Current Affairs 02 JULY 2020

Share:

 

🎯1. जागतिक बँकेचे भारताला विक्रमी कर्ज

 • जागतिक बँकेने गेल्या वर्षभरात सर्वाधिक कर्ज रक्कम भारताला उपलब्ध करून दिली असून तरतुदीपैकी निम्मी रक्कम करोना संकट तिमाहीत वितरित केली आहे. सामाजिक तसेच आरोग्य क्षेत्राबरोबर या आंतरराष्ट्रीय अर्थसाहाय्याचा अधिक लाभ देशातील सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योगाला झाला आहे.
 • जुलै २०१९ ते जून २०२० असे जागतिक बँकेचे वित्त वर्ष मंगळवारीच संपुष्टात आले. या दरम्यान जागतिक बँकेने भारताला एकूण ५.१३ अब्ज डॉलरचा कर्जपुरवठा केला आहे. पैकी २.७५ अब्ज डॉलर रक्कम ही गेल्या तिमाहीतच वितरित करण्यात आली आहे.
 • मार्च २०२० अखेरीस करोना आणि टाळेबंदीचे संकट देशात उग्र बनल्यानंतर जागतिक बँकेने गेल्या तिमाहीत उपलब्ध करून दिलेल्या एकूण २.७५ अब्ज डॉलरपैकी सर्वाधिक १.७५ अब्ज डॉलर देशातील लघुउद्योग क्षेत्राला मिळाले आहेत.
 • गेल्या वित्त वर्षांत भारताला कर्ज स्वरूपात देण्यात आलेली मदत ही दशकातील विक्रमी असल्याची माहिती जागतिक बँकेचे भारतातील संचालक जुनैद कमाल अहमद यांनी दिली. मावळत्या वित्त वर्षांचा आढावा घेतानाच भारतासाठीच्या आगामी अर्थसाहाय्याची माहिती अहमद यांनी बुधवारी निवडक पत्रकांना वेबसंवादाद्वारे दिली. चालू वर्षांसाठी भारताकरिता ४ अब्ज डॉलरची तरतूद करण्यात आल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.
 • सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग आपत्कालीन प्रतिसाद कार्यक्रमांतर्गत जागतिक बँके च्या संचालक मंडळाने ७५ कोटी डॉलरच्या अर्थसाहाय्याला मंजुरी दिली असून त्याचा लाभ १५ लाख लघुउद्योगांना होईल, असेही ते म्हणाले. भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पादनात ३० टक्के व निर्यातीत ४० टक्के हिस्सा राखणाऱ्या, १५ ते १८ कोटी रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या लघुउद्योग क्षेत्राला करोना-टाळेबंदीच्या संकटात जागतिक बँके च्या आर्थिक हातभाराचा लाभ होईल, असा विश्वास जुनैद अहमद यांनी व्यक्त केला.

🎯2. UPSC च्या पूर्वपरीक्षेसाठी केंद्र बदलण्याची सवलत, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय

 • कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर UPSC म्हणजेच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
 • मात्र काही दिवसांपूर्वीच UPSC नं आपल्या परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या होत्या. UPSCची पूर्वपरीक्षा 4 ऑक्टोबर 2020 रोजी होणार असून मुख्य परीक्षा 8 जानेवारी 2021 पासून घेण्यात येणार आहे.
 • परीक्षांच्या तारखा जाहीर केल्यानंतर बुधवारी (1 जुलै) UPSC नं एक महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे. उमेदवारांना या परीक्षेसाठीचं केंद्रही बदलण्याची मुभा देण्यात आली आहे.
 • युपीएससीच्या संकेतस्थळावर याबाबत अधिक माहिती देण्यात आली आहे. परीक्षेचा अर्ज भरताना ज्या केंद्राची निवड केली ते बदलायचं असल्यास 7 ते 13 जुलै 2020 किंवा 20 ते 24 जुलै 2020 या काळात केंद्र बदलता येईल.

