Current Affairs 04 January 2020

282
0
Share:

 

🎯 1. CBI अधिकारी बी. पी. राजू: ‘इंडिया सायबर कॉप ऑफ ईयर 2019’ पुरस्काराचे विजेता

 • केंद्रीय अन्वेषण विभागाचे अधिकारी बी. पी. राजू ह्यांना ‘इंडिया सायबर कॉप ऑफ द ईयर 2019’ हा सन्मान देऊन गौरविण्यात आले आहे.
 • 17 डिसेंबर 2019 रोजी हरयाणाच्या गुरुग्राम या शहरात झालेल्या वार्षिक माहिती सुरक्षा शिखर परिषदेदरम्यान या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.
 • राजस्थानातल्या एका अभियांत्रिकी महाविद्यालयातर्फे घेण्यात आलेल्या ऑनलाइन प्रवेश परीक्षेत झालेल्या फसवणूकीच्या प्रकरणाचा उलगडा करण्यात त्यांच्या भूमिकेसाठी हा सन्मान बी. पी. राजू ह्यांना NASSCOM-DSCI यांच्यावतीने देण्यात आला आहे.
 • त्या प्रकरणात बी. पी. राजू यांच्या नेतृत्वात असलेल्या चौकशी पथकाने नऊ आरोपींना अटक केली. छडा लावताना त्यांनी सायबर तंत्रज्ञानाचा वापर करून डिजिटल उपकरणांमधून महत्त्वाचे पुरावे देखील गोळा केले. मुख्य म्हणजे हा तपास अल्पावधीतच पूर्ण करण्यात आला होता.

🎯 2. वर्षाच्या पहिल्याच दिवशी भारतात ६७ हजार बालकांचा जन्म

 • नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी जगभरात तब्बल ३ लाख ९२ हजार ७८ बालकांचा जन्म झाल्याची माहिती समोर आली आहे. बालकांसाठी कार्यरत असलेल्या संयुक्त राष्ट्रांच्या युनिसेफ या संस्थेनं याबाबत माहिती दिली आहे. इतर देशांच्या तुलनेत भारतात सर्वाधिक म्हणजेच ६७ हजार ३८५ बालकांचा जन्म झाला. यानंतर दुसऱ्या क्रमांकावर चीन असून चीनमध्ये ४६ हजार २९९ बालकांचा जन्म झाला.
 • युनिसेफनं सादर केलेल्या आकड्यांनुसार तिसऱ्या क्रमांकावर नायजेरिया असून त्या ठिकाणी १ जानेवारी रोजी २६ हजार ३९ बालकांचा जन्म झाला. त्यानंतर पाकिस्तान (१६,७८७), इंडोनेशिया (१३,०२०), अमेरिका (१०,४५२), कांगो (१०,२४७), इथिओपिया (८,४९३) आणि पाकिस्तान (६,७८७) या देशांचा क्रमांक येतो.
 • दरम्यान, जन्माचा पहिला दिवस आई आणि बाळासाठई खडतर असतो. तर ४० टक्के बालकांचा मृत्यू हा त्यांच्या जन्माच्या दिवशीच होतो, असं युनिसेफकडून सांगण्यात आलं. जगभरात जन्माला येणाऱ्या बालकांबाबत युनिसेफनं काही तथ्य मांडली आहेत. २०१८ मध्ये जन्मलेल्या २५ लाख बालकांनी जन्माच्या पहिल्याच महिन्यात आपले प्राण गमावले होते.

🎯 3. अंगठीच्या आकाराचा सापडला हायड्रोजनचा वायुमेघ.

 • राष्ट्रीय रेडिओ खगोलभौतिकी केंद्रातील (एनसीआरए) खगोलशास्त्रज्ञांनी नव्या दीर्घिकेचा (गॅलरी) शोध लावला असून, या दीर्घिकेभोवती हायड्रोजन वायूचा अंगठीच्या आकाराचा गोलाकार वायुमेघ आहे.
 • जायंट मीटरवेव रेडिओ टेलिस्कोप वापरून शास्त्रज्ञांनी हा वायुमेघ शोधला असून, त्याच्या आतील दीर्घिका पृथ्वीपासून 260 दशलक्ष प्रकाशवर्षे दूर आहे.
 • तर या वायुमेघाचा व्यास आपल्या आकाशगंगेच्या चौपट असून, अशा प्रकारच्या वायुमेघाचा शोध 1987 मध्ये लागला होता. मात्र, तो पृथ्वीपासून सुमारे 130 दशलक्ष प्रकाशवर्षे दूर होता. परंतु एनसीआरएमधील शास्त्रज्ञ ओम्कार बाईत आणि प्रा. योगेश वाडदेकर यांनी आता नव्या दीर्घिकेचा शोध लावला आहे.
 • हे संशोधन मंथली नोटीस रॉयल अ‍ॅस्ट्रोनॉमिकल सोसायटी जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहे. शास्त्रज्ञांकडून अशा नऊ दीर्घिकांचा अभ्यास केला जाणार आहे.
 • तसेच योगेश वाडदेकर म्हणाले, अशा प्रकारच्या वायुमेघाची निर्मिती नेमकी कशी झाली, हे कोडे आहे. सूर्यमालेशी त्याची तुलना करता येत नाही, कारण वायुमेघाचे वस्तुमान सूर्याच्या दोन अब्जपट आहे.

