Current Affairs 30 JULY 2020

296
0
Share:

 

?1. चीनला इशाऱ्यासाठी भारताकडून हिंदी महासागरात युद्धनौका तैनात

 • पूर्व लडाखमधील चीनशी संघर्षांनंतर भारतीय नौदलाने हिंदी महासागरात मोठय़ा प्रमाणात युद्धनौका व पाणबुडय़ा तैनात केल्या आहेत. संरक्षण दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार यातून चीनला कठोर संदेश देण्यात आला .
 • १५ जून रोजी गलवान येथे चिनी लष्कराने केलेल्या हिंसाचारात भारताचे २० सैनिक शहीद झाले होते, त्यात चीनचेही ३५-४० सैनिक मारले गेल्याचे अमेरिकी गुप्तचरांनी सांगितले होते पण चीनने हा आकडा कधीच उघड केला नाही. संरक्षण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लष्कर, हवाई दल व नौदल या तीन पातळ्यांवर सरकारने चीनविरोधात आघाडी उघडली असून त्याच्या जोडीला राजनैतिक व आर्थिक मार्गाचा वापर केला जात आहे.
 • चीनने पूर्व लडाखमध्ये केलेले दु:साहस मान्य नसल्याचे यातून भारताने दाखवून दिले आहे. तीनही सेना दलांच्या प्रमुखांमध्ये रोजच्या रोज संपर्क असून चीनचा मुकाबला करण्यासाठी स्पष्ट संदेश जातील अशा कृती केल्या जात आहेत.
 • भारताच्या कृतीवर चीनने प्रतिसाद दिला आहे काय, यावर सूत्रांनी सांगितले,की हिंदी महासागरात चीनची तैनाती वाढलेली नाही. त्यांच्या युद्धनौका व जहाजे होती तेवढीच आहेत. दक्षिण चीन सागरात चीनने मोठय़ा प्रमाणात तैनाती केल्यामुळे हिंदी महासागरात त्यांनी प्रतिसाद दिला नसण्याची शक्यता आहे.
 • चीनच्या विस्तारवादी भूमिकेला अमेरिकेचा विरोध असून दक्षिण चीन सागरातील चीनच्या कारस्थानांना अमेरिकेसह अनेक देशांनी विरोध केला आहे. अमेरिकेने सध्या दक्षिण चीन सागरात युद्धनौका तैनात केल्या असून आता भारतानेही हिंदी महासागरात तसाच पवित्रा घेत, अमेरिकी नौदल, जपानी स्वसंरक्षण दल यांच्या सहकार्याने मोहीम सुरू केली आहे.
 • भारताने अलीकडेच फ्रान्स, अमेरिका, जपान यांच्या नौदलांबरोबर हिंदी महासागरात संयुक्त कवायती केल्या होत्या, त्यातूनही चीनला संदेश देण्यात आला होता. या कवायतीत अमेरिकेची युएसएस निमित्झ युद्धनौका सामील होती. भारत,जपान, अमेरिका व ऑस्ट्रेलिया यांचा ‘क्वाड’ गट तयार करण्यात आला असून तो चीनच्या विरोधात आहे. 

