Current Affairs 31 JULY 2020

477
0
Share:

 

?1. केंद्र सरकार 23 सार्वजनिक उपक्रमांमधून निर्गुंतवणूक करणार

 • अर्थमंत्रालयाने 23 सार्वजनिक उपक्रमांमधून निर्गुंतवणूक करण्याची योजना तयार केली असल्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी केली आहे.
 • प्रस्तावानुसार, सार्वजनिक क्षेत्रातल्या 23 सरकारी कंपन्यांच्या भागभांडवलांची खासगी क्षेत्राला विक्री केली जाणार आहे. यासाठी मंत्रिमंडळाने आधीच मान्यता दिली आहे.
 • 2020-21 या आर्थिक वर्षात केंद्र सरकारने10 लक्ष कोटी रुपयांच्या निर्गुंतवणुकीचे लक्ष्य ठेवले आहे. त्यापैकी 1.20 लक्ष कोटी रुपये सार्वजनिक क्षेत्रातल्या उपक्रमांमधून तर 90 हजार कोटी रुपये वित्तीय संस्थांमधील सरकारी हिस्सेदारीच्या विक्रीतून मिळतील.

निर्गुंतवणूक म्हणजे काय?

 • निर्गुंतवणूक म्हणजे सरकारच्या मालकी हक्कातल्या सार्वजनिक क्षेत्रातले उपक्रम, प्रकल्प किंवा इतर मालमत्तेची विक्री करणे होय.
 • सरकारी तिजोरीवरील आर्थिक भार कमी करण्याच्या किंवा विशिष्ट आवश्यकता पूर्ण करण्यासाठी निधी उभा करण्याच्या उद्देशाने ही प्रक्रिया चालवली जाते. आणि प्राप्त निधीतून इतर नियमित स्रोतांकडून होणाऱ्या महसुलातली तूट भरून काढता येते. 

?2. “BelYo”: भारताचे पहिलेकोविड-19 ब्लॉकचेन प्लॅटफॉर्म

 • “BelYo” या नावाने भारताचे पहिले ‘कोविड-19 ब्लॉकचेन प्लॅटफॉर्म’ तयार करण्यात आले आहे.
 • भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनी (ICMR) मान्यता दिलेल्या 730 शासकीय प्रयोगशाळा आणि 270 खासगी प्रयोगशाळांपर्यंत पोहोचणे आणि माहिती गोळा करणे हे हा मंच तयार करण्यामागचे उद्दीष्ट आहे.

ठळक बाबी

 • हा मंच भौतिक स्वरूपात असलेली नागरिकांची कोविड-19 संबंधित वैद्यकीय आणि लसीकरण माहिती डिजिटल स्वरूपात रूपांतरित करतो, जी रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेणाऱ्या आरोग्य सेतूसारख्या कोणत्याही अॅपमार्फत पुनर्प्राप्त केली जाऊ शकते.
 • एखादी व्यक्ती क्यूआर कोडच्या मदतीने स्वतःचे परीक्षण करू शकते आणि त्यासंबंधीची माहिती पुनर्प्राप्त करू शकते, ज्यामुळे प्रक्रिया 100 टक्के संपर्क-विरहित होते.
 • हा मंच बेलफ्रिक्स बीटी ही कंपनी, बंगळुरूच्या भारतीय विज्ञान संस्थेच्या (IISc) संगोपनाखाली असलेली योसिंक ही स्टार्टअप कंपनी यांनी संयुक्तपणे विकसित केला आहे.
 • याच्या विकासासाठी एमफॅसिस एफ1 फाउंडेशन या संस्थेनी वित्तपूरवठा केला.

