Current Affairs 04 December 2018

468
0
Share:

 

?1. सरकारी महाभरती फेब्रुवारीत

 • मराठा समाजाच्या आरक्षणामुळे स्थगित करण्यात आलेली शासकीय सेवेतील ७२ हजार पदांची मेगाभरती प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात आली आहे.
 • वेगवेगळ्या विभागांशी समन्वय साधून या प्रक्रियेला चालना देण्यासाठी मंत्रालयात खास ‘वॉर रूम’ स्थापन करण्यात आली आहे.
 • कोणत्याही परिस्थितीत ही भरती प्रक्रिया २८ फेब्रुवारीच्या आत पूर्ण करून नियुक्तीपत्रे देण्यात येतील, अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाचे अप्पर मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी ‘लोकसत्ता’ला दिली.
 • त्यानुसार सहा महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शासकीय सेवेतील ७२ हजार रिक्त पदे भरण्याची घोषणा केली होती.
 • त्यातील पहिल्या टप्प्यात ३६ हजार पदे भरण्याची प्रक्रियाही सुरू करण्यात आली होती.
 • परंतु त्याच वेळी मराठा आरक्षणाचा विषय प्रलंबित असल्याने, त्याचा निर्णय होत नाही, तोपर्यंत ही भरती थांबवावी, अशी मागणी मराठा समाजाच्या संघटनांनी केली होती. त्याचीही दखल घेऊन मुख्यमंत्र्यांनी या भरतीला स्थगिती दिली होती.
 • शासकीय आणि निमशासकीय सेवेत मराठा समाजातील सामाजिक व शैक्षणिकदृष्टय़ा मागास वर्गातील घटकांना १६ टक्के आरक्षण देण्याचा कायदा करण्यात आला.
 • त्याच वेळी मुख्यमंत्र्यांनी ७२ हजार पदांची भरती करण्याचे विधिमंडळात जाहीर केले.
 • कृषी, महसूल, ग्रामविकास, आरोग्य, वने, गृह, सामाजिक न्याय, इत्यादी विभागांतील रिक्तपदे भरली जाणार आहेत.
 • या ७२ हजार पदांपैकी काही पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरली जाणार आहेत.
 • परंतु ही संख्या तशी कमी आहे. जिल्हा स्तरावरील पदांचे प्रमाण जास्त आहे. जिल्हा निवड समित्यांमार्फत ही पदे भरली जातील.
 • साधारणत: एका संवर्गासाठी एकच दिवस परीक्षा घेण्याचा विचार आहे. जिल्हा स्तरावर त्याचे वेळापत्रक तयार करण्यात येत आहे.
 • सर्व विभागांशी समन्वय साधून भरती प्रक्रियेला गती देण्यासाठी मंत्रालयात खास वॉर रूम स्थापन करण्यात आल्याची माहिती कुंटे यांनी दिली.
 • साधारणत: एप्रिल-मे मध्ये लोकसभेच्या निवडणुका होतील. त्याची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी ही मेगाभरती प्रक्रिया पूर्ण करायची आहे.
 • परीक्षा, मुलाखती सर्व प्रक्रिया पार पडून निवड होणाऱ्या उमेदवारांना २८ फेब्रुवारीच्या आत नियुक्तीपत्रे हातात मिळतील आणि ते निवड झालेल्या जागी रुजू होतील, त्यादृष्टीने वेळापत्रक आखले जात आहे, असे त्यांनी सांगितले.

?2. आयपीएस अधिकाऱ्यांच्या प्रॉपर्टीची माहिती वेबसाइटवर

 • अखिल भारतीय पोलीस सेवेतील अधिकाºयांची (आयपीएस) आपल्या स्थावर मालमत्तेची माहिती आता संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे.
 • दरवर्षी त्यांना मालमत्तेचे विवरणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. सरत्या वर्षातील मालमत्तेची माहिती येत्या ३१ जानेवारीपर्यंत केंद्रीय गृह विभागाच्या संकेतस्थळावर आॅनलाइन अपलोड करायची आहे.
 • राज्यातील सर्व पोलीस महासंचालक व केंद्रीय सुरक्षा एजन्सीच्या प्रमुखांना त्याबाबत नुकतेच कळविण्यात आले आहे. पोेलीस अधिकाºयांच्या मिळकतीबद्दल अनेकदा आक्षेप नोंदविला जातो.
 • अधिकृत मिळकतीपेक्षा त्यांच्याकडे कित्येक पट अधिक संपत्ती असल्याचा आरोप केला जातो. त्यामुळे केंद्र सरकारने सर्व आयपीएस अधिकाºयांच्या अचल मालमत्ता गृह खात्याच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात याव्यात, असा निर्णय घेण्यात आला आहे.
 • त्यानुसार प्रत्येक आयपीएस अधिकाºयाने ३१ डिसेंबर २०१८ अखेरपर्यंतची स्थावर मालमत्तेबाबतची माहिती नव्या वर्षात ३१ जानेवारीपर्यंत खात्याच्या संकेतस्थळावर अपलोड करायची आहे.
 • त्याबाबत पोलीस महासंचालकांनी संबंधित अधिकाºयांना सूचना करायच्या असून मालमत्तेची माहिती विहित नमुन्यात भरून द्यायची आहे.

