Current Affairs 03 JULY 2020

Share:

 

 

🎯1. प्रसिद्ध कोरिओग्राफर सरोज खान यांचे निधन, वयाच्या 72व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

 • प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक सरोज खान यांचं मुंबईत निधन झालं आहे. श्वसनाचा त्रास होत असल्यानं 20 जून ला त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. मध्य रात्री त्यांचं हृदयविकाराच्या धक्क्यानं 72 व्या वर्षी निधन झालं आहे.
 • त्यांनी माधुरी दीक्षित, श्रीदेवी यांच्यासह बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांचे, अभिनेत्रीचे नृत्य दिग्दर्शित केलं होतं. सरोज खान यांनी 1986 पासून 2019 पर्यंत अनेक सिनेमांमध्ये कोरियोग्राफी केली होती.
 • तब्बल 2000 पेक्षा जास्त गाणी कोरीयोग्राफ केली आहेत. सरोज यांना आतापर्यंत 3 वेळा नृत्यदिग्दर्शनातील राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. त्यांच्या शिकवलेल्या नृत्यामुळे बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रींचं करिअर झालं आहे.
 • नृत्यदिग्दर्शक म्हणून त्यांचा शेवटचा चित्रपट ‘कलंक’ हा आहे. त्यांनी मिस्टर इंडिया, चांदणी, बेटा, तेजाब, नागीना, डर, बाजीगर, अंजाम, मोहरा, याराना, दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे या चित्रपटात नृत्यदिग्दर्शन केले.
 • तसेच, परदेश, देवदास, लगान, सोल्जर, ताल, फिजा, साथिया, स्वदेश, कुछ ना कहो, वीर जारा, डॉन, फना, गुरू, नमस्ते लंडन, जब वी मेट, एजंट विनोद, राउडी राठौर, एबीसीडी, तनु वेड्स मनु रिटर्न्स, मणिकर्णिका ” या चित्रपटांसाठीही त्यांनी नृत्यदिग्दर्शन केलं आहे.

राष्ट्रीय पुरस्कार –

2003 – देवदास – “डोला डोला” – Best Choreography

2006 – श्रीरंगम – सर्व गाण्यांसाठी – Best Choreography

2008 – जाब वुई मेट – “ये  इश्क हाये” – Best Choreography

🎯2. इतिहासात पहिल्यांदाच धावली तब्बल 2.8 किलोमीटर लांबीची ‘शेषनाग’ ट्रेन

 • साधारणपणे आपण जास्तीत जास्त 30 ते 40 डब्यांची मालगाडी धावलेली पाहिली असेल. मात्र भारतीय रेल्वेने तब्बल8 किलोमीटर लांबीची आणि तब्बल 251 डबे असलेली एक ट्रेन चालवण्याचा विक्रम केला आहे. ‘शेषनाग’ असे नाव या विशेष मालगाडीला देण्यात आले होते.
 • छत्तीसगडमधील परमलकसा आणि दुर्ग या दोन स्टेशन दरम्यान ही ट्रेन चालवण्यात आली. यासाठी रेल्वेने चार मालगाड्या एकत्र जोडल्या होत्या.
 • तब्बल 251 डबे, व्हॅगन, 4 ब्रेक व्हॅन आणि 9 विद्युत लोको (इंजिन ) या खास ट्रेनला जोडण्यात आले होते. मालगाडीने परमलकसा ते दुर्ग दरम्यानचे 22 किलोमीटरचे अंतर 45 मिनिटात पूर्ण केले.
 • परमलकसा येथून ही ट्रेन काल दुपारी 12 वाजून 20 मिनिटांनी सोडण्यात आली. ती 1 वाजून 5 मिनिटांनी दुर्गला पोहोचली. ही मालगाडी दुर्गहून पुढे बिलासपूर आणि तेथून कोरबापर्यंत ही गेली.
 • भारतीय रेल्वेच्या इतिहासात पहिल्यांदाच चार मालगाड्यांना जोडून एवढी लांब मालगाडी तयार करत ती चालवण्यात आली आहे. अशा प्रयोगामुळे भविष्यात एखाद्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मदत सामग्री, अन्न धान्य, युद्ध जन्य परिस्थितीत आवश्यक साहित्य पोहोचवण्यासाठी रेल्वे काय करू शकते याची चाचपणी झाली आहे.
 • परमलकसा आणि दुर्ग हे दोन्ही स्टेशन रेल्वेच्या दक्षिण पूर्व मध्य झोनच्या नागपूर विभागात येत असले तरी छत्तीसगडमधील स्टेशन्स आहेत.

