Current Affairs 06 January 2020

268
0
Share:

 

🎯1. निवडणूक आयोगाची नवी यंत्रणा: “पॉलिटिकल पार्टीज रजिस्ट्रेशन ट्रॅकिंग मॅनेजमेंट सिस्टम (PPRTMS)”

 • अर्जदारांना अर्जांची स्थिती जाणून घेता यावी यासाठी भारतीय निवडणूक आयोगाने (ECI) “पॉलिटिकल पार्टीज रजिस्ट्रेशन ट्रॅकिंग मॅनेजमेंट सिस्टम (PPRTMS)” नावाची नवी यंत्रणा कार्यरत केली आहे.
 • 1 जानेवारी 2020 पासून याबाबतचे नवीन नियम लागू झाले. त्याच्या अंतर्गत, 1 जानेवारीपासून राजकीय निवडणूक पक्षाच्या नोंदणीसाठी अर्ज करणारे अर्जदार विनंतीची प्रगती मागू शकतात आणि SMS व ई-मेलद्वारे स्थिती प्राप्त करू शकण्यास सक्षम झाले आहेत.
 • नव्या नियमांनुसार,
 • नोंदणी करणाऱ्या संघटनेच्या स्थापनेच्या तारखेपासून 30 दिवसांच्या आत आयोगाकडे अर्ज सादर करावा लागणार.
 • https://pprtms.eci.gov.in या संकेतस्थळावर अर्जाची स्थिती जाणून घेता येणार आहे.
 • राज्यघटनेतले कलम 324 आणि ‘लोकप्रतिनिधी कायदा-1951’ याच्या कलम 29 (अ) अन्वये राजकीय पक्षांची नोंदणी प्रकिया नियंत्रित केली जाते.

ECI विषयी

 • भारतीय निवडणूक आयोग (ECI) ही एक स्वायत्त व अर्ध-न्यायिक संस्था आहे. आयोगाला घटनात्मक दर्जा प्रदान करण्यात आला आहे. आयोगाची स्थापना दिनांक 25 जानेवारी 1950 रोजी झाली.
 • घटनेच्या कलम 324 अन्वये आयोगावर राष्ट्रपती व उपराष्ट्रपती तसेच संसदेची लोकसभा आणि राज्यसभा तसेच राज्याच्या विधानसभा निवडणुका घेण्याची जबाबदारी असते.
 • आयोगामध्ये एक मुख्य निवडणूक आयुक्त आणि दोन निवडणूक आयुक्त असतात. निवडणूक आयुक्त हे भारतीय निवडणूक आयोगाचे सदस्य आहेत, ज्यांना राष्ट्रीय व राज्य पातळीवर निवडणूक घेण्याचे अधिकार आहेत.

🎯2. पंतप्रधान बंगळुरु येथील कृषी विज्ञान विद्यापीठात 107व्या भारतीय विज्ञान काँग्रेसचे उद्धघाटन

 • पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवार दिनांक 3 जानेवारी 2020 रोजी बंगळुरु इथल्या कृषी विज्ञान विद्यापीठात 107 व्या भारतीय विज्ञान काँग्रेसचे उद्धघाटन
 • यावेळी ते उद्धघाटनपर भाषण देतील, तसेच I-STEM पोर्टलचे उ उद्धघाटन करतील. कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस.येदियुरप्पा, केंद्रीय मंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत.
 • यंदाच्या भारतीय विज्ञान काँग्रेसची संकल्पना आहे, ‘विज्ञान आणि तंत्रज्ञान: ग्रामीण विकास’. नोबेल पारितोषिक विजेते, विविध संस्थांमधील वैज्ञानिक, विचारवंत, शिक्षणतज्ज्ञ, संशोधक, धोरणकर्ते, विद्यार्थी आणि प्रतिनिधी यांच्यासह 15 हजारहून अधिक लोकांचा सहभाग या कार्यक्रमात अपेक्षित आहे.

🎯3. स्वच्छ सर्वेक्षण 2019-20 च्या तिमाहीत मुंबई आठव्या क्रमांकावर

 • यंदाच्या 2019-20 वर्षातील स्वच्छ भारत’अभियानाअंतर्गत पहिल्या दोन तिमाहीमध्ये करण्यात आलेल्या स्वच्छताविषयक सर्वेमध्ये मुंबईचा घसरलेला क्रमांक सावरला आहे. नुकत्याच सरलेल्या वर्षांच्या पहिल्या तिमाहीमध्ये मुंबईला 13 वा, तर दुसऱ्या तिमाहीमध्ये आठव्या क्रमांकावर स्थान मिळालं आहे. तथापि, मुंबईतील शौचालयांची संख्या, राखण्यात येणारी स्वच्छता, मालमत्ता करामध्ये अंतर्भूत केलेलं कचराविषयक शुल्क, बंदीयोग्य प्लास्टिकवर करण्यात आलेली कारवाई याबाबत सादर केलेल्या माहितीच्या आधारे मुंबईला देशातील पहिल्या 20 शहरांच्या यादीत स्थान देण्यात आलं आहे.
 • पालिकेने सादर केलेल्या माहितीच्या आधारे 2019-20 या वर्षांच्या पहिल्या तीन महिन्यांमध्ये देशभरातील शहरांमध्ये मुंबईला 13 वा क्रमांक देण्यात आला होता. त्यानंतर दुसऱ्या तिमाहीमध्ये मुंबईने आठवा क्रमांक पटकावला.
 • स्वच्छ सर्वेक्षणात 2016-17 मध्ये मुंबईला 29 वा क्रमांक मिळाला होता. त्यानंतर 2017-18 मध्ये मुंबईने 18 वा क्रमांक पटकावला होता. मात्र 2018-19 मध्ये सर्वेक्षणाच्या निकषांची पूर्तता करण्यात पालिका अपयशी ठरली आणि त्यामुळे मुंबईचा क्रमांक 49 वर घसरला होता. मात्र, या वर्षांच्या पहिल्या तिमाहीत मुंबईला 13 वे आणि दुसऱ्या तिमाहीत आठवे स्थान देण्यात आले आहे.

