Current Affairs 05 January 2020

267
0
Share:

 

🎯1. इराण-अमेरिका युद्ध झाल्यास भारतालाही बसणार जबर फटका..

 • अमेरिका आणि इराणमध्ये युद्ध झाल्यास भारतालाही त्याचा फटका बसू शकतो. इराणचे टॉप कमांडर कासिम सुलेमानी यांच्या मृत्यूवरुन दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. शुक्रवारी बगदाद विमानतळाजवळ अमेरिकेने केलेल्या ड्रोन हल्ल्यात कासिम सुलेमानी यांचा मृत्यू झाला.
 • भारतावर काय परिणाम होणार?
 • अमेरिका आणि इराणमध्ये युद्ध झाल्यास फक्त ऊर्जा पुरवठयावरच परिणाम होणार नाही तर, आखातामध्ये राहणाऱ्या भारतीयांनाही त्याचा फटका बसेल.
 • सलेमानी यांच्या मृत्यूनंतर तेलाच्या किंमती आधीच चार टक्क्यांनी वाढल्या आहेत. युद्ध भडकल्यास पश्चिम आशियामध्ये वास्तव्याला असलेल्या ८० लाख भारतीयांच्या भवितव्यावर त्याचा परिणाम होईल.
 • एकटया सौदी अरेबियामध्ये तीस लाख भारतीय राहतात. यापूर्वी या भागात झालेल्या युद्धाचा तिथे राहणाऱ्या भारतीयांसह अनेक परदेशी नागरिकांवर परिणाम झाला होता. भारताची मुख्य चिंता काय? भारतासाठी चिंतेची बाब म्हणजे, पश्चिम आशियात राहणारे भारतीय तिथून मोठया प्रमाणावर पैसा पाठवतात.
 • ही रक्कम अब्जावधीच्या घरात आहे. भारतीय अर्थव्यवस्था सध्या अडचणींचा सामना करत असताना दुसऱ्या देशाच्या युद्धामुळे बसणारा फटकाही परवडणारा नाही.
 • चाबहार बंदरामुळे भारताला इराणमधून अफगाणिस्तानशी संपर्क साधता येणार आहे. तसेच येथून पूर्वेला केवळ ८० किलोमीटर अंतरावर पाकिस्तानच्या किनाऱ्यावर चीन विकसित करत असलेल्या ग्वादर या बंदराला शह देता येणे शक्य होणार आहे.

🎯2. जी. बबीता रायुडू: SEBI याचे नवे कार्यकारी संचालक..

 • बाजारपेठेवर नियंत्रण ठेवणारी भारतीय रोखे व विनिमय मंडळ (SEBI) यांनी जी. बबिता रायुडू ह्यांची कार्यकारी संचालकपदी निवड केली आहे. 1 जानेवारी 2020 रोजी रायुडू ह्यांनी पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. रायुडू व्यतिरिक्त SEBIमध्ये आणखी आठ कार्यकारी संचालक कार्यरत आहेत.
 • रायुडू नव्या पदभारासह कायदेशीर व्यवहार विभाग, अंमलबजावणी विभाग आणि विशेष अंमलबजावणी कक्ष सांभाळणार आहेत.

SEBI विषयी:-

 • भारतीय रोखे व विनिमय मंडळ (SEBI) हे भारतामध्ये समभाग बाजारपेठेमधील सुरक्षा बंध/कर्जरोखे/रोखे/किंवा अन्य उत्पादने यांच्या संदर्भात होणार्‍या व्यवहारांवर नियंत्रण ठेवणारे विभाग आहे.
 • 1988 साली या संस्थेची स्थापना झाली आणि ‘SEBI अधिनियम-1992’ अन्वये दि. 30 जानेवारी 1992 रोजी त्याला वैधानिक दर्जा प्राप्त झाला. मुंबईत त्या मंडळाचे मुख्यालय आहे.