?3. जागतिक संत्रा महोत्सवाचे जानेवारीत आयोजन

 • नागपूरच्या संत्र्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यासपीठ मिळवून देणाऱ्या जागतिक संत्रा महोत्सवाचे जानेवारी २०१९ मध्ये आयोजन करण्यात येणार आहे.
 • लोकमत समूहाच्या पुढाकाराने मागील वर्षीपासून सुरू केलेल्या या वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हलची जागतिक स्तरावर दखल घेण्यात आली आहे.
 • नागपूरच्या संत्र्याला जागतिक व्यासपीठ मिळवून देताना संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना नवीन विकसित तंत्रज्ञानाची माहिती व्हावी, संत्रा या फळाला बाजारपेठेसोबत प्रक्रिया उद्योगाला चालना देण्यासाठी जागतिक संत्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते.
 • महोत्सवाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील तंत्रज्ञानाची माहिती उपलब्ध होणार असल्याची माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी दिली.
 • राज्यात विभागनिहाय प्रमुख सहा महोत्सव आयोजित करण्यात येणार असून या अंतर्गत नागपूर येथे जागतिक संत्रा महोत्सवाचे आयोजन येत्या १८ ते २१ जानेवारीदरम्यान सुरेश भट सभागृहात करण्यात येणार आहे.
 • या महोत्सवानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन होत असल्यामुळे महोत्सवाचा लाभ संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना होणार आहे. या महोत्सवात विविध देशांचे प्रतिनिधी उपस्थित राहतील.

?4. भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज गौतम गंभीर याने सर्व फॉरमॅट्समधून निवृत्ती जाहीर केली आहे

 • भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज गौतम गंभीर याने सर्व फॉरमॅट्समधून निवृत्ती जाहीर केली आहे. यासोबतच गौतम गंभीरचं क्रिकेट करिअर संपलं आहे.
 • यापुढे खेळत राहण्याची उमेद संपल्यानेच तसंच आता थांबण्याची वेळ आली असल्याने आपण क्रिकेटला रामराम ठोकत असल्याचं गौतम गंभीरने सांगितलं आहे.
 • गौतम गंभीरने आपला निर्णय जाहीर करताच त्याच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर आठवणी शेअर करत त्याचे आभार मानले आहेत. #ThankYouGambhir असा हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंडिंगमध्ये आहे.
 • 2016 मध्ये राजकोटमधील कसोटी सामन्यात गौतम गंभीर भारतीय संघातून अखेरचा खेळला होता.
 • गौतम गंभीरने आपल्या करिअरमध्ये 58 कसोटी सामने खेळले. कसोटी कारकिर्दीत 95 च्या सरासरीने गंभीरने एकूण 4154 धावा केल्या.
 • यामध्ये 9 शतकं आणि 22 अर्धशतकांचा समावेश आहे. गंभीर एकूण 147 एकदिवसीय सामने खेळला. यामध्ये त्याने 68 च्या सरासरीने 5238 धावा केल्या.
 • गंभीरचा स्ट्राइक रेट 25 होता.
 • गंभीर एकूण 37 टी-20 सामने खेळला. टी-20 सामन्यांमध्ये गंभीरने 41 च्या सरासरीने 932 धावा केल्या. यामध्ये सात अर्धशतकांचा समावेश आहे.