आयोगाचं पत्रक

 • प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर बदल करून दिला जाणार आहे. एखाद्या केंद्राची क्षमता संपल्यास ते उमेदवारांना उपलब्ध होणार नाही.

अर्जही मागे घेता येणार

 • बुधवारी (1 जुलै) प्रसारित केलेल्या निवेदनात अर्ज मागे घेण्याचीही मुभा देण्यात आली आहे. एक ते 8 ऑगस्ट या काळात परीक्षेचा अर्ज मागे घेण्याची मुभा आयोगाने दिली आहे.
 • परीक्षेच्या इतर अटी आणि नियमांमध्ये कोणतेही बदल होणार नसल्याचं आयोगाने स्पष्ट केलं आहे.
 • महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचं वेळापत्रक
 • राज्य सेवा पूर्व परीक्षा 13 सप्टेंबर 2020 ला होणार आहे. PSI STI आणि ASO या अराजपात्रित पदांसाठी संयुक्त पूर्व परीक्षा 11 ऑक्टोबर 2020 ला तर अभियांत्रिकी सेवेची पूर्वपरीक्षा 1 नोव्हेंबर 2020 ला होणार आहे.
 • या कोणत्याही परीक्षांच्या मुख्य परीक्षांची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. कोरोनाच्या काळातील उपाययोजना आणि लॉकडाऊनचा कालावधी लक्षात घेता परीक्षेच्या आयोजनाचा आढावा वेळोवेळी घेण्यात येईल त्यासाठी विद्यार्थ्यांनी MPSC ची वेबसाईट सतत पाहात रहावी असं आवाहन आयोगाने केलं आहे.
 • राज्यसेवा पूर्व परीक्षा यावर्षी 5 एप्रिलला नियोजित होती. त्यानंतर ती 26 एप्रिलला करण्यात आली आणि त्यानंतर ती अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली होती. आता नवीन तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. याआधी युपीएससीनेही पूर्वपरीक्षेची तारीख बदलून 31 ऑक्टोबर केली आहे.

🎯3. ‘आयसीसी’च्या कार्याध्यक्षपदावरून शशांक मनोहर पायउतार

 • हंगामी कार्याध्यक्ष म्हणून ‘आयसीसी’चे उपाध्यक्ष इम्रान ख्वाजा यांच्याकडे जबाबदारी
 • शशांक मनोहर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) कार्याध्यक्षपदावरून पायउतार झाले. मनोहर यांनी नोव्हेंबर २०१५ पासून ‘आयसीसी’ कार्याध्यक्षपद सांभाळले. हंगामी कार्याध्यक्ष म्हणून ‘आयसीसी’चे उपाध्यक्ष इम्रान ख्वाजा यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे.
 • मनोहर यांना ‘आयसीसी’च्या नियमांप्रमाणे पुन्हा दोन वर्षांसाठी कार्याध्यक्ष होता येऊ शकते. कारण तीन वेळा निवडून येण्याची संधी नियमांप्रमाणे आहे. अर्थातच ‘आयसीसी’च्या पुढील आठवडय़ात होणाऱ्या बैठकीत कार्याध्यक्षपदाची निवडणूक कधी आयोजित करायची याबाबतचा निर्णय होणार आहे. ‘आयसीसी’चे मुख्य कार्यकारी अधिकारी मनू साहनी यांनी मनोहर यांचे आभार मानले आहेत. ‘‘मनोहर यांनी आयसीसीचे कार्याध्यक्ष म्हणून जबाबदारी उत्तमपणे सांभाळल्याबद्दल त्यांचे आभारी आहोत,’’ असे साहनी यांनी सांगितले. ख्वाजा यांनीही मनोहर यांच्या कार्यपद्धतीबद्दल कौतुकोद्गार काढले.
 • २०१६ मध्ये शशांक मनोहर हे ICC अध्यक्षपदी निवड झाले होते.
 • त्यानंतर २०१८ मध्ये ते पुन्हा बिनविरोध निवडून आले.
 • ६२ वर्षीय शशांक मनोहर हे २००८ ते २०११ या काळात BCCI चे प्रमुख होते.
 • शशांक मनोहर हे जून महिन्यात पदावरून पायउतार होणार होते.
 • मात्र करोनामुळे ICC च्या कार्यकारी मंडळाची बैठक लांबणीवर पडल्याने मनोहर यांना पुढील दोन महिने मुदतवाढ देण्यात आली.
 • त्यामुळे ऑगस्टपर्यंत मनोहर ICC च्या अध्यक्षपदी कायम राहणार होते, पण अखेर त्यांनी पदाचा राजीनामा दिला.