🎯 4. UNICEFचा “जागतिक लोकसंख्या अहवाल”

 • संयुक्त राष्ट्रसंघ बाल कोष (UNICEF) यांचा “जागतिक लोकसंख्या अहवाल” प्रसिद्ध करण्यात आला आहे.
 • अहवालात असे म्हटले आहे की 2027 सालापर्यंत जगातला सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश म्हणून भारत चीनला मागे टाकणार.
 • UNICEFने यावर ‘वर्ल्ड डेटा लॅब’ बरोबर काम केले. 1 जानेवारी 2020 रोजी जन्मलेल्या बाळांच्या संख्येचा अंदाज UNच्या ‘जागतिक लोकसंख्या अंदाज (2019)’ याच्या अद्ययावत पुनरावृत्तीवर आला आहे.

इतर ठळक बाबी

 • नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी म्हणजे 1 जानेवारी 2020 रोजी अंदाजे 67,385 नवजात बाळ भारतात जन्मले जो की एक विक्रम झाला आहे. त्या दिवशी जगात जन्मलेल्या अंदाजे 392,078 बाळांपैकी 17% भारतात जन्माला आली. यांपैकी एक चतुर्थांश नवजात बाळ ही दक्षिण आशियामध्ये जन्माला आली आहेत.
 • 1 जानेवारी 2020 या दिवशी चीनमध्ये 46 हजार 229 बाळांनी जन्म घेतला. तर नायजेरियात 26 हजार 039, पाकिस्तानात 13 हजार 020, इंडोनेशियात 13 हजार 020, अमेरिकेत 10 हजार 452 बाळांचा जन्म झाला.
 • 2020 साली जगातल्या पहिल्या बाळाचा जन्म फिजी देशात झाला.
 • 1 जानेवारी 2020 रोजी जागतिक लोकसंख्या अंदाजे 7,621,018,958 वर पोहचली. याचा अर्थ गेल्या वर्षीच्या काळापासून ही अंदाजे वाढ 77,684,873 ने झाली आहे. वाढीचा दर03% असण्याचा अंदाज आहे.
 • जानेवारी 2020 मध्ये जगभरात प्रत्येक सेकंदाला3 जन्म आणि 1.9 मृत्यू अपेक्षित आहेत.
 • आतापर्यंतच्या दशकात जागतिक लोकसंख्या6 अब्जपर्यंत वेगाने वाढेल अशी संयुक्त राष्ट्रसंघाचा अंदाज आहे. अंदाज असा आहे की 2050 साली हा आकडा 9.8 अब्ज आणि 2100 साली 11.2 अब्जपर्यंत पोहोचेल.
 • जवळजवळ निश्चित आहे की जागतिक लोकसंख्या काही वर्षातच 8 अब्जांवर जाणार, जी 1975 सालापासून दुप्पट असणार.
 • गेल्या तीन दशकांत जगात नवजात बाळाच्या जगण्याच्या प्रमाणात उल्लेखनीय प्रगती झाली आहे आणि जगभरात वयाच्या पाच वर्षापूर्वी मृत्यूमुखी पडणार्‍यांची संख्या निम्म्याहून कमी झाली आहे.
 • बालमृत्यू ही भारतातली सार्वजनिक आरोग्यासाठीची एक मोठी चिंता आहे आणि जन्माच्या वेळी मृत्यूमुखी पडणाऱ्या नवजात बाळांची संख्या जवळजवळ76 दशलक्ष होती आणि सुमारे 3.5 दशलक्ष बाळ अकाली जन्मले.

🎯5. हॉकीपटू सुनीता लाक्राची निवृत्ती

 • भारताच्या महिला हॉकी संघाची बचावपटू सुनीता लाक्राने गुडघ्याला झालेल्या दुखापतीमुळे आंतरराष्ट्रीय हॉकीमधून निवृत्ती पत्करली आहे.
 • भारताच्या महिला हॉकी संघाने 2018च्या आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये रौप्यपदक जिंकले होते.
 • तसेच त्या संघात सुनीताचा समावेश होता. 28 वर्षीय सुनीताच्या गुडघ्यावर आणखी एक शस्त्रक्रिया आवश्यक आहे.
 • सुनीताने 139 सामन्यांमध्ये देशाचे प्रतिनिधित्व केले आहे.

Latest Current Affairs Videos

Latest Current Affairs Videos