Current Affairs 01 JULY 2020

Share:

 

🎯 1. “प्रोजेक्ट प्लॅटिना”: महाराष्ट्रात चाललेला जगातला  सर्वात मोठा प्लाझ्मा थेरपी ट्रायल प्रकल्प.

 • कोविड-19च्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी प्लाझ्मा थेरपीचा वापर प्रभावी ठरतो. या थेरपीचा वापर व्यापक प्रमाणात होण्यासाठी महाराष्ट्र राज्यात जगातला सर्वात मोठा प्लाझ्मा थेरपी ट्रायल प्रकल्प राबवविला जात आहे. या प्रकल्पाला “प्रोजेक्ट प्लॅटिना” असे नाव देण्यात आले आहे.
 • नागपूरच्या शासकीय महाविद्यालयात ‘प्लॅटिना’ प्रकल्प केंद्राचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. याप्रसंगी प्लाझ्मा डोनेशन, c बॅंक, प्लाझ्मा ट्रायल आणि इर्मजन्सी ऑथराजेशन या चार सुविधांचेही उद्घाटन करण्यात आले.
 • महाराष्ट्रात 23 ठिकाणी वैद्यकीय महाविद्यालये, पालिका रुग्णालये या ठिकाणी या उपचार पद्धतीचा वापर करण्यास केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. यापैकी 17 ठिकाणी ही उपचार पद्धती कोविड रुग्णांसाठी सुरु होत आहे. राज्यात ज्या 10 ठिकाणी वैद्यकीय महाविद्यालयांची सुविधा नाही, तिथे आरोग्य विभागामार्फत प्लाझ्मा संकलनासाठी लागणारे यंत्र पुरविले जाणार आहेत. हा संकलीत केलेला प्लाझ्मा वैद्यकीय महाविद्यालयात पुरविला जाणार.

प्लाझ्मा थेरपीविषयी….

 • प्लाझ्मा थेरपीमध्ये आजारातून बरे झालेल्या व्यक्तींच्या रक्तातून प्लाझ्मा घेऊन कोविड-19 रुग्णांवर उपचार करण्यात येतात. जे रुग्ण बरे होऊन चालले आहेत त्यांनी 10 दिवसानंतर 28 दिवसांच्या आत प्लाझ्मा दान करणे आवश्यक आहे.
 • विकित्सक रक्तातून प्लाझ्मा स्वतंत्ररीत्या काढतात. बरे झालेल्या रुग्णांच्या रक्तात प्रतिजैवकांचा विकास झालेला असतो. प्लाझ्मापासून ही प्रतिजैवके प्राप्त करून एखाद्या रोग्याला दिले जातात. यामुळे त्याची प्रतिरोधक शक्ती अधिक प्रभावीपणे काम करू शकते.
 • मध्यम व तीव्र स्वरुपाची लक्षणे असलेल्या व नेहमीच्या औषध उपचारांनी बरा न होणारा, ऑक्सिजनची गरज असणारा रुग्ण यासाठी निवडला जातो.

🎯 2. हाँगकाँगवर संपूर्ण कब्जा मिळवणारा कायदा चिनी संसदेत मंजूर

 • चिनी संसदेमध्ये मंगळवारी खास हाँगकाँगसाठी बनवण्यात आलेला राष्ट्रीय सुरक्षा कायदा मंजूर झाला.
 • तयामुळे संपूर्ण हाँगकाँगवर कब्जा करण्याचा चीनचा मार्ग मोकळा झाला आहे.
 • कधीकाळी ब्रिटिशांची वसाहत असलेले हाँगकाँग २३ वर्षांपूर्वी चीनकडे सोपवण्यात आले.
 • हाँगकाँग चीनच्या नियंत्रणाखाली असले तरी तिथे वेगळे कायदे होते. त्यामुळे चीनला आपल्या पद्धतीने तिथे कारभार करता येत नव्हता.
 • चीनच्या नॅशनल पीपल्स काँग्रेसच्या स्थायी समितीमध्ये एकमताने हा राष्ट्रीय सुरक्षा कायदा मंजूर करण्यात आला.

हाँगकाँग हे जगातील महत्वाचे वित्तीय केंद्र आहे.

 • हाँगकाँग १९९७ पासून चीनच्या नियंत्रणाखाली आहे. चीनच्या तुलनेत हाँगकाँगमध्ये अनेक सवलती आहेत.
 • तिथली जनता लोकशाही हक्कांसाठी जागरुक आहे. त्यामुळे चीनचे सर्व कायदे हाँगकाँगमध्ये लागू होत नाहीत.
 • मागच्यावर्षी लोकशाही हक्कांसाठी हाँगकाँगमध्ये हिंसक आंदोलन झाले होते.

