Current Affairs 03 January 2020

304
0
Share:

 

🎯1. पंतप्रधान कृषी कर्मण पुरस्कार प्रदान करणार.

 • पीएम किसान योजनेंतर्गत 6 कोटी लाभार्थ्यांना 2 हजार रुपयांचा तिसरा हफ्ता पंतप्रधानांकडून जारी केला जाणार.
 • पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवार 2 जानेवारी 2020 रोजी कर्नाटकातल्या तुमकुर येथे एका सार्वजनिक सभेत कृषी कर्मण पुरस्कार आणि प्रशंसा पुरस्कार राज्यांना प्रदान करतील.
 • तसेच प्रगतीशील शेतकऱ्यांसाठी कृषी मंत्र्यांचे कृषी कर्मण पुरस्कारही वितरित करतील.
 • या कार्यक्रमात पीएम किसान (प्रधानमंत्री किसान सन्मान निधी) चा डिसेंबर 2019 ते मार्च 2020 या कालावधीसाठीचा 2000 रुपयांचा तिसरा हफ्ता जारी करण्यात येईल.
 • यामुळे सुमारे 6 कोटी लाभार्थ्याना फायदा होणार आहे. पीएम किसान अंतर्गत 8 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील लाभार्थ्यांना पंतप्रधानांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान केली जातील.
 • याच कार्यक्रमात पंतप्रधान तामिळनाडूतल्या निवडक शेतकऱ्यांना खोल समुद्रात मत्स्यनौका आणि फिशिंग व्हेसल ट्रान्स्पाँडर्सच्या चाव्या प्रदान करतील.
 • कर्नाटकातील निवडक शेतकऱ्यांना त्यांच्या हस्ते किसान क्रेडिट कार्ड वितरित केली जातील.
 • पंतप्रधान या ठिकाणी आयोजित प्रदर्शनालाही भेट देतील आणि उपस्थितांना संबोधित करतील.

🎯2. चीनमध्ये सुरू झाली जगातील पहिली स्मार्ट हायस्पीड ट्रेन

 • चीनमध्ये ५६४९६ कोटी रुपये खर्चून जगातील पहिली स्मार्ट व हायस्पीड ट्रेन सुरू करण्यात आली आहे. ही चालकविरहित आहे. ताशी ३५० किमी वेगाने चालणाऱ्या या रेल्वेत ५ जी सिग्नल, वायरलेस चार्जिंग व स्मार्ट लायटिंगसह सर्व सुविधा आर्टिफिशियल इंटेलिजन्सशी संबंधित आहेत.
 • सोमवारी बीजिंगपासून झांगजियाकोदरम्यान १७४ किमीचा प्रवास या रेल्वेने १० थांब्यासह ४७ मिनिटांत पूर्ण केला. या रेल्वेचे खास वैशिष्ट्य म्हणजे याचे संचालन करण्याचे प्रत्येक तंत्र, जीपीएस सिस्टिमसुद्धा चीनमधील आहे. ही रेल्वे २०२२ च्या हिवाळी ऑलिम्पिकसाठी सुरू केली.

🎯3. नवी दिल्लीमध्ये उभी राहणार नवी संसद.

 • भारतीय संसदेची नवीन इमारत अनेक अर्थांने खास असणार आहे. नवीन इमारतीचा आकार त्रिकोणी असणार  आहे.
 • या इमारतीला तीन मोठे मिनार असणार आहेत. इतकचं नाही नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार या इमारतीच्या तळाशी सर्व मंत्रालयाच्या कार्यालयांना जोडणारी शटल सेवाही असणार आहे.
 • तर याशिवाय पंतप्रधानांसाठी नवीन निवासस्थान बंधण्याचीही तयार करण्यात येत आहे.
 • तसेच याच वर्षी 13 सप्टेंबर रोजी शहरी विकास मंत्रालयलाने पंतप्रधानांच्या घरासंबंधीच्या या प्रकल्पाची घोषणा केली केली आहे. हे घर बांधण्यासाठी वेगवेगळ्या कंपन्यांकडून निविदाही मागवण्यात आल्या होत्या.
 • ऑक्टोबर महिन्यामध्ये गुजरातमधील एचसीपी डिझाइन प्लॅनिंग अॅण्ड मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमीटेडची निविदेला सरकारने पसंती दर्शवली.
 • सर्व कंपन्यांना मागे टाकत गुजरातमधील डॉ. बिमल पटेल यांच्या या कंपनीने हे कंत्राट मिळवले आहे.