?5. देशातील सर्वात अवजड उपग्रह GSAT-11 चं प्रक्षेपण, इंटरनेट स्पीडमध्ये क्रांती

 • 5,854 वजन असणाऱ्या या उपग्रहाचं बुधवारी सकाळी युरोपिअन अवकाश केंद्र फ्रेंच गुएना येथून प्रक्षेपण करण्यात आलं.
 • हा एक कम्युनिकेशन उपग्रह आहे, जो देशातील इंटरनेटचा वेग वाढवण्यास मदत करेल.
 • हा उपग्रह इतका मोठा आहे की, प्रत्येक सोलार पॅनल चार मीटरपेक्षा मोठा आहे, जो एका मोठ्या रुमइतका असल्याचं सांगितलं जात आहे.
 • याआधी वर्षाच्या सुरुवातील या उपग्रहाचं प्रक्षेपण करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
 • मात्र तांत्रिक समस्या निर्माण झाल्याने भारतीय अवकाश केंद्राने एप्रिल याची पुन्हा तपासणी करण्यासाठी फ्रेंच गुएना येथून परत मागवलं होतं.
 • Gsat-6A च्या अपयशानंतर हा निर्णय घेण्यात आला होता. एप्रिल महिन्याच्या जवळपास Gsat-6A अनियंत्रित झाला होता आणि 29 मार्चला प्रक्षेपण होताच त्याचा संपर्क तुटला होता.
 • यानंतर GSAT-11 चं प्रक्षेपण कऱण्याचा निर्णय घेण्यात आला होता. अनेक निरीक्षण आणि तपासण्या केल्यानंतरच GSAT-11 चं प्रक्षेपण करण्याला हिरवा कंदील दाखवण्यात आला.
 • हा उपग्रह इंटरनेटच्या क्षेत्रात गेम चेंजर ठरेल असा दावा केला जात आहे. उपग्रहाचं काम सुरु झाल्यानंतर देशातील इंटरनेट स्पीडमध्ये क्रांती येईल.
 • GSAT-11 च्या सहाय्याने प्रत्येत सेकंदाला 100 गीगाबाइट हून जास्त ब्रॉडबॅण्ड कनेक्टिव्हिटी मिळेल.

?6 .चार गुरुत्वीय लहरींची लायगो, व्हर्गो प्रकल्पात नोंद

 • अमेरिका आणि युरोपमधील वैज्ञानिक यंत्रणांना यश
 • लायगो या आंतरराष्ट्रीय संशोधन प्रकल्पांतर्गत आणखी चार गुरुत्वीय लहरींचे अस्तित्व शोधण्यात आले असून, कृष्णविवरांच्या एकमेकांवरील आघातानंतरच्या विलीनीकरणातून गुरुत्वीय लहरींची निर्मिती होत असते.
 • अमेरिकेतील लायगो व युरोपच्या व्हर्गो या गुरुत्वीय लहरी शोधक यंत्रांनी १० कृष्णविवरांच्या व एका न्यूट्रॉन ताऱ्यांच्या विलीनीकरणातून निर्माण झालेल्या गुरुत्वीय लहरींची नोंद केली आहे.
 • यात गुरुत्वीय लहरी घटनांची नोंद GW170729, GW170809, GW170818, and GW170823 या नावांनी झाली असून, त्यातील जीडब्ल्यू १७०७२९ या गुरुत्वीय लहरी २९ जुलै २०१७ रोजी नोंदल्या गेल्या. त्या जास्त वस्तुमान असलेल्या दूरस्थ स्रोतापासून आलेल्या होत्या.
 • त्यातील विलीनीकरणाची घटना ही पाच अब्ज वर्षांपूर्वीची असून, त्यात निर्माण झालेली ऊर्जा ही पाच सौर वस्तुमानाइतकी आहे. तिचे रूपांतर शेवटी गुरुत्वीय लहरीत झाले.
 • १२ सप्टेंबर २०१५ ते १९ जानेवारी २०१६ या काळात पहिल्यांदा गुरुत्वीय लहरींच्या निरीक्षणाला लायगो प्रकल्पात सुरुवात करण्यात आली. त्यानंतर प्रगत लायगो प्रकल्पात तीन द्वैती कृष्णविवरांच्या विलीनीकरणातून आलेल्या गुरुत्वीय लहरी नोंदल्या गेल्या.
 • ३० नोव्हेंबर २०१६ ते २५ ऑगस्ट २०१७ या काळात एका द्वैती न्यूट्रॉन ताऱ्याच्या विलीनीकरणातून व सात कृष्णविवरांच्या विलीनीकरण घटनातील गुरुत्वीय लहरी नोंदल्या गेल्या.
 • जीडब्ल्यू १७०८१४ ही नोंद पहिल्या द्वैती कृष्णविवर मिलनातील असून ती तीन यंत्रांनी घेतली होती. त्यानंतर जीडब्ल्यू १७०८१७ या लहरींची नोंद जीडब्ल्यू १७०८१४ या लहरींच्या नोंदीनंतर झाली होती.
 • यातील बहुतेक आघाती मिलन हे गुरुत्वीय लहरी व प्रकाश निर्माण करणारी होती.
 • जीडब्ल्यू १७०८१८ या गुरुत्वीय लहरी लिगो व व्हिर्गो वेधशाळांनी अधिक अचूकतेने नोंदल्या होत्या. त्यात द्वैती कृष्णविवरे ही अडीच अब्ज प्रकाशवर्षे दूर एकमेकांवर आदळली.
 • त्यातून या गुरुत्वीय लहरी निर्माण झाल्या. त्यानंतर जीडब्ल्यू १७०८१७ या न्यूट्रॉन ताऱ्यांच्या विलीनीकरणातून निर्माण झालेल्या गुरुत्वीय लहरीही जास्त अचूकतेने नोंदल्या गेल्या होत्या.

