between NLCIL and TANGEDCO with an equity participation of 89:11. Piyush Goyal also dedicated 150-MW solar power projects of NLC India Ltd (NLCIL) in Tamil Nadu. Tamil Nadu is the sole beneficiary of the 150 MW renewable power plants of Virudhunagar and Ramanathapuram districts commissioned and dedicated to the nation.

?10. Sheikh Ahmad re-elected as President of Olympic Council of Asia

Sheikh Ahmad Al-Fahad Al-Sabah was officially re-elected for an eighth term as President of the Olympic Council of Asia (OCA). He won a new five-year term until 2024. Tsunekazu Takeda, President of the Japanese Olympic Committee, also retained his position as a vice-president. About Olympic Council of Asia (OCA): ♦ Governing body of sports in Asia ♦ Headquarters: Kuwait City, Kuwait ♦ Founded: 16 November 1982 ♦ Membership: 45 National Olympic Committees ♦ Motto: Ever Onward

 


Latest Current Affairs Videos

Latest Current Affairs Videos