Current Affairs 01 JANUARY 2019

522
0
Share:

 

?1. ज्येष्ठ अभिनेते कादर खान यांचे निधन

 • ज्येष्ठ अभिनेते कादर खान यांचे कॅनडातील टोरंटो येथे निधन झाले. ते 81 वर्षांचे होते.
 • ते दीर्घ आजारानं ग्रस्त असल्याने बऱ्याच दिवसांपासून त्यांच्यावर कॅनडात उपचार सुरु होते. कादर खान यांचा मुलगा सरफराज याने ही माहिती दिली. मागील 16-17 दिवसांपासून त्यांच्यावर कॅनडातील एका हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते.
 • त्यांना कॅनडाची नागरिकता मिळाली होती. 2015-16 साली ते कॅनडामध्ये स्थायिक झाले होते. तिथेच्या त्यांच्या पार्थिव देहावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत.
 • प्रोग्रेसिव सुप्रान्यूक्लियर पाल्सी डिसऑर्डर या आजारामुळे 81 वर्षीय कादर खान यांचा मेंदूने काम करणं बंद केलं होतं.
 • गेल्या वर्षी कादर खान यांच्या गुडघ्याची शस्त्रक्रिया करण्यात आली होती, त्यामुळे त्यांना चालणेही कठीण झाले होते. चालल्यास आपण खाली पडू याची भीती कादर खान यांना वाटत होती.
 • त्यानंतर सातत्यानं त्यांची प्रकृती खालावत गेली होती. अखेर त्यांची प्राणज्योत मालवली.

कादर खान यांची कारकिर्द

 • कादर खान यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1937 रोजी काबूलमध्ये झाला होता. लहानपणापासूनच त्यांना अभिनयाची, नाट्यलेखनाची आवड होती.
 • 1973 मध्ये ‘दाग’ चित्रपटातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. चार दशकांमध्ये 300हून अधिक चित्रपटांमध्ये त्यांनी कामं केली.
 • त्यांचं विनोदाचं टायमिंग अफलातून होतं. कादर खान यांना तीन वेळा फिल्मफेअर तर 2013 मध्ये त्यांना साहित्य शिरोमणी पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं.

?2. देशातील ३ संस्कृत विद्यापीठांना केंद्रीय विद्यापीठाचा दर्जा

 • मानव संसाधन विकास राज्यमंत्री सत्यपाल सिंह यांनी देशातील ३ संस्कृत विद्यापीठांना केंद्रीय विद्यापीठाचा दर्जा देण्याबाबत निवेदन देण्यात आले असल्याचे सांगितले.
 • दिल्लीतील राष्ट्रीय संस्कृत संस्थान आणि लालबहादूर शास्त्री राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठ तसेच तिरुपती येथील राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठाचा यामध्ये समावेश आहे. ही मागणी संस्कृत विषयातील तज्ज्ञ आणि विद्यार्थ्यांकडून करण्यात आली आहे.
 • राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर संस्कृत विषयाप्रती जाण निर्माण व्हावी, असा यामागील उद्देश असल्याचे मानव संसाधन विकास मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.
 1. झोमॅटो, स्विगीवरही आता केंद्राची नजर
 • झोमॅटो, स्विगी, बिगबास्केट, ग्रोर्सस् आणि उबेरइट यांसारख्या फुड डिलेव्हरी करणाऱ्या कंपन्या सध्या आघाडीवर आहेत. या कंपन्यांकडून खाद्यपदार्थांची घरपोच डिलिव्हरी केली जात असल्याने तरुणाईसोबतच इतरांसाठीही फायद्याचे ठरत आहे.
 • मात्र, आता या कंपन्यांवर केंद्र सरकारची नजर असणार आहे. त्यामुळे यासाठी ‘फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड ऑथोरिटी ऑफ इंडिया’कडून नवा नियम आणण्याची तयारी सरकारने केली आहे.
 • झोमॅटो, बिगबास्केटसारख्या कंपन्यांच्या माध्यमातून सर्व प्रकारचे भारतीय खाद्यपदार्थांसह इतर खाद्यपदार्थ पुरविले जात आहेत.
 • या ई-कॉमर्स कंपन्यांसाठी सरकारकडून विविध नियम आणले जात आहेत. ‘फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड ऑथोरिटी ऑफ इंडिया’ने (एफएसएसएआय) नवे मार्गदर्शक तत्वे जारी केले आहेत. या मार्गदर्शक तत्त्वानुसार ऑनलाईन फूड विक्रेत्या कंपन्यांवर याचा थेट परिणाम होणार आहे.
 • दरम्यान, ‘एफएसएसएआय’कडून रेस्टॉरंट आणि कॅफेसाठी यापूर्वीच मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली. त्यानंतर आता झोमॅटो, स्विगी, बिगबास्केट, ग्रोर्सस् आणि उबेरइट यांसारख्या ऑनलाईन फूड विक्रेत्या कंपन्यांसाठी ही मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात येणार आहे.