🎯4. महामार्ग प्रकल्पांतून चीन हद्दपार, चिनी गुंतवणुकीला वगळणार – नितीन गडकरी

 • चिनी अ‍ॅपवरील बंदीपाठोपाठ चिनी कंपन्यांची आर्थिक कोंडी करण्याचा पवित्रा केंद्र सरकारने घेतला आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या प्रकल्पात सहभागी होण्यास चिनी कंपन्यांवर बंदी घालण्यात आली आहे.
 • संयुक्त उपक्रमांच्या माध्यमातूनही चिनी कंपन्यांना शिरकाव करण्यास मज्जाव केला जाईल, अशी घोषणा केंद्रीय रस्ते-परिवहन व राष्ट्रीय महामार्ग विकासमंत्री नितीन गडकरी यांनी बुधवारी केली.
 • देशी कंपन्यांना महामार्ग प्रकल्पांमध्ये अधिकाधिक सहभागी करून घेण्याचे प्रयत्न करणार आहे. त्यासाठी अटी व शर्ती शिथिल केल्या जाऊ शकतात. तसे धोरण लवकरच केंद्र सरकार जाहीर करेल.
 • आता नवे धोरण महामार्गाच्या प्रस्तावित प्रकल्पांसाठीच नव्हे, कार्यान्वित झालेल्या प्रकल्पांनाही लागू केले जाणार आहे. प्रक्रिया सुरू झालेल्या प्रकल्पांमध्ये चिनी कंपन्यांचा सहभाग असेल तर नव्याने निविदा काढण्यात येतील.
 • तंत्रज्ञान, सल्ला वा प्रकल्प रचनेसाठी लघुउद्योगांमध्ये परदेशी गुंतवणुकीला प्रोत्साहन दिले जात असले, तरी त्यातून चिनी गुंतवणुकीला वगळले जाईल, असे नितीन गडकरी यांनी सांगितले.

🎯5. भारत पुन्हा खरेदी करणार बंकर फोडणारे स्पाइस-२००० बॉम्ब

 • भारताची स्पाइस २००० बॉम्ब खरेदी करण्याची योजना आहे. स्पाइस बॉम्बमध्ये जमिनीवरील टार्गेटसचा अत्यंत अचूकतेने वेध घेण्याची क्षमता आहे.
 • या बॉम्बच्या खरेदीमुळे भारताच्या ताकतीमध्ये आणखी वाढ होईल. मागच्यावर्षी पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर बालाकोटमधील जैश-ए-मोहम्मदच्या तळावर एअर स्ट्राइक करण्यात आला होता. हा तळ स्पाइस २००० बॉम्बने नष्ट करण्यात आला होता.
 • एअर फोर्ससाठी हे बॉम्ब खरेदी करण्यात येणार आहेत. चीन बरोबर वाद सुरु असताना सैन्यदलांना तात्काळ खरेदीसाठी निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. एअरफोर्सकडे स्पाइस २००० बॉम्ब आहेत. पण आता आणखी असे बॉम्ब खरेदी करण्याचा विचार आहे.
 • भारताकडे उपलब्ध असलेल्या स्पाइस बॉम्बच्या नव्या आवृत्तीमध्ये ७० किमीच्या परिघातील लक्ष्याचा अचूक वेध घेण्याबरोबर बंकर उद्धवस्त करण्याची क्षमता आहे.