🎯4. सलग दुसऱ्या महिन्यात जीएसटीच्या संकलनात वाढ

 • मोदी सरकारसाठी खूशखबर!, सलग दुसऱ्या महिन्यात जीएसटीच्या संकलनात वाढ जीएसटी (वस्तू-सेवाकर) संकलनाचा आकडा सलग दुसऱ्या महिन्यात एक लाख कोटीच्या वर गेला आहे.
 • डिसेंबर 2019 या महिन्यात एक लाख 3 हजार 184 कोटी रुपयांचे जीएसटी संकलन झाले आहे. याआधी नोव्हेंबर महिन्यात एकूण 1,03,492 कोटी रुपयांचे जीएसटी संकलन झाले होते. तर ऑक्टोबर महिन्यात 95,380 कोटी रुपये आणि सप्टेंबर महिन्यात 91,916 कोटी रुपयांचे जीएसटी संकलन झाले होते.
 • एकूण जीएसटीमध्ये केंद्रीय जीएसटी (सीजीएसटी) 19,962 कोटी रुपये, तर राज्य जीएसटी (एसजीएसटी) 26,792 कोटी रुपये वसूल झाले आहेत. एकात्मिक जीएसटी (आयजीएसटी) 48,099 कोटी रुपये आहे. उपकर 8,331कोटी रुपयांचा आहे.

🎯5. महेंद्रसिंह धोनी दशकातील सर्वोत्तम एकदिवसीय, ट्वेन्टी-20 कर्णधार :

 • भारताचा यशस्वी माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीची ‘ईएसपीएन क्रिकइन्फो’ या लोकप्रिय क्रिकेट संकेतस्थळाने जाहीर केलेल्या दशकातील सर्वोत्तम एकदिवसीय आणि ट्वेन्टी-20 संघाच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे.
 • विराट कोहलीला कसोटी संघाच्या कर्णधारपदाचा मान मिळाला असून तिन्ही संघात स्थान मिळवणारा तो एकमेव भारतीय खेळाडू ठरला आहे.
 • ‘क्रिकइन्फो’च्या 23 सदस्यीय पॅनेलकडून या संघांची निवड करण्यात आली. 50 कसोटी आणि सहा वर्षांचा आंतरराष्ट्रीय पातळीवरील निकष कसोटी संघासाठी काढण्यात आला. तर एकदिवसीय आणि ट्वेन्टी-20 संघांसाठी अनुक्रमे 75 आणि 100 ट्वेन्टी-20 सामन्यांचा अनुभव असलेल्या खेळाडूंना प्राधान्य देण्यात आले.

🎯6. कोळ्याच्या नव्या प्रजातीचा शोध :

 • अहमदाबाद येथील गुजरात युनिव्हर्सिटी कॅम्पसमधून नव्या प्रजातीच्या कोळ्याचा शोध लागला आहे.
 • वन्यजीव संशोधक ध्रुव प्रजापती यांनी हा कोळी शोधला आहे. ‘विंग कमांडर अभिनंदन वर्धमान’ यांच्या नावे म्हणजेच ‘फ्लेग्रा अभिनंदन वर्धमान’ नावाने हा कोळी ओळखला जाणार आहे. तसेच फ्लेग्रा या कुळातील हा कोळी आहे.
 • गांधीनगर स्थित गीर फाउंडेशन येथे वन्यजीव संशोधक धु्रव प्रजापती यांनी ‘फ्लेग्रा अभिनंदन वर्धमान’ या कोळ्याचा शोध लावण्यापूर्वी 10 कोळ्यांच्या प्रजातींचा शोध लावला आहे.
 • तर नव्या प्रजातीच्या कोळ्याची शरीररचना ही तामिळनाडू येथे आढळणाऱ्या ‘फ्लेग्रा प्रसन्ना’या प्रजातीच्या कोळ्याशी मिळतीजुळती आहे. परंतु दोन्ही प्रजातींमधील प्रजनन प्रक्रियेमध्ये वेगळेपण दिसून येते. प्रजापती यांचे हे स्वतंत्र संशोधन आहे.

Latest Current Affairs Videos

Latest Current Affairs Videos