?3. झिम्बाब्वेसोबतच्या पारंपरिक औषधी होमिओपथी क्षेत्रातल्या सहकार्यासंबंधीच्या सामंजस्य कराराला केंद्रीय मंत्रीमंडळाची मंजुरी

 • 29 जुलै 2020 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या केंद्रीय मंत्रीमंडळ बैठकीत भारत आणि झिम्बाब्वे दरम्यान पारंपरिक औषधी व होमिओपथी उपचारपद्धती क्षेत्रातल्या परस्पर सहकार्यासंबंधीच्या सामंजस्य कराराला पूर्वलक्षी प्रभावाने मंजूरी देण्यात आली.
 • समानता आणि परस्पर लाभाच्या जोरावर दोन्ही देशांमधील पारंपरिक औषधी क्षेत्रातील सहकार्य बळकट करणे, त्याचे संवर्धन करणे आणि विकास करणे हे या सामंजस्य कराराचे मुख्य उद्दीष्ट आहे.
 • 3 नोव्हेंबर 2018 रोजी या संदर्भातल्या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या होत्या. या कराराच्या माध्यमातून पारंपारिक औषधी आणि होमिओपॅथीच्या प्रसारासाठी दोन्ही देशांमधील सहकार्यासाठी एक आराखडा तयार करण्यात येणार ज्याचा दोन्ही देशांतल्या पारंपारिक वैद्यकीय क्षेत्राला लाभ होणार.

झिम्बाब्वे देश

 • झिम्बाब्वे हा दक्षिण आफ्रिकेतला एक देश आहे. झिम्बाब्वेच्या उत्तरेला झाम्बिया, पूर्वेला मोझांबिक, दक्षिणेला दक्षिण आफ्रिका व पश्चिमेला बोत्स्वाना हे देश आहेत.
 • राजधानी शहर – हरारे
 • राष्ट्रीय चलन – झिम्बाब्वे डॉलर 

?4. टपाल तिकीटावर दिसणार राम मंदिर, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार प्रकाशित

 • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पाच ऑगस्ट रोजी अयोध्येत राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडणार आहे. हा भूमिपूजनाचा सोहळा पार पडल्यानंतर त्याच दिवशी पंतप्रधानांच्या हस्ते राम मंदिराची प्रातिनिधिक चित्र असणारे आणि रामायणावर आधारित पोस्टाचे तिकीट प्रकाशित केले जाण्याची शक्यता आहे.
 • राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्याची जोरदार तयारी अयोध्येत सुरु झाली आहे. असं असतानाच या सोहळ्याचे आयोजक असणाऱ्या राम जन्मभूमी तिर्थक्षेत्र ट्रस्टने राम भक्तांना पाच ऑगस्ट रोजी अयोध्येत येऊन गर्दी करु नये असं आवाहन केलं आहे. सर्व राम भक्तांना ‘राम जन्मभूमी मंदिर निर्माण यज्ञा’मध्ये सहभागी होण्याची संधी योग्यवेळी दिली जाईल असंही ट्रस्टने स्पष्ट केलं आहे. अयोध्या रिचर्स इन्स्टीट्यूटचे निर्देशक व्हाय. पी. सिंग यांनी इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या माहितीनुसार पोस्टाचे विशेष तिकीट प्रकाशित केलं जाणार आहे.
 • “सर्व काही ठरवल्याप्रमाणे झालं तर पाच ऑगस्ट रोजीच पोस्टाचे तिकीट प्रकाशित केलं जाईल. यापैकी एक तिकीट हे राम मंदिराची प्रातिनिधिक प्रतिकृती असणारं असेल तर दुसऱ्यावर इतर देशांमध्ये रामाचे महत्व सांगणाऱ्या गोष्टी असतील,” असं सिंग यांनी सांगितलं आहे. अयोध्या रिसर्च इन्स्टीट्यूटच्या माध्यमातून रामलीलेसंदर्भातील काही विशेष पोस्टर आणि कटआऊट्स बनवले जात आहेत.
 • जगभरामध्ये प्रभू रामाचा वेगवगेळ्या संस्कृतींमध्ये असणारा प्रभाव या पोस्टर आणि कटआऊट्समध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला जाणार आहेत. राम मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावर हे हे पोस्टर आणि कटआऊट्स ठेवले जाणार आहेत.