?2. प्रदूषण! भारतातली १४० कोटी जनतेचं आयुष्य ५.वर्षांनी घटलं

 • दिवसेंदिवस वाढत चाललेल्या प्रदूषणामुळे भारतातील लोकांचं आयुष्यमान घटतंय. एका नव्या संशोधनातून समोर आलंय. भारतातील लोकांचं आयुर्मान (Life Expectancy) ५.२ वर्षांनी घटतेय आणि त्याचं कारण म्हणजे प्रदूषण, असं या अभ्यासात म्हटलं गेलंय.
 • अमेरिकेच्या शिकागो युनिव्हर्सिटीच्या ‘द एनर्जी पॉलिसी इन्स्टिट्युट’नं हा खुलासा केलाय. यामध्ये, भारतातील वायू प्रदूषणाचा मोठा परिणाम भारतीयांच्या आयुष्यावर होत असल्याचं नमूद करण्यात आलंय.
 • बांग्लादेशानंतर भारत हा दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे जिथे प्रदूषणामुळे मोठ्या प्रमाणात लोकांचं आयुष्य कमी होत चाललंय.
 • ‘जागतिक आरोग्य संघटने’नं (World Health Organisation) प्रदूषणासंबंधी जारी केलेल्या गाईडलाईन्सनुसार, भारताच्या संपूर्ण लोकसंख्या अर्थात १४० कोटी भारतीय नागरिक प्रदूषणात आपलं आयुष्य जगत आहेत तर ८४ टक्के लोक भारतानं बनवलेल्या प्रदूषणाच्या गाईडलाईन्सनुसार, प्रदूषणात आपलं जीवन जगत आहेत.
 • देशात राजधानी दिल्लीनंतर उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ सर्वात जास्त प्रदूषित शहर ठरलंय. लखनऊमधल्या नागरिकांचं आयुर्मान १०.३ वर्षांनी घटलंय. तर दिल्ली वासियांचं आयुर्मान ९.४ वर्षांनी घटलंय.

?3. फ्रान्समधील आंतरराष्ट्रीय तापनाभिकीय प्रायोगिक अणुभट्टी (ITER) येथे कार्याला प्रारंभ झाला

 • 28 जुलै 2020 रोजी फ्रान्समधील सेंट पॉल-लेझ-दुरांस या शहरात उभारलेल्या ITER टोकमॅकच्या असेम्ब्लीचे काम सुरु झाले. त्यानिमित्त फ्रान्सचे राष्ट्रपती मॅक्रॉन यांनी एक आभासी सोहळा आयोजित केला होता.

प्रकल्पाविषयी

 • आंतरराष्ट्रीय तापनाभिकीय प्रायोगिक अणुभट्टी (इंटरनॅशनल थर्मोन्यूक्लियर एक्सपिरिमेंटल रिएक्टर – ITER) हा फ्रान्समध्ये एक मोठ्या प्रमाणावर केला जाणारा वैज्ञानिक प्रयोग आहे, ज्यामधून न्यूक्लियर फ्यूजनद्वारा व्यावसायिक पातळीवर ऊर्जा तयार करणे शक्य आहे. भारत, चीन, अमेरिका, रशिया, जपान, दक्षिण कोरिया आणि युरोपीय संघ हे सात देश या प्रकल्पाचा भाग आहेत.
 • न्यूक्लियर फ्यूजनद्वारा ऊर्जा निर्मिती करण्याच्या उद्देशाने फ्रान्समध्ये चालविणार्‍या आंतरराष्ट्रीय तापनाभिकीय प्रायोगिक अणुभट्टी (ITER) संशोधन प्रकल्पासाठी उपकरणे पुरविण्यात भारताने पुढाकार घेतला आहे. ITER-भारत प्रकल्प हा संपूर्ण प्रकल्पामधील एक भाग सिरिश देशपांडे यांच्या नेतृत्वात चालवला जात आहे. आतापर्यंत पुरविण्यात आलेल्या एकूण यंत्रसामुग्रीपैकी जवळजवळ 40 टक्के भार भारतातून आला आहे.
 • भारत प्रकल्पाला त्याचे लक्ष्य साध्य करण्यासाठी आणि प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी, क्रायोस्टॅट, इन-व्हेसल शिल्ड्स, कुलिंग वॉटर, क्रायोजेनिक आणि क्रायो-डिस्ट्रिब्यूशन प्रणाली, RF आणि बीम तंत्रज्ञान वापरून सहाय्यक हीटिंग उपकरणे,  मल्टिमेगा वॅट वीज पुरवठा आदी बाबींमध्ये भारताने भरीव योगदान देत आहे.