🎯 3. भारत पुन्हा खरेदी करणार बंकर फोडणारे स्पाइस-२००० बॉम्ब

 • भारताची स्पाइस २००० बॉम्ब खरेदी करण्याची योजना आहे. स्पाइस बॉम्बमध्ये जमिनीवरील टार्गेटसचा अत्यंत अचूकतेने वेध घेण्याची क्षमता आहे. या बॉम्बच्या खरेदीमुळे भारताच्या ताकतीमध्ये आणखी वाढ होईल.
 • मागच्यावर्षी पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर बालाकोटमधील जैश-ए-मोहम्मदच्या तळावर एअर स्ट्राइक करण्यात आला होता. हा तळ स्पाइस २००० बॉम्बने नष्ट करण्यात आला होता. एएनआयने हे वृत्त दिले आहे.
 • एअर फोर्ससाठी हे बॉम्ब खरेदी करण्यात येणार आहेत. चीन बरोबर वाद सुरु असताना सैन्यदलांना तात्काळ खरेदीसाठी निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. एअरफोर्सकडे स्पाइस २००० बॉम्ब आहेत. पण आता आणखी असे बॉम्ब खरेदी करण्याचा विचार आहे. भारताकडे उपलब्ध असलेल्या स्पाइस बॉम्बच्या नव्या आवृत्तीमध्ये ७० किमीच्या परिघातील लक्ष्याचा अचूक वेध घेण्याबरोबर बंकर उद्धवस्त करण्याची क्षमता आहे.

काय आहे स्पाइस २००० बॉम्ब

 • भारताने बालाकोटमध्ये शत्रूच्या तळावर हल्ला करण्यासाठी स्पाइस २००० अस्त्राचा वापर केला. स्पाइस २००० हा स्मार्ट बॉम्ब असून अत्यंत अचूकतेने लक्ष्याचा वेध घेण्यासाठी या बॉम्बचा वापर केला जातो.
 • स्पाइस २००० ला बॉम्ब म्हटले जात असले तरी हा एक ‘गायडन्स किट’ आहे. म्हणजे ज्याला मार्गदर्शक म्हणता येईल. पारंपरिक वॉरहेड किंवा बॉम्ब जो असतो त्याला स्पाइस २००० किट जोडले जाते. त्यामुळे २६ फेब्रुवारीला एअर स्ट्राइकच्यावेळी जो बॉम्ब वापरला गेला तो स्वदेशी बनावटीचा असावा. त्याची निर्मिती भारतातील दारुगोळा कारखान्यामध्ये झाली असावी.
 • या स्पाइस किटची निर्मिती इस्त्रायलमधल्या कंपनीने केली आहे. या किटमध्ये कॅमेरा, मेमरी चीप आणि जीपीएस असते. ज्याच्या मदतीने लक्ष्यावर अचूक प्रहार करता येतो. एकदा लक्ष्य निश्चित झाले की, या स्मार्ट किटच्या मेमरी चीपमध्ये सर्व माहिती सेट केली जाते. टार्गेटचे जीपीएस लोकेशन, उपग्रहामार्फत घेतलेले फोटो, लक्ष्याच्या आसपास काय आहे त्याची माहिती मेमरी चीपमध्ये सेट केली जाते. पारंपारिक बॉम्बला हे स्मार्ट किट जोडले जाते.
 • फक्त अचूक लक्ष्यभेद करण्यासाठी बॉम्बसोबत हे स्मार्ट किट वापरले जाते. या तंत्राच्या मदतीने काही किलोमीटर अंतरावरुन हवाई दलाला अचूक हल्ला करता येतो. त्यामुळे एअर स्ट्राइकमध्ये टार्गेट मिस होण्याची शक्यता अत्यंत धूसर आहे. त्यामुळेच पाकिस्तानने घटनास्थळी दीडमहिना कोणाला जाऊ दिले नाही. उलट भारतीय हवाई दलाने जंगलात इतक्या आतमध्ये असलेल्या भागात लक्ष्यावर अचूक प्रहार करुन आपली क्षमता दाखवून दिली. दहशतवाद्यांना तुम्ही आमच्यापासून लपवू शकत नाही हेच भारताने आपल्या कारवाईतून सिद्ध केले.