काय आहे स्पाइस २००० बॉम्ब

 • भारताने बालाकोटमध्ये शत्रूच्या तळावर हल्ला करण्यासाठी स्पाइस २००० अस्त्राचा वापर केला. स्पाइस २००० हा स्मार्ट बॉम्ब असून अत्यंत अचूकतेने लक्ष्याचा वेध घेण्यासाठी या बॉम्बचा वापर केला जातो.
 • स्पाइस २००० ला बॉम्ब म्हटले जात असले तरी हा एक ‘गायडन्स किट’ आहे. म्हणजे ज्याला मार्गदर्शक म्हणता येईल. पारंपरिक वॉरहेड किंवा बॉम्ब जो असतो त्याला स्पाइस २००० किट जोडले जाते. त्यामुळे २६ फेब्रुवारीला एअर स्ट्राइकच्यावेळी जो बॉम्ब वापरला गेला तो स्वदेशी बनावटीचा असावा. त्याची निर्मिती भारतातील दारुगोळा कारखान्यामध्ये झाली असावी.
 • या स्पाइस किटची निर्मिती इस्त्रायलमधल्या कंपनीने केली आहे.
 • या किटमध्ये कॅमेरा, मेमरी चीप आणि जीपीएस असते. ज्याच्या मदतीने लक्ष्यावर अचूक प्रहार करता येतो. एकदा लक्ष्य निश्चित झाले की, या स्मार्ट किटच्या मेमरी चीपमध्ये सर्व माहिती सेट केली जाते. टार्गेटचे जीपीएस लोकेशन, उपग्रहामार्फत घेतलेले फोटो, लक्ष्याच्या आसपास काय आहे त्याची माहिती मेमरी चीपमध्ये सेट केली जाते. पारंपारिक बॉम्बला हे स्मार्ट किट जोडले जाते.

🎯6. 109 जोडी मार्गांवर खासगी रेल्वेसेवा सुरू करण्यासाठी प्रस्ताव:

 • रेल्वे मंत्रालयानं बुधवारी एक महत्त्वपूर्ण घोषणा केली. 109 जोडी मार्गांवर खासगी रेल्वेसेवा सुरू करण्यासाठी रेल्वेनं प्रस्ताव मागवले आहेत.
 • संपूर्ण देशातील रेल्वेच्या जाळ्याला १२ कलस्टरमध्ये विभागण्यात आलं आहे.
 • या 12 क्लस्टरमध्ये 109 जोडी मार्गांवर खासगी गाड्या चालवल्या जाणार आहेत.
 • प्रत्येक रेल्वे कमीतकमी 16 डब्ब्यांची असेल. तर या ट्रेनचा सर्वाधिक वेग हा 160 किलोमीटर प्रति तास असेल.
 • या ट्रेनचा रोलिंग स्टॉक खासगी कंपनी खरेदी करेल. तसंच देखरेखीचा खर्चही संबंधित कंपनी करेल. रेल्वे केवळ गार्ड आणि मोटरमन पुरवणार आहे.
 • या कामासाठी खासगी क्षेत्राच्या गुंतवणुकीचे उद्दिष्ट 30 हजार कोटी रुपये ठेवलं गेलं आहे.

🎯7. जाडेजाला Most valuable player म्हणून घोषित- Wisden

 • भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जाडेजाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
 • Wisden ने जाडेजाला 21व्या शतकातला भारताचा Most valuable player म्हणून घोषित केलं आहे. गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण अशा तिन्ही प्रकारांत जाडेजा सर्वोत्तम कामगिरी करत असल्यामुळे त्याची या बहुमानासाठी निवड झालेली आहे.
 • तिन्ही क्षेत्रात जाडेजाच्या कामगिरीचा अभ्यास केला

Latest Current Affairs Videos

Latest Current Affairs Videos