?4. बिबटय़ांनाही आता ‘रेडिओ कॉलर’

 • राज्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात वाघ आणि माणसांचा तर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान परिसरात बिबट आणि माणसांचा संघर्ष नित्याची बाब झाली आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय वन्यजीव संस्थेच्या सहकार्याने गेल्या काही वर्षांपासून वाघांना रेडिओ कॉलर लावून अभ्यास केला जात आहे. त्याच धर्तीवर आता वन्यजीव संवर्धन संस्था-भारत यांच्या सहकार्याने बिबटय़ांना जीपीएस-जीएसएम कॉलर लावून मानव-बिबट सहसंबंधांवर प्रकाश टाकला जाणार आहे.
 • केंद्रीय पर्यावरण, वने व हवामानबदल मंत्रालयाने दूरमिती पद्धतीने होणाऱ्या या अभ्यासासाठी १४ जुलैला मंजुरी दिली आहे. त्याची सुरुवात बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील बिबटय़ांना रेडिओ कॉलर लावून होणार आहे. सलग दोन वर्षांच्या या अभ्यासानंतर मानव-बिबट सहसंबंधांच्या अभ्यासाचे निष्कर्ष समोर येतील.
 • बिबटय़ांना रेडिओ कॉलर लावून त्यांचा भ्रमणमार्ग, अधिवास आणि आवास क्षेत्र समजून घेण्यास या अभ्यासातून मदत होणार आहे. याकरिता वन्यजीव संवर्धन संस्था-भारत आणि वनखाते यांच्यात सामंजस्य करार झाला होता. राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक(वन्यजीव) यांनी यासाठी परवनगी देखील दिली होती.

प्रकल्पाची वैशिष्टय़े

 • मानव व बिबटय़ातील परस्परसंबंध व एकमेकांशी ते कसे जुळवून घेतात हे पाहणे.
 • मुंबईतील बिबट उत्तरेकडील मोठा रस्ता ओलांडून तुंगारेश्वर अभयारण्यात कसे जातात ते पाहणे.
 • संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील बिबट तेथील जागा व वेळेचा वापर कशाप्रकारे करतात ते समजून घेणे.
 • अभ्यासातील निष्कर्षांच्या आधारे या क्षेत्रातील बिबटय़ांचा वावर व संघर्ष निवारणसंबंधी शिफारशी सुचवणे.
 • केंद्रीय पर्यावरण, वने व हवामानबदल विभागाने याला मान्यता दिली याचा अनंद आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून या लाजाळू प्राण्याबाबत अमूल्य माहिती मिळेल अशी अपेक्षा आहे.
 • आधीच्या प्रकल्पातून ग्रामीण भागात बिबट माणसांसोबत कसे राहतात, याविषयी बरीच माहिती मिळाली आहे. पण इतकी घनदाट मानववस्ती असलेल्या भागात आणि माणसांच्या इतक्या जवळ बिबट कसे राहतात हे जाणून घेण्यासाठीचा हा पहिलाच अभ्यास असेल. 

?5. रजत भाटियाची क्रिकेटमधून निवृत्ती

 • दिल्लीचा अष्टपैलू क्रिकेटपटू रजत भाटियाने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. दिल्लीच्या सर्वोत्तम क्रिकेटपटूंमध्ये ४० वर्षीय भाटियाचे नाव घेण्यात येते.
 • त्याने ११२ प्रथम श्रेणी लढती खेळताना ६४८२ धावा फटकावल्या. गोलंदाजीतही १३७ बळी घेतले. गेल्या हंगामात बांगलादेशमध्ये ‘अ’ श्रेणीचे सामने खेळण्याची भाटियाला संधी मिळाली होती.
 • भाटियाला २०१४मध्ये भारताकडून खेळायची एकमेव संधी होती. मात्र ती हुकली. अर्थातच त्याचे दु:ख करून घेत नाही, असे भाटियाने सांगितले.
 • ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या संभाव्य संघात २०१४मध्ये भाटियाचा समावेश झाला होता. मात्र नंतर भारतीय संघात त्याची निवड झाली नाही.

Latest Current Affairs Videos

Latest Current Affairs Videos