🎯 4. चीनला भारतीय बातम्यांची धास्ती, वेबसाईट्स आणि वृत्तपत्रांवर घातली बंदी

 • भारत आणि चीनमध्ये गलवान खोऱ्यातील चकमकीवरुन तणाव असताना भारतीय प्रसारमाध्यमं तेथील प्रत्येक घडामोडीची माहिती देत आहेत. चिनी सरकारचं मुखपत्र असणाऱ्या वेबसाईट्स तसंच वृत्तपत्रांमधील माहितीही भारतीय प्रसारमाध्यमांकडून दिली जात आहे. यादरम्यान चिनी सरकारने नवी खेळी करत भारतीय प्रसारमाध्यमं आणि वेबसाईट्स ब्लॉक केल्या आहेत. एएनआयने यासंबंधी वृत्त दिलं आहे.
 • भारतीय टीव्ही चॅनेल्स सध्या आयपी टीव्हीच्या माध्यमातून उपलब्ध आहेत. पण गेल्या दोन दिवसांपासून आयफोन आणि डेस्कटॉपवर एक्स्प्रेस व्हीपीएन काम करत नाही आहे. एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, चिनी नागरिक फक्त व्हीपीएनच्या सहाय्याने भारतीय मीडिया वेबसाईट्स पाहू शकतात. पण चीनकडे तंत्रज्ञानदृष्ट्या प्रगत फायरवॉल उपलब्ध असून या माध्यमातून व्हीपीएनदेखील ब्लॉक केलं जाऊ शकतं.
 • १५ जून रोजी पूर्व लडाखमध्ये भारत आणि चिनी सैनिकांमध्ये चकमक झाल्यापासून दोन्ही देशांमध्ये तणाव आहे. या चकमकीत दोन्ही देशांचं नुकसान झालं असून भारताचे २० जवान शहीद झाले आहेत तर चिनी सैनिकही ठार झाले आहेत.
 • चीनने भारतीय वृत्तपत्र आणि वेबसाईट्स ब्लॉक करण्याचा निर्णय भारताने ५९ अ‍ॅपवर बंदी घालण्याच्या आधीच घेतला असल्याचं रिपोर्टमध्ये सांगितलं जात आहे. साऊथ चीन मॉर्निंग पोस्टच्या वृत्तानुसार, चीनने ब्लॉक करण्यात आलेल्या वेबसाईट्सची संख्या जवळपास १० हजार झाली आहे. यामध्ये सोशल नेटवर्किंग साइट फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअ‍ॅप याशिवाय ब्लूमबर्ग, वॉल स्ट्रीट जर्नल, द न्यूयॉर्क टाइम्स यांचाही समावेश आहे.

चीनची प्रतिक्रिया

 • चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियन यांनी, भारताने उचललेल्या पावलानंतर चिंतेत असल्याचं म्हटलं असून परिस्थितीची पडताळणी सुरू असल्याचं सांगितलं आहे.

🎯 5. सुरक्षित सुविधा भारतातील फोनवर देण्यास सुरुवात-अ‍ॅपल गुगल.

 • वापरकर्त्यांच्या व्यक्तिगततेला धक्का न लावता कोविड रुग्णाच्या संपर्कातील व्यक्ती शोधण्याची सोय अ‍ॅपल व गुगल या प्रतिस्पर्धी कंपन्यांनी आरोग्य संकटाच्या काळात एकत्र येऊन करून दिली आहे.
 • त्यात ‘एक्स्पोजर नोटिफिकेशन सोल्यूशन’ नावाची आज्ञावली म्हणजे सॉफ्टवेअर विकसित करण्यात आले आहे.
 • भारतात अँड्राइड व आयफोनवर ही सुविधा उपलब्ध करण्यास गेल्या महिन्यापासून सुरुवात झाली आहे.
 • ही सुविधा ‘एपीआय’ म्हणजे ‘अ‍ॅप्लीकेशन प्रोग्रॅम इंटरफेस’ असून त्यामुळे आरोग्य संस्था व सरकार यांना विश्वासार्ह पद्धतीने संपर्क व्यक्तींचा शोध घेता येऊ शकतो.
 • भारतातील आरोग्य सेतू हे उपयोजन या ‘एक्स्पोजर नोटिफिकेशन’ सुविधेला सुसंगत किंवा अनुकूल नसल्याने त्याचा वापर भारतात कठीण आहे.
 • आरोग्यसेतू उपयोजनात व्यक्तीची जास्तीत जास्त माहिती गोळा केली जाते त्यामुळे त्यात व्यक्तिगततेचा भंग होतो त्यामुळे सरतेशेवटी सरकारने या उपयोजनाची (अ‍ॅप्लीकेशन) सक्ती बंद केली होती.‘एक्स्पोजर नोटिफिकेशन’ सुविधा केवळ सार्वजनिक आरोग्य अधिकारी वापरत असलेल्या उपयोजनास लागू करता येते.

Latest Current Affairs Videos

Latest Current Affairs Videos