Current Affairs 28 JULY 2020

288
0
Share:

 

 

?1. अमेरिका : राष्ट्राध्यपदाच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं; २९ सप्टेंबर रोजी पहिली डिबेट

 • सध्या जगभरात करोना विषाणूनं थैमान घातलं असून अमेरिकेला याचा सर्वाधिक फटकादेखील बसला आहे. असं असलं तरी अमेरिकेत मात्र राष्ट्राध्यपदाच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे.
 • निवडणुकीसाठी पहिली डिबेट २९ सप्टेंबर रोजी ओहियोमध्ये पार पडणार आहे. कमिशन ऑफ प्रेसिडेन्शिअल डिबेट्सनं सोमवारी याबाबत माहिती दिली.
 • “क्लिव्हलँडच्या केस वेस्टर्न विद्यापीठ आणि क्लिव्हलँड क्लिनिक ही डिबेट होस्ट करणार आहेत,” अशी माहितीही यावेळी देण्यात आली. २९ सप्टेंबर रोजी हेल्थ एज्युकेशन कँपसमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्य डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रेट्सचे उमेदवार आणि माजी राष्ट्राध्यक्षे जो बायडेन यांच्यादरम्यान थेट डिबेट होणरा आहे.
 • दोन्ही नेते १५ ऑक्टोबर रोजी फ्लोरिडातील मायामीमध्ये पुन्हा एकमेंकासमोर येणार आहे. तर तिसरी डिबेट २२ ऑक्टोबर रोजी होणार आहे.
 • अमेरिकेत उप-राष्ट्राध्यक्षपदासाठी ७ ऑक्टोबर रोजी पहिली डिबेट होणार आहे. सॉल्ट लेक सिटी विद्यापीठात पार पडणाऱ्या या डिबेटमध्ये उप-राष्ट्राध्यक्ष माईक पेंस हे डेमोक्रेट्रिक पक्षाच्या उमेदवारासमोर येणार आहे. सध्या डेमोक्रेटिक पक्षाकडून आपल्या उमेदवाराची घोषणा करण्यात आलेली नाही. या सर्व डिबेट ९० मिनिटांच्या असतील. तसंच या रात्री ९ ते १०.३० दरम्यान होणार आहे. या सर्व डिबेट्सचं अमेरिकेत थेट प्रक्षेपणही करण्यात येणार आहे.

सर्वेक्षणात बायडेन यांची बाजी

 • आठवडाभरापूर्वी करण्यात आलेल्या सर्वेक्षणात बायडेन यांनी बाजी मारल्याचं दिसून आलं होतं. एसीबी न्यूज/ वॉशिंग्टन यांच्या सर्वेक्षणाची माहिती १९ जुलै रोजी जारी करण्यात आली होती.
 • यानुसार ट्रम्प यांना ४४ तर बायडेन यांना ५४ टक्के लोकांचं समर्थन असल्याचं समोर आलं होतं. सलग पाचव्या राष्ट्रीय सर्वेक्षणात बायडेन यांनी बाजी मारल्याचं दिसून आलं होतं.

कधी होणार डिबेट

 • पहिली डिबेट : २९ सप्टेंबर क्विव्हलँडमध्ये
 • दुसरी डिबेट : १५ ऑक्टोबर मायामीमध्ये
 • तिसरी डिबेट : २२ ऑक्टोबर नॅशविलेमध्ये 

?2. केंद्र सरकारचे हे खास मोबाइल ॅप देणार 450 शहरांतील हवामानाची माहिती

 • केंद्र सरकारने देशातील बदलते हवामान आणि त्याची माहिती लोकांपर्यंत सहजपणे पोहोचावी यासाठी एक नवीन मोबाइल अ‍ॅप लाँच केले आहे. ‘मौसम’ नावाचे हे अ‍ॅप भूविज्ञान (पृथ्वी विज्ञान मंत्रालय) मंत्री हर्षवर्धन यांनी लाँच केले आहे. ‘मौसम’ हे अ‍ॅप अँड्रॉइड युजर्ससाठी गुगलच्या प्ले-स्टोअर आणि अ‍ॅपल युजर्ससाठी अ‍ॅप स्टोअरवर उपलब्ध झाले आहे.
 • जवळपास 200 शहरांचे तापमान, आर्द्रता, हवेचा वेग, दिशा इत्यादी अनेकप्रकारची माहिती ‘मौसम’ अ‍ॅपद्वारे मिळेल. त्याचबरोबर जवळपास 450 शहरांच्या आगामी सात दिवसांच्या हवामानाबाबतचा अंदाज अ‍ॅपच्या माध्यमातून तुम्हाला कळेल. यातील माहिती दिवसातून आठ वेळेस अपडेट होईल.
 • एखाद्या शहरातील गेल्या 24 तासांमधील आकडेवारीही यात दिसेल. तर, यामध्ये युजर्सना अलर्ट करण्यासाठी सर्व जिल्हे लाल, पिवळा आणि नारंगी या तीन रंगांमध्ये दाखवणारे फीचरही आहे.
 • हवामानाची सर्व महत्त्वाची ‘मौसम’ अ‍ॅपद्वारे माहिती मिळेल. ‘मौसम’ अ‍ॅप इंटरनॅशनल क्रॉप्स रिसर्च इंस्टीट्यूट फॉर सेमी-एरिड ट्रॉपिक्स (ICRISAT),भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था (आयआयटीएम) आणि भारतीय हवामान विभाग (आयएमडी) यांनी संयुक्तपणे डेव्हलप केले आहे. यावेळी, वेधशाळेच्या नेटवर्कमध्ये वाढ करण्यासाठी, नवीन संगणकीय संसाधने खरेदी करण्यासाठी मोठ्या गुंतवणूकीची आवश्यकता असल्याचे हर्षवर्धन यांनी म्हटले आहे.