🎯4. ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धात ज्योतिबा, रामचंद्र, सागर यांना सुवर्ण :

 • ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धेत सोलापूरच्या ज्योतिबा अटकळे (57 किलो) आणि सोलापूरच्या रामचंद्र कांबळे (79 किलो) यांनी गादी विभागात तर माती विभागात पुण्याच्या सागर मारकडने (61 किलो) सुवर्णपदक पटकावले.
 • श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे-बालेवाडी येथे सुरू असलेल्या या स्पध्रेत गादी विभागातील 79 किलो गटाच्या अंतिम फेरीत रामचंद्रने उस्मानाबादच्या रवींद्र खैरेवर 14-3 अशी मात केली.
 • तर अहमदनगरचे केवल भिंगारे व साताऱ्याच्या श्रीधर मुळीक यांना कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. 57 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत सोलापूरच्या ज्योतिबाने कोल्हापूरच्या रमेश इंगवलेला चीतपट केले.

🎯5. ज्येष्ठ कलाकारांना ‘वासुदेव गायतोंडे कला जीवनगौरव पुरस्कार’

 • राज्याला कलेचा समृद्ध वारसा लाभला आहे. दृश्यकलेचे शिक्षण देणारी देशातील पहिली संस्था सर ज.जी. कला महाविद्यालयाच्या रूपात मुंबईत स्थापन झाली. राज्यातील कलाकारांनी कला क्षेत्रात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय लौकिक प्राप्त केला आहे. त्यानुसार, दृश्यकलेच्या क्षेत्रात योगदान देणाऱ्या ज्येष्ठ कलाकारांना ‘वासुदेव गायतोंडे कला जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.
 • राज्यात दृश्यकला क्षेत्रात सातत्यपूर्ण आणि निष्ठेने कार्य करणाऱ्या ज्येष्ठ कलाकारांना ‘वासुदेव गायतोंडे कला जीवनगौरव पुरस्कार’ दरवर्षी प्रदान करण्यात येणार आहे. या पुरस्काराचे स्वरूप पाच लाख रुपये, स्मृतिचिन्ह आणि सन्मानपत्र असे असणार आहे.
 • तर हा पुरस्कार दृश्यकलेच्या एका ज्येष्ठ व नामवंत कलाकार यांना दरवर्षी, क्रमनिहाय प्रदान करण्यात येईल. त्यात अनुक्रमे रेखा व रंगकला, शिल्पकला, उपयोजित कला आणि कला व शिल्प (अंतर्गत गृहसजावट, वस्त्रकाम, मातकाम, धातूकाम) या विभागांचा समावेश आहे.
 • तसेच या क्रमनिहाय येणाऱ्या संबंधित कला विभागात पुरस्कारासाठी कलाकार यांची निवड न झाल्यास त्यानंतरच्या क्रमावरील विभागातील कलाकारांचा पुरस्कारासाठी विचार करण्यात येईल, असे निर्देश शासन निर्णयात नमूद आहेत.

🎯6. इरफानची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती :

 • भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणने सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.
 • Star Sports वाहिनीच्या एका कार्यक्रमात इरफानने आपल्या 15 वर्षांच्या कारकिर्दीची अखेर करत असल्याचं जाहीर केलं.
 • तर इरफानने आतापर्यंत 120 वन-डे, 29 कसोटी आणि 24 टी-20 सामन्यात भारतीय संघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे.
 • तसेच 2006 साली पाकिस्तान दौऱ्यात इरफान पठाणने कसोटी सामन्यात हॅटट्रीक नोंदवत सर्वांना आपली दखल घ्यायला भाग पाडली. इरफानने सलमान बट, युनूस खान आणि मोहम्मद युसूफ या फलंदाजांना माघारी धाडलं होतं.

🎯7. बेन स्टोक्सची क्षेत्ररक्षणात विक्रम

 • एका डावात सर्वाधिक वेळा पाच झेल टिपणारा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स हा इंग्लंडचा पहिला खेळाडू ठरला आहे.
 • दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान जेम्स अँडरसनच्या गोलंदाजीवर त्याने ऑनरिख नॉर्कीएचा झेल टिपला. दुसऱ्या स्लिपमध्ये स्टोक्सने हे पाचही झेल टिपले.
 • इग्लंडच्या १०१९ सामन्यांमध्ये एका डावात चार झेल टिपण्याची किमया २३ वेळा घडली आहे.
 • जागतिक कसोटी सामन्यांमध्ये पाच झेल पकडणारा स्टोक्स हा ११वा खेळाडू आहे.
 • अलीकडेच ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथने एका डावात पाच झेल टिपले होते.

 


Latest Current Affairs Videos

Latest Current Affairs Videos