🎯3. आता देशातील 12 राज्यांत ‘एक देश, एक रेशन कार्ड’ची योजना सुरू झाली

 • 1 जानेवारी 2020 पासून देशातील एकूण 12 राज्यांत ‘एक देश, एक रेशन कार्ड’ ची योजना सुरु करण्यात आली आहे
 • ‘एक देश, एक रेशन कार्ड’ म्हणजे काय ?
 • ‘एक देश, एक रेशन कार्ड’ अंतर्गत देशातील कोणत्याही भागातून रेशन दुकानातून खाद्य सामान घेता येऊ शकणार
 • म्हणजे कोणत्याही एका केंद्राकडून रेशन घेण्याची सक्ती आता राहणार नाही
 • याचा फायदा अशा लोकांना अधिक होणार जे एका शहरातून दुसऱ्या शहरात स्थलांतरित होत असतात
 • ही योजना पुढील 12 राज्यांत लागू झाली
 • आंध्र प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, हरयाणा, राजस्थान, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश, गोवा, झारखंड आणि त्रिपुरा
 • या राज्यांमध्ये ही योजना सुरू करण्यात आली आहे.
 • तसेच, जून 2020 पर्यंत देशातील सर्व राज्यांत ही योजना अंमलात आणली जाणार आहे.

🎯4. CAA अंमलबजावणी करणारे उ. प्र. पहिले राज्य

 • सुधारित नागरिकत्व कायद्याची अंमलबजावणी करणारे उत्तर प्रदेश हे देशातील पहिले राज्य ठरणार आहे. नागरिकत्व कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रक्रिया सुरू करण्यास सांगितले आहे. सूत्रांनी याबाबतची माहिती दिली.

🎯5. 14 वैज्ञानिकांना भारत सरकारची ‘स्वर्ण जयंती पाठ्यवृत्ती’ मिळाली

 • नाविन्यपूर्ण संशोधनाच्या कल्पना असलेल्या प्रकल्पांमध्ये सहभाग आणि संबंधित शाखांमधल्या संशोधन आणि विकास कार्यावर प्रभाव पाडण्याची क्षमता असलेल्या 14 वैज्ञानिकांना 2018-19 या वर्षासाठी भारत सरकारची ‘स्वर्ण जयंती पाठ्यवृत्ती’ (फेलोशिप) देण्यात आली आहे.
 • पाठ्यवृत्ती आणि संशोधनासाठी निवडण्यात आलेल्या वैज्ञानिकांना विज्ञान व तंत्रज्ञान विभागाकडून मदत दिली जाते.
 • संशोधनासाठी दरमहा 25 हजार रुपये पाठ्यवृत्तीचा यात समावेश आहे.
 • तसेच वैज्ञानिकांना त्यांच्या वेतनाव्यतिरिक्त 5 वर्षांसाठी वार्षिक 5 लक्ष रुपये एवढे संशोधन अनुदान देखील दिले जाते.

🎯7. वेटलिफ्टर मीराबाई चानूला सुवर्ण

 • जागतिक स्पर्धेत आणि राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणार्या रेल्वेच्या मीराबाई चानुने येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत महिलांच्या 49 किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकले.
 • तिने स्नॅच विभागात 83 किलो आणि क्लिन-जर्क विभागात 111 किलो असे एकूण 194 किलो वजन उंचलले. हरियाणाच्या दिपीकाला रौप्य आणि मणीपूरच्या एस. देवीला एस. कास्यपदक मिळाले.
 • 45 किलो वजनी गटात रिया सेनने सुवर्णपदक जिंकले.
 • महराष्ट्राच्या दिपालीला रौप्य आणि कर्नाटकांच्या क्रुक्षिमीता कास्यपदक मिळाले. पुुरुष 55 किलो वजनी गटात मणीपूरच्या आर. नेहालने प्रथम क्रमांक मिळवला.

Latest Current Affairs Videos

Latest Current Affairs Videos