 ?3. इटोलिझुमाब प्रभावी नाही कोविड दलाचे प्रतिकूल मत:

 • बायोकॉन कंपनीने सोरायसिसवर तयार केलेले इटोलिझुमाब हे औषध आपत्कालीन करोना वैद्यकीय उपचारात समाविष्ट करण्याइतके प्रभावी नाही असे मत कोविड १९ विशेष समिती सदस्यांनी व्यक्त केले असून या औषधाबाबत प्रतिकूल मत दिले आहे.
 • बायोकॉनच्या प्रमुख किरण शॉ मुझुमदार यांनी या औषधाच्या उपयुक्ततेबाबत अधिक माहिती समितीला सादर करण्याची तयारी दर्शवली आहे. या औषधाच्या उपचारासाठी 40 हजार रु. खर्च येतो.
 • इटोलिझुमाब हे औषध म्हणजे मोनोक्लोनल प्रतिपिंडाचा प्रकार असून ते बायोकॉनने सेंटर फॉर मॉल्यिकुलर इम्युनॉलॉजी या क्युबातील संस्थेच्या मदतीने तयार केले आहे.
 • 12 जुलैला या औषधाचा वापर कोविड रुग्णांवर आपत्कालीन परिस्थिीतीत करण्यास भारताच्या औषध महानियंत्रकांनी मान्यता दिली होती पण आता कोविड विशेष समितीने या औषधाचा समावेश करोना वैद्यकीय व्यवस्थापनात करू नये अशी सूचना केली आहे.
 • एक हजार रुग्णात या औषधाचे चांगले परिणाम दिसून आले असल्याचा दावा कंपनीने केला आहे. 

?4 .29 सप्टेंबर रोजी हेल्थ एज्युकेशन कँपसमध्ये पहिली डिबेट:

 • सध्या जगभरात करोना विषाणूनं थैमान घातलं असून अमेरिकेला याचा सर्वाधिक फटकादेखील बसला आहे. असं असलं तरी अमेरिकेत मात्र राष्ट्राध्यपदाच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे.
 • निवडणुकीसाठी पहिली डिबेट 29 सप्टेंबर रोजी ओहियोमध्ये पार पडणार आहे. कमिशन ऑफ प्रेसिडेन्शिअल डिबेट्सनं सोमवारी याबाबत माहिती दिली.
 • “क्लिव्हलँडच्या केस वेस्टर्न विद्यापीठ आणि क्लिव्हलँड क्लिनिक ही डिबेट होस्ट करणार आहेत,” अशी माहितीही यावेळी देण्यात आली. 29 सप्टेंबर रोजी हेल्थ एज्युकेशन कँपसमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्य डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रेट्सचे उमेदवार आणि माजी राष्ट्राध्यक्षे जो बायडेन यांच्यादरम्यान थेट डिबेट होणारा आहे.

?5. चीनवर दुसऱ्यांदाडिजिटल स्ट्राइक‘! भारत सरकारने अजून 47 ॅप्स केले Ban

 • चीनशी संबंधित कंपन्यांवर भारत सरकारने दुसऱ्यांदा मोठी कारवाई केली आहे. ‘इंडियाटुडे’च्या वृत्तानुसार, 59 चिनी अ‍ॅप्स बॅन केल्यानंतर भारत सरकारने अजून 47 चिनी अ‍ॅप्स बॅन केले आहेत. नव्याने बॅन करण्यात आलेल्या अ‍ॅप्समध्ये बहुतांश ‘क्लोनिंग’ अ‍ॅपचा समावेश आहे.
 • बॅन केलेले क्लोनिंग अ‍ॅप्स म्हणजे आधीपासून बॅन असलेल्या अ‍ॅपसाठी पर्याय म्हणून उतरवण्यात आले होते. नव्याने बॅन केलेल्या अ‍ॅप्सची यादी लवकरच जारी केली जाणार आहे. याशिवाय, युजरची खासगी माहितीचोरी, तिचा गैरवापर, राष्ट्रीय सुरक्षेला धोका यांच्या आधारे भारत सरकारने अजून 250 अ‍ॅप्सची यादीही बनवली असल्याची माहिती सुत्रांची माहिती आहे.
 • नव्याने बॅन करण्यात आलेल्या अ‍ॅप्सच्या यादीत यावेळेस काही आघाडीच्या गेमिंग अ‍ॅप्सचाही समावेश असण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.
 • दरम्यान, भारत-चीन सीमेवर संघर्षादरम्यान भारतीय जवान शहीद झाल्यानंतर देशभरात चीनविरोधात संतापाची लाट उसळली होती. त्यानंतर गेल्या महिन्यात वापरकर्त्यांची माहितीचोरी, तिचा गैरवापर, राष्ट्रीय सुरक्षेला धोका आणि नागरिकांची मागणी यांच्या आधारे 59 अ‍ॅप्सवर बंदी घालून भारताने चीनला दणका दिला होता.
 • यामध्ये टिकटॉक, कॅमस्कॅनर, शेअरइट अशा अनेक लोकप्रिय अ‍ॅप्सचा समावेश होता. त्यानंतर आता सरकारने अजून 47 अ‍ॅप्स बॅन करण्याचा निर्णय घेतला असून यावेळी काही लोकप्रिय गेमचाही समावेश असण्याची शक्यता आहे.

Latest Current Affairs Videos

Latest Current Affairs Videos