?7. हिंसाचारानंतर फ्रान्समध्ये इंधन दरवाढ अखेर मागे

 • लोकांनी रस्त्यांवर येऊन तीन आठवडे वाढता हिंसक संताप व्यक्त केल्यामुळे अखेर फ्रान्स सरकारने पर्यावरण-इंधन कर लागू करण्याचा निर्णय निलंबित केला आहे.
 • लोकांच्या दडपणाला नमून पंतप्रधान एदुआर्द फिलिप्पे यांनी गॅस आणि वीजदरवाढही ताबडतोब गोठवण्याचा निर्णय जाहीर करताना आणखी हिंसाचार सहन केला जाणार नाही, असा इशारा दिला.
 • पॅरिसमध्ये दंगली, लुटालूट आणि नासधूस झाल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी मंगळवारी सकाळी आपल्या मंत्रिमंडळ सहकाऱ्यांची भेट घेऊन पर्यावरण-इंधन कर लागू न करण्याची घोषणा केली.
 • स्वच्छ इंधनाच्या वापराच्या दिशेने पाऊल म्हणून पुढील महिन्यात पेट्रोल व डिझेलवर कर लावला जाणार होता.

?8. आखाती देशातून तेलाची निर्यात रोखण्याचा इराणचा इशारा

 • अमेरिकेच्या निर्बंधांमुळे जर इराणला तेलाची निर्यात करता येणार नसेल, तर आखाती देशांमधून आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाची विक्रीच रोखण्याचा गर्भित धमकीवजा इशारा इराणचे अध्यक्ष हसन रुहानी यांनी दिला आहे.
 • इराणची तेल निर्यात रोखणे अमेरिकेला शक्‍य नाही, हे अमेरिकेला समजायला हवे, असे रुहानी यांनी सेम्नान प्रांतात टिव्हीवरील भाषणादरम्यान सांगितले.
 • जर अमेरिकेने इराणची तेल निर्यात रोखण्याचा प्रयत्न केला तर पर्शियन आखातातून कोणतीही तेल निर्यात होणार नाही, असे ते म्हणाले.
 • आंतरराष्ट्रीय दबावामुळे आखातात तेल निर्यातीस अटकाव केला जाईल, असा इशारा 1980 पासून इराणने सातत्याने दिला आहे.
 • मात्र आतापर्यंत कधीही त्या धमकीप्रमाणे कृती केलेली नाही. अमेरिकेने इराणबरोबरच्या आण्विक करारातून माघार घेतली आणि इराणवर नव्याने निर्बंधही घातले आहेत.
 • इराणची तेलनिर्यात शून्य करण्याचे अमेरिकेने ठरवले आहे.
 • त्या निर्बंधांमधून भारतासह 8 देशांना मात्र वगळण्यात आले आहे. या निर्बंधांमुळे इराणमधील महागाई वाढायला लागली आहे.

?1. Delhi Daredevils renamed as Delhi Capitals ahead of 2019 IPL season

The change in name comes close on the heels of JSW Sports picking up a 50 percent stake in the franchise. Ahead of the 2019 IPL auctions, the Delhi Daredevils released former captain Gautam Gambhir and a host of international stars which include Jason Roy, Glenn Maxwell and Liam Plunkett, along with Indian paceman Mohammed Shami.

?2. Nagaland becomes second state to adopt pan-India women helpline

Nagaland became the first state in the Northeast and second in the country, after Himachal Pradesh, to launch a pan-India single emergency number ‘112’ under the Emergency Response Support System (ERSS). The launch coincided with the state’s formation day and the inaugural day of the 2018 edition of the Hornbill Festival. The Union Government has allocated Rs 321.69 crore under the Nirbhaya Fund for the implementation of the ERSS project across the nation. Nagaland alone has been allocated Rs 4.88 crore for the project. The Justice Verma Committee, in the backdrop of the unfortunate Nirbhaya incident in December 2012, suggested for the implementation of the ‘Emergency Response Support System’ (ERSS) across India.