🎯3. ३८९०० कोटींच्या संरक्षणसामग्री खरेदीस मंजुरी

 • सीमेवर भारत व चीन दरम्यान तणाव उद्भवला असतानाच; सशस्त्र दलांची लढाऊ क्षमता वाढवण्यासाठी ३८ हजार ९०० कोटी रुपये खर्चून ३३ लढाऊ जेट विमाने, अनेक क्षेपणास्त्र यंत्रणा आणि इतर लष्करी साहित्य खरेदी करण्याच्या प्रस्तावाला संरक्षण मंत्रालयाने गुरुवारी मंजुरी दिली.
 • रशियाकडून २१ मिग-२९ लढाऊ विमाने खरेदी करण्यात येणार असून, सरकारी मालकीच्या हिंदुस्तान एरोनॉटिक्स लि. (एचएएल) कडून १२ एसयू-३० एमकेआय (सुखोई) विमाने खरेदी केली जाणार आहेत. सध्या कार्यरत असलेल्या ५९ मिग-२९ विमानांचा दर्जा वाढवण्याचा स्वतंत्र प्रस्तावही मंजूर करण्यात आला आहे.
 • २४८ ‘अ‍ॅस्ट्रा’ क्षेपणास्त्र यंत्रणेच्या खरेदीलाही मंजुरी देण्यात आली आहे. स्वनातीत विमानाला खिळवून ठेवून नष्ट करणाऱ्या या यंत्रणेची सर्व प्रकारच्या वातावरणात दिवसा तसेच रात्रीही काम करण्याची क्षमता आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संरक्षण साहित्य खरेदी परिषदेच्या (डीएसी) बैठकीत या खरेदीबाबत निर्णय घेण्यात आले.

🎯4. भूमिपुत्रांसाठी ठाकरे सरकारचा महत्त्वाचा निर्णय

 • महाराष्ट्रातील भूमिपुत्रांसाठी ठाकरे सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. भूमिपुत्रांना रोजगारात ८० टक्के संधी मिळावी यासाठी महाराष्ट्र सरकार लवकरच Maha Jobs पोर्टल लॉन्च करणार आहे. याच्या माध्यमातून कुशल, अर्धकुशल आणि अकुशल कर्मचार्‍यांची भरती केली जाणार आहे.
 • एमआयडीसीकडे या पोर्टलची जबाबदारी असेल. स्थानिकांची भरती करण्यासाठी एमआयडीसीने ९५० व्यापार आणि १७ वेगेवगळी क्षेत्र निवडली आहेत. इंडस्ट्री युनिट आणि नोकरीची गरज असणारे दोघेही या पोर्टलवर नोंदणी करु शकतात. फ्री प्रेस जर्नलने यासंबंधी वृत्त दिलं आहे.
 • उद्योग विभागाच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, “राज्यात लॉकडाउनचे निर्बंध शिथील केल्यानंतर ६५ हजार इंडस्ट्रीयल युनिट्स सुरु झाले असून त्या पार्श्वभूमीवर एमआयडीसीकडून नुकतंच एक मानव संसाधन सर्वेक्षण करण्यात आलं. जवळपास ३३०० युनिट्सकडून आम्हाला प्रतिसाद मिळाला. त्यांना जवळपास ५० हजार कर्मचाऱ्यांची गरज असल्याचा अंदाज आहे. यापैकी ७० टक्के कुशल तर ३० टक्के अकुशल आहेत”.
 • अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, “एमआयडीसीमध्ये स्थित असणाऱे इंडस्ट्रीयल युनिट तसंच बाहेर असणारेही या पोर्टलवर भरतीसाठी नोंदणी करु शकतात. १७ क्षेत्रांची निवड करण्यात आली असून यामध्ये ऑटोमोबाइल, अभियांत्रिकी, उत्पादन, लॉजिस्टिक, वस्त्रोद्योग, वस्त्र, प्रक्रिया, औषधनिर्माण आणि जैव तंत्रज्ञान यांचा समावेश आहे”.
 • “हे पोर्टल एक मंच उपलब्ध करुन देईल. कंपनी तसंच ज्यांना नोकरीची गरज आहे ते दोघंही नोंदणी करु शकतात. कुशल, अर्धकुशल आणि अकुशल सर्वांसाठी ही संधी उपलब्ध आहे,” अशी माहिती अधिकाऱ्याने दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १६ हजार कोटींचे सामंजस्य करार करताना कंपन्या ८० टक्के नोकऱ्या स्थानिकांना देतील अशी अपेक्षा व्यक्त केली होती.