?4. नववर्षाच्या पहिल्या दिवशी भारत रचणार विक्रम

 • नववर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजे १ जानेवारीला भारत जगामध्ये सर्वाधिक बाळांना जन्म देणारा देश ठरणार आहे.
 • संयुक्त राष्ट्रसंघाने दिलेल्या माहितीनुसार, १ जानेवारील भारतात तब्बल ६९, ९४४ बाळांचा जन्म होईल.
 • या दिवशी जगभरात जन्माला येणाऱ्या एकूण बालकांच्या तुलनेत हे प्रमाण १८ टक्के इतके आहे. त्यामुळे साहजिकच भारताच्या नावावर आगळावेगळा विक्रम नोंदवला जाईल.
 • भारतापाठोपाठ चीन आणि नायजेरियामध्ये १ जानेवारीला अनुक्रमे ४४,९४० आणि २५,६८५ बाळांचा जन्म होईल. यानंतर पाकिस्तानमध्ये १५,११२, इंडोनेशियात १३,२५६, अमेरिकेत १०,०८६, डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगोमध्ये १०,०५३ आणि बांगलादेशमध्ये ८,२४८ बाळांचा जन्म होईल, असे संयुक्त राष्ट्रसंघाच्या अहवालात म्हटले आहे.
 • भारताची सध्याची लोकसंख्या साधारणपणे १३० कोटी इतकी आहे. लोकसंख्येच्याबाबतीत जगात चीनपाठोपाठ भारताचा क्रमांक लागतो.
 • मात्र, २०२४ साली भारत चीनच्या पुढे जाईल, असा संयुक्त राष्ट्रसंघाचा कयास आहे.

?5. स्मृती सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू तर हरमनप्रीत आयसीसी ट्वेंटी-20 संघाची कर्णधार

 • स्मृतीला वन डे सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू म्हणूनही घोषित केले आहे.
 • आयसीसीच्या महिला क्रिकेटपटूच्या वन डे क्रमवारीत ती चौथ्या तर ट्वेंटी-20 क्रमवारीत 10व्या स्थानावर आहे.
 • आयसीसीचा हा मानाचा पुरस्कार जिंकणारी ती दुसरी भारतीय खेळाडू ठरली आहे.
 • सर्वोत्तम महिला क्रिकेटपटूसाठी दिला जाणारा राचेल हेयहोए फ्लिंट पुरस्कार जाहीर झाला आहे.
 • याआधी 2007 मध्ये दिग्गज गोलंदाज झुलन गोस्वामीला वर्षातील सर्वोत्तम महिला खेळाडूच्या पुरस्काराने गौरविण्यात आले होते.
 • स्मृतीने 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2018 या कालावधीत 12 वन डे सामन्यात 90च्या सरासरीने 669 धावा केल्या आहेत, तर 25 ट्वेंटी -20 सामन्यांत तिने 130.67च्या स्ट्राईक रेटने 622 धावा चोपल्या आहेत.
 • स्मृतीच्या दमदार कामगिरीच्या जोरावर भारतीय महिला संघाने आयसीसी महिला वर्ल्ड कप ट्वेंटी-20 स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला होता.
 • तिने या स्पर्धेत पाच सामन्यांत 35च्या स्ट्राईक रेटने 178 धावा केल्या आहेत.

?6. लवकरच येणार पहिल्या महिला डॉ. आनंदीबाई जोशी यांच्या आयुष्यावर आधारित बायोपिक

 • आजही मोठ्या आदराने महाराष्ट्रातच नाही तर जगभरात डॉ. आनंदीबाई जोशी हे नाव घेतले जाते. आनंदीबाई अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून वेळप्रसंगी समाजाचा रोष पत्करून शिकल्या आणि भारतातील पहिल्या महिला डॉक्टर होण्याचा मान त्यांनी मिळवला.
 • आता त्यांच्या याच प्रेरणादायी जीवनसंघर्षावर आधारित ‘आनंदी गोपाळ’ हा चित्रपट पुढील महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
 • देशातील प्रत्येक महिलेला आनंदीबाई म्हणजे महाराष्ट्राने दिलेली देगणी असल्याचे म्हणत या चित्रपटाची झी स्टुडिओने घोषणा केली आहे.
 • आनंदीबाईचा जीवनप्रवास १५ फेब्रुवारीला रुपेरी पडद्यावर उलगडणार आहे.

?1. Rishabh Pant first Indian wicket-keeper to claim 20 catches in Test series

Indian wicket-keeper batsman Rishabh Pant became the country’s first keeper to complete twenty catches in a Test series, during the final day of the ‘Boxing Day Test’. Pant surpassed former cricketers Naren Tamhane and Syed Kirmani who had recorded nineteen dismissals in 1954-55 and 1979-80 respectively. Australia’s Brad Haddin holds the record for taking most catches in a Test series (29).