?3. Croatia star Luka Modric wins Ballon d’Or to end Ronaldo, Messi era

Midfielder Luka Modrić, who led Croatia to their first-ever FIFA World Cup final, won this year’s Ballon d’Or. He was named 2018 FIFA World Cup’s best player and had also won this year’s The Best FIFA Men’s Player award. This is the first time since 2007 that neither Cristiano Ronaldo nor Lionel Messi won the Ballon d’Or. France World Cup winner Kylian Mbappe won the Kopa Trophy – for the best player under the age of 21.

?4. Common Mobility Card was launched in Delhi

Delhi Transport Minister Kailash Gahlot launched the Common Mobility Card which can be used by commuters to travel aboard both Delhi metro trains and State-run buses. The ONE card, which is essentially the rebranded Delhi Metro smart card with the tagline ‘One Delhi. One Ride’ with the logos of all three transport operators in the city, the Delhi Metro, the Delhi Transport Corporation and the Delhi government. National Common Mobility Card (NCMC): ♦ NCMC is an interoperable transport card conceived by the Ministry of Urban Development of the Government of India. ♦ The Urban Development Ministry brought in the National Payments Corporation of India (NPCI) with the task of management, clearing, and settlement of payments, simulating cards and terminals and maintenance of the network. ♦ Centre for Development of Advanced Computing (C-DAC) is given the responsibility of developing standards and hardware for the card usage and the related ecosystems.

?5. India, UAE to ink MoU for projects in third countries

India & UAE for the first time will sign a memorandum of understanding (MoU) to set up projects in third countries beginning with Ethiopia during Foreign Minister Sushma Swaraj’s ongoing visit to the Gulf country. This will be India’s second third-country project in Africa after Delhi and Tokyo during their October annual summit decided to set up a hospital in Kenya. External Affairs Minister Sushma Swaraj will also inaugurate a Gandhi-Zayed Digital Museum in Abu Dhabi to mark the celebrations of 150 years of Mahatma Gandhi’s birth and centenary celebrations of the birth of Shaikh Zayed, founder of the modern UAE.

?6. IPL auction to be held in Jaipur on December 18

The player auction for the 2019 Indian Premier League (IPL) season will take place on December 18 in Jaipur. As many as 70 players including 20 overseas cricketers will be up for grabs for the eight franchises, who are left with a total purse of ₹145.25 crore. Yuvraj Singh was released by KXIP while Delhi Daredevils let go of Gautam Gambhir.

?7. First manned Soyuz mission to ISS was launched successfully

After the October launch failure, a Soyuz rocket carrying Russian, American and Canadian astronauts took off from Kazakhstan and reached orbit on 3rd December in the first manned mission. Russian cosmonaut Oleg Kononenko, Anne McClain of NASA and David Saint-Jacques of the Canadian Space Agency were launched off for a six-and-a-half month mission on the International Space Station (ISS).  After the rocket lifted off from the Baikonur Cosmodrome, Russian space agency Roscomos announced that the capsule was successfully launched into orbit.

?8. UAE passport tops the Global Passport Power Rank 2018

As per the ratings released by Passport Index, the United Arab Emirates has topped the Global Passport Power Rank 2018, emerging as the country with the most powerful passport in world. UAE passport holders can now fly to 113 countries without a visa, and 54 others with a visa-on-arrival. Singapore and Germany ranks second with 166 countries. India ranked 66th in Global Passport Power Rank 2018.

?9. India celebrates the Indian Navy Day on 4th December

The Indian Navy Day is celebrated on December 4 every year to commemorate Operation Trident, an attack on the Karachi harbor during the Indo-Pakistan war in 1971. The Indian Navy is the fifth largest in the world, employing 67,109 personnel. The Indian Navy has three commands: Eastern Command headquartered in Vishakhapatnam, Western Command in Mumbai, and Southern Command in Kochi. The Navy operates in 66 bases under the Commands. It operates three classes of submarines: Chakra (under which is the nuclear-powered INS Chakra), Sindhughosh, and Shishumar. Marine Commandos or MARCOS, part of a special unit of the Navy, are made to undergo an excruciating training which only 10% of the trainees successfully complete.

?10. Punjab cabinet approves international airport near Ludhiana

The Punjab Cabinet approved the setting up of a new international civil terminal at Indian Air Force (IAF) Station, Halwara 32 kms from Ludhiana. The terminal will be jointly developed by the state government and Airports Authority of India (AAI). While AAI would have majority stake of 51 per cent, the Punjab Government, through the Greater Ludhiana Development Authority (GLADA), will have 49 per cent stake in the project. The state already has two intentional airports at Mohali and Amritsar.


Latest Current Affairs Videos

Latest Current Affairs Videos