🎯5. ज्येष्ठ कॅरम संघटक जनार्दन संगम यांचे निधन

 • ज्येष्ठ माजी कॅरमपटू आणि आंतरराष्ट्रीय पंच जनार्दन संगम यांचे गुरुवारी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांच्या राहत्या घरी निधन झाले.
 • ते ६८ वर्षांचे होते.
 • प्रकृती अस्वस्थ झाल्यामुळे संगम यांना गुरुवारी हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथेच त्यांचे उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली आणि नातवंडे असा परिवार आहे.
 • संगम यांनी खेळाडू म्हणून नेव्हल डॉकयार्डचे प्रतिनिधित्व केले. परंतु खेळापेक्षा त्यांनी संघटनेची कार्ये करण्यास अधिक पसंती दिली. अनेक राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय सामन्यात प्रमुख पंचांची भूमिका बजावणाऱ्या संगम यांनी तांत्रिक अधिकारी म्हणूनही काम केले आहे.
 • १९९२ ते २०१९ या २७ वर्षांच्या कालखंडात त्यांनी महाराष्ट्र कॅरम संघटनेच्या कार्यकारिणीवर संयुक्त सचिव पद सांभाळले. तसेच संघटनेचे माजी सचिव म्हणूनही ते कार्यरत होते. त्याशिवाय कॅरमच्या प्रसिद्धीसाठी वृत्तपत्रे आणि क्रीडा वाहिन्यांद्वारे त्यांनी अमूल्य योगदान दिले.

🎯6. मेस्सीने रचला इतिहास! ला लीगामध्ये डागला फ्रोफेशनल करियरमधला 700वा गोल

 • दिग्गज फुटबॉल प्लेयर लियोनेल मेस्सीच्या नावावर आजापर्यंत अनेक विक्रम आहेत. अशातच मेस्सीने आणखी एका विक्रम आपल्या नावे केला आहे. लियोनेल मेस्सीने आपल्या प्रोफेशनल करिअरचा 700वा गोल केला आहे. फुटबॉलमधील प्रतिष्ठेच्या ला लीगा या स्पर्धेमध्ये भारतीय वेळेनुसार मध्यरात्री बार्सिलोना आणि एटलेटिको मेड्रिडमध्ये फुबॉलचा सामना पार पडला.
 • या सामन्यात मिळालेल्या पेनल्टीवर दणदणीत गोड डागत मेस्सीने आपल्या करिअरमधील 700वा गोल करत इतिहास रचला.
 • मेस्सीने 700व्या गोलसोबतच आपल्या प्रोफेशनल करिअरमध्ये एक नवा मैलाचा दगड मिळावला आहे. आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये अर्जेंटिना आणि क्लब फुटबॉलमध्ये बार्सिलोनाकडून खेळताना गोल डागत मेस्सी जगातील सर्वश्रेष्ठ फुटबॉल खेळाडू ठरला आहे.
 • 700 गोलपर्यंत पोहोचण्यासाठी मेस्सीने 860 सामने खेळले आहेत. प्रोफेशनल फुटबॉलमध्ये सर्वाधिक गोल करण्याचा रेकॉर्ड ऑस्ट्रियाच्या जोसेफ बीकनच्या नावे आहे.
 • जोसेफने आपल्या कारकीर्दीत 805 गोल केले होते. ब्राझीलचे दिग्गज फुटबॉल खेळाडू रोमारियो आणि फुटबॉल सम्राट पेले प्रोफेशनल फुटबॉलमध्ये सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत.