?2. Bhutan PM Dr. Lotay Tshering concluded his 3-day visit to India

This was Prime Minister Dr. Lotay Tshering’s first overseas visit after assuming the office in November 2018. This was also the Golden Jubilee year of the establishment of formal diplomatic relations between India and Bhutan. Mr Modi and Dr. Tshering reiterated their commitment to jointly develop 10,000 MWs of hydropower generating capacity in Bhutan and in this regard discussed the Sankosh Hydropower Project. Prime Minister Modi had announced a 4,500 crore rupees financial assistance to Bhutan for its 12th five-year plan. India will give a transitional Trade Support Facility of 400 crore rupees to Bhutan over a period of five years to strengthen bilateral trade and economic linkages.

?3. Germany approves USD 8 billion rail and road tunnel link to Denmark

German authorities gave their approval to an US$8 billion (6.30 billion pounds) rail and road tunnel linking Denmark and Germany, despite environmental objections. It is part-funded by the European Union. The 19 km (11.8 mile) Fehmarnbelt link, connecting the Danish island of Lolland to the island of Fehmarn on the German side, was due to be completed in 2024.

?4. Bangladesh’s PM Hasina wins third straight

Bangladesh PM Sheikh Hasina has secured her third consecutive term, with her alliance winning 287 of the 298 seats for which results have been declared for the 300-strong parliament. The main opposition Bangladesh Nationalist Party, which boycotted the 2014 poll, has won just six seats in the general election held on December 30.

?5. Transgenders can file sexual harassment case under IPC

Delhi High Court has allowed that Section 354A of Indian Penal Code (IPC) can be used by transgenders to register complaints of sexual harassment. According to the police, there was a lack of an appropriate penal section under which they could register such a complaint.

?6. Cabinet approves listing of 7 unlisted CPSEs on Stock Exchange

The Cabinet Committee on Economic Affairs, chaired by the Prime Minister Narendra Modi gave its approval to list seven Central Public Sector Enterprises (CPSE) on the Stock Exchange through Initial Public Offering (IPO) /Further Public Offer (FPO): ♦ Telecommunication Consultants (India) [TCIL]; ♦ RailTel Corporation India; ♦ National Seed Corporation India (NSC); ♦ Tehri Hydro Development Corporation (THDC); ♦ Water & Power Consultancy Services (India) [WAPCOS Ltd.]; ♦ FCI Aravali Gypsum and Minerals (India) [FAGMIL]; ♦ Kudremukh Iron Ore Company (KIOCL).

?7. Government doubles export incentives for onion farmers to 10 percent

Government has doubled the export incentives for onion farmers from existing 5 percent to 10 percent. This is the result of steep drops in recent weeks in the prices for onions, a staple food in India. The export incentive for fresh Onions was zero before July, 2018. During July this year, the incentives were introduced at the rate of five percent. The Ministry said, now, with the current increase, Onions enjoy one of the highest incentives for Agro-exports.

?8. PM Modi inaugurated 6th International Rice Research Institute in Varanasi

Prime Minister Narendra Modi visited Varanasi and Ghazipur in Uttar Pradesh. He dedicated the 6th International Rice Research Institute (IRRI), South Asia Regional Center (ISARC) to the nation. The Institute is built at the campus of National Seed Research and Training Center (NSRTC) in Varanasi. During the visit, he laid the foundation stone of medical College in Ghazipur. He also released a commemorative postal stamp on Maharaja Suheldev. Another important announcement is the SAMPANN software which is developed to ease the problems of pensioners. PM Modi also inaugurated 15 projects worth Rs. 80 crore in his constituency Varanasi.

?9. Center has given an extension of 6 months to complete the ongoing exercise for updating the NRC

The Center given an extension of six months to complete the ongoing exercise for updating the National Register of Citizens (NRC) in Assam by 30th June 2019 as the enumeration of citizens in the NRC cannot be completed within the earlier specified date of 31st December 2018. The Registrar General of India, Mr. Sailesh issued a notification that stated the Central Government considers the extension necessary in lieu of public interest to complete the update of the National Register of Citizens. The first notification regarding the same was issued by the Government on 6th December 2013 and had set a deadline of 3 years to complete the entire process but since then five extensions have been given but the exercise had not been completed.

?10. NHRC launches toll free helpline 14433 facility to file complaint through CSC

National Human Rights Commission (NHRC) launched a toll-free number 14433 and a facility to file complaints through Common Service Center (CSC). The toll-free number is 14433 and has been unveiled by Justice (retd.) H.L.Dattu, Chairperson of NHRC at the headquarters of the body, Manav Adhikar Bhawan. People can now send their complaints related to human rights violation through both the toll-free number and CSCs, although the toll-free number will only be available during office hours. A collaboration between NHRC and CSC has been formed and the service has been provided to 750 CSCs with at least one in each district. Secretary-General of NHRC.

 


Latest Current Affairs Videos

Latest Current Affairs Videos