?5. 10 ऑगस्टपर्यंत करोनाची लस उपलब्ध होणार:

 • जगभरात करोनाचा कहर सुरु असताना रशियातून एक चांगली बातमी समोर आली आहे. 10 ऑगस्टपर्यंत करोनावरच्या पहिल्या लसीला मंजुरी देऊ शकतो असा दावा रशियाच्या वैज्ञानिकांनी केला आहे.
 • पुढील दोन आठवड्यांमध्ये रशिया करोना व्हायरसवरची लस बाजारात आणू शकतं.
 • रशियन अधिकारी आणि वैज्ञानिकांनी CNN शी बोलताना हे वक्तव्य केलं आहे. मॉस्कोतल्या गामालेया इन्सिट्युटमध्ये ही लस तयार करण्यात आली आहे.
 • गामालेया इन्सिट्युटचा वैज्ञानिकांचा दावा आहे की, सामान्य लोकांच्या वापरासाठी या लसीला 10 ऑगस्टपर्यंत मंजुरी देऊ शकतो. पण सर्वात आधी लस फ्रंटलाईन आरोग्य कर्मचाऱ्यांना दिली जाईल असंही रशियाच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.

?6. DRDO कडूनडेअर टू ड्रीम 2.0′ ही नव उद्योजकांसाठीची स्पर्धा जाहीर

 • 27 जुलै 2020 रोजी माजी राष्ट्रपती ‘मिसाईल मॅन’ डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या पाचव्या स्मृतिदिनानिमित्त, संरक्षण संशोधन व विकास संघटनेनी (DRDO) संशोधन कार्यासंबंधी “डेअर टू ड्रीम0” ही स्पर्धा जाहीर केली.
 • नव्याने उदयाला येत असलेले तंत्रज्ञान लक्षात घेऊन ही योजना तयार करण्यात आली आहे. ‘आत्मनिर्भर भारत’ अंतर्गत व्यक्तिगत पातळीवर संशोधन करणारे संशोधक आणि नवउद्योजक यांच्या संरक्षण आणि उड्डयणशास्त्र तंत्रज्ञान क्षेत्रातल्या संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना आहे.
 • देशातल्या संशोधक व नवउद्योजकांसाठी प्रोत्साहनपर खुले आव्हान आहे. तज्ञ समितीकडून योग्य परीक्षणानंतर विजेते निवडले जाणार. नवउद्योजकांना 10 लक्ष रुपयांपर्यंत तर व्यक्तिगत गटात पाच लक्ष रुपये अशी रोख बक्षिसे विजेत्यांसाठी जाहीर करण्यात आली आहेत.

?7. भारतासाठी हर्ड इम्युनिटी पर्याय असू शकत नाही:

भारतातील लोकसंख्येचे प्रमाण लक्षात घेता, करोना व्हायरसची साथ रोखण्यासाठी हर्ड इम्युनिटीवर अवलंबून राहता येणार नाही असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी स्पष्ट केले.

लस हाच करोना व्हायरसवर मात करण्याचा मार्ग आहे असे सरकारचे मत आहे.“हर्ड इम्युनिटी हे आजारापासून मिळणारे अप्रत्यक्ष संरक्षण आहे.

हर्ड इम्युनिटी लोकसंख्येला आजारापासून वाचवते पण लस तयार होईल तेव्हाच हर्ड इम्युनिटी तयार होईल किंवा नागरिकांना करोनाची लागण होऊन ते त्यातून बरे झाले, तर हर्ड इम्युनिटी तयार होते.

भारतासाठी हर्ड इम्युनिटी पर्याय असू शकत नाही. लस दिल्यानंतरच हर्ड इम्युनिटी तयार होऊ शकते” असे आरोग्य मंत्रालयाने पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

 


Latest Current Affairs Videos

Latest Current Affairs Videos