🎯7.विज्ञान अभियांत्रिकी संशोधन मंडळाचा “अॅक्सिलरेट विज्ञान” उपक्रम

 • विज्ञान व अभियांत्रिकी संशोधन मंडळाने (SERB) संशोधकीय पाठ्यवृत्ती देण्यासाठी, क्षमता वाढविण्यासाठी तसेच विविध कार्यशाळांचे आयोजन करण्यासाठी देशभरात एकच व्यासपीठ असावे, या दृष्टीने ‘अॅक्सिलरेट विज्ञान’ या नावाच्या उपक्रमाला प्रारंभ केला आहे. हा उपक्रम “अभ्यास” कार्यक्रमाचा एक भाग आहे.
 • वैज्ञानिक कार्यक्रमांचे आयोजन विशेषतः एकत्रीकरण/विलीनीकरण करण्याचे काम हा उपक्रम द्रुतगतीने करणार. याप्रमाणे SERB संस्थेला ही योजना कार्यान्वित करण्यात मदत करण्यासाठी सर्व वैज्ञानिक मंत्रालये/विभागांचे प्रतिनिधी आणि काही इतर लोकांची मिळून एक आंतरमंत्रालयीन निरिक्षण समिती (IMOC) स्थापन करण्यात आली आहे.

ठळक बाबी

 • उच्चस्तरीय वैज्ञानिक संशोधनाला प्रोत्साहन देणे आणि विज्ञानाधिष्ठीत मनुष्यबळ निर्माण करणे, हा या आंतरमंत्रालयीन योजनेचा प्राथमिक उद्देश असून त्यामुळे संशोधनातली संधी तयार होऊन ज्ञानाधिष्ठित आर्थिक व्यवस्था निर्माण होण्यास मदत होणार.
 • गुणवत्ता विकास आणि उत्तम प्रशिक्षित संशोधक हा संशोधनाचा पाया असल्यामुळे, या उपक्रमाच्या माध्यमातून संशोधन क्षमतांना ओळखून, मार्गदर्शन करून, तसेच देशभरात अशा प्रशिक्षण देणाऱ्या कार्यशाळा आयोजित केल्या जाणार आहेत.
 • संशोधनाच्या पायाचा विस्तार करण्यासाठी पदव्युत्तर कार्यक्रमांचे एकत्रीकरण/विलीनीकरण करणे, उत्तम दर्जेदार कार्यशाळांच्या आयोजनावर लक्ष केंद्रित करणे आणि ज्यांना संशोधनासाठी सोय वा स्रोत उपलब्ध नसणार, त्यांच्यासाठी संशोधकीय पाठ्यवृत्ती देऊ करणे, ही व्यापक तीन ध्येय निश्चित करण्यात आली आहेत.
 • पाठ्यवृत्तींचे केंद्रीय समन्वयीकरण करून दरवर्षी 1000 योग्य संशोधकांना संधी दिली जाणार आहे.उपक्रमाचा आणखी एक नवीन घटक म्हणजे सम्मोहन (SAMMOHAN) ज्याचे संयोजिका (SANYOJIKA) आणि संगोष्टी (SANGOSHTI) हे दोन भाग आहेत. संयोजिका म्हणजे सरकारचा वित्तपुरवठा होत असलेल्या विज्ञान व तंत्रज्ञानाच्या विविध योजनांची माहिती देणारा खुला कार्यक्रम आणि संगोष्टी म्हणजे SERBचा पूर्वनियोजित कार्यक्रम आहे.

अभ्यास” कार्यक्रमाविषयी…

 • “अभ्यास” हा कार्यक्रम, पदव्युत्तर आणि पीएचडी विद्यार्थ्यांच्या, वेगवेगळ्या क्षेत्रातल्या विद्याशाखा, संशोधकीय क्षमतेचा विकास करून त्याला चालना आणि प्रोत्साहन देऊन त्यांची काळजी घेत सक्षमीकरण करून, देशातल्या संशोधनाचा विकास करण्यासाठी आहे.
 • त्याचे उच्च दर्जाच्या कार्यशाळा (KARAYALA) आणि संशोधन पाठ्यवृत्ती (VRITIKA) असे दोन भाग आहेत. ही योजना, ज्या संशोधकांना शिक्षणासाठी क्षमता/ सोय/ पायाभूत सुविधा मर्यादित स्वरूपात उपलब्ध आहेत, अशांसाठी आहे.

Latest Current Affairs Videos

Latest Current Affairs Videos